Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
सजय राऊत यांच्या विरोधात महिलेने केलेल्या आरोपांची चौकशी करा | हायकोर्टाचे पोलीस आयुक्तांना निर्देश
फिल्म निर्मात्या आणि डॉक्टर स्वप्ना पाटकर यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर विविध आरोप करत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर मंगळवारी उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी पाटकर यांनी न्यायालयात याचिका दाखल करताच, बोगस डिग्रीच्या खोट्या प्रकरणात पाटकर यांना अटक केल्याचा दावा विरोधी पक्षकारांकडून करण्यात आला. मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई पोलीस आयुक्त यांना याप्रकरणी तातडीने लक्ष घालत आपली भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणाची पुढील गुरुवार(24 जून) पर्यंत तहकूब करण्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
ती बाळासाहेब ठाकरेंची वास्तू, शिवसेना भवनावर मोर्चा काढण्याचं कारण काय? म्हणून शिवसैनिकांनी शिवप्रसाद दिला
भारतीय जनता पक्षाचे काही लोक काल शिवसेना भवनासमोर आले होते. त्यांनी तिथे राडा करण्याचा प्रयत्न केला. राडा करणाऱ्यांना शिवसैनिकांनी शिवप्रसाद दिला आहे. हा विषय प्रसादापर्यंतच मर्यादित राहू द्या, शिवभोजन थाळी देण्याची वेळ येऊ देऊ नका, असा सज्जड इशारा शिवसेना नेते संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षाला दिला आहे.
4 वर्षांपूर्वी -
वाढदिवसाला त्यांनी केक जास्त खाल्ला असेल | पिंजऱ्याचं दार उघडं ठेवतो आतमध्ये येऊनच दाखवा - संजय राऊत
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे आपल्या वाढदिवशी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याशी वाकयुद्ध रंगले होते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी संजय राऊत यांनी पाटील यांची पुन्हा फिरकी घेतली. काल त्यांचा वाढदिवस होता, त्यांनी जास्त केक खाल्ला असेल. त्यांना फारसे गांभीर्याने घेऊ नका असे राऊत म्हणाले. ते नंदुरबारमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते.
4 वर्षांपूर्वी -
वाघाशी मैत्री केली जात नाही | वाघ ठरवतो मैत्री कधी करायची ते - संजय राऊत
काल पुण्यात प्रसार माध्यमांशी संवाद साधताना चंद्रकांत पाटील असं म्हणाले की वाघाशी मैत्री करायला आम्ही कधीही तयार आहोत कारण दुश्मनी वाघाशी नव्हतीच. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजप युतीसाठी जणून काही चंद्रकांत पाटलांनी ऑफरच दिली असं दिसून आलं.
4 वर्षांपूर्वी -
तोल ढासळलेल्या व्यक्तीवर बोलायचं नसतं, उपचार करायचे असतात - संजय राऊत
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकर यांच्यावर केलेल्या टीकेला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलं असून संताप व्यक्त केला आहे. राज्य सरकार प्रत्येक गोष्ट केंद्रावर ढकलत आहे. उद्या आदित्य ठाकरेंच्या लग्नासाठीसुद्धा उद्धव ठाकरे पंतप्रधांनांना पत्र लिहतील असा टोला चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना लगावला.
4 वर्षांपूर्वी -
एक दिवस देवेंद्र फडणवीस मातोश्रीवरही येतील - संजय राऊत
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना एक महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. देवेंद्र फडणवीस हे शरद पवार आणि एकनाथ खडसे यांच्या घरी गेले, हे पाहून मला खूप बरे वाटले. महाराष्ट्राच्या राजकारणात वैचारिक मतभेद असले तरी कोणीही एकमेकांचा वैयक्तिक शत्रू नसतो. ही आपल्याकडची परंपरा आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस एक दिवस मातोश्रीवरही येतील, असा विश्वास मला असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले.
4 वर्षांपूर्वी -
काँग्रेसच्याच पुण्याईवर देश चालतोय, मोदी सरकारला आत्मचिंतनाची गरज - संजय राऊत
केंद्रातील मोदी सरकारला आज सात वर्ष पूर्ण झाली आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना मोदी सरकारच्या आजरवच्या कामगिरीबाबत विचारण्यात आलं असता त्यांनी मोदी सरकारला आत्मचिंतानाची गरज असल्याचं वक्तव्य केलं आहे. मोदी सरकारच्या आजवरच्या कामगिरीबाबत विचारण्यात आलं असता त्यांनी मोदी सरकारला आत्मचिंतानाची गरज असल्याचं वक्तव्य केलं आहे. देश काँग्रेसच्याच पुण्याईवर तरला आहे असं सांगताना राऊत यांनी मोदी सरकारला आणखी मेहनत घ्यायची गरज असल्याचं म्हटलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
गुजरात व्यापारी आहे, पण महाराष्ट्र लढणारा आहे - शिवसेना
महाराष्ट्रात काहीही करुन राजकीय आणि आर्थिक गोंधळ निर्माण करून राज्य बदनाम करण्याचे कारस्थान सुरूच आहे. दिल्लीतील सरकारे बदलत राहिली तरी महाराष्ट्राशी वैर काही संपलेले नाही. महाराष्ट्राने दिल्लीची फालतू गुलामी कधीच पत्करली नाही. महाराष्ट्राला इतिहास आहे. बूड आहे म्हणून तो टिकला आहे. महाराष्ट्रनिर्मितीचा क्षण हा मंगलमयच असतो. तो दिवस महाराष्ट्राचे शौर्य व धैर्य दाखवणारा असतो. महाराष्ट्र लढत आहे, महाराष्ट्र लढत राहील व विजयी होईल! असे शिवसेनेनं म्हटलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
मोदींवर पूर्ण विश्वास, ते मद्रास कोर्टाच्या टिप्पणीला गांभीर्याने घेतील असा मला विश्वास - संजय राऊत
आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचं चित्रं ज्या पद्धतीने निर्माण केलं जात आहे. त्यावरून हे फार मोठं षडयंत्र असू शकतं. भारताची अर्थव्यवस्था नष्ट करण्याचं हे मोठं षडयंत्र असू शकतं, असा दावा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला. संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हा गंभीर दावा केला. राष्ट्रीय स्तरावर भारताचा अपमान होत असेल तर त्यात राजकारण करण्याची गरज नाही.
4 वर्षांपूर्वी -
पंतप्रधानांनी आरोग्य सेवांचा तुटवडा होणार नाही असं म्हटलेलं पण लस, रेमडेसिवीर, ऑक्सिजनचा तुडवडा होतोय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्याही राज्याला ऑक्सिजन आणि रेमडेसिविर इंजेक्शन्स कमी पडून दिली जाणार नाहीत, असे म्हटले आहे. त्यामुळे त्यांच्या मनात कोणत्याही राज्याविषयी आकस नाही. पण भाजपमधील काही राजकीय शुक्राचार्य महाराष्ट्रापर्यंत मदत पोहोचवण्यात अडथळे निर्माण करत आहेत, असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला.
4 वर्षांपूर्वी -
बेळगाव प्रकरणी फडणवीसांच्या पाठिंब्याची गरज होती | पण त्यांनी वेगळी भूमिका घेतली - राऊत
राज्यात एकीकडे कोरोना रूग्ण संख्या वाढत आहे. तर दुसरीकडे निवडणूकीची रणधुमाळी सुरू आहे. पंढरपूर मंगळवेढा निवडणूकीची एकीकडे तयारी सुरू आहे तर दुसरीकडे बेळगाव लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत शुभम शेळके या उमेदवाराच्या प्रचारासाठी बेळगावमध्ये गेले होते. यावेळी त्यांनी त्यांच्या दौऱ्यावर आणि भाजपलाही सुनावले आहे.
4 वर्षांपूर्वी -
उद्या मोदींनी देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केल्यास त्यालाही फडणवीस विरोध करणार का?
महाराष्ट्रात लॉकडाऊन करण्यास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सातत्याने विरोध केला जात आहे. हा विरोध भारतीय जनता पक्षाच्या राजकीय भूमिकेमुळे असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला आहे. परंतु, उद्या कोरोना रुग्णांची संख्या वाढली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली तर तेव्हा देवेंद्र फडणवीस काय करणार? असा खोचक सवाल राऊतांनी केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
राज्यात भाजपच्या १०५ आमदारांना निवडून दिलेल्या लोकांसाठी तरी लस घेऊन या - संजय राऊत
एक काळ असा होता दिल्लीतील आपले जे मराठी मंत्री, नेते होते. ते कोणत्याही पक्षाचे असो, पण महाराष्ट्राचा जर विषय आला की हे सगळी लोकं एकत्र यायचे आणि केंद्रात महाराष्ट्राच्या हक्कासाठी लढत राहिले आहेत. हे मी स्वतः पाहिलेलं आहे. पण आता चित्र नेमकं उलटं आहे. आता सत्तेतील जे आपले मराठी मंत्री आहेत, ते तिथे बसून महाराष्ट्राची बदनामी करत आहेत अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
देशाच्या इतिहासात सर्वात गलीच्छ राजकारण सध्या महाराष्ट्रातील विरोधक करत आहेत - संजय राऊत
उद्योगपती अंबानी यांनी धमकावल्या प्रकरणी अटकेत असलेले सचिन वाझे यांच्या पत्रामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. पत्रातून सचिन वाझे यांनी अनिल देशमुख तसंच शिवसेनेचे नेते अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यानंतर अनिल परब यांनी स्पष्टीकरण देत आरोप खोटे असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली असून राज्यात पत्र लिहिण्याचा नवा ट्रेंड आल्याचं म्हटलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
अनिल देशमुख आणि महाराष्ट्र सरकारच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्र सरकार आणि अनिल देशमुख यांच्याकडून उच्च न्यायालयाच्या निर्णायाला आव्हाण देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्र्यांवर महिना 100 कोटी वसूलीचे आरोप केले होते. याच पार्श्वभूमीवर त्यांची सीबीआय चौकशी व्हावी याकरीता उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
4 वर्षांपूर्वी -
महाविकास आघाडीतील कोणीही मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू नये - उपमुख्यमंत्री
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्र्यांवर केलेल्या आरोपांनंतर अनिल देशमुख वादात आडकले आहेत. यावरुन विरोधक सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडत आहेत. यातच, शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही देशमुखांवर ‘रोखठोक’मधून टीका केली. यानंतर आता संजय राऊतांच्या टीकेला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
4 वर्षांपूर्वी -
जोपर्यंत 12 आमदारांची नियुक्ती होत नाही, तोपर्यंत मी राज्यपालांवर टीका करणारच
मागील काही महिन्यांत जे घडले त्यामुळे महाराष्ट्राच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. वाझे हा साधा फौजदार. त्याचे इतके महत्त्व का वाढले? हाच तपासाचा विषय. गृहमंत्र्यांनी वाझेंना 100 कोटी वसुलीचे टार्गेट दिले असा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग करतात. त्या आरोपांचा सामना करायला सुरुवातीला कुणीच पुढे आले नाही! सरकारकडे ‘डॅमेज कंट्रोल’ची योजना नाही हे पुन्हा दिसले, असे रोखठोक मत शिवसेनेनं मांडले. सामना वृत्तपत्राच्या रोखठोक सदरात सचिन वाझे आणि गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या चर्चांवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे.
4 वर्षांपूर्वी -
शुक्लांवर एवढा विश्वास का ठेवला? | महाविकास आघाडीला संजय राऊत यांचा सवाल
एकदा धडा घेऊनही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी रश्मी शुक्ला यांच्यावर इतका विश्वास कसा ठेवला, याचे आश्चर्य वाटते. राजकारणात अधिकाऱ्यांवर इतका विश्वास कधीही ठेवायचा नसतो. खांद्यावर विश्वासाने ठेवलेली मान हे अधिकारी कधीही बगलेत दाबू शकतात, हे आताच्या उदाहरणावरून दिसून आले आहे. अत्यंत सहजपणे सत्तेत जाऊन बसलेल्या लोकांनी या अनुभवानंतर शिकावे, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महविकास आघाडीच्या सरकारला शुक्रवारी नवी दिल्लीत सुनावले.
4 वर्षांपूर्वी -
फडणवीस हे सह्याद्री आणि मोदींपेक्षाही मोठे नेते | पण मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत
महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे अत्यंत मोठे नेते आहेत. त्यांची उंची सह्याद्री आणि नरेंद्र मोदी यांच्यापेक्षाही मोठी आहे. बहुतेक त्यामुळेच देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री व्हायला जमलं नाही, असा खोचक टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावला. देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेतेपदाची प्रतिमा मलीन होईल, नष्ट होईल, असे वर्तन करु नये. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार बरखास्त करण्याची वारंवार मागणी करुन ते विरोधी पक्षाचं हसं करत आहेत, अशी टीका देखील खासदार संजय राऊत यांनी केली.
4 वर्षांपूर्वी -
फडणवीस बॉम्ब घेऊन आले | तो भिजलेला लवंगी फटाका निघाला - संजय राऊत
शिवसेना नेते संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहसचिवांना दिलेल्या बदल्यांच्या रॅकेटच्या अहवालाची अक्षरश: खिल्ली उडवली. फडणवीस दिल्लीत बॉम्ब घेऊन आले होते. परंतु तो भिजलेला लवंगी फटका निघाला. त्याला वातही नव्हती, अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी खिल्ली उडवली. तसेच राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख हेच महाराष्ट्राचे गृहमंत्री राहणार असल्याचं स्पष्ट केलं.
4 वर्षांपूर्वी