Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
राहुल गांधी म्हणजे देवासाठी सोडलेला वळू किंवा सांड | दानवेंनी विखारी टीका
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची जनआशीर्वाद यात्रा आज बदनापुरात पोहोचली. त्यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांच्यावर विखारी टीका केलीय. दानवे यांनी राहुल गांधी यांचा उल्लेख देवासाठी सोडलेला वळू किंवा सांड असा केला आहे. त्यामुळे भाजप विरुद्ध काँग्रेस असा संघर्ष आता पेटण्याची चिन्ह आहेत. दरम्यान, दानवे यांनी राहुल गांधींवर केलेल्या टीकेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
शिवसेनेला 'खान पाहिजे की बाण'? रावसाहेब दानवेंचा शिवसेनेला टोला
नवी मुंबईच्या नेरुळमध्ये भारतीय जनता पक्षाचं राज्यस्तरीय अधिवेशन होतंय. या अधिवेशनाच्या निमित्ताने भारतीय जनता पक्ष विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा संघटनात्मक बांधणीला सुरुवात करणार आहे. चंद्रकांत पाटील यांनी या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्षपदी सूत्रं हाती घेतली. त्यानंतर झालेल्या भाषणात त्यांनी राज्य सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली. ते म्हणाले, हे सरकार पडावं अशी आम्ही वाट बघत नाही. मात्र आपसातील भांडणांमुळेच हे सरकार कोसळेल असंही त्यांनी सांगितलं. यावेळी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नढ्ढा यांनी महाराष्ट्रात ऐकला चलो रे चे संकेत दिले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
राऊतांना उपचारासाठी वेड्याच्या इस्पितळात दाखल करावं: रावसाहेब दानवे
राज्यात सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार यांनी भारतीय जनता पक्षाशी हातमिळवणी केली. त्यांनतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी तर अजित पवार उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. त्यानंतर अजित पवार यांचे गटनेतेपद काढून टाकण्यात आले. यावर राजकीय वर्तुळात बराच गदारोळ माजला. तसेच अजित पवार यांनी पाठिंबा दिला तेव्हा ते राष्ट्रवादीचे विधीमंडळ नेते होते आणि आजही तेच नेते आहेत त्यांनी काढलेला व्हिप राष्ट्रवादीच्या नेत्यांना पाळावाच लागेल” असंही रावासाहेब दानवे यांनी म्हटलं आहे. या संबंधी भारतीय जनता पक्षाचे नेता रावसाहेब दानवे यांनी पत्रकार परिषद घेत अजित पवारांना अजूनही गटनेतेपदाचे अधिकार असल्याचे सांगितले.
6 वर्षांपूर्वी -
युती केली चूक झाली, आता २०२४च्या तयारीला लागा: रावसाहेब दानवे
भारतीय जनता पक्षाशी शिवसेनेची युती तुटल्याची अधिकृत घोषणा झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या आधी आमच्याशिवाय कोणी सत्तेत येणार नाही आणि विरोधीपक्ष पूर्णपणे नष्ट होणार याच अविर्भावात भारतीय जनता पक्षाचे नेते वावरत होते. अगदीच बोलायचे झाल्यास राज्यातील भारतीय जनता पक्षाचे संकटमोचक गिरीश महाजन तर काँग्रेस-राष्ट्रवादीला मिळून २०-२५ जागाच मिळतील असं छातीठोक प्रसार माध्यमांना सांगत होते. मात्र निकालाअंती काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जागा शंभरच्या आसपास जाऊन पोहोचल्या आणि भारतीय जनता पक्ष १०५ जागांवर स्थिरावला.
6 वर्षांपूर्वी -
'मोदी देशात दुफळी निर्माण करणारे नेते' या बातमीवर रावसाहेबांनी ट्विट केलं 'पूर्ण जगात मोदी साहेबांचा डंका'
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेतील जगप्रसिद्ध टाइम मासिकाच्या मुखपृष्ठावर झळकले होते. परंतु यावेळी नरेंद्र मोदींचा मुखपृष्ठावरील फोटो हा सकारात्मक लेखासंदर्भात नसून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख ‘टाइम’ने थेट दुफळी निर्माण करणारा भारतातील प्रमुख नेता असा केला होता. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदी हिंदुत्वावर आधारित राजकारण करत असल्याने देशात ध्रुवीकरण झाल्याचा आरोप मोदींसंदर्भात लेख लिहिणाऱ्या आतिश तासीर यांनी प्रसिद्ध केला होता.
6 वर्षांपूर्वी -
रावसाहेब दानवेंना पैशांची मस्ती आलीये, बच्चू कडू संतापले
रावसाहेब दानवेंना पैशांची मस्ती आली आहे आणि आपण काय बोलतो आहोत हे त्यांना कळत नाही, अशा कठोर शब्दात आमदार बच्चू कडू यांनी रावसाहेब दानवे यांच्यावर टीका केली आहे. दानवे हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष कसे आहेत? तेच मला कळत नाही. त्यांना या निवडणुकीत आपण उत्तर जरूर देणार…, असं कडू म्हणाले. शेतकऱ्यांसाठी चुकीची भाषा वापरूनही त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. आपण काय बोलावं याचं भान असलं पाहिजे, असंही बच्चू कडू यावेळी म्हणाले.
6 वर्षांपूर्वी -
जमली नाही गर्दी म्हणून सभा लवकर आटोपली... रावसाहेब दानवेंना कार्यकर्त्यांची पाठ
#ApnaBoothSabseMajboot भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत सांगलीमध्ये भाजपचा संवाद संघटन मेळावा होणार होता. मात्र अमित शहांच्या अनुपस्थितीमुळे नाराज झालेले भाजप कार्यकर्ते व बुथ प्रमुखांनी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे उपस्थित असतानादेखील मेळाव्याकडे पाठ फिरवली. खासदार, चार आमदार, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, पंचायत समित्या आदी असूनदेखील जाहीर केल्याप्रमाणे पाच हजार कार्यकर्तेदेखील भाजप नेत्यांना जमा करता आले नाहीत. मोकळ्या खुर्च्या पाहून प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी आपले भाषण आटोपते घेत काढता पाय घेतला.
6 वर्षांपूर्वी