Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
भाजपाची सत्ता नसणाऱ्या राज्यांमध्ये तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्यानेच | राऊतांची प्रतिक्रिया
केंद्र सरकारच्या CBI या चौकसी संस्थेला महाराष्ट्रात आता थेट तपास करता येणार नाही. राज्यात चौकशीसाठी येण्यापूर्वी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागेल असा आदेश राज्य सरकारने काढला आहे. एखाद्या प्रकरणाची चौकशी करायची असेल तर CBI थेट राज्यात येवून चौकशी करू शकते. मात्र त्यासंदर्भात काही अधिकार राज्यांना देण्यात आले आहेत. त्याचाच वापर करत राज्य सरकारने सीबीआयच्या अधिकारांना कात्री लावली आहे.
5 वर्षांपूर्वी -
म्हणजे देश येड्यागबाळ्यांच्या हाती आहे असेच दानवेंना म्हणायचे आहे काय
सरकार चालविणे येड्यागबाळ्यांचे काम नाही, असे विधान भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केले होते. ते विधान शिवसेनेला चांगलेच खटकलेले आहे. त्या विधानावरुन शिवसेनेने आजच्या (१९ ऑक्टोबर) सामनाच्या अग्रलेखातून रावसाहेब दानवे यांच्यावर निशाणा साधला आहे तसेच मोदी सरकारच्या आर्थिक कारभाराबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
5 वर्षांपूर्वी -
संजय राऊत राष्ट्रपती होतील | तेव्हा मला महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट चालेल.....कोणी म्हटलं?
कुणाल कामरा यांचा ‘Shut Up Ya Kunal’ कार्यक्रम नेटिझन्समध्ये चांगलाच लोकप्रिय आहे. या कार्यक्रमात कामरा हे अनेक राजकीय नेत्यांसोबत अनौपचारिक गप्पा मारताना दिसतात. या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सीझनबद्दल जेव्हा चर्चा सुरू झाली, तेव्हा स्वतः कुणाल कामरा यांनी एक ट्वीट केलं होतं. ‘Shut Up Ya Kunal’ च्या दुसऱ्या सीझनचे पहिले पाहुणे म्हणून येण्यासाठी संजय राऊत तयार झाले तरच मी हा कार्यक्रम सुरू करेन, अन्यथा नाही, असं कामरा यांनी या ट्वीट केलं होतं.
5 वर्षांपूर्वी -
दसरा मेळावा व्यासपीठावरच होणार | संजय राऊत यांचं मोठं विधान
दसरा मेळावा व्यासपिठावरच होणार असल्याचं शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे. शिवसेनेचे मुख्यमंत्री म्हणून हा पहिलाच दसरा मेळावा असेल. दसरा मेळाव्याचं महत्व राजकिय आणि सांस्कृतिक देखील आहे. दसरा मेळावा कसा घ्यायचा याबाबत चर्चा होईल. नियम आणि आरोग्याच्या दृष्टीनं योग्य होईल अश्या पद्धतीचं नियोजन केलं जाईल, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
कृष्णकुंजवर राज भेट झाली नाही | कुणाल कामराने राऊतांकडे कॉमेडी मोर्चा वळवला
स्डँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी संजय राऊत यांची भेट घेतल्यानंतर ‘Shut Up Ya Kunal’ या कार्यक्रमात संजय राऊत कुणाल कामरांना मुलाखत देणार असल्याबद्दल चर्चा सुरू झाली.
5 वर्षांपूर्वी -
हा तर लोकशाहीवर सामूहिक बलात्कार | इतिहास त्यांना माफ करणार नाही
काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांना झालेल्या धक्काबुक्कीच्या निषेधार्थ सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात नांदेडमध्ये आंदोलन करण्यात आलं. यावेळी योगी आदित्यनाथ यांचा पुतळाही जाळण्यात आला. काँग्रेस कार्यकर्त्यांनी योगी सरकार आणि भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. राहुल गांधी यांना झालेल्या धक्काबुक्कीचा गडचिरोली युवक काँग्रेस कडून निषेध करण्यात आलाय. युवक काँग्रेसतर्फे उत्तर प्रदेश सरकारचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा प्रतिकात्मक पुतळा दहन करून निषेध नोंदविण्यात आला.
5 वर्षांपूर्वी -
आदित्य ठाकरेंची बदनामी करणाऱ्यांसोबत कशाला जायचे | राऊतांवर सेनेत नाराजी
मोदी सरकारने केलेल्या कृषी कायद्यांना विरोध म्हणून शिरोमणी अकाली दलाने थेट राष्ट्रीय लोकशाही आघाडीतूनच बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे. यावरुन शिवसेनेनं पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपवर टीका केली आहे. ज्या कारणांसाठी एनडीए स्थापन झाली ते कारणच मोदींच्या झंझावातात नष्ट झाले हे सत्य स्वीकारुन नवा झेंडा फडकवावा लागेल. सध्या तरी अकाली दल हा एनडीएचा शेवटचा खांबही कलथून गेला आहे. राष्ट्रीय स्तरावरील हिंदुत्वाचे राजकारणही त्यामुळे निस्तेज होताना दिसत आहे, अशी टीका शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
समविचारी पक्ष असल्याने युतीत निवडणूक लढवली | आता भाजपशी वैचारिक मतभेदांचा साक्षात्कार?
देवेंद्र फडणवीस आणि आमच्यात वैचारिक मतभेद असले तरी आम्ही एकमेकांचे शत्रू नाही, असे वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले. ते रविवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शनिवारी झालेल्या भेटीबद्दल खुलासा केला. संजय राऊत यांनी म्हटले की, ही बैठक गुप्त नव्हती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या भेटीबद्दल माहिती होती. ‘सामना’साठी देवेंद्र फडणवीस यांची प्रदीर्घ मुलाखत घेण्याचा आमचा विचार आहे. त्याविषयीच आम्ही काल चर्चा केली. परंतु, आपली जाहीर मुलाखत घेण्यात यावी, अशी इच्छा देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्याचे राऊत यांनी सांगितले.
5 वर्षांपूर्वी -
शेती विधेयकं मंजूर झाल्याने शेतकऱ्यांच्या दुप्पट उत्पन्नाची हमी सरकार देणार का? संजय राऊत
मुंबई व आसपासच्या परिसरातील नोकरदार व कष्टकऱ्यांच्या सोयीसाठी सरकारनं लोकल सुरू करावी या मागणीसाठी मनसेनं पुकारलेल्या ‘सविनय कायदेभंग’ आंदोलनाला उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्था या संघटनेनं पाठिंबा दिला आहे. रेल्वे पोलिसांनी नोटीस बजावल्यानंतरही मनसे हे आंदोलन करण्यावर ठाम आहे.
5 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्र जातपात धर्म पाहत नाही | पहिला ब्राह्मण मुख्यमंत्री शिवसेनेने दिलाय - संजय राऊत
मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टात मिळालेली स्थगिती कशी उठवली जावी, यावर मंथन सुरु आहे. मात्र अशातच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी गंभीर आरोप केला होता. आपण ब्राह्मण असल्यानं टार्गेट करण्यात येत असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला होता. त्यामुळे मराठा आरक्षणाची लढाई सुरु असताना फडणवीसांना आताच जात का आठवली? असा प्रश्न विचारला जात आहे अशी चर्चा सुरु झाली होती.
5 वर्षांपूर्वी -
आम्हाला NDA तुन बाहेर पडण्यासाठी भाग पाडलं | शिवसेना बाहेर पडताच NDA विस्कळीत झाली
शिवसेना जेव्हा बाहेर पडली तेव्हाच एनडीए विस्कळीत झाली असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. एनडीए आणि भाजपात फार जिव्हाळ्याचे सबंध राहिलेले नाहीत असंही ते म्हणाले आहे. शिरोमणी अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर यांनी कृषी विधेयकांना विरोध दर्शवत केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. एबीपी माझाशी बोलताना संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली.
5 वर्षांपूर्वी -
GDP घसरलाय, RBI कंगाल झाली आहे | आणि सरकारनं कंपन्यांचा मोठा सेल लावलाय
खासगीकरणाविरोधात शिवसेनेने लोकसभेत आवाज उठवला आहे. खासदार संजय राऊत यांनी आज राज्यसभेत याबाबत प्रश्न विचारुन मोदी सरकारला धारेवर धरत याप्रश्नी आवाज उठवला. जेएनपीटी, एअर इंडिया, एलआयसी यांचे खासगीकरण करू नका, असे खासदार संजय राऊत यांनी राज्यसभेत म्हटले आहे. खासगीकरण झाल्यास अनेकांच्या नोकऱ्या जातील याकडे संजय राऊत यांनी लक्ष वेधले.
5 वर्षांपूर्वी -
सत्ता हातातून गेल्यामुळे तुम्ही इतका तमाशा करत आहात | राऊतांचा भाजपाला टोला
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत हा विषय आमच्यासाठी संपला आहे. आम्ही त्यावर बोलणं बंद केलं आहे. ज्याला जे करायचं आहे, त्याने ते करावं, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली. नुकतंच कंगना रनौत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनात भेट घेतली. कंगनाच्या वांद्र्यातील कार्यालयावर मुंबई महापालिकेने केलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली. साधारण 40 मिनिटे दोघांची चर्चा झाली. त्यावर संजय राऊत यांनी ही प्रतिक्रिया दिली.
5 वर्षांपूर्वी -
राज ठाकरे सुद्धा ठाकरे ब्रँडचे घटक | फटका त्यांनाही बसणार | अन्यथा ठाकरे ब्रँडचे पतन
अभिनेत्री कंगना रणौतने काही दिवसांपूर्वी मुंबई ही आपल्याला पाकव्याप्त काश्मीरसारखी वाटते आहे असं वक्तव्य केलं होतं. त्यावरुन बराच वादंग माजला. सिनेसृष्टीतल्या अनेक कलाकारांनी कंगनाच्या या वक्तव्याचा निषेध केला. एवढंच नाही तर राजकीय वर्तुळातही कंगनावर टीका झाली. विधानसभेच्या विशेष अधिवेशनात कंगनाविरोधात हक्कभंगही आणला गेला.
5 वर्षांपूर्वी -
राऊत Vs रानौत प्रकरण | संजय राऊतांना धमकी देणाऱ्या व्यक्तीला अटक
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना धमकी देण्याच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांनी कोलकाता येथील रहिवाश्याला अटक केली आहे. आरोपी पलाश बोस हा दक्षिण कोलकाता येथील रहिवासी आहे. त्याने कंगना रणौत हिचं समर्थन करत संजय राऊत यांना धमकी दिली होती.
5 वर्षांपूर्वी -
बाबरी तोडणारे लोक आम्हीच आहोत | राऊतांचं प्रतिउत्तर
मागील काही दिवसांपासून राज्यात कंगना रणौत विरुद्ध शिवसेना असा वाद पाहायला मिळत आहे. अभिनेत्री कंगना रणौतनं मुंबई पोलीस आणि मुंबईविषयी केलेल्या वक्तव्यावरून ही ठिणगी पडली होती. त्यानंतर आज कंगना रणौतच्या कार्यालयावर अनधिकृत बांधकामाच्या कारणावरून मनपानं हातोडा चालवला. त्यामुळे संतप्त झालेल्या कंगनानं शिवसेनेला बाबरची सेना संबोधलं. कंगनाच्या या टीकेला शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
माझी ताकद काय आहे | हे १०५ आमदार असूनही विरोधी पक्षात बसलेल्यांना विचारा - संजय राऊत
शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत हे रविवारी दिवसभर विरोधकांच्या निशाण्यावर राहिले. मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केल्यानंतर…कंगना रणौतवर टीका करताना संजय राऊतांनी तिचा उल्लेख हरामखोर मुलगी असा केला. यावरुन सोशल मीडिया आणि विरोधी पक्षांनी संजय राऊतांना चांगलंच धारेवर धरलं. अनेक सेलिब्रेटींनी राऊतांनी माफी मागावी अशी मागणी केली. विरोधी पक्षातील भाजपाने सुशांत प्रकरणावरुन लक्ष हटवण्यासाठी हा प्रकार केला जात असल्याचं म्हटलं. यानंतर पुन्हा एकदा सूचक शब्दांत संजय राऊतांनी विरोधकांना सुनावलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
ट्विटरवर खेळण्यापेक्षा पोलीस आयुक्तांकडे जा | तुमच्याकडील पुरावे पोलिसांना द्या
अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणी अनेक आरोप-प्रत्यारोपांची मालिका अद्याप सुरु आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपल्याला उघड धमकी दिली असा गंभीर आरोप अभिनेत्री कंगना रनौतने केला आहे. मुंबईत भीती वाटत असेल तर परत येऊ नये, असा इशारा राऊतांनी दिल्याचा दावा कंगनाने केला आहे. मला मुंबई पोलिसांची भीती वाटत असल्याचे वक्तव्य काही दिवसांपूर्वी कंगनाने केले होते.
5 वर्षांपूर्वी -
पंतप्रधान मोदींना देखील देश फिरण्यास सांगावे | राऊतांच भाजपाला प्रतिउत्तर
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाची पद्धत एकच आहे. पंतप्रधानही कार्यालयात बसून काम करतात. मुख्यमंत्री गेल्यावर गर्दी होते. पंतप्रधान प्रोटोकॉल तोडत नाहीत, मग सीएमनी का तोडावा?” असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.
5 वर्षांपूर्वी -
पंतप्रधान मोदींना देखील देश फिरण्यास सांगावे | राऊतांच भाजपाला प्रतिउत्तर
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाची पद्धत एकच आहे. पंतप्रधानही कार्यालयात बसून काम करतात. मुख्यमंत्री गेल्यावर गर्दी होते. पंतप्रधान प्रोटोकॉल तोडत नाहीत, मग सीएमनी का तोडावा?” असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.
5 वर्षांपूर्वी