Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Delhi Terrorist Arrest | महाराष्ट्र ATS प्रमुखांची सविस्तर माहिती | आशिष शेलार यांचा उतावळेपणा देखील उघड?
एकही दहशतवादी मुंबईत आला नाही, त्यांचा कुणी साथीदारही आला नाही, महाराष्ट्रात कोणतेही स्फोटक सापडलेले नाहीत, असं स्पष्टीकरण महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे (एटीएस) प्रमुख विनित अग्रवाल यांनी दिले. मुंबईतील धारावीचा रहिवासी असलेला समीर कालिया उर्फ जान मोहम्मद शेख याचे 20 वर्ष जुने दाऊद कनेक्शन उघड झाल्याचेही त्यांनी सांगितले. एटीएस प्रमुखांनी पत्रकार परिषद घेत यासंदर्भात माहिती दिली. देशात बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा मोठा कट दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने उधळून लावला आहे.
4 वर्षांपूर्वी -
Mumbai Local Blast Terror Plan | राज्याच्या गृहमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक
एका मोठ्या दहशतवादी मॉड्यूलचा भाग राहिलेल्या पाकिस्तानच्या आयएसआयशी संबंधीत 6 दहशतवाद्यांना मंगळवारी (14 सप्टेंबर) ला अटक करण्यात आली. याच्या काही तासांनंतरच मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड ऑपरेटिव्ह जान मोहम्मद शेख उर्फ समीर कालियाच्या कुटुंबातील सदस्यांची चौकशी केली. समीर कालिया 12 सप्टेंबरपासून घरातून बेपत्ता होता आणि 14 रोजी त्याच्या अटकेची बाब समोर आली आहे. दिल्ली गुन्हे शाखेच्या माहितीनुसार, मुंबईहून दिल्लीला जात असताना शेखला कोटा येथून एका ट्रेनमध्ये अटक करण्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी