Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
३३ कोटी वृक्ष लागवडीची चौकशी लागताच | मुनगंटीवारांना आशा देवेंद्रजींच्या पुन्हा येण्याची
विद्यमान विरोधीपक्षनेते आणि तत्कालीन देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने राज्यात राबविलेल्या ३३ कोटी वृक्ष लागवडीची चौकशी विधिमंडळ सदस्यांच्या समितीमार्फत करण्यात येणार आहे. यासाठी आज सर्वपक्षीय 16 आमदारांची समिती जाहीर करण्यात आली असून या समितीचे अध्यक्ष राज्यमंत्री दत्तात्रय भरणे असणार आहेत.
4 वर्षांपूर्वी -
मुनगंटीवार यांच्या अडचणीत वाढ | ३३ कोटी वृक्ष लागवडीच्या चौकशीसाठी समिती जाहीर
विद्यमान विरोधीपक्षनेते आणि तत्कालीन देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने राज्यात राबविलेल्या ३३ कोटी वृक्ष लागवडीची चौकशी विधिमंडळ सदस्यांच्या समितीमार्फत करण्यात येणार आहे. यासाठी आज सर्वपक्षीय 16 आमदारांची समिती जाहीर करण्यात आली असून या समितीचे अध्यक्ष राज्यमंत्री दत्तात्रय भरणे असणार आहेत.
4 वर्षांपूर्वी -
मला पाडून दाखवा | त्या आव्हानावर अजित दादांचं उत्तर | मुनगंटीवार निरुत्तर
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा दुसऱ्या दिवशीही सभागृहात सत्ताधारी पक्ष व विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी सुरु आहे. आज अधिवेशनाचा दुसरा आणि शेवटचा दिवस आहे. याच दरम्यान, आज सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भारतीय जनता पक्षाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांच्यातील शाब्दिक युद्ध हे सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
4 वर्षांपूर्वी -
'तो' शब्द भाजप पक्षातील नेत्यांकडूनच फिरवला गेला: सुधीर मुनगंटीवार
विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजपमध्ये आम्ही जे काही ठरविले होते, त्यावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फारकत घेतली. त्यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी फारकत घेतली, असं धक्कादायक विधान माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
'मुनगंटीवार के हसीन सपने' पुस्तकाची प्रस्तावना मीच लिहीन - संजय राऊत
महाविकास आघाडी सरकारच्या स्थिरतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे भाजपचे नेते आणि राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना राऊतांनी टोला लगावल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या (7 मार्च) अयोध्या दौऱ्यावर आहेत. सोबत पती रश्मी ठाकरे आणि चिरंजिव आदित्य ठाकरे असतील. शनिवारी दुपारी साडेचार वाजता मुख्यमंत्री रामाचं दर्शन घेणार आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणजे रामाचा प्रसाद आहे. रामलल्लाच्या कृपेनेच उद्धव ठाकरे आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले आहेत, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
5 वर्षांपूर्वी -
अब की बार बाप-बेटे की सरकार; सुधीर मुनगंटीवार यांचा मुख्यमंत्र्यांना टोला
भारतीय जनता पक्षातर्फे आज महाविकास आघाडी सरकारविरोधात पहिल्यांदाच आंदोलन छेडण्यात आले आहे. भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरुन आंदोलन पुकारणार होते हे कालच स्पष्ट करण्यात आलं होतं. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या महाआघाडी सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली आहे. या सरकारच्या काळात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्येही वाढ झाल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला आहे. या सर्व घटनांना निषेध करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारविरोधा आंदोलन पुकारल्या सांगण्यात येत आहे.
5 वर्षांपूर्वी -
तुमच्या पक्षातर्फे ट्रस्ट करा आणि मशीद बांधा, मुनगंटीवारांचं पवारांना प्रतिउत्तर
भाजप नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अयोध्येतील राम मंदिर ट्रस्टवरुन केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला. “आयुष्यभर शरद पवारांनी मतांचे तुष्टीकरण केलं. खुर्चीसाठी पार्टी फोडली. तुम्ही तुमच्या पक्षातर्फे ट्रस्ट करा आणि मशीद बांधा. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार ट्रस्ट स्थापन होतोय. मग आरोपांचे कारण काय?” असा सवाल मुनगंटीवारांनी पवारांना विचारला.
5 वर्षांपूर्वी -
फडणवीसांच्या काळातील ३३ कोटी वृक्षांच्या लागवडीची चौकशी; माजी वनमंत्री काय म्हणाले?
फडणवीस सरकारच्या कार्यकाळात झालेल्या वृक्ष लागवडीची चौकशी करण्याचे आदेश ठाकरे सरकारनं दिले आहेत. फडणवीस सरकारच्या काळात ५० कोटी वृक्ष लावण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. या संपूर्ण अभियानाची चौकशी केली जाणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
वृक्ष लागवडीत भ्रष्टाचार करुन मुनगंटीवारांनी ५०० कोटींचा बंगला बांधला: अमोल मिटकरी
महाराष्ट्रात शिवसेना, एनसीपी आणि काँग्रेस महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर सत्ताधारी पक्षातील नेतेमंडळीकडून विविध मुद्यांवरून आरोप केले जात आहे. त्यात आता भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर वृक्ष लागवडीत मोठा भ्रष्टाचार असल्याचा आरोप करण्यात येत आहे. एनसीपीचे सरचिटणीस अमोल मिटकरी यांनी हे आरोप केले आहे. ठाण्यातील एका जिमच्या उदघाट्न कार्यक्रमात ते बोलत होते.
5 वर्षांपूर्वी -
केंद्राला सहकार्य न केल्यास घटनात्मक पेच निर्माण होईल; मुनगंटीवार यांचा इशारा
कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास संस्था अर्थात NIA कडे सोपवण्यात आला आहे. NIA ची टीम पुणे पोलीस मुख्यालयात दाखल झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रकरणी विशेष चौकशी पथकामार्फत (SIT) या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली होती. ज्यानंतर केंद्र सरकारने हे पाऊल उचलले आहे. मात्र २५ जानेवारीला हे प्रकरण केंद्रीय गृहमंत्रलायने एनआयएकडे सोपवले.
5 वर्षांपूर्वी -
शरद पवारांना जाणता राजा म्हटलेलं कसं चालतं ? सुधीर मुनगंटीवार
‘आज के शिवाजी-नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरून राजकीय वातावरण तापलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केल्यानं भारतीय जनता पक्षाला टीकेला सामोरं जावं लागत आहे. त्याचवेळी भारतीय जनता पक्षाचे नेते आणि राज्यातील माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्यावर स्पष्टीकरण देत विरोधकांना प्रत्युत्तर दिलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना दिलेली जाणता राजा ही उपाधी शरद पवार यांनाही दिली जाते. पवारांच्या कार्यकाळात अनेक कर्जबाजारी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, त्यामुळं त्यांना जाणता राजा ही उपाधी लागू होते का? असा सवाल मुनगंटीवार यांनी केला.
5 वर्षांपूर्वी -
मनसे आणि भाजपाची वैचारिक भूमिका सारखीच असल्यास भाजप-मनसे युती शक्य: मुनगंटीवार
२३ जानेवारी रोजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. याच दिवशी राज ठाकरेंनी मनसेच्या महाअधिवेशानचे आयोजन केलं आहे. राजकीय वर्तुळामधील चर्चेनुसार त्याचवेळी मनसेची नवीन भूमिका राज स्पष्ट करणार असल्याचे समजते. इतकच नाही तर मनसेचा झेंडा बदलण्याची घोषणाही या महाअधिवेशनात होण्याची शक्यता आहे. मनसेचा सध्याच्या झेंड्यामध्ये निळा, पांढरा, भगवा आणि हिरवा रंग आहे. मात्र आता हा झेंडा बदलून तो पूर्णपणे भगवा किंवा केशरी केला जाणार आहे. यासंदर्भात पक्षातील नेत्यांबरोबर चर्चा झाल्याचे समजते.
5 वर्षांपूर्वी -
महाविकासआघाडी ताब्यात घेणार? मुंनगंटीवार यांची पत्नी या ट्रस्टवर; २०० कोटीची जमीन १ रु. भाडयाने
श्रीमंत तिरुपती देवस्थानाला मुंबईतली कोट्यवधींची जमीन एक रुपया भाडेपट्ट्याने देण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. देवस्थानाच्या मागणीनुसार मुंबईतील वांद्रे उपनगरातील शासकीय जमीन ३० वर्षांसाठी भाडेपट्ट्याने देण्यास ८ ऑगस्ट २०१९ रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली होती. आपल्या पत्नीचे विश्वस्त पद कायम राहावे म्हणून राज्याच्या अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तब्बल ८० कोटी किंमत असणारी सरकारी जमीन तिरुपती देवस्थान ट्रस्टला चक्क १ रुपया या कवडीमोल भावाने दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या कामासाठी पारदर्शकतेचा कायम पुरस्कार करणा-या मुख्यमंत्र्यांनीही त्याला पाठिंबा दिल्याची माहिती मंत्रालयातील विश्वसनीय सूत्रांनी दिली होती. दरम्यान, या जमिनीचे बाजारमूल्य तब्बल २०० कोटी असल्याचं समोर आलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
आमदार खरेदीचे आरोप खोटे; काँग्रेस-राष्ट्रवादीने पुरावे द्यावेत: मुनगंटीवार
भारतीय जनता पक्ष सत्ता स्थापनेसाठी आमदार फोडण्याचा प्रयत्न करत असल्याची खोटी माहिती काँग्रेस आणि राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाने दिली असून येत्या ४८ तासांत या पक्षांनी या आरोपाबाबत पुरावे द्यावे, अन्यथा राज्यातील जनतेचा माफी मागावी, असे आवाहन बारतीय जनता पक्षाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याही नेत्याने कोणत्याही आमदाराला फोन केलेला नाही, कुणाकडे कॉल रेकॉर्डिंग असेल, तर त्यांनी ती सादर करावी, असे आव्हानही मुनगंटीवार यांनी विरोधी पक्षांना दिले आहे. मुनगंटीवार पत्रकारांशी बोलत होते.
6 वर्षांपूर्वी -
शिवसेनेशिवाय अल्पमतातील सरकार स्थापन करू नका; भाजपाला दिल्लीतून सूचना
शिवसेनेसोबत चर्चा सुरू असल्याची माहिती मुनगंटीवार यांनी पत्रकारांना दिली. शिवसेनेकडून काही स्तरावर चर्चा आहे. पण चॅनलच्या माध्यमातून पाहिलं तर वाटतं चर्चा बंद आहे, असं सूचक विधान त्यांनी केलं. शिवसेनेसोबतच सरकार स्थापन व्हावं ही भाजपाची इच्छा आहे. अल्पमतातील सरकार कदापि बसवणार नाही. दिल्लीहून तशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. स्थिर सरकार देण्याच्या दृष्टीनंच भाजपानं आत्तापर्यंत वाट पाहिली आहे, असं मुनगंटीवार म्हणाले.
6 वर्षांपूर्वी -
भाजपचे शिष्टमंडळ उद्या राज्यपालांना भेटणार तर सेनेच्या आमदारांची तातडीची बैठक
राज्यात महायुतीचंच सरकार येणार आहे, असं सांगतानाच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ उद्या राज्यपालांना भेटून राजकीय परिस्थितीवर चर्चा करणार असल्याचं भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं. मुनगंटीवार यांनी राज्यपालांना भेटून राजकीय परिस्थितीची माहिती देणार असल्याचं सांगितल्याने भाजप सरकार स्थापनेचा दावा करणार की नाही? याचा सस्पेन्स वाढला आहे.
6 वर्षांपूर्वी -
शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्याची गोड बातमी मुनगंटीवार महाराष्ट्राला देतील: संजय राऊत
मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाने सत्ता स्थापनेचा दावा करुन सरकार बनवले पाहिजे. राज्यपालांना ते १४५ आमदारांच्या पाठिंब्याची यादी देणार असतील तर ती आनंदाची बाब आहे असे राऊत म्हणाले. त्याचवेळी संजय राऊत यांनी महाराष्ट्रात शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल असा दावा केला. सुधीर मुनगंटीवार महाराष्ट्राला लवकरच गोड बातमी मिळेल असे म्हणाले होते. महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार ही ती गोड बातमी आहे असे राऊत म्हणाले.
6 वर्षांपूर्वी -
...अन्यथा राज्यात राष्ट्रपती राजवट: सुधीर मुनगंटीवार
राज्यात ७ नोव्हेंबरपर्यंत सरकार स्थापन न झाल्यास राज्यात राष्ट्रपती शासन लागू होऊ शकतं, असं वक्तव्य अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं. महाराष्ट्राला आपण पुरोगामी महाराष्ट्र असं संबोधतो. पुरोगामी महाराष्ट्रात अशा प्रकारची स्थिती यापूर्वीही कधी उद्भवली नव्हती आणि यापुढेही उद्भवणार नाही, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसंच राज्यात महायुतीतच सरकार स्थापन होईल, असंही ते म्हणाले.
6 वर्षांपूर्वी -
आंध्र सरकारने स्थापलेल्या नव्या समितीत सपना मुनगंटीवार यांना देवस्थान समितीवर घेण्याच्या अटीवर मुंबईत जमीन?
श्रीमंत तिरुपती देवस्थानाला मुंबईतली कोट्यवधींची जमीन एक रुपया भाडेपट्ट्याने देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. देवस्थानाच्या मागणीनुसार मुंबईतील वांद्रे उपनगरातील शासकीय जमीन 30 वर्षांसाठी भाडेपट्ट्याने देण्यास ८ ऑगस्ट रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. आपल्या पत्नीचे विश्वस्त पद कायम राहावे म्हणून राज्याच्या अर्थमंत्र्यांनी ८० कोटी किंमत असणारी सरकारी जमीन तिरुपती देवस्थान ट्रस्टला चक्क १ रुपया या कवडीमोल भावाने दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या कामासाठी पारदर्शकतेचा कायम पुरस्कार करणा-या मुख्यमंत्र्यांनीही पाठिंबा दिल्याची माहिती मंत्रालयातील विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, या जमिनीचे बाजारमूल्य दोनशे कोटी आहे.
6 वर्षांपूर्वी -
८ ऑगस्ट पुरग्रस्तांसाठीची मंत्रिमंडळाची बैठक; अन सपना मुनगंटीवार विश्वस्त असलेल्या तिरुपती देवस्थान ट्रस्टवर खैरात
मुंबई : श्रीमंत तिरुपती देवस्थानाला मुंबईतली कोट्यवधींची जमीन एक रुपया भाडेपट्ट्याने देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. देवस्थानाच्या मागणीनुसार मुंबईतील वांद्रे उपनगरातील शासकीय जमीन 30 वर्षांसाठी भाडेपट्ट्याने देण्यास ८ ऑगस्ट रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. आपल्या पत्नीचे विश्वस्त पद कायम राहावे म्हणून राज्याच्या अर्थमंत्र्यांनी ८० कोटी किंमत असणारी सरकारी जमीन तिरुपती देवस्थान ट्रस्टला चक्क १ रुपया या कवडीमोल भावाने दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या कामासाठी पारदर्शकतेचा कायम पुरस्कार करणा-या मुख्यमंत्र्यांनीही पाठिंबा दिल्याची माहिती मंत्रालयातील विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, या जमिनीचे बाजारमूल्य दोनशे कोटी आहे.
6 वर्षांपूर्वी