Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
मराठी द्वेषी | मुंबईत राहून तुझ करिअर कसं बनतं तेच बघतो | मनसे इशारा
सध्या ‘बिग बॉस’चे 14वे पर्व सुरू जोशात सुरू आहे. यात रोज काहीना काही नवे वाद उभे राहत आहेत. स्पर्धकांची आपापसांत रोजची भांडणे सुरू आहेत. आता यात प्रेमाचा त्रिकोण समोर आल्यानंतर नवी खडाजंगी सुरू झाली आहे. गायक राहुल वैद्य, जान कुमार सानू आणि निक्की तंबोली यांच्यात आपापसांत जोरदार वाद सुरू आहेत. या वादादरम्यान जान कुमार सानूने मराठी गायक राहुल वैद्य याच्यावर शाब्दिक हल्लाबोल करताना ‘मराठी’ भाषेबद्दल अपमानकारक शब्द उच्चारले. यानंतर आता मनसेच्या अमेय खोपकरांनी जान कुमार सानूला धमकीवजा इशारा दिला आहे.
5 वर्षांपूर्वी -
VIDEO | विद्यमान मुख्यमंत्र्यांची ती मागणी | मनसेकडून लाव रे तो व्हिडीओ
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस काल उस्मानाबादच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सत्तेत नसताना प्रती हेक्टर २५ हजारांची मदत करण्याची मागणी केली होती यासंबंधीचा व्हिडीओ दाखवला होता. मुख्यमंत्र्यांकडे आपली मागणी पूर्ण करण्याची ही चांगली संधी आहे असा टोला यावेळी त्यांनी लगावला होता.
5 वर्षांपूर्वी -
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
महाराष्ट्रावर मोठया दुष्काळाचं सावट…तर मराठवाडा वाळवंटाच्या दिशेने?
5 वर्षांपूर्वी -
सराफाकडून शोभा देशपांडेंचा मराठीवरून अपमान | मनसेने सोन्यासारखं धूत पिवळा केल्यावर माफी
मनसेने चोप दिल्यानंतर आणि माफी मागत नाही तोवर दुकान उघडू देणार नाही असा इशारा दिल्यानंतर या मुंबईतल्या कुलाबा येथील महावीर ज्वेलर्स चालवणाऱ्या सराफाने लेखिका शोभा देशपांडे यांची माफी मागितली आहे. माझ्याशी मराठीत बोला असा आग्रह धरल्याने लेखिका शोभा देशपांडे यांना या सराफाने हीन वागणूक दिली तसंच दोन महिला पोलिसांच्या मदतीने दुकानाबाहेर ढकलून दिलं अशा आरोप लेखिका शोभा देशपांडे यांनी केला.
5 वर्षांपूर्वी -
ब्रँड राज ठाकरे | कोळी महिलांची समस्या २४ तासात मार्गी | बेकायदा मासेविक्रेते पसार
डोंगरी येथील कोळी महिला काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना भेटण्यासाठी कृष्णकुंज येथे आल्या होत्या. डोंगरी मार्केटमध्ये बेकायदा मासेविक्रेत्यांनी अतिक्रमण केलं असून हे अतिक्रम हटवण्याची मागणी या महिलांनी राज ठाकरे यांच्यापुढे यावेळी मांडली होती.
5 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्र्यांकडून उपहार गृह सुरू करण्याचे संकेत | पण कर्मचाऱ्यांच्या वाहतूक व्यवस्थेचं काय?
भारतात कोरोनाव्हायरस संक्रमितांची संख्या आता 61 लाख 45 हजार 292 झाली आहे. मात्र दिलासादायक बाब म्हणजे गेल्या 24 तासांत निरोगी झालेल्या रुग्णांची संख्या ही नवीन रुग्णांपेक्षा जास्त आहे. 24 तासांत देशात 70 हजार 589 नवीन रुग्ण आढळून आले. तर, 85 हजार 194 रुग्ण निरोगी झाले. दुसरीकडे कोरोना संक्रमितांमध्ये 60 लाखांचा आकडा पार करणारा भारत हा जगातला दुसरा देश आहे. भारताआधी अमेरिकेनं हा आकडा पार केला होता. तर, 24 तासांत देशात 776 रुग्णांचा मृत्यू झाला. यासह एकूण मृतांची संख्या आता 96 हजार 318 झाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज ठाकरेंनी रो-रो बोटीवर मास्क नसल्याने दंड भरल्याचं वृत्त चुकीचं | मनसेकडून खुलासा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क परिधान न केल्यामुळे त्यांना १००० रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ‘मुंबई मिरर’ या इंग्रजी दैनिकात यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध झाले आहे. त्यानुसार राज ठाकरे हे शुक्रवारी मुंबई-मांडवा रो-रो फेरीने अलिबागला जात असताना हा प्रकार घडला. यावेळी रो-रो बोटीत प्रवाशांनी धुमप्रान करु नये आणि मास्क परिधान करावा, अशी उद्घोषणा केली जात होती. मात्र, ही बाब बहुधा राज ठाकरे यांच्या लक्षात आली नाही. परिणामी राज ठाकरे बोटीवरच्या मोकळ्या जागेत मास्क न परिधान करताच उभे होते. यावेळी त्यांनी सिगारेटही शिलगावली होती. हा प्रकार रो-रो बोटीवरील अधिकाऱ्याच्या लक्षात आल्यानंतर त्याने राज ठाकरे यांना नियमाविषयी सांगितले. राज ठाकरे यांना आपली चूक लक्षात येताच त्यांनी दिलगिरी व्यक्त करत १००० रुपयांचा दंड भरला.
5 वर्षांपूर्वी -
शासकीय व खासगी डॉक्टरांचाही कोरोनाने मृत्यू | आरोग्य विम्यातही सरकारकडून भेदभाव - राज ठाकरे
राज्यातील करोना परिस्थिती अजूनही नियंत्रणात नसल्याचं चित्र आहे. गेल्या काही दिवसांपासून दररोज २३ ते २५ हजारांहून अधिक लोकांना करोनाचा संसर्ग होत असल्याचं आकडेवारीतून दिसत आहे. त्यामुळे वैद्यकीय सेवेवरती ताण वाढत आहे. सेवा बजावणाऱ्या शासकीय व खासगी डॉक्टरांचाही करोनामुळे मृत्यू होत असून, त्यांना देण्यात येणाऱ्या आरोग्य विम्याच्या संरक्षणावरून आता नवा मुद्दा पुढे आला आहे. या भेदभावावरून राज ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले असून, सरकारला जबाबदारीची आठवण करून दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
योग्य खबरादारी घेऊन मंदिरं उघडली गेली पाहिजेत | राज ठाकरेंची भूमिका
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या लॉकडाऊन सुरु आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील मंदिरे बंद असल्याने पुजारी आणि मंदिराच्या आसपासचे व्यावसायिक नाराज आहेत. अद्यापही मंदिरे सुरु करण्याबाबत राज्य सरकारने निर्णय न घेतल्याने त्र्यंबकेश्वरच्या पुजाऱ्यांचे शिष्टमंडळ आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला आलं होतं. राज ठाकरेंच्या कृष्णकुंज निवासस्थानी या पुजाऱ्यांनी भेट घेतली.
5 वर्षांपूर्वी -
आर्थिक अडचणींमुळे कुटुंबीयांची आणि राज ठाकरेंची माफी मागत शहराध्यक्षाची आत्महत्या
अखेरचा जय महाराष्ट्र म्हणत मनसेच्या किनवट शहराध्यक्ष सुनील ईरावार यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने मनसेत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सुनील ईरावार हे नांदेड जिल्ह्यातील किनवट शहराध्यक्ष आहेत. आर्थिक अडचणींमुळे राहत्या घरात आत्महत्या केल्याने अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे. राजकारणात जात आणि पैसे दोन्ही गोष्टी लागतात, माझ्याकडे यापैकी काहीच नाही असं त्याने सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज ठाकरेंच्या टीकेनंतर अखेर राज्य सरकारला जाग | जिम सुरु करण्याची परवानगी मिळणार
राज्य सरकाने जिम सुरु करण्याचा निर्णय घेतला असून आज किंवा उद्या या आदेशांवर सही करणार असल्याचे विजय वड्डेटीवर यांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि भाजपाकडून जिम सुरु करण्याबाबत मोठ्या प्रमाणात मागणी करण्यात येत होती. त्यानंतर आज जिम सुरु करण्यासाठी सरकार तयार असल्याचे विजय वड्डेटीवर यांनी सांगितले आहे.
5 वर्षांपूर्वी -
मनसेने अवाजवी वीज बिलं माफ करण्याची मागणी केंद्राकडे करावी - ऊर्जामंत्री नितीन राऊत
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन काळानंतर महावितरण आणि इतरही काही वीज पुरवठा करणाऱ्या कंपन्यांकडून ग्राहकांना भरमसाट वीज बिलं देण्यात आली. यासंदर्भात सध्या बरीच नाराजी दिसून येत आहे. पण, वीज बिलांची तपासणी केल्यास मुळात वीज बिलांच्या देय रकमेचा आकडा वाढवलेला नाही, असं मत खुद्द राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी मांडलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
महावितरणला मनसे झटका | मनसे कार्यकर्त्यांनी महावितरणचे कार्यालय फोडले
महावितरणच्या वाढीव वीज बिलाचा फटका सर्वसामान्यांसह दिग्गज लोकांना देखील बसला आहे. अगदी भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनाही फटका बसला होता. मुक्ताईनगर येथील त्यांच्या राहत्या घराचे बिल एक लाखाहून अधिक रकमेचे आल्याने त्यांनी आपला संताप व्यक्त केला होता. महावितरणने सर्व सामान्य जनतेला वेठीस धरू नये, बिलांमध्ये सूट द्यावी, अशी मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केली होती.
5 वर्षांपूर्वी -
मनसेच्या कार्यसम्राट नगरसेवकाची पक्षांतर्गत गळचेपी | समाज माध्यमांवर घुसमट व्यक्त केली
पुणे मनसेतील कार्यसम्राट नगरसेवक वसंत मोरे यांनी समाज माध्यमांवर पक्षांतर्गत होणारी घुसमट व्यक्त केल्याने कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. पुण्यात राज ठाकरे यांच्यानंतर नगरसेवक वसंत मोरे हेच मनसेची ओळख असल्याचं सर्वश्रुत आहे. केवळ लोक प्रतिनिधी म्हणून त्यांनी केलेली विकास कामं एवढीच त्यांची ओळख नसून, स्थानिक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन ते देखील आपल्यासोबत राजकारणात कसे मोठे होतील यासाठी कार्यशाळा घेणारे नगरसेवक ही देखील त्यांची ख्याती आहे. त्यामुळे जमिनीवर लोकांसाठी झटणारा कार्यकर्ता वसंत मोरे यांच्यासाठी काहीही करायला तयार असतात.
5 वर्षांपूर्वी -
राज ठाकरेंकडून स्व. बाळासाहेबांची आठवण काढत न्यायालयीन लढाईसाठी मोदींचे अभिनंदन
बुधवारी अयोध्येत प्रभू रामचंद्रांच्या मंदिराचं भूमिपूजन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दुपारी १२.३० वा. या ठिकाणी भूमिपूजन केलं जाणार आहे. या पार्श्वभूमीवर अयोध्येत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच देशभरातील भाजपा कार्यकर्त्यांनी याप्रसंगी आनंद साजरा करण्यासाठी मिठाई वाटण्याचं ठरवलं आहे. महाराष्ट्रातूनही शिवसेनेसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राम मंदिराच्या भूमिपूजनाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भूमिपूजनाच्या पूर्वसंध्येला एक पत्र लिहीत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
5 वर्षांपूर्वी -
मी काही यातला तज्ज्ञ नाही आणि WHO सुद्धा माझ्याकडून सल्ले घेत नाही - राज ठाकरे
“सरकारकडून लावलेले निर्बंध, टेलिव्हिजनवरील बातम्या आणि व्हॉट्सअॅपवरचे मेसेज यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहेत. काळजी घेणं गरजेचं आहे पण घाबरुन घरात बसणं योग्य नाही. लोकांना मानसिक विवंचनेतून बाहेर काढायला हवं. त्यामुळे सगळ्या गोष्टी पूर्ववत करा, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. काळजी घ्या, पण शटडाऊन आणि लॉकडाऊन नको, असंही ते म्हणाले. एबीपी माझाच्या ‘माझा महाराष्ट्र माझं व्हिजन’ या कार्यक्रमात ते बोलत होते.
5 वर्षांपूर्वी -
एकोपा नसल्याने हे महाविकास आघाडी सरकार फार काळ टिकणार नाही - राज ठाकरे
विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्तांतर झालं आणि एक नवी आघाडी उदयास आली. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार सत्तेत आलं. महाराष्ट्राला स्थिर सरकार मिळाल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांतच राज्याला कोरोनाने विळखा घातला. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढतच आहे. अशातच आता या जीवघेण्या कोरोना व्हायरसमधून महाराष्ट्राला मुक्त करण्यासाठी सरकारचं व्हिजन काय आहे?
5 वर्षांपूर्वी -
काळजी घेणं गरजेचं आहे पण घाबरुन घरात बसणं योग्य नाही - राज ठाकरे
राज ठाकरे यांनी एबीपी माझ्याच्या माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन या कार्यक्रमात अनेक विषयावर भाष्य केलं आहे . कोरोना आपत्तीच्या बाबतीत बोलताना राज ठाकरे म्हणाले, “या सगळ्या गोष्टी आपण २३ मार्चपासून पाहतोय. सुरूवातीला कुणालाच त्याचा अंदाज नव्हता. आज जेव्हा सगळी आकडेवारी पाहतो. परंतु, आज आपण आकडा पाहिला. मागील महिना दीड महिन्यांपासून बाहेर पडताहेत. हा आकडा माझ्या प्रश्नचिन्ह निर्माण करतो. १३० कोटींच्या देशात १३ लाख रुग्ण आहेत. यात २७ हजार रुग्णांचा मृत्यू झाला. पण हे किती काळ चालवणार आहोत.
5 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मला टीव्हीवर दिसले, कारभार दिसलाच नाही - राज ठाकरे
राज ठाकरे यांनी एबीपी माझ्याच्या माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन या कार्यक्रमात अनेक विषयावर भाष्य केलं आहे . कोरोना आपत्तीच्या बाबतीत बोलताना राज ठाकरे म्हणाले, “या सगळ्या गोष्टी आपण २३ मार्चपासून पाहतोय. सुरूवातीला कुणालाच त्याचा अंदाज नव्हता. आज जेव्हा सगळी आकडेवारी पाहतो. परंतु, आज आपण आकडा पाहिला. मागील महिना दीड महिन्यांपासून बाहेर पडताहेत. हा आकडा माझ्या प्रश्नचिन्ह निर्माण करतो. १३० कोटींच्या देशात १३ लाख रुग्ण आहेत. यात २७ हजार रुग्णांचा मृत्यू झाला. पण हे किती काळ चालवणार आहोत. लोकांच्या नोकऱ्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे. व्यवसाय बुडले आहेत. या आकड्याकडे पाहिलं, तर अख्खा देश लॉकडाउनमध्ये ठेवणं गरजेचं आहे का?. मी मुख्यमंत्री, अजित पवार आणि शरद पवार यांना फोन करून सांगितलं की बस झालं आता. लोकांना वेठीस धरू शकत नाहीत,” असं सवाल राज ठाकरे म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
मनसे कार्यकर्ते वीज कंपन्यांविरोधात हात सोडण्याच्या आधीच मंत्रालयात तातडीची बैठक
राज्यात काही दिवसांपासून वीजबिलांचा मुद्दा प्रकर्षानं समोर येताना दिसतोय. मुंबईसह राज्यभरातून याविषयी ओरड होत असून, याच मुद्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे भडकले आहेत. राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना यासंदर्भात पत्र दिलं आहे. “राज्य सरकारनं महावितरण आणि बेस्ट सारख्या सरकारी आस्थापनांना तात्काळ आदेश द्यावेत आणि खाजगी वीज कंपन्यांना देखील कडक शब्दांत समज द्यायला हवी, अन्यथा या खाजगी वीज कंपन्यांना आम्हाला झटका द्यावा लागेल,” असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे.
5 वर्षांपूर्वी