Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
SSC निकाल झाला | 11'वी प्रवेशासाठी CET परीक्षेची तारीख जाहीर | प्रवेश प्रक्रिया कशी असेल?
इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर 11 वी प्रवेशासाठी ऐच्छिक सीईटी परीक्षा होणार असल्याचं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं होतं. त्यानुसार आता 11 वी प्रवेशासाठी होणाऱ्या सीईटी परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. 21 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेच्या दरम्यान ही सीईटी परीक्षा होणार आहे. राज्यभरात एकाच वेळी ही परीक्षा घेतली जाईल, असं राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे 10वी परीक्षा पास झालेल्या विद्यार्थ्यांनी आता सीईटीसाठी तयारीला लागण्याची गरज आहे.
4 वर्षांपूर्वी -
SSC Result 2021 | वेबसाइट क्रॅश, हॉलतिकीटच दिलं गेलं नसल्याने क्रमांकच माहीत नाही, निकाल कसा पहावा?
माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी दहावीच्या परीक्षा यंदा कोरोनामुळे न घेताच निकाल जाहीर करण्यात आला. परंतु परीक्षा न देताच उत्तीर्ण होण्याचा हा आगळा वेगळा आनंद द्विगुणीत होऊ शकला नाही. ज्या बोर्डाच्या वेबसाइटवर आपले गुण किती हे पाहण्यासाठी विद्यार्थी आतुर झाले होते. ती साइटच निकालावेळी क्रॅश झाल्याने विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यात अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पास की नापास कळण्यासाठी बोर्डातील अधिकाऱ्यांना पालक आणि विद्यार्थ्यांनी दूरध्वनीवर संपर्क साधला असता थोडावेळात पाहता येईल असे जुजबी उत्तर देण्यात आले.
4 वर्षांपूर्वी -
SSC Result 2021 | राज्यातील इयत्ता दहावीचा उद्या निकाल लागणार | असा ऑनलाईन चेक करा
राज्यातील दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या म्हणजे 16 जुलै 2021 रोजी जाहीर होणार आहे. बोर्डाच्या वेबसाईटवर दुपारी 1 वाजता हा निकाल पाहता येईल. राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबतची माहिती दिली. राज्यातील शाळांना दहावीचे गुण संगणकीय प्रणालीत नोंदवण्याची मुदत उलटून गेली आहे. शालेय शिक्षण मंत्र्यांनी यापूर्वी दिलेल्या माहितीनुसार 15 जुलै पर्यंत दहावीचा निकाल जाहीर होणं अपेक्षित होता. आता ताज्या माहितीनुसार उद्या निकाल जाहीर होणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
९० टक्के मिळवून देखील पसंतीच्या कॉलेजसहित अकरावी प्रवेशात अडचणी - सविस्तर वृत्त
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी एसएससी बोर्डाच्या परीक्षांचा निकाल उशिरानं जाहीर करण्यात आला. दरम्यान राज्याचा निकाल ९५.३० टक्के लागल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली. “करोनाच्या प्रादुर्भावामुळे निकालाला उशिर झाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि इतर सर्वांनी आम्हाला विशेष सहकार्य केलं. सर्वांनी लॉकडाउनच्या काळात अहोरात्र मेहनत केली म्हणून आज निकाल आम्हाला सादर करता येत आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन जाहीर करण्यात आला.
5 वर्षांपूर्वी -
दहावीचा निकाल जाहीर, राज्यात एकूण ९५.३० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या लातूर, औरंगाबाद, अमरावती, पुणे, नागपूर, मुंबई, कोल्हापूर, नाशिक व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा (SSC Result 2020) निकाल जाहीर झाला आहे. साधारण राज्यातील 17 लाख विद्यार्थी या परीक्षेसाठी बसले होते.
5 वर्षांपूर्वी -
राज्यातील दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. बुधवारी २९ जुलै २०२० रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. मंडळाकडून पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण अशा नऊ विभागात मार्च २०२० मध्ये १० वीची परीक्षा घेण्यात आली होती.
5 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्र बोर्डाचा १२ वीचा निकाल जाहीर, थोड्याच वेळात या वेबसाईट्सवर पहा
अनेक दिवसांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर अखेर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून HSC म्हणजेच इयत्ता बारावीच्या परीक्षांच्या निकालांची तारीख जाहीर करण्यात आली आहे. १६ जुलै २०२०, गुरुवारी दुपारी १ वाजता हा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
5 वर्षांपूर्वी