Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Sri Lanka Inflation | श्रीलंकेत बटाटा 400 रुपये किलोपेक्षा जास्त, कांदा 300 रुपयांच्या पार | जनतेवर उपासमारीची वेळ
श्रीलंकेतील खाद्यपदार्थांच्या आधीच गगनाला भिडलेल्या किंमती दिवसेंदिवस नवनव्या उच्चांकाला स्पर्श करत आहेत, त्यामुळे संकटात सापडलेल्या देशातील बहुतेक लोकांना ते विकत घेणे अशक्य झाले आहे. 1948 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर श्रीलंका आपल्या सर्वात वाईट राजकीय आणि आर्थिक संकटाशी झगडत आहे.
3 वर्षांपूर्वी -
श्रीलंकेत महागाई, आर्थिक संकटामुळे जनतेचा उद्रेक | पंतप्रधानांचं खासगी निवासस्थान पेटवलं | पंतप्रधानांचा राजीनामा
प्रचंड महागाई आणि आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी श्रीलंकेत मोठ्या प्रमाणात जाहीर निदर्शने आणि हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी पक्षाच्या नेत्यांना सांगितले आहे की, ते देशाच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा देण्यास आणि सर्वपक्षीय सरकारसाठी मार्ग तयार करण्यास तयार आहेत. माहितीनुसार, पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. श्रीलंकेतील संकट मोठ्या प्रमाणात लोकांच्या निषेधाच्या पार्श्वभूमीवर अधिकच गडद झाले आहे.
3 वर्षांपूर्वी -
Sri Lanka Crisis Video | महागाईने श्रीलंकेतील जनतेच्या संतापाचा कडेलोट | राजकीय नेत्यांना रस्त्यात तुडवायला सुरुवात
श्रीलंकेत सुरू असलेल्या आर्थिक संकट, प्रचंड महागाई, पेट्रोल-डिझेलच्या प्रचंड वाढलेल्या किंमतीच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावरील लोकांच्या हिंसक हालचाली पुन्हा सुरू झाल्या आहेत. दरम्यान, एका व्हायरल व्हिडीओमध्ये एसजेबीच्या खासदार रजिता सेनारत्ने यांच्यावर आंदोलकांनी हल्ला केला. संतापलेली आंदोलक जनता भर रस्त्यात राजकीय नेत्यांना मारहाण करत असल्याचं पाहायला मिळतंय.
3 वर्षांपूर्वी -
Sri Lanka Crisis | भारतात चर्चा धार्मिक मुद्यांवर | श्रीलंकेत महागाईवरून जनतेचा राष्ट्रपती भवनावर कब्जा | राष्ट्रपती पळाले
श्रीलंकेचे अध्यक्ष गोताबाया राजपक्षे यांना त्यांच्या निवासस्थानातून पळ काढावा लागला आहे. रिपोर्टनुसार, शनिवारी मोठ्या संख्येने आंदोलकांनी त्यांच्या निवासस्थानाला घेराव घातला. या परिस्थितीत श्रीलंकेच्या राष्ट्रपतींना हा निर्णय घ्यावा लागला. हजारो निदर्शकांना हुसकावून लावण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्याने जनतेच्या संतापाचा कडेलोट झाला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Sri Lanka Crisis | श्रीलंकेतील नागरिक महागाईने एका महिन्यात उद्ध्वस्त | 1 किलो तांदूळ 500 रुपयांना
शेजारी देश श्रीलंका गेल्या काही काळापासून गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहे. जवळजवळ संपलेली परकीय चलनाची साठा आणि कर्जाचा प्रचंड बोजा यामुळे शेजारील देश दिवाळखोरीचा धोका निर्माण झाला आहे. डॉलरच्या तुलनेत श्रीलंकेच्या चलनाचे मूल्य जवळपास निम्म्यावर आले आहे, त्यामुळे अनेक महत्त्वाच्या वस्तूंच्या किमती गगनाला (Sri Lanka Crisis) भिडल्या आहेत. डिझेल-पेट्रोल, गॅस खरेदीसाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की साखरेचा भाव 290 रुपये किलो आणि तांदूळ 500 रुपये किलो झाला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Sri Lanka Crisis | श्रीलंका देश 'दिवाळखोर' होण्याच्या मार्गावर | महागाई-बेरोजगारीने लोकं भीषण संकटात
भारताचा शेजारी देश श्रीलंका सध्या सर्वात कठीण आर्थिक संकटाचा सामना करत आहे. महागाई शिगेला पोहोचली आहे. सामान्य नागरिकांना रोजच्या जगण्यासाठी लागणाऱ्या वस्तू खरेदी करणं जवळपास अशक्य झालं आहे. महागाई आणि बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. मात्र नशीब वाईट की त्यात रशिया-युक्रेनच्या युद्धाने भर टाकली आहे. भारताचे शेजारील राष्ट्र श्रीलंका आणि पाकिस्तान महागाई आणि बेरोजगारीची धुसपूसत असून येथील नागरिक तिथल्या सत्ताधाऱ्यांविरोधात (Sri Lanka Crisis) रस्त्यावर उतरून मोर्चे काढत आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Sri Lanka Crisis | या 5 कारणांमुळे 'सोन्याच्या लंकेतील' सामान्य लोकांचा महागाईने जीव जातोय
शेजारी देश श्रीलंका सध्या कठीण आर्थिक परिस्थितीचा सामना करत आहे. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की खाण्यापिण्याच्या जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला आहे. तीच स्थिती डिझेल-पेट्रोलची आहे. सरकारसमोर आर्थिक आणीबाणी लादूनही खाण्यापिण्याचे वाटप करण्यासाठी फौजफाटा उभा करण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. श्रीलंकेचा परकीय चलनाचा साठा संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे आणि चलनाचे (श्रीलंकन रुपया) मूल्य विक्रमी नीचांकी (Sri Lanka Crisis) पातळीवर आहे. ‘सोने की लंका’ एवढी कशी खराब झाली हे पाच मुद्यांवर जाणून घेऊया.
3 वर्षांपूर्वी