Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
संजय राऊत हे शिवसेनेचे पोपट; उद्धव ठाकरेंनी त्यांच्यावर अंकुश ठेवावा: आ. रवी राणा
सध्या भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेमध्ये सत्तास्थापनेवरून कलगीतुरा रंगल्याचे पाहायला मिळत आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन तब्बल दहा दिवस उलटले असले तरी अजून पर्यंत सत्ता स्थापनेचा पेच कायम आहे. त्यात नक्की युतीचं सरकार स्थापन होणार की आघाडीच्या पाठिंब्यावर शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार याबद्दल देखील राजकीय अंदाज बांधले जाऊ लागले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
संजय राऊतांचं दबाबतंत्र वापरून पलटी मारण्याची सवय भाजपाला अवगत असल्याने दुर्लक्ष?
राज्यातील जनतेनं महायुतीला स्पष्ट कौल देऊनही सत्ता स्थापनेचा तिढा सुटताना दिसत नाही. शिवसेना भाजपमधील संवाद जवळपास बंद झाला आहे. त्यातच दोन्ही बाजूंकडून दबावाचं राजकारण जोरात सुरू आहे. खासदार संजय राऊत सातत्याने भाजपवर शरसंधान साधत आहेत. गेल्या काही दिवसांपासून राऊत सकाळी पत्रकार परिषद घेऊन भाजपावर तोफ डागत आहेत. मात्र आज राऊत यांनी पत्रकार परिषदेत भाजपावर टीका केली नाही. त्यामुळे उपस्थित पत्रकारांना काहीसा आश्चर्याचा धक्का बसला.
6 वर्षांपूर्वी -
‘विदुषका’ला रोज सकाळ झाली की हिंदी शेरोशायरी का आठवते? तरुण भारतचा प्रहार
विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून १० दिवसांहून अधिक कालावधी लोटला असला तरी राज्यात अद्याप सत्ता स्थापन झालेली नाही. विधानसभा निवडणुकांमध्ये राज्यातील जनतेने महायुतीला जनमत दिले आहे. असं असलं तरी ५०-५० सुत्रामुळे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेमध्ये सत्ता स्थापनेचे तिढा सुटलेला नाही. एकीकडून शिवसेनेचे नेते संजय राऊत दररोज आक्रामक भुमिका मांडताना दिसत आहे. प्रसारमाध्यमांसमोर येऊन बोलण्याबरोबरच राऊत ट्विटवरुनही रोज एखादे ट्विट करुन भारतीय जनता पक्षाला टोला लगावता दिसत आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांच्याशी चर्चा करण्यासाठी गेलेले असतानाच राऊतांनी प्रवास करण्यावरुन ट्विट करत एक टोला लगावला आहे.
6 वर्षांपूर्वी -
शिवसेनेकडे १७५चं संख्याबळ; आमचा मुख्यमंत्री शिवतीर्थावर शपथ घेईल: खा. संजय राऊत
विधानसभा निवडणुकीच्या निकालात भाजपा-शिवसेना युतीला सत्ता स्थापनेसाठी स्पष्ट कौल मिळालेला असतानाही राज्यात सत्तेचा रथ मुख्यमंत्रीपदासह समसमान वाटपावरून रूतून बसला आहे. दरम्यान, शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी सत्तास्थापनेबाबत मोठं विधान केलं आहे. “शिवसेनेकडं १७५ आमदारांचं संख्याबळ असून, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अंतिम निर्णयापर्यंत आले आहेत. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचा होईल. शिवतिर्थावर शपथविधी होईल,” असा दावा राऊत यांनी केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
राष्ट्रपती राजवटीची धमकी हा जनादेशाचा अपमान: शिवसेना
भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत सुरू झालेला सत्तास्थापनेबाबतचा वाद अधिकच चिघळण्याची चिन्हे दिसत असताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्ष नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या राष्ट्रपती राजवट वक्तव्यावर जोरदार टीकास्त्रे सोडले आहे. राज्यातील जनतेने महायुतीला सत्तास्थापनेसाठी जनादेश दिला असताना सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यात राष्ट्रपती राजवटीचा मुद्दा उपस्थित करत धमकी दिली असून ही धमकी म्हणजे जनमताचा अपमान असल्याचे राऊत म्हणाले. राष्ट्रपतींच्या नावाचा वापर करणे गैर असून राष्ट्रपती तुमच्या खिशात आहेत का, असा संतप्त सवालही राऊत यांनी केला आहे. दरम्यान, भारतीय जनता पक्षावर टीकास्त्र सोडताना राज्यातील जनतेने भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीला जनादेश दिला असून आम्ही युतीधर्माचे पालन करू अशी भूमिकाही राऊत यांनी घेतली आहे.
6 वर्षांपूर्वी -
आघाडी शिवसेनेसोबत जाणार नाही; पवारांनी सेनेची पुन्हा हवा काढली
महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत मोठा संघर्ष सुरू आहे. अशातच ‘आम्हीही बहुमताचा आकडा गाठू शकतो. आता लिहून घ्या, मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार,’ अशी भूमिका शिवसेनेनं घेतली आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. अशातच एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
6 वर्षांपूर्वी -
मी लिहून देतो की मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार: खासदार संजय राऊत
‘महाराष्ट्राच्या जनतेला शिवसेनेचा मुख्यमंत्री पाहायचा आहे. जर उद्धव ठाकरे म्हणाले आहेत की राज्याचा मुख्यमंत्री शिवसेनेचा होणार, तर मी लिहून देतो की मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार. आम्ही जर ठरवलं, तर बहुमत सिद्ध करून आमचा मुख्यमंत्री होऊ शकतो. त्यामुळे ज्यांच्याकडे बहुमत नाही, त्यांनी सत्तास्थापनेचा दावा करण्याची हिंमत करू नये. भारतीय जनता पक्षात फार मोठी माणसं आहेत, आम्ही त्यांना काय अल्टिमेटम देणार. आम्ही साधा पक्ष आहोत. त्यांचा पक्ष आंतरराष्ट्रीय आहे. जगभरात त्यांचे कार्यकर्ते, अनुयायी आहेत. आम्ही फक्त महाराष्ट्राबद्दल बोलतो’, अशा शब्दांत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षाला खोचक टोमणा मारला आहे. राज्यात सध्या सुरू असलेल्या सत्तावाटपाच्या गोंधळासंदर्भात संजय राऊत यांनी सलग दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेच्या मुख्यमंत्रीपदाबाबत सूचक वक्तव्य केलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
युतीत तणाव वाढला, सेनेच्या आघाडीतील नेत्यांशी भेटीगाठी
दिवाळीच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी ते वक्तव्य करायला नको होते, अशी नवनिर्वाचित आमदारांसमोरच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘मन की बात’ बोलून दाखविल्यानंतर काही तासांतच शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी शरद पवार यांची भेट घेतली. त्यामुळे पडद्यामागे राजकारणाचा सारीपाट बदलण्याचे दबावतंत्र सुरु असल्याचे दिसून येत आहे. तर दुसरीकडे शिवसेनेने आम्ही भाजपसोबत नाही, अशी जाहीर आणि ठाम भूमिका घेतल्यास दुसर्याक्षणी आमचा त्यांना बाहेरून जाहीर पाठिंबा असेल, असे काँग्रेसचे नेते दबक्या आवाजात बोलत आहेत.‘हीच ती वेळ’ आहे शिवसेनेला स्वाभिमान दाखविण्याची आणि शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्याची, अशी कोपरखळी काँग्रेसच्या एका नेत्याने मारली.
6 वर्षांपूर्वी -
भाजपकडे बहुमत असेल, तर खुशाल सत्ता स्थापन करावी: संजय राऊत
‘सामना’च्या अग्रलेखातून भारतीय जनता पक्षावर बोचरी टीका केल्यानंतर गुरुवारी सकाळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेची भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली. ‘आम्ही दिलेला शब्द आणि नीतिधर्म पाळतो, भारतीय जनता पक्षानेही तो पाळावा’, असं संजय राऊत म्हणाले आहेत. त्यामुळे शिवसेना अजून देखील मुख्यमंत्रीपदासह इतर सत्तापदांमध्ये समसमान वाटपाच्या फॉर्म्युल्यावर ठाम असल्याचं स्पष्ट झालं आहे. दरम्यान, ‘जर भारतीय जनता पक्ष किंवा इतर कुणाकडेही बहुमत असेल, तर त्यांनी खुशाल सत्ता स्थापन करावी’, असं आव्हान देखील संजय राऊत यांनी दिलं आहे. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत आपणच मुख्यमंत्री होणार अशी भूमिका आक्रमकपणे मांडल्यानंतर शिवसेना मवाळ भूमिका घेणार का? अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र, संजय राऊतांनी शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं स्पष्ट केलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रातील सत्तेचे रिमोट कंट्रोल आता उद्धव यांच्या हाती: शिवसेनेचा इशारा
महाराष्ट्रातील सत्तेचे रिमोट कंट्रोल आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ताब्यात असल्याचे शिवसेनेने रविवारी सांगितले. २०१४च्या तुलनेत यावेळी विधानसभेत कमी जागा मिळून देखील शिवसेनेने हा दावा केला आहे. १९९५ ते १९९९ या सत्ता काळात शिवसेनेचे संस्थापक दिवंगत बाळ ठाकरे हे सहसा ‘रिमोट कंट्रोल’ हा शब्द वापरत असत.
6 वर्षांपूर्वी -
वाघाच्या गळ्यात घड्याळ अन कमळाचा सुगंध; राऊतांना नक्की काय सूचित करायचंय?
विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती आले असून भारतीय जनता पक्षाला स्वबळ तर दूरच, पण २०१४च्या निवडणुकीत होत्या, तेवढ्या जागा देखील जिंकता आल्या नाहीत. त्यामुळे या परिस्थितीत शिवसेना अधिक कठोर आणि अडून राहणं हे साहजिक आहे. शिवसेनेच्या पाठिंब्याशिवाय भारतीय जनता पक्षाला सत्ता स्थापन करणं अशक्यच असल्याचं आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे शिवसेनेचा भाव आता युतीमध्ये चांगलाच वधारला असून या लहान भावाचा हट्ट आता भारतीय जनता पक्षाला पुरवावाच लागेल अशी चिन्ह आहेत. सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेने आधीच सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला कानपिचक्या दिलेल्या असतानाच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एक व्यंगचित्र ट्वीट करून समाज माध्यमांवर नवी चर्चा सुरू करून दिली आहे. हे व्यंगचित्र रवि नावाच्या व्यंगचित्रकाराने काढलं असून त्याचं देखील कौतुक संजय राऊत या ट्वीटमध्ये करत आहेत.
6 वर्षांपूर्वी -
मी गुळगुळीत बोलत नाही! सेनेशिवाय भाजपाला राज्य करणं अशक्य: संजय राऊत
विधानसभा निवडणुकीच्या निकालाला अवघे काही तास शिल्लक आहेत. निकालामध्ये कोणता पक्ष किती जागा मिळविणार हे गुरुवारी स्पष्ट होणार आहे. मात्र शिवसेनेने प्रत्येक जागा जिंकण्यासाठी लढली आहे. अबकी बार १०० पार हे ध्येय शिवसेनेचे होते. शिवसेना-भारतीय जनता पक्ष २०० च्या वर जाणार हे सांगायला कोणत्याही ज्योतिषाची गरज नाही. शिवसेना १०० जागांवर विजयी होणार आहे. भारतीय जनता पक्षाला जास्त जागा मिळाल्या तरी शिवसेनेशिवाय सत्ता स्थापन करता येणार नाही असा दावा शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
ज्या घोटाळ्यावरुन ईडीने FIR दाखल केला आहे, त्या बँकेत शरद पवार कोणत्याही पदावर नव्हते
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी)होणाऱ्या चौकशीवरुन सध्या मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी तणावाचं वातावरण आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक गैरव्यवहारप्रकरणी ईडीच्या मुंबईतील कार्यालयात शरद पवार स्वत:च उपस्थित राहणार आहेत. त्यांनी स्वत: आपण ईडी कार्यालयात जाणार असल्याचं जाहीर केलं होतं. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांना समर्थन दिलं आहे. शरद पवार राजकारणातले भिष्म पीतामह असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
...अन्यथा युती तुटणार; खासदार संजय राऊतांकडून देखील दुजोरा
शिवसेना आणि भाजपच्या युतीचा फॉर्म्युला अद्याप निश्चित झालेला नाही. त्यामुळे भाजपा-शिवसेनेची युती तुटणार का, असा प्रश्नचिन्ह सर्वांसमोर असतानाच शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी युती तुटण्याचे संकेत दिले आहेत. जर शिवसेनेला २४४ पैकी १४४ जागा मिळाल्या नाही तर युती तुटू शकते, असे राऊत यांनी म्हटले आहे.
6 वर्षांपूर्वी -
नाशिक: बनावट नोटा प्रकरणातील आरोपी छबू नागरेचा शिवसेनेत प्रवेश
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत जोरदार इनकमिंग सुरु आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील पदाधिकाऱ्यांचा त्यात सर्वात मोठा समावेश आहे. दिग्गज नेत्यांना थेट मातोश्री आणि वर्षा निवासवर प्रवेश दिले जाती आहेत. त्यात अनेक ठिकाणी कोणतीही तत्व आणि पार्श्वभूमी न पाहता केवळ निवडणूक जिंकायच्याच या उद्देशाने प्रवेश देणं सुरु आहे.
6 वर्षांपूर्वी -
खासदार संजय राऊत आणखी तीन चित्रपटांची घोषणा करणार
भारतीय राजकारणाच्या इतिहासात ठसा उमटवणार नाव म्हणजे हिंदुहृदयसम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे. त्यांच्या जीवनावरील ठाकरे या चित्रपटाच्या भरघोस यशानंतर संजय राऊत आता पुन्हा चित्रपट सृष्टीत पॉल टाकणार आहेत. राजकारणी ते चित्रपट निर्माते असा प्रवास करणारे संसद सदस्य संजय राऊत आपल्या आगामी तीन चित्रपट प्रकल्पाची घोषणा करण्यास सज्ज झाले आहेत. ठाकरे हा चित्रपट राऊटर्स एंटरटेनमेंटचे संजय राऊत लिखित, संकल्पित आणि निर्मित पहिला चित्रपट आहे.
6 वर्षांपूर्वी -
विरोधक मनसेलाचं नाही, तर डोनाल्ड ट्रम्प यांना देखील सोबत घेतील: संजय राऊत
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जसजशा जवळ येत आहेत तशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये टोलेबाजी सुरु झाली आहे. राज्यातील राजकीय वर्तुळात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहत आहे. सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची जय्यत तयारी सुरु केली आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेला पायउतार करण्यासाठी कॉंग्रेसकडून इतर पक्षांसोबत आघाडी करण्यासाठी हालचाल केली जात आहे. यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतल्याने कॉंग्रेस आघाडीत महाराष्ट्र नवनिर्माण सेने सहभागी होणार असल्याची जोरदार चर्चा आहे.
6 वर्षांपूर्वी -
अंड आणि कोंबडीला शाकाहारीचा दर्जा मिळावा: संजय राऊतांची मागणी
राज्यसभेत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एका अजब विषयावर मत मांडत थेट आयुष मंत्रालयाकडे मागणी केली आहे. अंड आणि कोंबडीला शाकाहारीचा दर्जा द्यावा अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आयुष मंत्रालयाला केली आहे. सोमवारी राऊत राज्यसभेत बोलत होते. यावेळी त्यांनी नंदुरबार आणि हरियाणातल्या आदिवासी समाजाचे दाखले देत ही मागणी राज्यसभेत उचलून धरली.
6 वर्षांपूर्वी -
नेटिझन्सकडून राऊतांचे व उद्धव ठाकरेंचे 'उत्तुंग' नेत्यांसोबतच्या भेटीचे फोटो व्हायरल
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी अचानक यूपीए अध्यक्षा आणि काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधींची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतल्यानं महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नव्या राजकीय समीकरणांची चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-एनसीपीच्या आघाडीत मनसे पक्ष सामील होणार का, याबद्दल अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. मात्र, ही भेट शिवसेनेच्या पचनी पडली नसल्यासारखी खोचक प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे.
6 वर्षांपूर्वी -
बाळासाहेब व इंदिराजी ही दोन उत्तुंग व्यक्तिमत्व होती, या भेटीची तुलना त्या भेटीशी शक्य नाही
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी अचानक यूपीए अध्यक्षा आणि काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधींची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतल्यानं महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नव्या राजकीय समीकरणांची चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-एनसीपीच्या आघाडीत मनसे पक्ष सामील होणार का, याबद्दल अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. मात्र, ही भेट शिवसेनेच्या पचनी पडली नसल्यासारखी खोचक प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे.
6 वर्षांपूर्वी