Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
सुषमा स्वराज यांना सर्वपक्षीय नेत्यांकडून आदरांजली
भारताच्या माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचं मंगळवारी रात्री उशीरा दिल्लीच्या एम्स रुग्णालयात निधन झालं. त्या ६७ वर्षांच्या होत्या. रात्री उशीरा कार्डिअॅक अरेस्टमुळे त्यांचं निधन झालं. छातीत दुखू लागल्या सुषमा स्वराज यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र रुग्णालयात त्यांनी डॉक्टरांच्या उपचाराला प्रतिसाद दिला नाही. सुषमा स्वराज यांच्या निधनानंतर सर्वच स्तरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे.
6 वर्षांपूर्वी -
बेजगाम जिल्ह्यामधून भारतीय लष्कराच्या एका जवानाचं अपहरण
पुलवामा हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील तणाव अधिकच वाढला आहे. पाकिस्तानकडून सातत्याने सीमेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जातं. तसेच बेजगाम जिल्ह्यामधून एका भारतीय लष्कराच्या जवानाचं अपहरण झाल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे जम्मू-काश्मीर भागात प्रचंड भीतीदायक वातावरण पसरले आहे.
6 वर्षांपूर्वी -
केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाची काही वेळात पत्रकार परिषद
पुलवामा हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील तणाव अधिकच वाढला आहे. पाकिस्तानकडून सातत्याने सीमेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जातं. तसेच बेजगाम जिल्ह्यामधून एका भारतीय लष्कराचं अपहरण झाल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे जम्मू-काश्मीर भागात प्रचंड भीतीदायक वातावरण पसरले आहे.
6 वर्षांपूर्वी -
भाजपाची अवस्था पाहून सुषमा स्वराजांनी लोकसभेचं मैदान सोडले : चिदंबरम
भाजपाच्या वरिष्ठ नेत्या आणि परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आगामी लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय काल इंदूर येथे जाहीर केला. त्यामुळे त्यांच्या या निर्णयावर विरोधकांनी खोचक प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेस नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी तिखट प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, “सुषमा स्वराज या स्मार्ट असून मध्य प्रदेशात भारतीय जनता पक्षाची स्थिती अत्यंत वाईट असल्याने त्यांनी निवडणुकीचे मैदान सोडून दिल्याचे ट्विट केले आहे.
7 वर्षांपूर्वी -
लोकसभा २०१९: सुषमा स्वराज निवडणूक लढवणार नाहीत!
भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या आणि विद्यमान परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज आगामी लोकसभा निवडणूक लढविणार नाहीत. त्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने सध्या मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. इंदूरमध्ये आयोजित एका पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली. तसेच या निर्णयाची पूर्ण कल्पना मी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना दिल्याचे सुद्धा त्यांनी स्पष्ट केले आहे.
7 वर्षांपूर्वी -
चीनने तिबेटमार्गे भारतात येणाऱ्या ब्रह्मपुत्रा नदीचे पाणी रोखले
चीनने आता भारताला डिवचण्यासाठी नव्या कुरापती काढण्यास सुरुवात केल्याचे वृत्त आहे. तिबेटमार्गे भारतात वाहणाऱ्या ब्रह्मपुत्रा नदीचे पाणी अडविल्यात आल्याचे समजते. चीनच्या या निर्णयामुळे चीनच्या सीमेवर लागून असलेल्या अरुणाचल प्रदेशातील अनेक भागात दुष्काळाचं मोठं सावट असल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्याबाबत केंद्र सरकार कोणता निर्णय घेणार ते पाहावं लागणार आहे.
7 वर्षांपूर्वी -
उन्नाव आणि कठुआ बलात्कार प्रकरणात सुषमा स्वराज आज गप्प का ?
निर्भया बलात्कार प्रकरणी २०१२ मध्ये लोकसभा हलवून सोडणाऱ्या आणि बलात्काऱ्यांना थेट फाशीची शिक्षा देण्याची मागणी करणाऱ्या सध्याच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आज गप्प का आहेत असा प्रश्न सध्या जनता उपस्थित करत आहे.
7 वर्षांपूर्वी -
पुणेकर श्री. विजय गोखले यांची भारताच्या परराष्ट्र सचिव पदी नियुक्ती
भारताचे विद्यमान परराष्ट्र सचिव एस. जयशंकर हे येत्या २८ जानेवारी रोजी सेवेतून निवृत्त होत असून त्यांची जागा आता मूळचे पुणेकर विजय गोखले यांची नियुक्ती झाली आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या सचिव पदी नियुक्ती झालेले ते दुसरे महाराष्ट्रीयन ठरले आहेत.
7 वर्षांपूर्वी