Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Eknath Shinde | सत्तेसाठी जिवलगांचीही चिंता नाही? | पत्नीला इस्पितळात सोडून संजय राठोड गुवाहाटी गेले
शिवसेनेविरोधात एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाने महाराष्ट्रात राजकीय अराजक निर्माण झालं आहे. शिंदे यांनी तब्बल ३५ पेक्षा अधिक शिवसेनेचे आमदार फोडल्यानं आता ठाकरे सरकार कोसळणार ही शक्यता दाट झाली आहे. एकनाथ शिंदे यांची आवश्यक असलेल्या आमदारांची बेरीज जवळपास जुळली असल्याचं दिसत असून आता मुख्यमंत्री काय करणार याकडेच महाराष्ट्राच लक्ष लागलं आहे.
3 वर्षांपूर्वी -
राजकारणाची पातळी खालावली | रोज उठून पाहावे लागते, आज कोणाचा नंबर? - संजय राठोड
महाराष्ट्राचे राजकारण सध्या संक्रमणाच्या स्थितीतून जात आहे, राजकारणाची पातळी खालावली असून रोज सकाळी-सकाळी उठून पेपर मध्ये पहावं लागतं आज कोणाचा नंबर आहे? अशी प्रतिक्रिया माजी मंत्री संजय राठोड यांनी पत्रकार परिषदेत दिली. उस्मानाबाद शहरातील शासकीय विश्रामगृहावर त्यांनी बंजारा समाजाच्या विविध प्रश्नांवर पत्रकारांशी चर्चा केली.
4 वर्षांपूर्वी -
तक्रार अर्ज महिलेचा नाही, महिलेच्या नावाचा वापर, स्वाक्षरी सुद्धा खोटी | षडयंत्र रचलं कोणी?
संजय राठोड यांच्याविरोधात एका महिलेने काही दिवसांपूर्वी यवतमाळ पोलिसांकडे पोस्टाने एक पत्र पाठवले होते. या तक्रार पत्रात संजय राठोड यांनी माझ्याकडे शरीरसुखाची मागणी केली आहे, असे आरोप करण्यात आले होते. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विटरच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली होती.
4 वर्षांपूर्वी -
संजय राठोड प्रकरणात चौकशीअंती वस्तुस्थिती समोर येईल, अनेकदा बिनबुडाचे आरोप होत असतात - अजित पवार
पुण्यात एका तरुणीने आत्महत्या केल्यानंतर मंत्रिपद गमावलेल्या संजय राठोड यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. माजी मंत्री संजय राठोड यांनी शरीरसुखाची मागणी केल्याची तक्रार यवतमाळ पोलिसांकडे दाखल करण्यात आली आहे. इतकच नाही, तर अजूनही तीच मागणी करून छळत असल्याचा आरोपही त्या पीडित ३० वर्षीय महिलेने केला होता.
4 वर्षांपूर्वी -
राठोड यांची महिलेच्या आरोपांवर पत्रकार परिषद | यापूर्वी राष्ट्रवादीच्या विटेकरांवर आरोप करणाऱ्या महिलेवर ब्लॅकमेलिंगचा गुन्हा दाखल होता
शिवसेना नेते संजय राठोड यांनी शरीरसुखाची मागणी केल्याचा गंभीर आरोप एका महिलेने केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाल्याने राठोड यांनी पत्रकार परिषद घेऊन हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. संस्थेत नोकरी मिळावी म्हणून माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्यात आले आहेत. या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नाही. सध्या या संस्थेशीही माझा संबंध नाही. केवळ वैफल्यातून हे आरोप करण्यात आले आहेत. माझं राजकीय करिअर संपवण्याचा हा प्रयत्न आहे, असा दावा संजय राठोड यांनी केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
पुजा चव्हाण आत्महत्या | त्या संवादातील राठोड नावाची व्यक्ती कोण? | रिकॉर्डिंग फॉरेन्सिक लॅबकडे पाठवलं
पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी तपास करणाऱ्या पुणे पोलिसांच्या हाती महत्वाचा पुरावा लागला आहे. आत्महत्येच्या पाच दिवस आधी पूजा चव्हाण आणि माजी मंत्री संजय राठोड यांच्यात अनेकदा फोनवरुन संभाषण झालं होतं. या सर्व संभाषणांचं रेकॉर्डिंग पोलिसांच्या हाती लागलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
पूजा चव्हाणच्या आई-वडिलांनी नोंदवलेल्या जबाबामुळे संजय राठोड यांना मोठा दिलासा | जबाबात काय?
राज्य सरकारला मोठ्या टीकेचा सामना करावा लागलेलं पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण सध्या मिटण्याची शक्यता आहे. त्याला कारण आहे पूजाच्या आई वडिलांनी पोलिसांकडे नोंदवलेला जबाब. कारण, आमची कोणा विरोधात काही तक्रार नसल्याचा जबाब पूजा चव्हाणच्या आई वडिलांनी पोलिसांकडे नोंदविला आहे. अशी माहिती झोन पाचच्या उपायुक्त नम्रता पाटील यांनी दिली. तर, यामुळे शिवसेना नेते आणि माजी वनमंत्री संजय राठोड यांना मोठा दिलासा मिळाल्याचे दिसत आहे.
4 वर्षांपूर्वी -
माझ्यावरील आरोपांमुळे मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेला तडा जाऊ नये म्हणून राजीनामा दिला - संजय राठोड
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रतिमेला तडा जाऊ नये, म्हणून मी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, असे माजी वनमंत्री संजय राठोड यांनी सांगितले. पूजा चव्हाण नावाच्या एका तरुणीच्या मृत्यूप्रकरणी संजय राठोड यांनी आपली प्रतिक्रिया दिली. तसेच भविष्यात मी दोषी आढळून आले तर कायमचा बाजूला होईल, असेही ते म्हणाले. भाजप सतत माझ्यावर आरोप करत आहे. मात्र, ते सतत माझ्यावर आरोप का करत आहेत याचे मी आत्मचिंतन करत आहे, अशी खोचक प्रतिक्रिया संजय राठोड यांनी दिली. औरंगाबाद येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.
4 वर्षांपूर्वी -
माजी वनमंत्री संजय राठोड आणि बंजारा समाजातील लोकांच्या भेटीगाठी | चर्चा सुरु
माजी वनमंत्री संजय राठोड सध्या बंजारा समाजातील लोकांनी भेट घेण्याचा प्लान संजय राठोड य़ांनी आखला आहे. लवकरच यासंदर्भात राज्यात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. संजय राठोड यांना देखील पक्षावर विश्वास असून त्यांनी यापुढे काय होणार, याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतली, असं स्पष्ट केलं आहे.
4 वर्षांपूर्वी