Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
पुरुष नेत्याशी संपर्क असेल तरच महिलांना निवडणुकीचं तिकीट दिलं जातं - रेखा शर्मा
महिलेला कोणतीही निवडणूक लढवायची असल्यास तिचा पुरुष नेत्याशी संपर्क असणं गरजेचं आहे. असं असेल तरच महिलांना निवडणूक लढवण्यासाठी तिकीट दिले जाते,’ असं खळबळजनक विधान राष्टीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा केलं. त्या हैदराबादमध्ये मौलाना आझात नॅशनल उर्दू महाविद्यालयाच्या महिला अभ्यास केंद्राने आयोजित केलेल्या एका वेबिनारमध्ये बोलत होत्या. यावेळी त्यांनी महिलांच्या राजकारणातील सद्यस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली.
4 वर्षांपूर्वी -
राजस्थानमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार | गुन्हा दाखल | स्वतंत्र पथकाकडून शोध सुरु
राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यातील बलात्काराच्या घटनेने सर्वांना हादरवून टाकले आहे. बाडमेर जिल्ह्यातील शिव पोलिस स्टेशन परिसरातील एका गावात अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आला.
5 वर्षांपूर्वी -
निर्भयाच्या गुन्हेगारांच्या फाशीची तारीख ठरली; चौथ्यांदा जारी केलं डेथ वॉरंट
संपूर्ण देश हादरवणाऱ्या निर्भया गँगरेप केसमधील दोषींना अखेर 20 मार्चला सकाळी 5.30 ला फाशी देण्याचं ठरलं आहे. कोर्टाने चौथ्यांदा डेथ वॉरंट जारी केलं आहे. याआधी तीन वेळा फाशीची तारीख आणि वेळ निश्चित झाल्यानंतर दोषींपैकी कुणी ना कुणी कोर्टाची दारं ठोठावत राहिल्यामुळे डेथ वॉरंट रद्द झालं होतं. तीन वेळा रद्द झाल्यानंतर आता चौथ्या वेळी कोर्टाने वॉरंट जारी केलं आहे. यावेळी दोषींची फाशी अटळ असल्याचं बोललं जात आहे.
5 वर्षांपूर्वी -
निर्भया प्रकरण : नराधमांच्या फाशीला पुढील आदेशापर्यंत पुन्हा स्थगिती
दिल्लीसह देश हादरवणाऱ्या निर्भया गँगरेप प्रकरणात 4 गुन्हेगारांना उद्या म्हणजे 3 मार्चला फाशी देण्यात येणार होती. पण अखेरच्या क्षणी कोर्टाने या चौघांची फाशी थांबवण्याचे आदेश दिले. पटियाला न्यायालयाने पुढच्या आदेशापर्यंत निर्भयाच्या दोषींच्या फाशीला स्थगिती दिली आहे. पुढचे आदेश मिळत नाहीत तोवर आता ही फाशी होणार नाही.
5 वर्षांपूर्वी -
मनसे आमदाराच्या पाठपुराव्याला यश; दिशा कायद्याची माहिती घेण्यासाठी गृहमंत्री आंध्रप्रदेशात
महिलांवरील अत्याचारांच्या घटनांना चाप बसावा यासाठी राज्यात कठोर कायदा आणण्यासाठी राज्य सरकारच्या हालचालींना वेग आला आहे. आंध्रप्रदेश सरकारने आणलेल्या दिशा कायद्याची माहिती घेऊन त्याची अंमलबजावणी कशी करता येईल यासंबंधिची माहिती जाणून घेण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख आंध्रप्रदेशच्या दौऱ्यावर आहेत.
5 वर्षांपूर्वी -
बलात्काऱ्यांना माफ करा हे विचारायची हिंमतच कशी होते? - निर्भयाच्या आईचा संताप
एकीकडे संपूर्ण देश निर्भयाच्या दोषींना फासावर कधी लटकावणार याची वाट पाहत आहे, मात्र दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाच्या ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंह यांनी धक्कादायक वक्तव्य केलं आहे. “सोनिया गांधींप्रमाणे निर्भयाच्या आईनेही दोषींना माफ करावं,” असं आवाहन इंदिरा जयसिंह यांनी केलं आहे. ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंह यांनी शुक्रवारी सोनिया गांधी यांचं उदाहरण देत म्हटलं होतं की त्यांनी राजीव गांधींच्या मारेकऱ्यांना माफ केलं होतं, त्याचप्रमाणे निर्भयाच्या आईनेही करावं.
5 वर्षांपूर्वी -
निर्भयाच्या दोषींना फाशीच; सुप्रीम कोर्टानं पुनर्विचार याचिका फेटाळली
निर्भया बलात्कार प्रकरणात सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेवर दोषी विनय कुमार शर्मा आणि मुकेश सिंह यांनी दाखल केलेली क्युरेटिव्ह (पुनर्विचार) याचिका सुप्रीम कोर्टानं आज फेटाळली. त्यामुळं निर्भयाच्या दोषींना सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेवर २२ जानेवारीला अंमलबजावणी होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
5 वर्षांपूर्वी -
BLOG: एक पत्र...एका सर्वसामान्य मुलीचं...ह्या समाजासाठी
प्रिय समाज! अप्रिय लिहिलेलं वाईट दिसेल म्हणून प्रिय! पुन्हा एकदा…वाईट दिसेल? कोणाला? समाजाला की चार लोकं काय म्हणतील त्यांना? आपल्या तथाकथित सुसंस्कृत समाजाला मुलगी जन्माला आल्या पासून चार लोकं काय म्हणतील, ह्याचीच चिंता जास्त असते. ह्या चार लोकांच्या म्हणण्याला किंमत देताना त्या मुलीच्या मनाचा कोणीच विचार करीत नाही. आताच्या समाजात स्त्रियांचा आदर करा, त्यांचा मान राखा आणि अशी कितीतरी स्त्रिसक्षमतेची वाक्य आपण ऐकतो, वाचतो, सोशल मीडियावर आपण ह्या मताशी किती सहमत आहोत हे दाखवायला शेअर सुद्धा करतो. पण जेव्हा खरोखर अन्याय घडत असेल मग तो फार मोठ्या स्तरावरचा नसला तरी देखील कितीजण त्याला विरोध करतात, हा प्रश्न अजूनही अनुत्तरीतच आहे. नुकतीच उन्नाव बलात्कार प्रकरणाबद्दल बातमी वाचली. सुप्रीम कोर्टाने बलात्कार पीडितेला रू. २५ लाख भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे.
6 वर्षांपूर्वी -
उन्नाव बलात्कार प्रकरण संपलं..
काही दिवसांपूर्वीच उन्नाव बलात्कार पीडित तरुणीच्या कारचा अपघात झाला. मात्र, हा अपघात नसून घातपात आहे. कारण उन्नाव बलात्कार प्रकरणात भाजपचा आमदार कुलदीप सेंगर आरोपी आहे. त्याच्या बचावासाठी पद्धतशीरपणे पीडित तरुणीला आणि तिच्या परिवाराला संपवण्याचा कट रचण्यात आला होता.
6 वर्षांपूर्वी -
देशाला हादरवणाऱ्या कठुआ बलात्कारप्रकरणी सातपैकी सहाजण दोषी
जम्मू-काश्मीरमधील बहुचर्चित कठुआ बलात्कार आणि हत्येप्रकरणी पठाणकोट कोर्टाने प्रमुख आरोपी सांझी राम, तिलक दत्ता यांच्यासह ५ जणांना दोषी ठरवले आहे. तर, आरोपी विशाल याला दोषमुक्त करण्यात आले आहे. विशेष न्यायालयाने आज आपला निकाल सुनावला. २ वाजता सर्व आरोपींना शिक्षा सुनावण्यात येणार आहे. दरम्यान, या घटनेने संपूर्ण देश ढवळून निघाला होता, या पार्श्वभूमीवर न्यायालय परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
6 वर्षांपूर्वी -
गुजरात - गुजरातमध्ये युपी-बिहारींना धमकावून राज्य सोडण्याच्या सूचना
गुजरात – गुजरातमध्ये युपी-बिहारींना धमकावून राज्य सोडण्याच्या सूचना
7 वर्षांपूर्वी