Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
जुन्नरमध्ये उद्धव ठाकरेंविरुद्ध बंड; आशा बुचके समर्थक शिवसैनिकांचे सामुहिक राजीनामे
पुणे जिल्हात लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय रणनीतीकर प्रशांत किशोर यांच्या टीमने दिलेल्या अहवालानंतर आणि शिवाजी आढळराव-पाटील यांच्या दबावाखाली शिवसेनेतील आक्रमक चेहरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या झेडपी सदस्य आशा बुचके यांची पक्षातून तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली होती. जुन्नर विधानसभा क्षेत्रात अमोल कोल्हे यांना तब्बल ४० हजार मतांची आघाडी मिळाली होती तसेच विद्यमान आमदार शरद सोनावणे दे कुचकामी ठरले होते. परिणामी शिवसेनेतील दिग्गज खासदार शिवाजी आढळराव-पाटील यांचा मानहानीकारक पराभव झाला होता.
6 वर्षांपूर्वी -
मी विधानसभा निवडणूक लढणार, हाकाळपट्टीनंतरही आशा बुचकेंचा ठाम निर्धार
लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम केल्यामुळे शिवसेनेच्या गटनेत्या आशा बुचके यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. पुण्यातील शिरूर लोकसभा मतदार संघात शिवसेनेच्या आढळराव पाटलांचा पराभव करत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे विजयी झाले. लोकसभा निवडणुकीत आशा बुचकेंनी पक्षविरोधी भूमिका घेतल्यामुळेच आढळराव पाटलांचा पराभव झाला असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला.
6 वर्षांपूर्वी -
सर्व वाघांचं शिवसेनेत स्वागत, मनसेचे एकमेव आमदार शरद सोनावणे यांची घरवापसी
मुंबई – “सर्व वाघांचं शिवसेनेत स्वाग! शिवसेनेत फक्तं वाघच राहू शकतात आणि जो शिवसेनेचा आहे तो सेनेत परत आला आहे” असं म्हणत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसेचे एकमेव आमदार शरद सोनवणे यांचं पक्षात स्वागत केलं. मी सोनावणेंना म्हटलं होतं शिवसेनेत प्रवेश करा, जुन्नर तर आपलंच आहे, शिरूर तर आपलंच आहे. तुम्ही काही दिवस बाहेर होतात पण तिथे आनंदी होतात का? असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला त्यावर शरद सोनावणे यांनी नाही असे उत्तर दिले. सोनावणे पक्षाबाहेर होते मात्र त्यांच्या मनात भगवा होता असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
6 वर्षांपूर्वी