Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
इतर राज्याची सुरक्षा हवी आहे | आपलं चंबू गबाळ आवरून आपल्या राज्यात जावं
सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी अभिनेत्री कंगना रणौत अनेक बॉलिवूड दिग्गजांवर टीका करत आहे. तसेच अनेकांना धारेवर धरलं आहे. आपल्या खळबळजनक वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असणाऱ्या कंगनाने आता मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखवला आहे. यावर संजय राऊत यांनी कंगना खडे बोल सुनावत ‘हा काय तमाशा चालवलाय?’ असा सवाल केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
प्रकाश आंबेडकरांनी पंढरपुरात जी गर्दी जमवली आहे ती रेटारेटी सुरु आहे - संजय राऊत
प्रकाश आंबेडकरांचं मंदिर उघडण्याच्या मागणीसाठी पंढरपुरात आंदोलन सुरु आहे. या आंदोलनावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. संजय राऊत यांनी म्हटलं की, मंदिर बंद ठेवणं हे कोणी आनंदाने करत नाहीयेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि सरकार हे टप्प्याटप्प्याने अनेक गोष्टी उघड्या करत आहेत. भविष्यात लवकरच मंदिराचा विषय, रेल्वे सुरु करण्याबाबत चर्चा आहे. पण विरोधी पक्षाने सुद्धा महाराष्ट्राच्या हितासाठी थोडा संयम बाळगला तर महाराष्ट्राच्या जनतेवर उपकार होतील.’
5 वर्षांपूर्वी -
राहुल गांधींना रोखण्याची सक्रियता काँग्रेसचे अस्तित्व नष्ट करणारी ठरेल - संजय राऊत
काँग्रेस पक्ष हा सगळ्यात जुना पक्ष आहे. त्यांच्या अंतर्गत खुप समस्या आहे. अंतर्गत वादामुळे काँग्रेस जर्जर झाली आहे. याची मला वेदना आहे. काँग्रेसला गांधी घराण्याशिवाय पर्याय नाही. काँग्रेसचं वैभव आता राहिलं नाहीय. मधल्या काळात जे पत्र पाठवल्यावरुन वादळ निर्माण झाले, तर शमले नाही. राहुल गांधी हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी हे वादळ शमवले पाहिजे, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. याचा फटका महाराष्ट्रात बसणार नाही. महाविकास आघाडी त्यांच्यासोबत आहे. पक्षातल्या तरूणांकडे नेतृत्व दिलं पाहिजे. गट तट सगळ्यांकडे असतात विरोधी पक्षातही असे गट आहेत, असंही ते म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
काँग्रेस सगळ्यात जुना पक्ष | पण अंतर्गत वादामुळे जर्जर झाला - संजय राऊत
काँग्रेस पक्ष हा सगळ्यात जुना पक्ष आहे. त्यांच्या अंतर्गत खुप समस्या आहे. अंतर्गत वादामुळे काँग्रेस जर्जर झाली आहे. याची मला वेदना आहे. काँग्रेसला गांधी घराण्याशिवाय पर्याय नाही. काँग्रेसचं वैभव आता राहिलं नाहीय. मधल्या काळात जे पत्र पाठवल्यावरुन वादळ निर्माण झाले, तर शमले नाही. राहुल गांधी हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी हे वादळ शमवले पाहिजे, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. याचा फटका महाराष्ट्रात बसणार नाही. महाविकास आघाडी त्यांच्यासोबत आहे. पक्षातल्या तरूणांकडे नेतृत्व दिलं पाहिजे. गट तट सगळ्यांकडे असतात विरोधी पक्षातही असे गट आहेत, असंही ते म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उभं करणे षडयंत्र आहे - संजय राऊत
सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आज महत्वाचा निर्णय देत, प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सुपूर्द करण्याचे आदेश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांनी आतापर्यंत गोळा केलेले सर्व पुरावे सीबीआयकडे सोपवण्यास सांगितलं आहे. काही दिवसांपासून मुंबई पोलीस सुशांत सिंहच्या मृत्यूचा तपास करत होतं. पण मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण करत हा तपास सीबीआयकडे सोपवला जावा यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.
5 वर्षांपूर्वी -
इंडियन मेडिकल असोसिएशनकडून राऊतांच्या निषेध | थेट राजीनाम्याची मागणी
‘डॉक्टरांपेक्षा कम्पाउंडर बरा’ अशा वक्तव्यामुळे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका होत आहे. भाजपने त्यांच्या विधानावर जोरदार आक्षेप घेत माफी मागावी अशी मागणी केली होती. मात्र संजय राऊत यांनी या प्रकरणावर आपल्या स्टाइलने खुलासा करत भाजपला फटकारून काढले होते.
5 वर्षांपूर्वी -
त्यांना डॉक्टरांपेक्षा जास्त कळतं म्हणाले | मग म्हणाले डॉक्टरांना काही कळत नाही - केदार शिंदे
मी डॉक्टरांचा कोणताही अपमान केलेला नाही. शाब्दिक कोटी आणि अपमान यांच्यातला फरक आपल्याला कळायला हवा, असे वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले. ते सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. संजय राऊत यांनी नुकत्याच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कंपाऊडरला डॉक्टरपेक्षा जास्त ज्ञान असते, अशा आशयाचे विधान केले होते. संजय राऊत यांच्या या वक्तव्यानंतर डॉक्टरांच्या काही संघटना आक्रमक झाल्या होत्या.
5 वर्षांपूर्वी -
डॉक्टरांपेक्षा कम्पाउंडरला जास्त कळतं | राऊतांच्या त्या विधानाचा भाजपकडून समाचार
शनिवारी संजय राऊत यांनी ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी जागतिक आरोग्य संघटनेला काय कळतं? ती सीबीआयसारखीच आहे. जागतिक आरोग्य संघटना म्हणजे इकडून तिकडून गोळा केलेल्या माणसांचा एक गट आहे. त्यांच्यामध्ये डॉक्टर असले म्हणून काय झालं? खरंतर डॉक्टरांपेक्षा कम्पाउंडरला जास्त कळतं. मी कधीच डॉक्टरांकडून औषध घेत नाही. कम्पाउंडरकडून औषध घेतो. त्यांना जास्त कळतं. तुम्ही त्या डब्ल्यूएचओ वाल्यांच्या नादाला लागू नका. त्यांच्यामुळेच कोरोना वाढला आहे, असे विधान संजय राऊत यांनी केले.
5 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्र्यांच्या आरोग्यविषयक ज्ञानाचं कौतुक | पण WHO'च्या नादाला लागूनच कोरोना वाढला - राऊत
शिवसेनेच्या मुखपत्राचे संपादक खासदार संजय राऊत हे सर्वज्ञानी असल्याची कोणतीही शंका आता कोणाच्याही मनात राहिली नसावी. कोरोनासारख्या जग व्यापणाऱ्या संकटावरही त्यांच्याकडे उपाय असावा. मध्यंतरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जी ‘वादळी’ मुलाखत त्यांनी घेतली त्यात जागतिक आरोग्य संघटनाही कोरोनासंदर्भात आपला सल्ला घेईल, अशी त्यांनी मुख्यमंत्र्यांची तारिफ केली होती. एबीपी माझावर आयोजित ‘माझा कट्टा’ या कार्यक्रमात या विषयी विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर देताना अजब वक्तव्य केलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
सुशांत प्रकरण | संजय राऊत आणि आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करा - भाजपाची मागणी
सुशांतसिंह राजपूत प्रकरणात बिहार सरकारला तसे पडायचे कारण नव्हते. सुशांतचे कुटुंब म्हणजे वडील पाटण्यात राहतात. त्याच्या वडिलांशी त्याचे संबंध चांगले नव्हते. वडिलांनी केलेले दुसरे लग्न सुशांतला मान्य नव्हते. त्यामुळे वडिलांशी त्याचे भावनिक नाते उरले नव्हते. याच वडिलांना फूस लावून बिहारमध्ये एक ‘एफआयआर’ दाखल करायला लावला गेला व मुंबईत घडलेल्या गुन्ह्याचा तपास करायला बिहारचे पोलीस मुंबईला आले. याचे समर्थन होऊच शकत नाही. बिहारचे पोलीस म्हणजे ‘इंटरपोल’ नव्हे. एका गुन्ह्याचा तपास मुंबई पोलीस करीत आहेत.
5 वर्षांपूर्वी -
आदित्य ठाकरेंचा सुशांत प्रकरणाशी काय संबंध | हिंमत असल्यास भाजपने जाहीरपणे त्यांचं नाव घ्यावं
सुशांतसिंह राजपूत प्रकरणात बिहार सरकारला तसे पडायचे कारण नव्हते. सुशांतचे कुटुंब म्हणजे वडील पाटण्यात राहतात. त्याच्या वडिलांशी त्याचे संबंध चांगले नव्हते. वडिलांनी केलेले दुसरे लग्न सुशांतला मान्य नव्हते. त्यामुळे वडिलांशी त्याचे भावनिक नाते उरले नव्हते. याच वडिलांना फूस लावून बिहारमध्ये एक ‘एफआयआर’ दाखल करायला लावला गेला व मुंबईत घडलेल्या गुन्ह्याचा तपास करायला बिहारचे पोलीस मुंबईला आले. याचे समर्थन होऊच शकत नाही असं राऊतांनी म्हटलं होतं.
5 वर्षांपूर्वी -
सुशांतचे कुटुंबीय संजय राऊत यांच्या विरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्याच्या तयारीत
अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणी राजकीय वाद उफाळला आहे. भाजप नेत्यांनी केलेल्या बेछुट आरोपानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही या प्रकरणात उडी घेत सुशांतच्या वडिलांबद्दल गंभीर आरोप केला होता. पण, सुशांतच्या मामाने राऊतांचा दावा खोडून काढला आहे.
5 वर्षांपूर्वी -
सुशांत प्रकरण | आदित्य ठाकरेंना वाचवण्यासाठी राऊत गुजरात दंगलीबद्दल बोलत आहेत - निलेश राणे
सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या तपासावरुन राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजप नेत्यांनी केलेल्या आरोपानंतर आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या तपासाबद्दल काही प्रश्न उपस्थितीत केले आहे. एवढंच ‘नाहीतर मुंबई पोलिसांमध्ये . बिहारप्रमाणे काही गुप्तेश्वर पांडे महाराष्ट्र पोलिसांत आहेत व त्यांच्यामुळे अडचणीत भर पडली’ असा संशयही राऊतांनी व्यक्त केला.
5 वर्षांपूर्वी -
सुशांतच्या वडिलांनी दुसरे लग्न केल्याने त्याचे वडिलांशी चांगले संबंध नव्हते - संजय राऊत
सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या तपासावरुन राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजप नेत्यांनी केलेल्या आरोपानंतर आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या तपासाबद्दल काही प्रश्न उपस्थितीत केले आहे. एवढंच ‘नाहीतर मुंबई पोलिसांमध्ये . बिहारप्रमाणे काही गुप्तेश्वर पांडे महाराष्ट्र पोलिसांत आहेत व त्यांच्यामुळे अडचणीत भर पडली’ असा संशयही राऊतांनी व्यक्त केला.
5 वर्षांपूर्वी -
देशाचं नेतृत्व करण्याची क्षमता आपल्यात आहे, राऊतांकडून मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज साठावा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना संजय राऊत यांनी आपल्या खास शैलीत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. संजय राऊत यांनी ट्विट करुन म्हटले आहे की, आपण आमच्या आयुष्यात खास आहात. आपणास वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा. देशाचं नेतृत्त्व करण्याची क्षमता आपल्यात आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
5 वर्षांपूर्वी -
साँप तो युही बदनाम है, मुझे तो लोग डसते हैं! नागपंचमीच्या शुभेच्छा - संजय राऊत
श्रावणातला पहिला सण नागपंचमी. पण यंदाच्या नागपंचमीवर कोरोनाचं सावट आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सांगलीत बत्तीस शिराळामध्ये यंदा नागपंचमी उत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. शेकडो वर्षांची पंरपरा जपण्यासाठी फक्त मानाच्या पालखीला परवानगी देण्यात आली आहे. तसेच आज शिराळा मधील अंबामात मंदिर बंद ठेवण्याचा देखील निर्णय घेण्यात आला आहे. मंदिरामध्ये फक्त ५ लोकांना पूजेसाठी तर पालखी सोहळ्यासाठी १० लोकांना परवानगी दिली आहे. कोरोना विषाणूमुळे नागपंचमी उत्सवाची शेकडो वर्षांपासून सुरू असलेली परंपरा खंडीत झाली आहे. याबाबतची माहिती सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजिती चौधरी यांनी दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांचा दिल्ली दरबारी अपमान, भाजपचे तोंड बंद आंदोलन
भाजप नेते उदयनराजे भोसले यांच्या राज्यसभेच्या शपथविधीवेळी घडलेल्या प्रसंगावरून आता महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. या वादात आता शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी उडी घेतली आहे. राऊत यांनी ट्विट करुन म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजांचा दिल्ली दरबारी अपमान झाला की नाही याचे प्रमाणपत्र कोणी द्यायचे? भाजपाचे या विषयावर तोंड बंद आंदोलन सुरू झाले आहे. तर संभाजी भिडे यांच्याकडून सांगली-सातारा बंदची अदयाप घोषणा नाही, अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली.
5 वर्षांपूर्वी -
सरकार पाडून दाखवाच, नंतर आम्ही ऑपरेशन लोटांगण सुरू करतो
राज्यातील महाविकास आघाडी केव्हाही कोसळू शकते असं सतत विरोधी पक्षाकडून सांगण्यात येत असल्याने शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपला आव्हान दिलं आहे. ते म्हणाले की, सरकार पाडणार… सरकार पाडणार हे रोज रोज कशाला बोलून दाखवता. आमचं चॅलेंज आहे, हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवाच.’ ते पुढे म्हणाले की, तुमचं ऑपरेशन लोट्स असेल तर त्याविरोधात ऑपरेशन लोटांगण सुरू करून तुम्हाला राज्यातील जनतेसमोर लोटांगण घालायला लावू, असा इशाराही त्यांनी दिला.
5 वर्षांपूर्वी -
भाजपचे १०५ आमदार निवडून येण्यामागे शिवसेनेचं सुद्धा योगदान होतं - शरद पवार
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी घेतलेली राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत लवकरच प्रसारित होणार आहे. मात्र त्याआधी संजय राऊत यांनी या बहुचर्चित मुलाखतीचा दुसरा प्रोमो शेअर केला आहे. यामध्ये संजय राऊतांचे रोखठोक प्रश्न आणि शरद पवारांची दिलखुलास उत्तरे पाहायला मिळत आहेत.
5 वर्षांपूर्वी -
शरद पवारांना मातोश्रीवर यावं लागलं अशी परिस्थिती नाही - संजय राऊत
शरद पवारांना मातोश्रीवर यावं लागलं अशी परिस्थिती नाही, अधूनमधून ते मुख्यमंत्र्यांना भेटत असतात. कोणत्याही प्रकारचे मतभेद सरकारमध्ये नाहीत. जशी बाहेर पावसाची रिपरिप सुरू आहे ना, तशी काही लोक बातम्यांची रिपरिप करत असतात. पवार साहेब भेटले पण इतर विषयांसाठी भेटले, अशी माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
5 वर्षांपूर्वी