Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
देशभक्तीचे प्रमाणपत्र वाटणाऱ्यांचे आता पितळ उघडे पडले आहे | सोनिया गांधींचं टीकास्त्र
रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्नब गोस्वामी आणि बार्कचे अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअप चॅट मधून अनेक गंभीर बाबी उघड झाल्या आहेत. विशेषतः पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानातील बालाकोटवर भारताने हवाई हल्ला केला. या कारवाईची माहिती अर्णब गोस्वामीना घटनेच्या तीन दिवस आधीच होती असे या संभाषणातून स्पष्ट दिसत आहे. हे संभाषण प्रसारमाध्यमे व समाज माध्यमावरही चर्चेत असून ही अत्यंत गोपनीय व संवेदनशील माहिती गोस्वामीकडे कशी आली असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
4 वर्षांपूर्वी -
राज्यांनी कृषी विधेयके निष्प्रभ करावीत | सोनिया गांधींचे निर्देश
केंद्र सरकारने संसदेच्या पावसाळी अधिवेशनात बहुमताच्या जोरावर आवाजी मतदानाद्वारे मंजूर केलेल्या कृषी कायद्यांविरोधात देशातील शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. दरम्यान, आता शेतकर्यांनी कृषी कायद्याविरोधातील हे आंदोलन २ ऑक्टोबरपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तर एक ऑक्टोबर रोजी सर्व शेतकऱ्यांनी देशव्यापी रेलरोकोची हाक दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
मला अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा | सोनिया गांधींच्या कार्यकारिणीला सूचना
काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सोमवारी अपेक्षेप्रमाणे पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली. आज काँग्रेसच्या कार्यकारिणीची व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक होत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या बैठकीच्या सुरुवातीलाच सोनिया गांधी यांनी आपली भूमिका मांडली. त्यांनी म्हटले की, पक्षाध्यक्षपदाच्या स्थित्यंतरासाठी प्रक्रिया सुरु करावी. जेणेकरून मला अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त होता येईल, असे सोनिया गांधी यांनी म्हटल्याचे समजते.
5 वर्षांपूर्वी -
२३ ज्येष्ठ नेत्यांचे सोनिया गांधींना पत्र | काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता
मागील काही वर्षांपासून बॅकफूटवर गेलेल्या काँग्रेसमध्ये फेरबदलाची चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर सोनिया गांधी यांची हंगामी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती. त्यांच्या निवडीला वर्ष झालं असून, काँग्रेसमधील २३ वरिष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पक्षाला उभारी देण्यासंदर्भात पत्र लिहिलं आहे. काँग्रेस अध्यक्षांच्या निवडीसह पक्षामध्ये गल्लीपासून दिल्लीपर्यंत फेरबदल करण्याची मागणीही या नेत्यांनी केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
पवारसाहेबांशी चांगला संवाद, पण कधीतरी सोनियाजींना सुद्धा मी फोन करतो - उद्धव ठाकरे
शिवसेना खासदार आणि दैनिक ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतील मतभेद, भाजपचं ऑपरेशन लोटस यासह अनेक मुद्द्यांवर सविस्तर भाष्य केलं आहे. तसंच सरकार जरी तीन पक्षांचं असलं तरीही स्टेअरिंग माझ्याच हातात आहे, असं म्हणत मित्रपक्षांना सूचक इशाराही दिला आहे.
5 वर्षांपूर्वी -
देशावरील संकटांसाठी एनडीए सरकारची चुकीची धोरणं व भोंगळ कारभार जबाबदार - सोनिया गांधी
व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज काँग्रेस कार्यकारिणी समितीची बैठक घेतली. भारतीय सीमांवर निर्माण झालेल्या तणावासाठी मोदी सरकार जबाबदार आहे. चुकीची धोरणे आणि भोंगळ कारभार सीमेवरील तणावाचे मूळ असल्याची टीका सोनिया गांधी यांनी केली.
5 वर्षांपूर्वी -
भारत-चीन वादावर केंद्र सरकारची भूमिका काय? - सोनिया गांधी
पूर्व लडाखमध्ये २० भारतीय जवान शहीद झाले आहेत. त्यामुळे भारताच्या पंतप्रधानांनी आता पुढे येऊन जनतेला संबोधित केलं पाहिजे. चीनने देशाचा भाग हडपला कसा यावर बोललं पाहिजे, आपेल २० सैन्य शहीद का झाले, तिकडची सध्याची परिस्थिती काय आहे? असे विविध प्रश्न आज काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मांडले आहेत.
5 वर्षांपूर्वी