Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
केजरीवालांनी मतदाराला गंडवले नाही; शिवसेनेचा मोदी-शहांना टोला
आपण तेवढेच देशप्रेमी आणि आपल्याला विरोध करणारे आणि इतर सर्व देशद्रोही हा काहींच्या मनातील भ्रमाचा भोपळा ही दिल्लीकर मतदारांनी फोडला आहे, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीतील विधानसभा निवडणूक निकालावरुन भाजपला हाणले आहे. एका निवेदनात ठाकरे यांनी अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात आम आदमी पार्टीने मिळविलेल्या जबरदस्त यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे.
5 वर्षांपूर्वी -
शिवसेनेच्या मते हा भाजपच्या अहंकाराचा पराभव; पण मित्रपक्ष काँग्रेसच्या अवस्थेवर मौन
दिल्ली भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात लावलेल्या पोस्टरवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा फोटो दिसत आहे. यासोबतच पोस्टरवर, विजयामुळे आम्हाला गर्विष्ठ होत नाही आणि पराभवामुळे आम्ही निराश होत नाही असा संदेश लिहिण्यात आलेला आहे. मतमोजणीआधी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून, दिल्लीमध्ये सरकार बनेल असा विश्वास व्यक्त केला जात होता. मनोज तिवारी यांनी भारतीय जनता पक्षाला ५५ जागा मिळतील असं म्हटलं होतं. पण मतमोजणीला सुरूवात होताच आपने स्पष्ट आघाडी घेतल्याचं समोर आल्यानंतर भारतीय जनता पक्षाकडून हे पोस्टर लावण्यात आलं आहे. यामुळे एकप्रकारे भारतीय जनता पक्षाने पराभव स्वीकारण्याची तयारी केल्याचं म्हटलं जात आहे.
5 वर्षांपूर्वी -
हिंगणघाट: आरोपीला कठोर शिक्षा दिल्याशिवाय सरकार स्वस्थ बसणार नाही: मुख्यमंत्री
माणुसकीला काळीमा फासणारी आणि अवघ्या महाराष्ट्राचं मन सुन्न करणारी घटना वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे घडली होती. परिणामी दारोडा गावातील एका २४ वर्षीय तरुणीला आपला जीव गमवावा लागला. काही वेळापूर्वी पीडितेचे पार्थिक तिच्या दारोडा गावात दाखल झालं आहे. आमच्या मुलीचा जीव घेणाऱ्या नराधमाला फासावर लटकवा, अशी मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे. अनेक महिलांनी त्या नराधमाला आमच्या स्वाधीन करा अशी मागणी केली आहे. आमच्या मुलीला जसा त्रास झाला त्या नराधमालाही तसाच त्रास व्हायला हवा, असं म्हणताना गावकऱ्यांचा आक्रोश दिसून येत आहे.
5 वर्षांपूर्वी -
भाजपा सुकलेल्या तलावात कमळे फुलवीत आहे; त्यांच्या नव्या ‘फुलोत्पादना'ला शुभेच्छा
दिल्लीत काँग्रेसचे अस्तित्व फारसे उरले नाही. भारतीय जनता पक्ष सुकलेल्या तलावात कमळे फुलवीत आहे. त्यांच्या या नव्या ‘फुलोत्पादना’ला आमच्या शुभेच्छा! पण केजरीवाल यांनी मागच्या पाच वर्षांत केलेल्या कामांवर मते मागितली आहेत. देशाच्या राजकारणात हा वेगळा प्रयोग आहे. राजकीय मतभेदांच्या पलीकडे जाऊन या प्रयोगाचे स्वागत केले पाहिजे. एक केजरीवाल सगळ्यांना ‘लय भारी’ पडताना दिसत आहेत. दिल्लीचे मतदार सुज्ञ आहेत. त्यांना शहाणपणाचे डोस पाजण्याची गरज नाही असंही सामनातून भारतीय जनता पक्षाला बजावलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
घुसखोरांविरोधातल्या आंदोलनाचं श्रेय इतरांनी घेऊ नये; उद्धव ठाकरेंचा मनसेला टोला
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपल्या महाअधिवेशनात झेंडा बदलल्यानंतर पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांविरोधात भूमिका जाहीर केली होती. आंदोलन छेडण्याचाही इशारा दिला होता. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना ९ फेब्रुवारीला मुंबईत मोर्चाही काढणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घुसखोरांच्या प्रश्नावर ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीत आपली भूमिका स्पष्ट केली.
5 वर्षांपूर्वी -
जे माझ्या वडिलांनी शिकवलेलं ते हे हिंदुत्व नाही: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
सध्या देशभर CAA वरून आंदोलनं पेटलेली असताना आणि काँग्रेससहित अनेक पक्ष त्या कायद्याला विरोध करत असताना शिवसेनेने वेगळी भूमिका घेतल्याचे काँग्रेस नाराज होण्याची दाट शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा हा एकप्रकारे काँग्रेसला धक्का असल्याचं मानलं जातं आहे आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या या भूमिकेकडे काँग्रेस कसं पाहणार ते पाहावं लागणार आहे. कारण CAA अंतर्गत बाहेरील निर्वासित हिंदूंना भारतात नागरिकत्व देणार असल्याने शिवसेनेने स्वतःचा स्वार्थ साधला असून, देशभरातील मुस्लिम समाजाची आणि आंदोलकांच्या भावना दुखावण्याची शक्यता नाकारता येत नाही असं राजकीय तज्ज्ञांना वाटतं. कदाचित हाच संदेश दिल्ली दरबारी पोहोचेल आणि यावरून भाजप देखील शिवसेनेला राजकीय कोंडीत पकडेल अशी शक्यता आहे.
5 वर्षांपूर्वी -
CAA समर्थन? CAA नागरीकत्व हिरावणारा नव्हे तर नागरिकत्व देणारा कायदा : मुख्यमंत्री
सध्या देशभर CAA वरून आंदोलनं पेटलेली असताना आणि काँग्रेससहित अनेक पक्ष त्या कायद्याला विरोध करत असताना शिवसेनेने वेगळी भूमिका घेतल्याचे काँग्रेस नाराज होण्याची दाट शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा हा एकप्रकारे काँग्रेसला धक्का असल्याचं मानलं जातं आहे आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या या भूमिकेकडे काँग्रेस कसं पाहणार ते पाहावं लागणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
NRC केवळ मुस्लिम नव्हे तर हिंदुंच्याही मुळावर घाव घालणारा कायदा : मुख्यमंत्री
‘जिथे भारतीय जनता पक्षाची सत्ता नाही तिथे अस्थिरता निर्माण करायची, दंगेधोपे घडवायचे आणि राज्य उलथून टाकायचे याला हे लोक हिंदुत्व म्हणतात का’, असा सवाल उपस्थित करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या हिंदुत्त्वावर जोरदार प्रहार केले. हे हिंदुत्व नसेल तर मी कुणापासून फारकत घेतली. हे माझे समविचारी आहेत काय? धर्माची होळी पेटवून सत्ता मिळवणं हे माझं हिंदुत्व नाही, अजिबात नाही. हे हिंदुराष्ट्र मी मानणार नाही.
5 वर्षांपूर्वी -
मला पटतय, आपल्याला पटतय ना ? तिथीचा हट्ट सोडा - अमोल मिटकरी
अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजयंतीची तारीख १९ फेब्रुवारी ही जाहीर करावी आणि तिथीचा हट्ट मुख्यमंत्र्यांनी सोडावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केली आहे. मला पटतय, आपल्याला पटतय ना..?, असं अशा आशयाचं ट्विट अमोल मिटकरी यांनी केलं आहे. ट्विटसोबत त्यांनी एक फोटो शेअर केला आहे. त्यावर तिथीचा हट्ट सोडा आणि १९ फेब्रुवारीलाच शिवजंयतीची तारीख जाहीर करा, असं आवाहन मुख्यमंत्र्यांना केलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
फोटोग्राफी तर माझा छंद आहे, तो मी सोडणार नाही: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीचा दुसरा भाग आज (मंगळवार) प्रसारित करण्यात आला. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी अनेक मुद्द्यांवर प्रकार टाकला आहे. शेतकरी कर्जमुक्ती, बुलेट ट्रेन, उद्योगधंदे, मराठवाड्यातील पाणीप्रश्न यावर त्यांनी भाष्य केले.
5 वर्षांपूर्वी -
'बुलेट ट्रेन' प्रकल्प म्हणजे पांढरा हत्ती; उपयोग कोणाला होणार? मुख्यमंत्री प्रकल्पावर नाखूष
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या ‘बुलेट ट्रेन’ प्रकल्पाला पांढरा हत्ती म्हणत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टीकास्त्र सोडले आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पावर सगळ्यांच्या सोबत बसून विचार व्हायला पाहिजे, असे सांगताना बुलेट ट्रेनचा उपयोग कोणाला होणार आहे, या प्रकल्पामुळे किती उद्योगधंद्याना चालना मिळणार आहे, हे पाहणे महत्वाचे असल्याचे म्हणत मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पावर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
CAA: हा कायदा केंद्राचा आहे, तुझ्या बापाचे राज्य आहे का? शेलारांची उद्धव ठाकरेंवर एकेरी शब्दात टीका
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुधारित नागरिकत्व कायद्याला (CAA) पाठिंबा दर्शवला आहे की विरोध हे प्रोमोमध्ये स्पष्ट झालेलं नाही. तर, राष्ट्रीय नागरिक नोंदणीला (NRC) विरोध असल्याचं स्पष्ट दिसत आहे. तसेच एनआरसी महाराष्ट्रात लागू होऊ देणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. शिवसेनेच्या मुखपत्रासाठी दिलेल्या मुलाखतीतून त्यांनी आपली भुमिका मांडली.
5 वर्षांपूर्वी -
....पण डॉ. मनमोहन सिंग यांच्या तुलनेत मी जरा जास्त बोलतो - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
दरम्यान, देशातील अशा अनेक राजकीय नेत्यांवर ते काही करतील का असा प्रश्न संजय राऊत यांनी मुलाखतीत उपस्थित केला आणि त्यात डॉ. मनमोहन सिंग यांचं नाव पुढे आलं, ज्यांना त्या टीकेला सामोरं जावं लागलं होतं मात्र भारतीय अर्थव्यस्थेतील त्यांचं पंतप्रधान म्हणून योगदान मोठं असल्याचं सर्वश्रुत आहे. मात्र यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील अशाच टीकेला सामोरं जावं लागत असल्याच संजय राऊत यांनी विचारताच, मी तुलनेत डॉ. मनमोहन सिंग यांच्या पेक्षा जास्त बोलतो असं उद्धव ठाकरे गमतीने म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
हिंदुत्वात वचन पाळलं जातं, मोडलं जाणाऱ्या हिंदुत्वाला मी स्वीकारत नाही: मुख्यमंत्री
शिवसेनेच्या सामना या मुखपत्राला दिलेल्या विशेष पहिल्या मुलाखतीत मुख्यमंत्री बोलत होते. सामनाचे कार्यकारी संपादक, खासदार संजय राऊत यांनी विचारलेल्या प्रश्नांना ठाकरे उत्तरे देत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामनाला विशेष मुलाखत दिली असून, त्यामध्ये त्यांनी सरकार स्थापनेच्या घडामोडीपासून वादग्रस्त नागरिकता कायद्यापर्यंत, राहुल गांधींपासून अजित पवारांपर्यंत प्रत्येक प्रश्नावर उत्तरे दिली आहेत.
5 वर्षांपूर्वी -
CAA-NRC: मनसेच्या भगव्याची उघडपणे बॅनरबाजी; तर काँग्रेस-एनसीपी'मुळे शिवसेना संभ्रमात
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ९ तारखेच्या मोर्चाची जय्यत तयारी करताना हा मोर्चा पाकिस्तानी आणि बांगलादेशी मुस्लिमांच्या विरोधात असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यावरून सध्या मुंबई पुण्यात पाकिस्तानी आणि बांगलादेशी मुस्लिमांच्या विरोधात उघडपणे बॅनरबाजी होताना दिसत आहे. मनसेच्या भगव्याने कट्टर भूमिका घेतली असली तरी युतीच्या काळात उघड भूमिका मांडणारी शिवसेना महाविकास आघाडीमुळे अडचणीत सापडल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मोर्चा अभूतपूर्व असेल अशी माध्यमांमध्ये देखील चर्चा असून, त्यानंतर राज ठाकरे यांची हिंदुत्वाबद्दलची भूमिका देशभर बळकट होऊन मनसेबद्दल भविष्यातील वेगळी विचारधारणा निर्माण होण्याची अशी शक्यता राजकीय विश्लेषकांनी वर्तवली आहे.
5 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा NRC'ला विरोध तर CAA बाबतीत संभ्रम कायम
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुधारित नागरिकत्व कायद्याला (CAA) पाठिंबा दर्शवला आहे की विरोध हे प्रोमोमध्ये स्पष्ट झालेलं नाही. तर, राष्ट्रीय नागरिक नोंदणीला (NRC) विरोध असल्याचं स्पष्ट दिसत आहे. तसेच एनआरसी महाराष्ट्रात लागू होऊ देणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. शिवसेनेच्या मुखपत्रासाठी दिलेल्या मुलाखतीतून त्यांनी आपली भुमिका मांडली.
5 वर्षांपूर्वी -
Budget2020 : केवळ स्वप्नांच्या दुनियेत रमवणारा अर्थसंकल्प: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सादर केलेला केंद्रीय अर्थसंकल्प हा देशाच्या सध्याच्या आर्थिक स्थितीशी फारकत घेतलेला आणि वास्तवाचे भान हरपून देशातील युवा, शेतकरी आणि सर्वसामान्य माणसांना केवळ स्वप्नांच्या दुनियेत रमवणारा आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. आय.डी.बी.आय आणि एलआयसीमधील आपली भागीदारी विकण्याचा घेतलेला निर्णय, रेल्वेचे खाजगीकरण यासारखे निर्णय देशाच्या खिळखिळ्या अर्थव्यवस्थेचे दर्शन घडवतात असे सांगून काही शासकीय बॉण्ड परदेशी लोकांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय या अर्थसंकल्पात घेतला गेला आहे, तो ही काळजी वाढवणारा आहे असंही म्हटलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
३ महिन्यातच उद्धव ठाकरे सुट्टीवर; काय मोठा पराक्रम केला म्हणून सुट्टी? - निलेश राणे
मिनी काश्मीर म्हणुन ओळख असलेल्या महाबळेश्वरमध्ये मुख्यमंत्री उद्भव ठाकरे हे तीन दिवसाच्या खाजगी दौर्यावर जातायेत. त्यासाठी महाबळेश्वर मधील वेण्णा लेक परिसरात हॅलिपॅड बनविण्यात आले असुन मोठा पोलीस बंदोबस्त या परिसरात ठेवण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी महाबळेश्वर मध्ये फ्लेक्स लावण्यात आले असून स्वागताची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. मुख्यमंत्री ३ दिवस सहकुटुंब महाबळेश्वर येथील राजभवन येथे वास्तव्य करणार आहेत. या दरम्यान महाबळेश्वर येथील एका लग्नसोहळ्याला ते उपस्थित राहणार आहेत.
5 वर्षांपूर्वी -
सत्तेतील सहकारी म्हणतात; ठाकरे सरकार ६ ते ८ महिन्यांपेक्षा जास्त टिकणार नाही
समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांचे पुत्र फरहान आझमी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. फरहान यांचे म्हणणे आहे की, मुख्यमंत्री १०० दिवस पुर्ण झाल्यावर अयोध्येत जाण्याच्या निर्णयावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुस्लिमांना घाबरत आहेत असं फरहान आझमी म्हणाला आहेत. फरहान आझमी म्हणाले की, जर उद्धव ठाकरे अयोध्यामध्ये राम मंदिर बांधणार असतील तर आम्हीसुद्धा अयोध्याला जाणार पण तिथे आम्ही बाबरी मशीद बांधणार. फरहान यांच्या या वक्तव्यामुळे राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
VIDEO - फरहान आझमी उद्धव ठाकरेंसोबत अयोध्येला जाणार; चितावणीखोर धार्मिक भाषण
समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांचे पुत्र फरहान आझमी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. फरहान यांचे म्हणणे आहे की, मुख्यमंत्री १०० दिवस पुर्ण झाल्यावर अयोध्येत जाण्याच्या निर्णयावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुस्लिमांना घाबरत आहेत असं फरहान आझमी म्हणाला आहेत. फरहान आझमी म्हणाले की, जर उद्धव ठाकरे अयोध्यामध्ये राम मंदिर बांधणार असतील तर आम्ही सुद्धा अयोध्याला जाणार पण तिथे आम्ही बाबरी मशीद बांधणार. फरहान यांच्या या वक्तव्यामुळे राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
5 वर्षांपूर्वी