Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
अवास्तव वीज बील आकारणीवरून राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र, अन्यथा वीज कंपन्यांना झटका देणार
राज्यात काही दिवसांपासून वीजबिलांचा मुद्दा प्रकर्षानं समोर येताना दिसतोय. मुंबईसह राज्यभरातून याविषयी ओरड होत असून, याच मुद्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे भडकले आहेत. राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना यासंदर्भात पत्र दिलं आहे. “राज्य सरकारनं महावितरण आणि बेस्ट सारख्या सरकारी आस्थापनांना तात्काळ आदेश द्यावेत आणि खाजगी वीज कंपन्यांना देखील कडक शब्दांत समज द्यायला हवी, अन्यथा या खाजगी वीज कंपन्यांना आम्हाला झटका द्यावा लागेल,” असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे.
5 वर्षांपूर्वी -
कल्याण डोंबिवलीत महाराष्ट्र सैनिकांकडून घरोघरी जाऊन स्क्रिनिंग आणि ऑक्सिजन लेवल तपासणी
मुंबई महानगर क्षेत्रामध्ये कोरोना रुग्णसंख्येत कल्याण-डोंबिवली महापालिका दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली असून, गेल्या काही दिवसांपासून येथे दररोज ४५० ते ५५० बाधित आढळून येत आहेत. शहरातील एकूण रुग्णांचा आकडा १७ हजारांच्या पुढे गेल्याने गेल्या १७ दिवसांपासून शहरात लागू असलेली टाळेबंदी फसल्याची चर्चा सुरू झाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
सुशांतसिंग राजपूतची आत्महत्या आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील वादाशी मनसेचा संबंध नाही - राज ठाकरे
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी तपासाला वेग आला आहे. पोलिसांकडून होणाऱ्या सतत विचारपूस व चौकशीच्यादरम्यान सुशांत सिंग राजपूतचा मित्र सिद्धार्थ पिथानीने बुधवारी वांद्रे पोलिस स्टेशन गाठले होते. सिद्धार्थ पिथानी सुशांतबरोबर त्याचा क्रिएटिव्ह कंटेंट मॅनेजर म्हणून काम करत होता. अलीकडेच अभिनेत्री संजना सांघी यांना पोलिसांनी चौकशीसाठी बोलवले होते. संजनाने सुशांतच्या ‘दिल बेचार’ या शेवटच्या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. या प्रकरणात, YRF कास्टिंग डायरेक्टर आणि जलेबी स्टार अभिनेत्री रिया चक्रवर्ती यांच्यासह सर्वांची पोलिसांनी आतापर्यंत चौकशी केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज ठाकरेंचं निवासस्थान कृष्णकुंजवर घरकाम करणाऱ्या दोघांना कोरोनाची लागण
मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या घरी काम करणाऱ्या दोन व्यक्तींना कोरोना व्हायरसची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. मंगळवारीच राज ठाकरे यांच्या दोन चालकांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. यानंतर आता कोरोना व्हायरसने थेट राज ठाकरे यांच्या घरात शिरकाव केला आहे. त्यामुळे कृष्णकुंजवर सध्या चिंतेचे वातावरण आहे.
5 वर्षांपूर्वी -
मनसेकडून दम मिळताच T-Series कंपनीने पाकिस्तानी गायकाचं गाणं हटवलं
महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरेंचा दरारा कामय असल्याचं दिसून आलं आहे. राज ठाकरे यांची मागणी भारतीय म्युझिक कंपनी T-Series नं मान्य केली आहे. पाकिस्तानी गायक आतिफ असलम यानं गायिलेलं गाणं ‘किंना सोना’ हे T-Series कंपनीच्या यू-ट्यूब चॅनेलवरून काढून टाकण्यात आलं आहे. तसेच यापुढे पाकिस्तानी कलाकारांना कुठल्याही प्रकारचं सहकार्य करण्यात येणार नाही, असंही T-Series कंपनीनं राज ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
या संकटाची तीव्रता कमी होवो; पुन्हा आरोग्याचं वातावरण येवो; राज ठाकरेंच्या शुभेच्छा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विटवरुन गुढीपाडव्यानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. करोनाच्या संकटाच्या छायेची तीव्रता कमी होऊन पूर्ण सर्वत्र आरोग्याचं, भरभराटीचं वातावरण येवो, अशा सदिच्छा राज यांनी ट्विट करुन दिल्या आहेत. राज यांनी त्यांच्या ट्विटवर अकाऊटंवरुन एक ऑडिओ मेसेज पोस्ट केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज ठाकरेंची मुख्यमंत्र्यांशी चर्चा, सरकारच्या प्रयत्नांचं कौतुक व कठोर निर्णयांचा सल्ला
मुंबईची लाईफलाईन असलेली उपनगरीय लोकल रेल्वे सेवा, बेस्ट बस आणि मेट्रोसेवा बंद झाल्यानं रोज गजबजणारी ठिकाणं आज सुनीसुनी वाटत आहेत. रिक्षा आणि टॅक्सी सेवा मात्र सुरु असल्यानं रस्त्यावर वाहनांची वर्दळ काही प्रमाणात दिसत आहे. मुलुंड चेकनाक्यावर तर खाजगी वाहनं मोठ्या प्रमाणात दिसल्यानं जमावबंदी लागू केली तरी त्याचा अपेक्षित परिणाम अद्याप झाला नसल्याचं चित्र सोमवारी सकाळी दिसत होतं.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्ती: मुंबई पोलिसांची सुरक्षा वाऱ्यावर; मनसेकडून मोफत मास्क किट वाटप
कोरोना विषाणुने जगभरात थैमान घातले आहे. महाराष्ट्रातही याची संख्या दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहे. केंद्र आणि राज्य सरकारडून कोरोना संदर्भात नागरिकांसाठी महत्वाच्या सूचना येत आहे. दरम्यान रत्नागिरीतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
5 वर्षांपूर्वी -
दणका! आणि पैसे बुडवणाऱ्या बिल्डरने जगताप दांपत्याचे ९ लाख ५० हजार परत केले
राज ठाकरेंच्या अन्याय तेथे लाथ मारण्याच्या आदेशाचं महाराष्ट्र सैनिकांनी पालन केल्याचं पाहायला मिळालं आहे. नवी मुंबई शहरातील कामोठे या ठिकाणी वास्तव्यास असणाऱ्या प्रविण जगताप आणि स्मिता जगताप यांना त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. प्रविण जगताप हे सिवील अभियंता म्हणून स्वतःचा छोटासा व्यवसाय करतात. त्यामुळे व्यवहारात थोडा जरी आर्थिक फटका बसला तर थेट व्यवसाय बंद करावा लागेल अशी स्थिती कायम होती.
5 वर्षांपूर्वी -
अख्खा अग्रलेख ‘सावली’वर खर्च केल्याबद्दल ‘शॅडो’ संपादकांचे आभार... - सविस्तर वृत्त
राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारच्या चुकीच्या कामाचे वाभाडे काढण्यासाठी मनसेच्या शॅडो मंत्रिमंडळाच्या निर्णयाचेच शिवसेनेने बुधवारी वाभाडे काढले. मनसेच्या शॅडो मंत्रिमंडळाच्या निर्णयावर शिवसेनेने कडाडून टीका केली. राज्यात १०५ आमदारवाल्यांनी शॅडो मंत्रिमंडळ तयार केले नाही. पण एकमेव आमदारवाल्यांनी शॅडो मंत्रिमंडळ तयार केले असे सांगत नाव न घेता मनसेवर टीका करण्यात आली.
5 वर्षांपूर्वी -
सरकारच्या कारभारावर नजर; मनसेच्या शॅडो कॅबिनेटमधील सदस्य जाहीर
राज्य सरकारवर वचक ठेवण्यासाठी मनसेने महाअधिवेशनात शॅडो कॅबिनेट स्थापणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार मनसेने शॅडो कॅबिनेटची स्थापना केली असून त्यात राज ठाकरेंनी विशिष्ट स्थरातील पदाधिकाऱ्यांना स्थान दिलं आहे. त्यामुळे इतर पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान शॅडो कॅबिनेटमधील प्रत्येक नेत्यावर संबंधित खात्याच्या कामावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी देण्यात येणार आहे. तसेच शॅडो कॅबिनेटमधील हे नेते एखाद्या मंत्र्याने गैरव्यवहार केला, तर त्याचा पाठपुरावा करणार आहेत.
5 वर्षांपूर्वी -
भाजपाला राज ठाकरेंना सोबत घ्यायचं असेल तर घ्यावे; शिवसेना नेत्याची टीका
शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मनसे आणि भाजपातील जवळीक वाढू लागली आहे. आता हे दोन्ही पक्ष एकत्र येणार अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. त्यात रविवारी पुन्हा एकदा भर पडली. भाजपाचे भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी आज पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेतली. तासभर चाललेल्या या चर्चेनंतर मनसे-भाजपा युतीची पुन्हा नव्याने चर्चा सुरू झाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
नेपाळचे उद्योग व वाणिज्य मंत्री लेखराज भट्टा यांनी राज ठाकरेंची सदिच्छा भेट घेतली
नेपाळचे उद्योग व वाणिज्य मंत्री लेखराज भट्टा यांनी आज कृष्णकुंजवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. दरम्यान, या भेटीत इतर कोणत्या विषयांवर चर्चा झाली का याबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे सध्या राज ठाकरे यांच्या पक्षाचे राज्य किंवा केंद्रात कोणतंही स्थान किंवा सहभाग नसताना लेखराज भट्टा यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येतं आहे.
5 वर्षांपूर्वी -
मनसेच्या औरंगाबाद जिल्हाध्यक्षाची हकालपट्टी; राज ठाकरेंची कारवाई
‘आपल्याच पक्षात काही लोक गद्दार आहेत. मीडियामध्ये चुकीच्या बातम्या देतात. या गद्दारांची नावं मला कळली असून त्यांची मी पक्षातून हकालपट्टी करणार आहे,’ असं म्हणत औरंगाबाद दौऱ्यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कारवाईचे संकेत दिले होते. त्यानंतर आता पक्ष विरोधी कारवाई केल्याने मनसे पदाधिकारी गौतम अमराव यांची जिल्हाध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. तसंच त्यांचं प्राथमिक सदस्यत्वही काढून घेण्यात आली.
5 वर्षांपूर्वी -
आता बस्स! प्रचंड गोष्टी सहन केल्या, तु ये काळं फासायला मग तुझं?...रुपाली पाटील संतापल्या
प्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी गर्भलिंग चाचणीसंदर्भात गर्भलिंग चाचणीसंदर्भात वक्तव्याबाबात एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर माफी मागितली आहे. ‘सम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते’ असं वादग्रस्त वक्तव्य किर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी केलं होतं. त्यासंदर्भात सोशल मीडियावर टीकेची झोड उडाली होती.
5 वर्षांपूर्वी -
नवी मुंबई: मनसेकडून 'पश्चिम महाराष्ट्र महोत्सव २०२०'चं आयोजन; शर्मिला ठाकरेंची उपस्थिती
नवी मुंबईमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने भव्य ‘पश्चिम महाराष्ट्र महोत्सव २०२०’चं आयोजन करण्यात आलं असून त्याला शर्मिला ठाकरे आणि मनसेच्या अनेक नेत्यांनी हजेरी लावली. नवी मुंबई शहरातील लोकांसाठी १४ फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारी’पर्यंत विविध कार्यक्रमांची पर्वणी अनुभवता येणार आहे. यावेळी पश्चिम महाराष्ट्रातील अनेक लघु उद्योजकांना त्यांच्या वस्तूंचे प्रदर्शन करण्याची संधी देखील मिळाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
मनसेचा भगवा फडकला आणि पुणे कात्रजमधील बच्चे कंपनीची 'फुलराणी' पुन्हा धावली
लहान मुलांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेली पेशवे उद्यानातील फुलराणी मिनी ट्रेन २०१४ मध्ये कात्रजमध्येही धावण्यास सुरुवात झाली होती. कात्रज परिसरातील आजी-आजोबा उद्यानातील ५०० मीटरच्या ट्रॅकवर धावणाऱ्या ‘फुलराणी’च्या कामासाठी पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीने ५३ लाख ८९ हजार रुपयांच्या खर्चाला मे २०१४ मध्ये मंजुरी दिली होती.
5 वर्षांपूर्वी -
तर औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर करण्याच्या मनसे खेळीने सेना-राष्ट्रवादीतच जुंपेल? सविस्तर
मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्यापासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर असून त्यात औरंगाबाद शहर दौरा केंद्रस्थानी आहे. राज ठाकरे उद्या औरंगाबादला पोहोचणार असले तरी मनसेचे आमदार राजू पाटील आणि नेते अभिजित पानसे स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यासाठी एकदिवस आधीच औरंगाबादला दाखल झाले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
मनसे 'हिंदुत्वा'मुळे शिवसेनेला खिंडार; सुहास दाशरथेंचा मनसेत प्रवेश
महाराष्ट्र नवनिर्माण सेना हिंदुत्वाच्या मार्गाने गेल्याने शिवसेनेला धक्के लागण्यास सुरुवात झाली आहे असंच म्हणावं लागेल. मनसे आता हिंदुत्वाचा अजेन्डा हाती घेणार असल्याने शिवसेनेला सर्वाधिक नुकसान होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, शिवसेनेचे औरंगाबादचे सहसंपर्क प्रमुख तथा लोकसभा संघटक सुहास दाशरथे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला आहे. कृष्णकुंज येथे राज ठाकरे यांच्या उपस्थितीत शेकडो पदाधिकाऱ्यांच्या सहित त्यांनी मनसेत प्रवेश केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
आधारकार्ड मतदानासाठी चालतं पण नागरीकत्व सिद्ध करण्यासाठी नाही? राज ठाकरे
सर्व देशांच्या लोकांना सामावून घेण्यासाठी भारत ही काय धर्मशाळा आहे का? असा सवाल मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मोदी सरकारला केला आहे. १३५ कोटी लोकसंख्या असेलेल्या देशाला आणखी लोकांची काय आवश्यकता आहे असा सवालही त्यांनी यावेळी केला. ते पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. देश म्हणून आपण आणखी ओझं वाहू शकत नाही, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
5 वर्षांपूर्वी