Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
सोमय्यांनी भाजप नेते प्रवीण दरेकर अध्यक्ष असलेल्या मुबंई जिल्हा मध्यवर्ती बँकेतील भ्रष्टाचार बाहेर काढावा - राजू शेट्टी
नुकताच किरीट सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर मनी लाँड्रिंगचे आरोप केले होते आणि ईडी चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर अनिल परब यांनादेखील ईडीने चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात सोमय्या यांनी ट्वीट देखील केले होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी यावर प्रतिक्रिया दिली असून ते म्हणतात की, “किरीट सोमय्या यांच्या मध्ये जर हिंमत असेल तर मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेतील भ्रष्टाचारही त्यांनी बाहेर काढावा” असे त्यांनी आव्हान दिले आहे.
4 वर्षांपूर्वी -
माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या मुलाच्या मुसक्या आवळा | स्वाभिमानीचे गृहमंत्र्यांना पत्र
दोन दिवसांपूर्वी वाळवा तालुक्यातील तांबवे येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी रविकिरण माने यांना त्यांच्या घरी जात माजी मंत्री सदाभाऊ खोत यांचा मुलगा सागर खोत यांच्यासह साथीदारांनी मारहाण व शिविगाळ केली. यामुळे स्वाभिमानी आणि खोत यांच्यात वाद उफाळला आहे.
4 वर्षांपूर्वी -
प्रविण दरेकर हे कुणाची भाटगिरी करत आहेत? | राजू शेट्टी यांनी झापलं
प्रविण दरेकर आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यात चांगलंच शाब्दिक युद्ध रंगलं आहे. राजू शेट्टी हे बिनबुडाचा लोटा आहे, अशी जहरी टीका दरेकर यांनी केली होती. त्याला शेट्टी यांनी जोरदार उत्तर दिलं आहे. प्रविण दरेकर कुणाची भाटगिरी करत आहेत?, असा सवाल राजू शेट्टी यांनी केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
राजू शेट्टी यांच्या आंदोलनाची सरकारकडून दखल | मुख्यमंत्र्यांकडून राजू शेट्टींना बैठकीचे निमंत्रण
राजू शेट्टींच्या आंदोलनाची राज्य सरकारने दखल घेतली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राजू शेट्टी यांना उद्या बैठकीचे निमंत्रण दिले आहे. राजू शेट्टी नृसिं यांना नृसिंहवाडीत प्रांताधिकाऱ्यांनी प्रस्तावाचं पत्र दिले आहे. दरम्यान, या वारंवार येणाऱ्या पुरावर कायमस्वरुपी उपाययोजना करने गरजेची असल्याचं मत राजू शेट्टी यांनी व्यक्त केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
हमीभाव वाढवल्याचा दावा कोणत्याही तज्ज्ञाने सिद्ध करून दाखवावा - राजू शेट्टी
केंद्र सरकारने बुधवारी यासंदर्भातला निर्णय जाहीर केला आहे. यानुसार, धानाच्या हमीभावात क्विंटलमागे ७२ रुपयांची किरकोळ वाढ करण्यात आली असून डाळी, तेलबिया व तृणधान्ये यांच्या हमीभावात देखील भरीव वाढ करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हमीभाव वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला.
4 वर्षांपूर्वी -
समितीकडून अदानी-अंबानींना सोयिस्कर अहवाल आल्यावर तोच शेतकऱ्यांच्या बोकांडी...
नव्या कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीला सुप्रीम कोर्टाने आज स्थगिती देऊन केंद्र सरकारला मोठा झटका दिला. पण कोर्टाने नेमलेल्या समितीमध्ये कृषी कायदे आणि सरकारच्या समर्थकांचाच समावेश असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर अदानी, अंबानीला अजून काही या कृषी कायद्यात दुरुस्ती करुन घ्यायची आहे ती घ्या आणि कायमचेच शेतकऱ्यांच्या बोकांडी हे कायदे बसवून देऊयात असे कोर्टाला म्हणायचे आहे का अशी शंका राजू शेट्टींनी व्यक्त केली आहे, कराड येथे पत्रकारांशी ते संवाद साधत होते.
4 वर्षांपूर्वी -
सत्तासुंदरी हातातून गेली | त्यामुळे शेलारांसह भाजपची अवस्था भ्रमिष्टा सारखी झाली आहे
माजी खासदार राजू शेट्टींवर विधानपरिषदेसाठी दलालांचे तुणतुणे वाजवण्याची वेळ आली आहे, अशी टीका करणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे नेते आशिष शेलारांवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पलटवार केला आहे. सत्तासुंदरी हातातून गेल्याने शेलार यांच्यासह भारतीय जनता पक्षाची अवस्था भ्रमिष्टा सारखी झाली आहे, अशी घणाघाती टीका माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
मोदी देतील त्या दराने शेतमाल खरेदी करा | असे फडणवीसांनी शेतकऱ्यांना सांगावे
कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना माजी खासदार राजू शेट्टी यांनी कृषी विधेयकावरून मोदी, फडणवीस व खोत यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, कृषी विधेयकावरून देशभरातील शेतकऱ्यांमध्ये संताप आहे. काल मुंबईत मध्यरात्री संचारबंदी लागणार हे माहित असतानाही पंधरा हजारांवर शेतकरी उद्योगपती अंबानीच्या कार्यालयावरील मोर्चात सहभागी झाले होते. टाळेबंदी काळामध्ये अंबानी-अदानी या उद्योगपतींना मोठा तोटा झाला आहे. तो भरून काढण्यासाठी त्यांना अन्नधान्याच्या बाजारामध्ये केंद्र शासन उतरवत आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुकेश अंबानींची भूक वाढली आहे | त्यासाठी शेतकऱ्यांवर विधेयके लादली
मोदी सरकारचे कृषी कायदे हे अंबानी यांच्यासारख्या उद्योगपतींच्या भल्यासाठी आहेत. मुकेश अंबानी यांची भूक वाढली आहे. त्यासाठी शेतकऱ्यांवर नको असलेली विधेयके लादली जात असल्याचा आरोप खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला.
4 वर्षांपूर्वी -
शेतकर्यांना खलीस्थान वादी म्हणणारे अमित शहा कोण लागून गेले?- राजू शेट्टी
शेतकर्यांना खलीस्थान वादी म्हणणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Union Home Minister Amit Shah) कोण लागून गेले? पुढील २ दिवसांत दिल्लीतील शेतकऱ्यांशी चर्चा करून निर्णय न झाल्यास संपूर्ण देश मोदी सरकारच्या विरोधात पेटवून ठेवू, असा सज्जड इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी (Former MP Raju Shetti) यांनी दिला. दरम्यान, राजू शेट्टी यांनी पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कार्यकर्ते अधिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच झालेल्या झटापटींमुळे वातावरण काही काळ तणावपूर्ण झाल्याने पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली होती.
4 वर्षांपूर्वी -
उध्वस्त झालेल्या कुटुंबाचं दुख: दिसत नाही | पण भाजपाची तळी उचलणाऱ्या संपादकांचं दुख दिसतं
Republic TV’चे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना काल मुंबईत त्यांच्या राहत्या घरी झालेल्या अटकेरून ठाकरे सरकारवर आणीबाणी लादल्याचे आणि हुकूमशाहीचे आरोप विरोधकांकडून करण्यात आला. ‘अर्णब गोस्वामी यांस २०१८ मधील एका अत्यंत खासगी प्रकरणात अटक झाली आहे. अर्णब गोस्वामी यांच्या अटकेचा भारतीय जनता पक्षाने तीव्र निषेध केला आहे. तसेच समाज माध्यमांच्या माध्यमातून देखील यावेळी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केल्याचं पाहायला मिळालं आहे.
5 वर्षांपूर्वी -
हिमाचलच्या टेकडावर जन्मलेल्या नटीने शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलू नये
कृषी विधेयकांविरुद्ध आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची तुलना दहशतवाद्यांशी केल्यानंतर माझ्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ काढला गेला, अशी सारवासारव करणारी अभिनेत्री कंगना राणावतवर शेतकरी नेत्यांकडून चौफेर टीका होऊ लागली आहे.
5 वर्षांपूर्वी -
गांजा घेत होता म्हणता त्या अभिनेत्याच्या आत्महत्येची चर्चा, पण रेवनाथची चर्चाच नाही
“एक अभिनेता ज्याने गांजा घेतल्याचं म्हटलं जातं, त्या अभिनेत्याच्या आत्महत्येची चर्चा, पण दुधाला भाव मिळाला नाही म्हणून आत्महत्या करणाऱ्या रेवनाथ काळेच्या आत्महत्येबद्दल चर्चा नाही, हे दुर्दैवी आहे”, अशी खंत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी व्यक्त केली. गेल्या काहीदिवसांपासून दुधाला भाव मिळावा या मागणीसाठी राज्यभर शेतकरी संघटनेकडून आंदोलन सुरु आहे. मात्र अद्याप शेतकऱ्यांची मागणी पूर्ण झालेली नाही.
5 वर्षांपूर्वी -
RSS'मुळे धारावी कोरोनामुक्त मग नागपुरात संघाचं मुख्यालय तरी कोरोनाचा कहर कसा? - राजू शेट्टी
धारावीतील कोरोनामुक्तीचे श्रेय आरएसएसला देण्यात येत असल्याने राजू शेट्टी यांनी महत्त्वाचा सवाल उपस्थित केला आहे. ते म्हणाले की, जर संघाने धारावी कोरोनामुक्त केली असा दावा केला जात असेल, तर संघाचं मुख्यालय असलेल्या नागपुरात कोरोनाचा कहर कसा? तिथला कोरोना अटोक्यात का नाही.’ ते कोल्हापुरात बोलत होते.
5 वर्षांपूर्वी -
स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील वाद मिटला; राजू शेट्टींचा विधानपरिषदेचा मार्ग मोकळा
विधान परिषदेवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी विधान परिषद निवडणुकीची ब्याद नकोच, अशी भूमिका घेतली होती. यावरून संघटनेमध्ये सारे काही आलबेल नसल्याचे दिसत होते. कोल्हापूरमध्ये झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांच्या व्यापक हितासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना एकसंघ ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला व हा वाद मिटविण्यात आला आहे.
5 वर्षांपूर्वी -
स्वाभिमानीमध्ये अंतर्गत वाद वाढल्याने राजू शेट्टींची विधानपरिषद आमदारकीतून माघार?
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी हे राष्ट्रवादीकडून विधानपरिषद आमदार होण्याची शक्यता आहे. राजू शेट्टी यांनी थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची बारामतीत जाऊन भेट घेतल्यानंतर तर या चर्चेनं अधिकच वेग पकडला आहे. मात्र अशातच आता ही आमदाराकीची चर्चा राजू शेट्टी यांच्यासाठी नवी डोकेदुखी ठरणार की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण स्वाभिमानीचे दोन मोठे नेते या मुद्द्यावरून नाराज झाले आहेत.
5 वर्षांपूर्वी