Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
भाजपच्या १०५ आकड्यातुन शिवसेना वजा केली तर त्यांचे ४०-५० आमदार असते - शरद पवार
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मॅरेथॉन मुलाखत घेतली. या मुलाखतीत शरद पवारांनी अनेक गौप्यस्फोट केले आहेत. तसेच, अनेक अफवांवरही स्पष्टीकरण दिलं आहे. त्यापैकी म्हणजे मुख्यमंत्र्यांसोबत असलेल्या मतभेदाबद्दल शरद पवारांनी रोखठोख भूमिका मांडली.
5 वर्षांपूर्वी -
भाजपाच्या हातात सत्ता देणं शिवसेनेच्या हिताचं नाही - शरद पवार
उद्धव ठाकरेंच्या कामाची पद्धत शिवसेनेची पद्धत आहे तसंच भाजपाच्या हातात सत्ता देणं शिवसेनेच्या हिताचं नाही असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांची घेतलेली मुलाखत घेतली असून त्यात शरद पवार यांनी हे वक्तव्य केलं आहे. ही मुलाखत शनिवारी प्रसिद्ध होणार आहे. दरम्यान या मुलाखतीचे प्रोमो संजय राऊत आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करत आहेत. संजय राऊत यांनी शुक्रवारी अजून एक प्रोमो शेअर केला असून यावेळी त्यांनी पोस्टमध्ये ‘सत्ता ही विनयाने वापरायची असते”, शरद पवार यांची जोरदार मुलाखत असं लिहिलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
भाजपचे १०५ आमदार निवडून येण्यामागे शिवसेनेचं सुद्धा योगदान होतं - शरद पवार
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी घेतलेली राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत लवकरच प्रसारित होणार आहे. मात्र त्याआधी संजय राऊत यांनी या बहुचर्चित मुलाखतीचा दुसरा प्रोमो शेअर केला आहे. यामध्ये संजय राऊतांचे रोखठोक प्रश्न आणि शरद पवारांची दिलखुलास उत्तरे पाहायला मिळत आहेत.
5 वर्षांपूर्वी -
नाराजी नव्हे तर या निमित्ताने पवार मातोश्रीवर गेले होते
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्या भेटीनंतर राज्यात राजकीय चर्चेला उधाण आलं होतं. त्या भेटीविषयी तर्कवितर्क लावले जात होते. या बहुचर्चित भेटीवर शरद पवार यांनी आज खुलासा केला आहे. पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. खासदार संजय राऊत यांना मुलाखत दिल्यानंतर त्या स्थळापासून मातोश्री जवळच होतं. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आपण गेलो होतो असा खुलासा त्यांनी केला.
5 वर्षांपूर्वी -
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या नगरसेवकाच्या कुटुबीयांची पवारांनी भेट घेतली
माजी विरोधी पक्षनेते, राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ता साने यांचं हृदय विकाराच्या झटक्यानं २५ जून रोजी निधन झालं. दत्ता साने यांना कोरोनाची लागण झाल्यानं त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यादिवशी पहाटे 5 वाजताच्या सुमारास चिंचवड इथल्या खासगी रुग्णालयात निधन झालं आहे. साने यांना 25 जून रोजी कोरोनाची लागण झाली होती.
5 वर्षांपूर्वी -
शरद पवारांच्या ताफ्यातील पोलीस व्हॅन एक्स्प्रेस वेवर पलटली
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वाहन ताफ्यातील एक मोटार उलटल्याची घटना आज सकाळी अमृतांजन पुलाखाली घडली. सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवीतहानी झाली नाही. मात्र दोन जण जखमी झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास आपल्या वाहन ताफ्यासह मुंबईच्या दिशेने निघाले होते. तेव्हा हा अपघात घडला. दरम्यान, स्वतः शरद पवार यांनी खाली उतरून जखमींची विचारपूस केली.
5 वर्षांपूर्वी -
कोरोनावर इंजेक्शन निघालं आहे, पण ते सामान्यांना परवडणारं नाही - शरद पवार
सातारा जावळीचे भाजपाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. दरम्यान, शिवेंद्रराजे यांनी पवारांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. मात्र, पवारांसोबत झालेल्या बैठकीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, तर रखडलेल्या विकास कामांबाबत चर्चा झाल्याचे शिवेंद्रसिंहराजे यांनी सांगितले.
5 वर्षांपूर्वी -
फडणवीस काहीना काही बोलून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत - शरद पवार
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण चांगलंच ढवळून निघालं आहे. शरद पवार आज सातारा दौऱ्यावर आहेत. गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याकडे लक्ष द्यायची गरज नाही, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. तसेच शरद पवार यांनी सत्तास्थापनेसंदर्भातल्या दाव्यावर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.
5 वर्षांपूर्वी -
बारामतीत डिपॉझिट जप्त झालं, सांगली लोकसभेतही त्यांचं काही झालं नाही - शरद पवार
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण चांगलंच ढवळून निघालं आहे. शरद पवार आज सातारा दौऱ्यावर आहेत. गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याकडे लक्ष द्यायची गरज नाही, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. तसेच शरद पवार यांनी सत्तास्थापनेसंदर्भातल्या दाव्यावर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.
5 वर्षांपूर्वी -
निसर्ग चक्रीवादळ: कार्यकर्त्यांना प्रशासनासोबत मदतीला उभे रहावे, पवारांच आवाहन
‘निसर्ग’ चक्रीवादळाने कोकण किनारपट्टीला धोका निर्माण झाला असून प्रशासनासोबत राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उभे रहावे, असे आदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी दिले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
....अन्यथा पुढच्या पिढीलाही याची मोठी किंमत मोजावी लागेल; पवारांचा इशारा
राज्यातील आणि देशातील कोरोनाच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा फेसबुक लाईव्ह द्वारे लोकांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी लोकांना घरातच राहण्याचं आणि कोरोनाबाबत योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. तसंच यावेळी शरद पवार यांनी लोकांनी विचारलेल्या प्रश्नांनाही उत्तर दिली.
5 वर्षांपूर्वी -
मध्यप्रेदशात घडले; पण महाराष्ट्रात काळजी करण्याचे काहीच कारण नाही: शरद पवार
काँग्रेसचा राजीनामा देणारे ज्योतिरादित्य शिंदे यांनी बुधवारी जाहिररित्या भाजपचमध्ये प्रवेश केलाय. यावेळी त्यांच्यासोबत भाजप पक्षाध्यक्ष जे पी नड्डा हेदेखील व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी, ज्योतिरादित्य शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृह मंत्री अमित शहा, पक्षाध्यक्ष जे पी नड्डा यांचे आभार मानले. तर कमलनाथ सरकारवर टीका करत ‘कमलनाथ सरकारनं घोर निराशा केल्याचं’ ज्योतिरादित्य शिंदे यांनी म्हटलं. विजयाराजे यांचे नातू भाजपमध्ये आले याचा आनंद असल्याचं यावेळी जे पी नड्डा यांनी म्हटलं.
5 वर्षांपूर्वी -
... मग पवार साहेबांचाही बाप काढणार का? गणेश नाईक संतापले
राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपमध्ये गेलेले गणेश नाईक यांच्यात सुरु असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरुच आहेत. जितेंद्र आव्हाडांनी गणेश नाईकांचा खंडणीखोर म्हणून उल्लेख केल्यानंतर आता टीकेची पातळी बापापर्यंत येऊन पोहोचली आहे. पक्ष बदण्याच्या भूमीकेवरुन गणेश नाईकांवर टीका करताना, मला दर १० वर्षांनी बाप बदलण्याची सवय नाही, असं जितेंद्र आव्हाडांनी काल म्हटलं होतं. त्यावर बोलताना, पवार साहेबांनीही (शरद पवार) अनेक वेळा पक्ष बदलले, मग आता त्यांचाही बाप काढणार का? असा सवाल गणेश नाईकांनी विचारला आहे.
5 वर्षांपूर्वी -
दिल्ली हिंसाचाराला भाजपच जबाबदार, पवारांची केंद्रावर सडकून टीका
दिल्ली हिंसाचाराच्या मुद्यावरुन राजकीय आरोप-प्रत्यारोपात आत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही उडी घेतली आहे. दिल्लीतील हिंसाचाराला केंद्रातील भाजप सरकार जबाबदार असल्याचा आरोप शरद पवारांनी केला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीतील अपयशानंतर भाजप समाजात तेढ निर्माण करत असल्याचे पवारांनी म्हटले आहे. मुंबईतील एका कार्यक्रमात त्यांनी केंद्रातील भाजप सरकारवर हल्लाबोल केला.
5 वर्षांपूर्वी -
कोरेगाव भीमा : शरद पवार यांची देखील साक्ष नोंदवणार
भीमा- कोरेगाव प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना साक्ष देण्यासाठी बोलविण्यात येणार आहे. आयोगाचे अध्यक्ष न्या. जे. एन. पटेल यांनी सोमवारी यासंदर्भात माहिती दिली. काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांनी एसआयटीतर्फे कोरेगाव-भीमा प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात सत्ता आणि पोलीस यंत्रणेचा गैरवापर करून चुकीच्या लोकांना यामध्ये गुंतविण्यात आलं असल्याचे पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात नमूद केले होते.
5 वर्षांपूर्वी -
युवा संवाद; महाविद्यालयीन निवडणुका पुन्हा व्हाव्यात- शरद पवार
आज मुंबईत राष्ट्रवादीकडून युवा संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी तरुण पिढीसोबत संवाद साधला. युवा पिढीसोबत बोलण्याची संधी मिळाली याचा शरद पवार यांनी आनंद व्यक्त केला. तुमची पिढी आणि माझी पिढी यामध्ये किती फरक आहे, हे मला पाहायचे आहे. आता माझे वय ८० झाले आहे. मात्र प्रश्न विचारण्याची क्षमता कमी झाली नाही, असं म्हणत पवारांनी त्यांचा आमदारकीचा अनुभव तरुणांना सांगितला. अत्यंत दिलखुलास पद्धतीने पवारांनी तरुणांच्या प्रश्नांची उत्तरे दिली.
5 वर्षांपूर्वी -
१९७८ मध्ये मी किती पक्षांचं सरकार चालवलं हे मलाच आठवत नाही: शरद पवार
ठाकरे सरकारचा रिमोट माझ्या हाती नाही असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हटलं आहे. महाविकास आघाडीचं सरकार हे पाच वर्षे टीकणार आहे त्यात काहीही अडचण येणार नाही असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. एबीपी माझाच्या व्हिजन २०२० या कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी हे विचार मांडले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
वयाच्या या टप्प्यात व्हिजन सांगणं योग्य नाही, आता तरुणांना व्हिजन द्यायचं: शरद पवार
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजकारण आणि समाजकारणातल्या नव्या भूमिकेचे संकेत दिले आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदम्यानही त्यांनी सक्रिय निवडणुका आता लढणार नाही असं वक्तव्य केलं होतं. आता पुन्हा एकदा त्यांनी आपल्या बदलत्या आणि नव्या भूमिकेचे संकेत दिले आहेत. ते म्हणाले, वयाच्या या टप्प्यावर व्हिजन सांगणं योग्य नाही. तर आता तरुणांना व्हिजन द्यायचं आणि ते काय करतात ते बघायचं. त्यांच्या कामात फार काही हस्तक्षेप करायचा नाही. कारण न विचारता सतत सांगत गेलं की मान राहात नाही असंही त्यांनी सांगितलं.
5 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता आमच्यात रमले आहेत: शरद पवार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करून दिलं. सरकारचं काम व्यवस्थित सुरू आहे. सर्व नीट चालू आहे. त्यामुळे आता मी लांब झालो. या सरकारचा रिमोट माझ्या हातात नाही, असं सांगतानाच करतानाच काही मदत लागली, माझी गरज पडली तर उभं राह्यचं. यापेक्षा सरकारशी काहीही संबंध ठेवायचा नाही, असा निर्णय मी घेतला आहे, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज स्पष्ट केलं.
5 वर्षांपूर्वी -
ट्रम्प यांचा गुजरात दौरा; भारत म्हणजे फक्त गुजरात नाही: राष्ट्रवादी
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागतासाठी ‘हाऊडी मोदी’प्रमाणे ‘नमस्ते ट्रम्प’ असा कार्यक्रम होणार आहे. भारताचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रवीश कुमार यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. डोनाल्ड ट्रम्प नागरिक अभिनंदन समितीच्यावतीने ‘नमस्ते ट्रम्प’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला कोणाला निमंत्रित करावे, याचे सर्व अधिकार हे अयोजन समितीकडेच असल्याची माहिती देखील रवीश कुमार यांनी दिली आहे.
5 वर्षांपूर्वी