Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
अमोल कोल्हेंना शिरूर लोकसभेची आज उमेदवारी जाहीर होणार?
शिरूर लोकसभा मतदारसंघातील भोसरी येथे आज सायंकाळी एनसीपीच्या पक्षाचा मेळावा पार पडत आहे. या मेळाव्यात शिवसेनेतून राष्ट्रवादीतून आलेल्या अमोल कोल्हे यांची शिरूर लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीने शिरूर लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा क्षेत्रात पक्षाचे मेळावे घेऊन जोरदार वातावरण निर्मिती करण्याचे नियोजन केले आहे. दरम्यान, अमोल कोल्हे यांच्या संभाव्य उमेदवारीने पक्षातील आणखी एक इच्छुक विलास लांडे यांच्या समर्थकांत अस्वस्था पसरली आहे. त्यामुळे कोल्हे यांची उमेदवारी आजच जाहीर होणार की लांडे यांची समजूत काढून उमेदवारीवर शिक्कामोर्तब करणार हे आज स्पष्ट होईल.
6 वर्षांपूर्वी -
सरकार केवळ धर्माच्या नावाखाली लोकांमध्ये विष पेरतंय: शरद पवार
महाराष्ट्रात गंभीर दुष्काळी परिस्थिती असताना केंद्र आणि राज्य सरकारकडून अद्याप मदत दिली जात नाही. जनतेला मदत करण्याची या सरकारची भावनाच नाही. जनावरांना चारा नाही. एकही छावणी सुरु नाही. रोजगार हमीची कामे नाहीत. याकडे लक्ष देण्याऐवजी हे सरकार धर्माच्या नावाखाली समाजामध्ये विष पसरवत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी येथे केली.
6 वर्षांपूर्वी -
आघाडीसोबतचे तर्क केवळ माध्यमांमध्ये, पण राज ठाकरेंची वेगळीच रणनीती आहे?
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकट मुलाखत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली होती आणि त्यानंतर माध्यमांमध्ये या चर्चांना उधाण आल्याचं पाहायला मिळालं. त्यात राज ठाकरे यांनी पाडव्याच्या सभेआधी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. मात्र, तत्पूर्वी एक घटना दिल्लीत घडली होती आणि ती म्हणजे स्वतः काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिल्लीत शरद पवारांची भेट घेतली होती.
6 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शरद पवारांसमोरच एकमेकांना भिडले
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादीने महाराष्ट्र पिंजून काढायला सुरुवात केलेली असताना, माढा मतदार संघात येणाऱ्या फलटण तालुक्यात एनसीपीमध्ये गटबाजी उफाळून आली आहे. दरम्यान, आज स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे दौऱ्यावर आले असताना त्यांच्यासमोरच शेखर गोरे आणि कविता म्हेत्रे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड वादावादी झाली. कविता म्हेत्रे यांना स्टेजवर स्थान देण्यावरून सुरू झालेल्या या वादामुळे कार्यक्रमात गोंधळ आणि तुफान घोषणाबाजी सुरू झाली, त्यामुळे पवारांना देखील आपले भाषण काहीवेळ थांबवावे लागले.
6 वर्षांपूर्वी -
अण्णांच्या संबंधी बोलणे आणि वाचणे मी सोडून दिले आहे: शरद पवार
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषण या विषयावर बोलणे आणि बातम्या वाचणे देखील मागील २ वर्षे पूर्णपणे सोडून दिलं आहे, अशी खोचक प्रतिक्रिया एनसीपीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील बारामती हॉस्टेल येथे पक्षातील वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडली.
6 वर्षांपूर्वी -
ते महागठबंधन नाही 'महाठगबंधन' आहे, तर शरद पवार हे शकुनी मामा: पूनम महाजन
नरेंद्र मोदी भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत आणि विरोधकांकडे तर पंतप्रधानपदाचा उमेदवारच नाही. विरोधकांनो तुमचा पंतप्रधान कोण, असे विचारल्यानंतर सोमवारपासून शनिवापर्यंत मायावती, अखिलेश, स्टॅलिन, चंद्राबाबू, ममता हे नेते एक एक दिवस पंतप्रधान होतील आणि रविवारी सुट्टीच्या दिवसाचे पंतप्रधान शरद पवार असतील, अशी खासदार पूनम महाजन यांनी विरोधकांची खिल्ली उडवली.
6 वर्षांपूर्वी -
गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेलांचा आज राष्ट्रवादीत प्रवेश
गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला आज एनसीपी’त जाहीर प्रवेश करणार आहेत. तत्पूर्वी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षात राहिलेल्या वाघेला यांनी आता एनसीपी’सोबत पुढचा राजकीय प्रवास सुरु करण्याची तयारी केली आहे. गुजरात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पटेल उर्फ बोस्की यांनी तशी अधिकृत माहिती प्रसार माध्यमांना दिली आहे.
6 वर्षांपूर्वी -
१० टक्के सवर्ण आरक्षण घटनात्मक पातळीवर टिकेल का? पवार साशंक
आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या सवर्णांना मोदी सरकारनं दिलेलं एकूण १० टक्के आरक्षण कोर्टात टिकेल की नाही, याबद्दल एनसीपीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी शंका व्यक्त केली आहे. कोल्हापूर दौऱ्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी संवाद साधला असता ही शंका त्यांनी व्यक्त केली. मोदी सरकारकडून सदर निर्णय नेमका कोणासाठी घेण्यात आला आहे?, असा प्रश्न विचारत हे आरक्षण कोर्टात टिकणार नसल्याचं मत अनेक प्रसिद्ध घटनातज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे असं पवार यावेळी म्हणाले. दरम्यान, त्यांनी मोदींवर सुद्धा जोरदार निशाणा साधला.
6 वर्षांपूर्वी -
राज्यातील आघाडीसाठी राहुल गांधी आणि शरद पवार यांच्यात चर्चा
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात आघाडी करण्यावरून बोलणी अंतिम टप्यात आहेत. एकूण ४८ जागांपैकी ४० जागांवरील वाटप निश्चित झाले आहे. दरम्यान उर्वरित ८ जागांचा तिढा अद्याप सुटलेला नाही आणि त्याअनुषंगाने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात दिल्लीत उच्चस्तरीय बैठक पार पडली.
6 वर्षांपूर्वी -
राज्यातील सरकारचा जन्मच मुळात अनैतिक संबंधांतून झाला आहे: उद्धव ठाकरे
भाजप-एनसीपीचे अनैतिक राजकीय संबंध खूप जुनेच असून राज्यातील सध्याच्या सरकारचा जन्मच मुळात अशा अनैतिक संबंधांतून झाला आहे. केवळ अहमदनगरमधील नव्या पॅटर्नमुळं फक्त मोठ्या प्रमाणावर उफाळून आले इतकेच,’ अशी उपहासात्मक टीका टीका ‘सामना’च्या अग्रलेखातून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
मिशेलने सोनियांचे नाव घेतल्याचे इडीच्या अधिकाऱ्याने ऐकले व माध्यमांमध्ये पेरले: पवार
ऑगस्ट वेस्टलँड घोटाळ्याप्रकरणी तुरूंगात असलेल्या ख्रिश्चियन मिशेलने काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचे नाव घेणे हा केवळ एका कटाचाच भाग आहे. वास्तविक त्याने सोनियांचे नाव घेतले. परंतु ते कोणी ऐकले आहे? मात्र एका इडीच्या अधिकाऱ्याने ते ऐकले आणि त्याने सर्वांना सांगितले की मिशेलने सोनिया गांधींचे नाव घेतले. परंतु, ते खरे आहे की नाही याची कोणालाच काहीच खरी माहिती नाही.
6 वर्षांपूर्वी -
कॉंग्रेस पक्षाचे नेतृत्व जनतेने स्वीकारले : शरद पवार
५ राज्यांमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे जाहीर अभिनंदन केले. जनतेने कॉंग्रेस पक्षाचे नेतृत्व स्वीकारले असे सुद्धा ते म्हणाले, तसेच नरेंद्र मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.
6 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षण: १ डिसेंबर फार दूर नाही, किती जल्लोष होतो ते पाहूच; मुख्यमंत्र्यांना टोला
१ डिसेंबरपर्यंत मराठा समाजाला आरक्षण देण्याची फडणवीसांची घोषणा म्हणजे मराठा समाजाची शुद्ध फसवणूक असल्याचे पवार म्हणाले. मराठा आणि ओबीसी या दोन समाजांमध्ये फूट पाडून निवडणुका जिंकण्याचे फडणवीसांचे दिवास्वप्न असल्याची बोचरी टीका एनसीपीचे सर्वेसेवा शरद पवार यांनी कोल्हापूर येथील पत्रकार परिषदे दरम्यान केली. आता १ डिसेंबर ही तारीख तर खूप नाही; त्यामुळे किती त्यांच्या घोषणेप्रमाणे किती जल्लोष होतो हे सुद्धा पाहूच, असा सणसणीत टोला शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या मराठा आरक्षणाच्या संदर्भतील विधानावरून लगावला आहे.
7 वर्षांपूर्वी -
दिग्गज नेते नारायण राणे व शरद पवार कोकणात राजकीय भूकंप करणार?
आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कोकणात राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कोकणात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी पट्यात राष्ट्रवादीची विशेष ताकद नसताना सुद्धा या मतदारसंघासाठी राष्ट्रवादीने आग्रह धरल्याने राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
7 वर्षांपूर्वी -
राज्यात दुष्काळ असताना सत्ताधारी राम मंदिरावरून वातावरण दूषित करत आहेत
सध्या राज्यात दुष्काळ आणि नापिकीमुळे शेतकरी तसेच शेती व्यवसाय संकटात आहे आणि त्यामुळे आत्महत्या सुद्धा वाढत आहेत. परंतु केंद्रातील व राज्यातील सत्ताधाऱ्यांना त्याबद्दल जराही आस्था राहिलेली नाही. कारण राज्यातील दुष्काळावर चर्चा सुरु असताना सत्ताधारी पक्ष केवळ राम मंदिराचा मुद्दा काढून समाजात जाणीवपूर्वक दुषित वातावारण तयार करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यात भर म्हणजे घटनात्मक संस्थांवर हल्ले करुन त्या सर्व बाजूनी दुबळ्या करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया, असा थेट हल्लाबोल एनसीपीचे सर्वेसेवा शरद पवार यांनी सरकावर केला.
7 वर्षांपूर्वी -
पवारांची अमित शहांवर टीका, न्यायालयाचे निर्णय सुद्धा तुम्हाला मान्य नाहीत
पुण्यात एनसीपीच्या संविधान बचाव यात्रेची समारोप सभा आज पार पडली. दरम्यान, या कार्यक्रला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. दरम्यान, शरद पवार यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा सुद्धा भाषणादरम्यान समाचार घेतला आहे.
7 वर्षांपूर्वी -
एनसीपीचा राजीनामा देऊन तारिक अन्वर पुन्हा काँग्रेसवासी
शरद पवारांचे जुने विश्वासू आणि राष्ट्रवादीच्या स्थापनेमध्ये महत्वाची भूमिका बजावणारे तारिक अन्वर अखेर यांनी आज राहुल गांधी यांच्या उपस्थितीत पुन्हा काँग्रेसवापसी केली आहे. त्यामुळे बिहारमधील राष्ट्रवादीची ताकद संपुष्टात आली आहे. तारिक अन्वर हे दिल्लीतील राजकारणातले मोठे नेते आणि शरद पवारांचे विश्वासू म्हणून सर्वश्रुत होते. त्यामुळे काँग्रीसला बिहारच्या राजकारणात बळ मिळणार आहे.
7 वर्षांपूर्वी -
पवार-राज भेटीची चर्चा, पण त्यांना तर सेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर सुद्धा भेटले होते
प्रसार माध्यमांवर सध्या चर्चा रंगली आहे ती राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबाद मधील एकाच हॉटेलातील वास्तव्याची आणि एकाच विमानाने मुंबईच्या दिशेने केलेल्या प्रवासाची. परंतु या दोन्ही नेत्यांची भेट शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी सुद्धा घेतल्याचे समोर आले आहे.
7 वर्षांपूर्वी -
राज ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार एकाच विमानाने मुंबईकडे
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसेवा शरद पवार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे गुरुवारी संध्याकाळी एकाच विमानाने औरंगाबादहून मुंबईकडे रवाना झाल्याने प्रसार माध्यमांमध्ये पुन्हा चर्चेचा विषय झाला. मात्र तो निव्वळ योगायोग असल्याचं समोर आलं आहे. राज ठाकरे त्यांचा १० दिवसांचा पश्चिम विदर्भाचा दौरा आटपून काल औरंगाबादमार्गे मुंबईला विमानाने रवाना झाले.
7 वर्षांपूर्वी -
मोदींची पंतप्रधान पदाची खुर्ची २०१९ मध्ये जाणार
राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार यांनी २०१९ मधील निवडणुकीचे भाकीत केलं आहे. २००४ मधील लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर जशा प्रकारे कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालं नव्हतं, तशीच परिस्थिती २०१९ मधील लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर उद्भवणार आहे असं ते म्हणाले. त्यावेळी निवडणुकीच्या निकालानंतर देशभरातील सर्व पक्ष मनमोहन सिंग यांच्या समर्थनार्थ एकवटले होते आणि ते देशाचे पंतप्रधान झाले होते. त्याप्रमाणे २००४ मध्ये जशी राजकीय परिस्थिती निर्माण झाली होती, अगदी त्याप्रमाणेच परिस्थिती २०१९ मध्ये सुद्धा येणार आहे असं पवार म्हणाले.
7 वर्षांपूर्वी