Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
युपी: राष्ट्रवादीकडून 'मुस्लिम कार्ड' तर सेनेकडून 'हिंदुत्व कार्ड'; काय शिजतंय सेना-एनसीपीत?
अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी ‘श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट’ची स्थापना करण्यात आली आहे. या ट्रस्टची बुधवारी दिल्लीमध्ये पहिली बैठक पार पडली. या ट्रस्टवरुनच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारला सवाल केला आहे. ‘राम मंदिराच्या उभारण्यासाठी ट्रस्ट तयार करु शकता तर मशिदीसाठी का नाही? असा सवाल त्यांनी केला आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.
5 वर्षांपूर्वी -
अजितदादा, आपण आधीच एकत्र यायला हवं होतं - उद्धव ठाकरे
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज शिवनेरी किल्ल्यावर आले होते. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केल्यानंतर उपस्थित शिवप्रेमींना मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. अजितदादा, आपण आधीच एकत्र यायला हवं होतं, अशी भावना मुख्यमंत्र्यांनी शिवभक्तांशी संवाद साधताना बोलून दाखवली. ‘मी आणि अजितदादा कार्यक्रम पाहात होतो. त्यावेळी एक कार्यकर्ता मला वळून वळून सांगत होता, दादांना सांभाळा. त्यावर मी आता उत्तर देतो. अहो अजितदादा, आपण एवढी मधली वर्षे उगाच घालवली. उगाचच इतकी वर्षे वेगळं राहिलो. आपण आधीच एकत्र यायला हवं होतं, असं मुख्यमंत्री म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्री शिवनेरीवर भाषण देताना गर्दीतुन एकजण ओरडला ते शिवस्मारकाचं बघा जरा
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज शिवनेरी किल्ल्यावर आले होते. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केल्यानंतर उपस्थित शिवप्रेमींना मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. अजितदादा, आपण आधीच एकत्र यायला हवं होतं, अशी भावना मुख्यमंत्र्यांनी शिवभक्तांशी संवाद साधताना बोलून दाखवली. ‘मी आणि अजितदादा कार्यक्रम पाहात होतो. त्यावेळी एक कार्यकर्ता मला वळून वळून सांगत होता, दादांना सांभाळा. त्यावर मी आता उत्तर देतो. अहो अजितदादा, आपण एवढी मधली वर्षे उगाच घालवली. उगाचच इतकी वर्षे वेगळं राहिलो. आपण आधीच एकत्र यायला हवं होतं, असं मुख्यमंत्री म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
फडणवीस सरकारच्या ‘त्या करोडो वृक्ष लागवडीचे’ महाविकास आघाडीकडून चौकशीचे आदेश
फडणवीस सरकारच्या कार्यकाळात झालेल्या वृक्ष लागवडीची चौकशी करण्याचे आदेश ठाकरे सरकारनं दिले आहेत. फडणवीस सरकारच्या काळात ५० कोटी वृक्ष लावण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. या संपूर्ण अभियानाची चौकशी केली जाणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
तृप्ती देसाईंची थेट मुख्यमंत्र्यांना त्यांच्या दालनात कोंडून ठेवण्याची धमकी...नेमक्या काय म्हणाल्या?
प्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी गर्भलिंग चाचणीसंदर्भात गर्भलिंग चाचणीसंदर्भात वक्तव्याबाबात एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर माफी मागितली आहे. ‘सम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते’ असं वादग्रस्त वक्तव्य किर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी केलं होतं. त्यासंदर्भात सोशल मीडियावर टीकेची झोड उडाली होती.
5 वर्षांपूर्वी -
एल्गार परिषद: पवारांना तत्कालीन युती सरकारच्या भूमिकेवर संशय; युतीतल्या सेनेचा विसर?
भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषदेविषयी आज राष्ट्रवादी काँग्रेचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदे घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही उपस्थित होते. भीमा कोरेगाव आण एल्गार परिषद हे दोन वेगळे कार्यक्रम आहे. यामध्ये उलटसुलट चर्चा होत असल्याचं शरद पवार म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
कोरेगाव-भीमा हिंसाचार आणि एल्गार परिषद प्रकरण या दोन वेगवेगळ्या गोष्टी: मुख्यमंत्री
राज्यात गेल्या काही दिवसांपासून एल्गार परिषदेबरोबरच कोरेगाव भीमा प्रकरण चर्चेत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एल्गार परिषदेसंदर्भातील तपासावर संशय व्यक्त केला होता. याची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली होती. मात्र, हा याप्रकरणाचा तपास केंद्र सरकारनं एनआयएकडे दिला. या संपूर्ण प्रकरणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठा खुलासा केला आहे. “कोरेगाव भीमा प्रकरणाचा तपास केंद्राकडं दिलेला नाही. देणार नाही,” असं त्यांनी स्पष्ट केलं.
5 वर्षांपूर्वी -
कोरेगाव-भीमाचा तपास केंद्राला कदापिही देणार नाही: मुख्यमंत्री
राज्यात गेल्या काही दिवसांपासून एल्गार परिषदेबरोबरच कोरेगाव भीमा प्रकरण चर्चेत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एल्गार परिषदेसंदर्भातील तपासावर संशय व्यक्त केला होता. याची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली होती. मात्र, हा याप्रकरणाचा तपास केंद्र सरकारनं एनआयएकडे दिला. या संपूर्ण प्रकरणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठा खुलासा केला आहे. “कोरेगाव भीमा प्रकरणाचा तपास केंद्राकडं दिलेला नाही. देणार नाही,” असं त्यांनी स्पष्ट केलं.
5 वर्षांपूर्वी -
ट्रम्प यांचा अहमदाबाद दौरा संपल्यावर झोपडपट्ट्या लपविणाऱ्या भिंती पाडणार काय? शिवसेना
प्रे. ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून आपल्या देशात येत आहेत. त्यांच्या स्वागतात कोणतीही कसर राहू नये. शेवटी हा राजकीय शिष्टाचार आहे. ‘केम छो ट्रम्प’ने ते खूश होतील, पण ट्रम्प यांना दिल्लीत आधी न उतरवता थेट अहमदाबादेत उतरवून केंद्र सरकारला नक्की कोणता संदेश द्यायचा आहे? प्रे. ट्रम्प यांचा अहमदाबाद दौरा आटोपल्यानंतर झोपडपट्ट्या लपविणाऱ्या भिंती पाडणार काय? हे प्रश्न आहेत. मागे ‘गरिबी हटाव’ या घोषणेवरून बरीच टिंगलटवाळी झाली होती. त्याच घोषणेचे रूपांतर आता ‘गरिबी छुपाव’ या योजनेत झालेले दिसते. नव्या अर्थसंकल्पात त्यासाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद केली आहे काय?
5 वर्षांपूर्वी -
अयोध्येला नक्की जा म्हणजे तुमचे खरे रक्त जागे होईल: देवेंद्र फडणवीस
नवी मुंबईच्या नेरुळमध्ये भारतीय जनता पक्षाचं राज्यस्तरीय अधिवेशन होतंय. या अधिवेशनाच्या निमित्ताने भारतीय जनता पक्ष विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा संघटनात्मक बांधणीला सुरुवात करणार आहे. चंद्रकांत पाटील यांनी या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्षपदी सूत्रं हाती घेतली. त्यानंतर झालेल्या भाषणात त्यांनी राज्य सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली. ते म्हणाले, हे सरकार पडावं अशी आम्ही वाट बघत नाही. मात्र आपसातील भांडणांमुळेच हे सरकार कोसळेल असंही त्यांनी सांगितलं. यावेळी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नढ्ढा यांनी महाराष्ट्रात ऐकला चलो रे चे संकेत दिले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
फरहान आझमी म्हणतो..तर आम्ही बाबरी मस्जिद बनवू...हे सेनेला पटणार का? सोमैया
नवी मुंबईच्या नेरुळमध्ये भारतीय जनता पक्षाचं राज्यस्तरीय अधिवेशन होतंय. या अधिवेशनाच्या निमित्ताने भारतीय जनता पक्ष विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा संघटनात्मक बांधणीला सुरुवात करणार आहे. चंद्रकांत पाटील यांनी या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्षपदी सूत्रं हाती घेतली. त्यानंतर झालेल्या भाषणात त्यांनी राज्य सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली. ते म्हणाले, हे सरकार पडावं अशी आम्ही वाट बघत नाही. मात्र आपसातील भांडणांमुळेच हे सरकार कोसळेल असंही त्यांनी सांगितलं. यावेळी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नढ्ढा यांनी महाराष्ट्रात ऐकला चलो रे चे संकेत दिले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
ज्यांच्या विरुद्ध २५ वर्ष संघर्ष केला त्यांनी एका बैठकीत विश्वास दाखवला: उद्धव ठाकरे
सिंचन क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या जैन इरिगेशन कंपनीच्या वतीने आयोजित पद्मश्री आप्पासाहेब पवार कृषी उच्च तंत्र पुरस्कार सोहळा शनिवारी दुपारी जैन हिल्सवर पार पडला. या सोहळ्यात मुख्यमंत्री ठाकरे बोलत होते. या सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार, कामगार व राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील, कृषी मंत्री दादा भुसे, जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आदी उपस्थित होते.
5 वर्षांपूर्वी -
'ऑपरेशन लोटस' काय तुम्हालाच लोटलं ना लोकांनी; मुख्यमंत्र्यांचा भाजपाला टोला
पवार-ठाकरे यांच्यामध्ये शेतकरी आहे आणि शेतकरी हा आमच्या सरकारचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत कोणतंही अंतर नाही, असे नमूद करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘आमचं बरं चाललंय’ असाच संदेश आज दिला.
5 वर्षांपूर्वी -
सामना जाहिरातीत नाणार'चा उदोउदो! फसव्या भूमिकेतील शिवसेना पकडली गेल्याची चर्चा
लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत नाणार प्रकल्पाविरोधात आघाडी उघडत मते मिळवणाऱ्या शिवसेनेची नाणारवरून कोंडी होण्याची शक्यता आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक ‘सामनात’च नाणार प्रकल्पाचा उदोउदो करणारी जाहिरात छापून आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. शिवसेनेच्या मुखपत्रातच ही जाहिरात आल्याने कोकणात नाणार प्रकल्प राबविला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून त्यामुळे कोकणवासियांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे. या जाहिरातीमुळे शिवसेना स्वतःच स्वतःच्या सापळ्यात अडकली आहे.
5 वर्षांपूर्वी -
औरंगाबादचा विकास करुन दाखवा, मी नामांतरासाठी साथ देईन: खा. इम्तियाज जलील
मागील ३ दशकं शिवसेनेने औरंगाबादच्या नामांतराचा प्रश्न प्रलंबित आहे तसेच विकासाची पूर्ण बोंब असल्याचं पाहायला मिळत. यावरून एमआयएम’ने शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. इम्तियाज जलील म्हणाले, ” इथल्या कट्टर शिवसैनिकांना विचारा की त्यांना औरंगाबादचं नाव बदलायचं आहे की विकास करायचा आहे? संभाजी महाराजांचं नाव औरंगाबादला देण्याच्या गोष्टी करणाऱ्या शिवसेना आणि मनसेने चार वर्षात शहराचा विकास करुन दाखवावा. तुम्ही कचरामुक्त शहर करुन दाखवा, विकास घडवून दाखवा. तसंच केल्यास मी स्वतः तुम्हाला नामांतरासाठी साथ देईन असं खासदार इम्तियाझ जलील म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
एल्गार परिषद खटला मुंबईतील विशेष NIA कोर्टाकडे वर्ग; पुणे सत्र न्यायालयाची मंजुरी
भीमा-कोरेगाव प्रकरणाचा खटला मुंबईतील विशेष एनआयए न्यायालयाकडे वर्ग करण्यास पुणे सत्र न्यायालयाने मंजुरी दिली आहे. विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या कोर्टाने यासंबंधी आदेश दिला. पुणे न्यायालयाने तसे ‘ना हरकत’ पत्रही दिले आहे. याप्रकरणातील सर्व आरोपींना येत्या २८ फेब्रवारी रोजी मुंबईतील एनआयएच्या विशेष न्यायालयासमोर उभे करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. एल्गार परिषद व कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणाचा तपास पुणे पोलिस करत होते. अचानक केंद्र सरकारने हा तपास पुणे पोलिसांकडून काढून घेत एनआयएकडे दिला होता.
5 वर्षांपूर्वी -
फुकट सेवा? सरकारला खरंच 'डेटा यूटिलिझेशन आणि डेटा सेक्युरीटी' हे विषय कळतात का? सविस्तर वृत्त
पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्या मुलाच्या कंपनीने मुंबई पोलिसांसाठी अत्याधुनिक पेपरलेस अशी ‘डिजिटाईज्ड नोटशीट प्लस’ प्रणाली मोफत उपलब्ध करून दिली आहे. काही तांत्रिक कारणामुळे ही प्रणाली अद्याप कार्यान्वित झालेली नाही. मात्र विद्यमान पोलीस आयुक्तांच्या मुलाच्या कंपनीला हे काम मंजूर करण्यात आल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात असले तरी यात नियमबाह्य़ काहीच नाही, अशी प्रतिक्रिया संजय बर्वे यांनी दिली.
5 वर्षांपूर्वी -
जितकं काम तितकाच पगार असावा; असा एखादा निर्णय होणे गरजेचे: अमोल मिटकरी
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 5 दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या निर्णयानंतर एकीकडे कर्मचारी आनंद व्यक्त करत असतानाच राज्यमंत्री बच्चू कडू यांनी या निर्णयावर निशाणा साधला आहे. ‘पाच दिवसांचा आठवडा मग कर्मचाऱ्यांना ७ दिवसांचा पगार का द्यायचा?’ असा सवाल बच्चू कडू यांनी केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
अजित पवारांचा विरोध डावलून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना ५ दिवसांचा आठवडा?
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना मोठी गुड न्यूज दिली आहे. पाच दिवसांचा आठवडा करण्याची गेल्या अनेक वर्षांपासूनच्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या मागणीला ठाकरे सरकारनं अखेर मंजुरी दिली आहे. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याविषयीचा निर्णय घेण्यात आला.
5 वर्षांपूर्वी -
राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना ५ दिवसांचा आठवडा, पण...कामाची वेळ?

5 वर्षांपूर्वी