Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
शरद पवारांच्या निवासस्थानी होणाऱ्या बैठकांचा तिसऱ्या आघाडीशी काहीच संबंध नसल्याचं स्पष्ट
राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, निवडणूक स्ट्रॅटेजिस्ट प्रशांत किशोर आणि इतर विरोधकांमध्ये बैठकांवर बैठका होत आहेत. याच स्वरुपाची बैठक आज दुपारी 4 वाजता देखील दिल्लीत पवारांच्या निवासस्थानी होणार आहे. परंतु, या बैठकांचा आणि तिसऱ्या आघाडीचा काहीही संबंध नसल्याचे आता समोर आले आहे. गेल्या काही दिवसांत प्रशांत किशोरांचे सल्ले घेऊन शरद पवार आगामी लोकसभेसाठी तिसऱ्या आघाडीसाठी मोर्चेबांधणी करत असल्याची चर्चा होती.
4 वर्षांपूर्वी -
लोकसभा २०२४ पवार इन ऍक्शन मोड | मोदी सरकारविरोधात दिल्लीत बोलावली १५ विरोधी पक्षांची बैठक
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व्हेसर्वा शरद पवार यांनी 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. आगामी लोकसभेसाठी त्यांनी विरोधकांची मुठ बांधणे सुरू केले आहे. याच पार्श्वभूमीवर पवारांनी सोमवारी निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांची भेट घेतली आणि त्यानंतर मंगळवारी दुपारी 4 वाजता ‘राष्ट्र मंच’ची बैठक बोलावली आहे. मोदी सरकारच्या विरोधात 2018 मध्ये यशवंत सिन्हा यांनी राष्ट्र मंचची सुरुवात केली होती.
4 वर्षांपूर्वी -
शरद पवार दिल्लीकडे रवाना | भाजप विरोधातील आघाडीच्या राजकारणाला वेग येण्याची शक्यता
राष्ट्रवादी काँग्रेसचेसर्वेसेवा शरद पवार अखेर मोठ्या ब्रेकनंतर राजधानी दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. विशेष म्हणजे शस्त्रक्रियेनंतर गेल्या काही दिवसांपासून आपल्या मुंबईतील निवासस्थानी विश्रांती घेणारे शरद पवार रविवारी दिल्लीसाठी रवाना झाले असून २३ जूनपर्यंत राजधानीमध्येच असणार असं वृत्त आहे. त्यामुळे दिल्लीत भारतीय जनता पक्षविरोधी रणनीतीला जोर येणार असल्याचं म्हटलं जातंय.
4 वर्षांपूर्वी -
महाविकास आघाडी सरकार ५ वर्षे टिकेल, काम करेल आणि आगामी लोकसभा, विधानसभा सुद्धा...
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात एकांतात झालेल्या संवादावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पहिल्यांदाच बोलले आहेत. ठाकरे आणि मोदी यांच्या भेटीबाबत बोलताना त्यावर किंचितही विचार करण्याची गरज नसल्याचा दावा शरद पवार यांनी केलाय. इतकंच नाही तर त्यांनी महाविकास आघाडीबाबतही मोठं भाकीत केलंय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 22 व्या वर्धापन दिनी शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीतील घटकपक्षांच्या नेत्यांमध्ये नवी ऊर्जा निर्माण होईल, असा विश्वास राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून व्यक्त केला जातोय.
4 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादीचा आज स्थापना दिन | पवारांनी राष्ट्रवादी पक्षाची स्थापना का आणि कशी केली होती ?
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४’च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
4 वर्षांपूर्वी -
मोदी-उद्धव ठाकरे भेटीपूर्वी काल रात्री उशिरापर्यंत मुख्यमंत्र्यांची ‘वर्षा’वर शरद पवारांसोबत चर्चा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उद्या म्हणजे ८ जूनला दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत.मराठा आरक्षण,स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण,जीएसटी परतावा,लसीकरण अशा अनेक मुद्यांवर ही भेट आहे.या भेटीआधीचं उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार वर्षा बंगल्यावर पोहोचले आहेत. शरद पवारांसह उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा वर्षा बंगल्यावर पोहोचले आहेत.मराठा आरक्षणाबाबत ठाकरे आणि मोदींची भेट होतेय या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांची भेट महत्त्वाची आहे. याशिवाय या भेटीमध्ये महाराष्ट्रातील महामंडळावरील नियुक्त्यांबाबतही चर्चा होऊ शकते.
4 वर्षांपूर्वी -
काल फडणवीस नाथाभाऊंच्या घरी गेले होते, आज नाथाभाऊ शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचले
एकनाथ खडसेही शरद पवारांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी मंगळवारी जळगाव दौऱ्यात खडसेंच्या घरी भेट दिली होती. त्यानंतर लगेचच खडसे पवारांच्या भेटीसाठी पोहोचल्याने नव्याने चर्चेला सुरुवात झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
पवारांचं पत्रं आणि केंद्रीय मंत्र्यांना फोन | खतांच्या किमती कमी झाल्या | शेतकऱ्यांना पावरफूल दिलासा
देशामध्ये रासायनिक खतांच्या किमती वाढवण्यात आल्याने मोदी सरकारविरोधात संताप व्यक्त केला जात होता. खतांच्या किमती कमी व्हाव्यात यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता.यासंदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्र लिहीले होते. पवारांना केंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांनी फोन करून लवकरच रासायनिक खतांच्या दरवाढीचा पुनर्विचार करण्याचे आश्वासन पवारांना दिले होते.
4 वर्षांपूर्वी -
शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज | तब्येत उत्तम
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना आज ब्रीच कँडी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ही माहिती दिली.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्ती | राज्य सरकारच्या प्रयत्नांना सहकार्य करा | पवारांचं जनतेला आवाहन
देशभरात कोरोनाची परिस्थिती गंभीर होत असताना दिसत आहे. बुधवारी देशात विक्रमी 1 लाख 26 हजार 265 लोक संक्रमित आढळले. गेल्या वर्षी महामारी सुरू झाल्याच्या नंतरपासून आतापर्यंत पहिल्यांदाच एका दिवसात एवढे लोक कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. यापूर्वी 6 एप्रिलला एका दिवसात 1.15 लाख लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना संकट | संकटावर मात करण्यासाठी जनतेने सहकार्य करावे - शरद पवार
कोविड १९ च्या महामारीने गंभीर रुप घेतले असून या संकटावर मात करण्यासाठी राज्यातील जनतेने सहकार्य करावे आणि सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पत्राद्वारे केले.दरम्यान अभूतपूर्व संकटातून जनतेला बाहेर काढण्यासाठी स्थानिक स्तरावर झोकून द्यावे असे आवाहनही शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना केले आहे.
4 वर्षांपूर्वी -
पवारांवर यशस्वी शस्त्रक्रिया | प्रकृती पूर्णपणे स्थिर | २-३ दिवसांत डिस्चार्जची शक्यता
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर मंगळवारी रात्री मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया पार पडली. एन्डोस्कोपीद्वारे शरद पवार यांच्या गॉल ब्लॅडरमधील मोठा स्टोन बाहेर काढण्यात आला. त्यामुळे आता शरद पवार यांना पोटदुखीचा त्रास होणार नाही.
4 वर्षांपूर्वी -
शस्त्रक्रियेपूर्वीच्या चाचण्यासांठी पवार रुग्णालयात दाखल | उद्या शस्त्रक्रिया होणार
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज (३० मार्च) मुंबईच्या ब्रीच कॅंडी रुग्णालयात दाखल झाले आहेत. उद्या (३१ मार्च) त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार आहेत. त्याआधीच्या काही चाचण्यासांठी ते रुग्णालयात दाखल झाले आहेत. दरम्यान, काल त्यांना पोटात दुखू लागल्याने एडमिट केले होते. नंतर त्यांना डिस्चार्जही देण्यात आला होता. मात्र, आज पुन्हा ते रुग्णायलयात दाखल झाले आहे.
4 वर्षांपूर्वी -
पवारांच्या आजारपणाचं देखील भाजप नेत्यांकडून संधीत रूपांतर करण्याचं विचित्र राजकारण? | संभ्रमाची मालिका
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना काल सायंकाळी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोटात दुखत असल्याच्या तक्रारीवरून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पक्षाचे नेते नवाब मलिक यांनी आणि स्वतः सुप्रिया सुळे यांनी यापूर्वीच दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Breaking | शरद पवारांवर शस्त्रक्रिया होणार | ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना काल सायंकाळी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पोटात दुखत असल्याच्या तक्रारीवरून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पक्षाचे नेते नवाब मलिक यांनी दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
IPS लॉबीचा मुद्दा कुचकामी ठरल्याने 'त्या' भेटीबाबत माध्यमातून पुड्या? | राष्ट्रवादीचं स्पष्टीकरण
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रफुल पटेल यांची अमित शाह यांच्यासोबत गुप्त चर्चा झाल्याची माहिती ‘दिव्य भास्कर’ या गुजराती वृत्तपत्राने दिली आहे. पटेल आणि पवार प्रायव्हेट जेटने आले होते. त्यानंतर शांतिग्राममधील गेस्टहाऊसला तिघांची भेट झाली, असा दावा या बातमीत करण्यात आला आहे. या भेटीचे परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर या भेटीचे परिणाम होण्याची वृत्त त्यानंतर वेगाने पसरली आहे.
4 वर्षांपूर्वी -
आरोपातील तारीख चुकली | देशमुख त्या तारखेला मुंबईत नव्हे तर नागपूरला होते
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्बनंतर राज्यातील वातावरण तापले आहे. परमबीर सिंहांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर त्यांनी सचिन वाझेंना दर महिन्याला 100 कोटी रुपये जमा करण्याचे टार्गेट दिले असल्याचा खळबळजनक दावा केला. यानंतर भाजपकडून गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी तीव्र झाली होती. आता यावर शरद पवारांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. ‘आरोपांमध्ये तथ्य नाही, यामुळे राजीनामा घेण्याचा प्रश्नच नाही’ असे शरद पवारांनी स्पष्ट केले आहे.
4 वर्षांपूर्वी -
पैसे कसे गोळा केले जातात हे पत्रात लिहिलेले नाही | पवारांकडून खुलासा
मुंबई पोलिस आयुक्तपदावरुन उचलबांगडी केलेले अधिकारी परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहे. अनिल देशमुख यांनी प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांची वसुली करण्याचे टार्गेट सचिन वाझेंना दिले असल्याचा दावा त्यांनी केला होता. दरम्यान गृहमंत्र्यांनी हे आरोप फेटाळून लावले असले तरीही राज्यात राजकीय वादळ आले आहे. गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरु लागली आहे. आता यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांनी प्रतिक्रिया या दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
फडणवीस दिल्लीत आल्यानंतर हे पत्र समोर आलं | पवारांच्या या प्रतिक्रियेचा अर्थ काय?
मुंबई पोलिस आयुक्तपदावरुन उचलबांगडी केलेले अधिकारी परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहे. अनिल देशमुख यांनी प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांची वसुली करण्याचे टार्गेट सचिन वाझेंना दिले असल्याचा दावा त्यांनी केला होता. दरम्यान गृहमंत्र्यांनी हे आरोप फेटाळून लावले असले तरीही राज्यात राजकीय वादळ आले आहे. गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरु लागली आहे. आता यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांनी प्रतिक्रिया या दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
हवाच काढली? | एका सब इन्स्पेक्टरमुळे राज्य सरकारवर परिणाम होईल असं मला वाटत नाही
सचिन वाझेप्रकरणावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिल्यांदाच थेट भाष्य केलं आहे. एका इन्स्पेक्टरचा राज्यावर काही परिणाम होईल असं मला वाटत नाही, असं सांगत शरद पवार यांनी ठाकरे सरकारला कोणताही धोका नसल्याचा निर्वाळाच आज दिला.
4 वर्षांपूर्वी