Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
मुलांमुळेच नारायण राणेंचं नुकसान | त्यांची मुलं उठसूट इतरांचे बाप काढतात, तुम्ही काय बिनबापाचे आहात काय?
मुख्यमंत्री ठाकरे यांना धमी देणाऱ्या नारायण राणे यांच्यावर कायद्यावे कारवाई केली. राणे यांच्यावरील कारवाई म्हणजे घटनाबाह्य असल्याचे तारे भाजप नेते तोडतात तेव्हा आश्चर्य वाटते. पंतप्रधान, राष्ट्रपती, मुख्यमंत्री असोत, त्यांचा जाहीर उपमर्द कोणालाच नाही. राणे हा अपराध वारंवार करती राहिले. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणे हा कोणाला गुन्हा वाटत असेल तर ते भारतीय संविधानास कुचकामी ठरवत आहे. असे टीकास्त्र संजय राऊत यांनी शिवसेनेचे मुखपत्र रोखठोकमधून सोडले आहे.
4 वर्षांपूर्वी -
भारती पवार, कपिल पाटील, कराडांनीही जनआशीर्वाद यात्रा काढली | पण यात एकच अतिशहाणा निघाला - संजय राऊत
शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजप नेते नारायण राणेंना करण्यात आलेल्या अटकेवरून बोचरी टीका केली आहे. फार बोलत नाही पुढल्या कार्यक्रमाला जायचं आहे. अजून एखादा कार्यक्रम करेक्ट करून दाखवू. आपल्याला कार्यक्रम करण्याची सवय आहे. कार्यक्रम केल्यावर परिणामाची चर्चा कधीही करत नाही, असं सूचक विधान संजय राऊत यांनी केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
संजय राठोड अडचणीत | घाटंजीत एसआयटीचे पथक दाखल | तक्रारदार महिलेचा जबाब नोंदवणार
पुण्यात एका तरुणीने आत्महत्या केल्यानंतर मंत्रिपद गमावलेल्या संजय राठोड यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. माजी मंत्री संजय राठोड यांनी शरीरसुखाची मागणी केल्याची तक्रार यवतमाळ पोलिसांकडे दाखल करण्यात आली आहे. इतकच नाही, तर अजूनही तीच मागणी करून छळत असल्याचा आरोपही त्या पीडित ३० वर्षीय महिलेने केला होता.
4 वर्षांपूर्वी -
केंद्राने खाऊचा डबा दिला, पण डबा रिकामाच आहे | घटना दुरुस्ती विधेयकावरून राऊतांची टीका
१०२ व्या घटनादुरुस्तीमुळे सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग (एसईबीसी) निर्माण करण्याचे अधिकार पुन्हा राज्यांना बहाल करण्यासंदर्भात संसदेत विधेयक मांडले गेले आहे. मात्र केंद्र सरकारला उघडे पाडण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने कंबर कसली आहे. हे एसईबीसी प्रवर्ग तयार करूनही मराठा आरक्षण देण्यात अडचण येऊ शकते हे लक्षात घेऊन आता घटनेत नमूद असलेल्या आरक्षणाची ५० टक्के मर्यादा शिथिल करण्याचे विधेयक अथवा प्रस्ताव मांडावा यासाठी आघाडी सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत.
4 वर्षांपूर्वी -
संसद अधिवेशनाच्या निमित्ताने दिल्ली वारी | संजय राऊत-मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा
शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्री या निवासस्थानी भेट घेतली. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यात राजकीय चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. संजय राऊत यांनी नुकतीच दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली होती. राहुल गांधी यांच्याशी झालेल्या चर्चेचा तपशील संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना सांगितला आहे. शिवसेना युपीएचा भाग नाही. मात्र, दिल्लीत राहुल गांधी आणि राऊत यांच्यात जवळकी वाढलेल्याचे चित्र दिसून आले आहे.
4 वर्षांपूर्वी -
ज्या राज्यात सत्ता नाही, तिथे भाजप राज्यपालांच्या माध्यमातून राज्य करू इच्छिते - संजय राऊत
नियोजित मराठवाडा दौऱ्यात जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकांवरून वादंग निर्माण झाल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एक पाऊल मागे घेतले आहे. ५ ऑगस्टपासून ते नांदेड, परभणी आणि हिंगोलीच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्याचा सुधारित कार्यक्रम राजभवनाने बुधवारी जारी केला असून तिन्ही आढावा बैठका रद्द करत केवळ शासकीय विश्रामगृहावर अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली जाणार आहे. यामुळे आघाडी सरकार आणि राजभवन यांच्यातील संघर्षावर तात्पुरता पडदा पडला आहे.
4 वर्षांपूर्वी -
शिवसेना अजून यूपीए'चा भाग नाही, आमची स्वतंत्र वाटचाल सुरू - संजय राऊत
दिल्लीत सध्या संसदेचं अधिवेशन सुरु आहे. यावेळी विरोधकांच्या मोठ्या प्रमाणावर गाठीभेटी देखील सुरु आहेत. त्यालाच अनुसरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काल काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. त्यानंतर पुन्हा युपीए संदर्भातील चर्चा सुरु झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
आमचे शाखाप्रमुख बोलतील | केवळ ३ शब्दात प्रसाद लाड यांना लायकी दाखवली
वेळ पडल्यास शिवसेना भवन देखील फोडू’ या विधानावरुन भाजप आमदार प्रसाद लाड यांनी सारवासारव करायला सुरुवात केली आहे. हे विधान केल्यानंतर त्यावर राज्यभरातून प्रतिक्रिया येऊ लागल्या होत्या. त्यानंतर लाड यांनी रात्री उशीरा आपल्या विधानावरुन स्पष्टीकरण दिले आहे.
4 वर्षांपूर्वी -
मोदी वाराणासीत गेले तेव्हा सर्व काही अलबेल असल्याचं म्हणाले | मग गंगा खोटे बोलते का? - संजय राऊत
ऑक्सिजन अभावी रुग्ण दगावले नसल्याचं लेखी उत्तर केंद्र सरकारने दिलं आहे. सरकारच्या या उत्तरावर शिवसेना नेते संजय राऊत प्रचंड संतापले आहेत. केंद्र सरकार सत्यापासून दूर पळत आहे. हे सरकार भ्रमिष्ट झालं असून ऑक्सिजन अभावी दगावलेल्यांच्या नातेवाईकांनी केंद्र सरकारवर खटलाच दाखल केला पाहिजे, असं आवाहन संजय राऊत यांनी केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
गंगेच्या किनाऱ्यावर हजारो मृतदेह अंत्यसंस्कारही न करता दफन केले गेले | ते जगाने पाहिले - संजय राऊत
आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यसभेत मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. उत्तर प्रदेशातील गंगेच्या किनाऱ्यावर हजारो मृतदेह दफन केले गेले. हे जगाने पाहिलं. त्या मृतदेहांवर अंत्यसंस्कारही झाले नाहीत. या मृतदेहांची विटंबना झाली, कायदो सांगतो मृतदेहांचा अपमान हे सुद्धा बेकायदा आहे. आम्ही परत एकदा मृतदेहांना मारलं, चिरडलं, अपमानित केलं. परंतु, माझा सरकारला सवाल आहे, तुम्ही मृतांचे आकडे का लपवता?
4 वर्षांपूर्वी -
राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र येण्याची स्वप्नं पडणं हा आजार आहे - संजय राऊत
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदशाध्यक्षा शरद पवार यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप असं नवीन समीकरण उदयास येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तशा चर्चांनी जोरही धरला आहे. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनीच खुलासा केला आहे. अशी स्वप्नं पडणं हा आजार आहे. असे काही होणार नाही. महाविकास आघाडीचं सरकार 5 वर्ष चालेल, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
ते काय बोलतात, कसे डोलतात यावर सरकारचं भवितव्य अजिबात अवलंबून नाही - संजय राऊत
शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आजच्या सामना अग्रलेखामधून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासाठी जोरदार बॅटिंग केली आहे. पटोले यांनी काँग्रेसचे नेतृत्व हाती घेतल्यापासून ते आतापर्यंतची परिस्थिती, त्यांची दरदिवशी खळबळ निर्माण करणारी वक्तव्यं यावर राऊतांनी आजचा सामना अग्रलेख लिहिला आहे. पटोले नेमके काय आहेत, त्यांचा स्वभाव कसा आहे, त्यांची वक्तव्यं का चर्चेत असतात, यावर आजचा अग्रलेख आहे. अग्रलेख वाचल्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते देखील भारावून जातील असा हा अग्रलेख आहे.
4 वर्षांपूर्वी -
भाजप आमदारांचे निलंबन हा शिस्तीचाच भाग | कारवाई केली नसती तर सभागृहातच दंगली होतील - संजय राउत
ओबीसीच्या राजकीय आरक्षणावरुन काल विधिमंडळात भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी चांगलाच गदारोळ घातला होता. तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी पीठासीन अधिकाऱ्यांना शिवीगाळ व अंगावर धावून जाण्याच्या प्रयत्न केल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाच्या 12 आमदारांना एका वर्षासाठी निलंबित केले आहे. यानंतर राज्याच्या राजकारणात गोंधळ निर्माण झाला. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार निशाणा साधला आहे.
4 वर्षांपूर्वी -
कुणालाही भेटलो नाही, अफवा पसरवण्याचे कारखाने दिवाळखोरीत निघतील - संजय राऊत
भारतीय जनता पक्षाचे आमदार आशिष शेलार यांना भेटल्याच्या वृत्ताचा शिवसेना नेते संजय राऊत यांनी इन्कार केला आहे. मी काल कुणालाही भेटलो नाही. या सर्व अफवा आहेत. अशा अफवांनी राजकारण हलत नाही. अफवा पसरवण्याचे कारखाने सुरू आहेत. ते दिवाळखोरीत निघतील, असं संजय राऊत यांनी सांगितलं.
4 वर्षांपूर्वी -
केंद्रीय तपास यंत्रणेमार्फत मंत्र्यांना अडचणीत आणून सरकार पडणार असे केंद्राला वाटत असेल तर ते अशक्य आहे
विरोधकांना राज्य सरकारविरोधात घाव घालावा, ते त्यांचं कामच आहे. पण विरोधकांनी खोट्या तलवारीचे घाव घालू नये, असा इशारा शिवसेना नेते संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षाला दिला आहे. संजय राऊत यांनी टीव्ही वृत्त वाहिन्यांशी संवाद साधताना हा इशारा दिला आहे. केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर करून मंत्र्यांना अडचणीत आणून सरकार हलवू शकतो असं केंद्र सरकारला वाटत असेल तर ते कदापी शक्य नाही.
4 वर्षांपूर्वी -
आमदार-खासदारांना शरण आणण्याची ताकद ईडी आणि सीबीआय'मध्ये आहे - संजय राऊत
भारतीय जनता पक्षासोबत पुन्हा जुळवून घेतल्यास बरं होईल, अशी आग्रही मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे करत शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी एकच खळबळ उडवून दिली होती. सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलंल पत्र चर्चेचा विषय ठरला आहे. या पत्राचा धागा पकडून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ईडी, सीबीआयच्या गैरवापरावरून केंद्रातील भाजप सरकारला लक्ष्य केलं आहे. केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून कधीकाळी नरेंद्र मोदी, अमित शहांनादेखील त्रास सहन करावा लागला. त्यामुळे यंत्रणांमुळे होणाऱ्या मनस्तापाची त्यांना कल्पना असावी, असं राऊत यांनी शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या आजच्या (२७ जून) ‘सामना’मधील ‘रोखठोक’ सदरात म्हटलं आहे
4 वर्षांपूर्वी -
सर्वांना त्रास देण्याचा प्रयत्न, पण आम्ही सुद्धा बघून घेऊ - राऊतांच्या इशारा
अनिल देशमुख यांचे पीए संजीव पलांडे आणि कुंदन शिंदे यांना अटक करण्यात आले असून, आता देशमुख यांना समन्स बजावण्यात आलं आहे. याप्रकरणावरून शिवसेनेचे नेते संजय राऊत भाजपावर चांगलेच भडकले. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने समन्स बजावलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
CBI, ED'चा वापर करुन राज्यात सरकार येईल असे भाजपला वाटत असेल तर ते अंधारात चाचपडत आहेत - संजय राऊत
अंमलबजावणी संचालनालयाने (ED) महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील घरी आज सकाळी छापे टाकले. ईडीचे अधिकारी गेल्या चार तासांपासून तपास करत आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
ED, CBI भाजपचे कार्यकर्ते आहेत का? रामजन्म भूमी खरेदी घोटाळ्याची चौकशी करावी - संजय राऊत
केंद्रीय तपास यंत्रणा ईडी आणि सीबीआयकडून राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सातत्याने कारवाईचा बडगा उगारला जात आहे. त्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ईडी आणि सीबीआय़ या केंद्रीय यंत्रणा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्या आहेत का? असा खोचक टोला लगावला आहे. तसेच जर या संस्थांना तपासच करायचा असेल तर त्यांनी राम जन्मभूमी मंदिर टस्टच्या जमीन घोटाळ्यासंदर्भात चौकशी करावी, अशी मागणी संजय राऊत यांनी यावेळी केली.
4 वर्षांपूर्वी -
स्वप्ना पाटकर यांना बनावट PHD डिग्री प्रकरणी अटक झालेली | त्यांच्यावर फसवणूक, 420, 467, 468 या गंभीर गुन्ह्यांची नोंद
फिल्म निर्मात्या आणि डॉक्टर स्वप्ना पाटकर यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर विविध आरोप करत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर मंगळवारी उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी पाटकर यांनी न्यायालयात याचिका दाखल करताच, बोगस डिग्रीच्या खोट्या प्रकरणात पाटकर यांना अटक केल्याचा दावा विरोधी पक्षकारांकडून करण्यात आला. मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई पोलीस आयुक्त यांना याप्रकरणी तातडीने लक्ष घालत आपली भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणाची पुढील गुरुवार(24 जून) पर्यंत तहकूब करण्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी