Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
सरपंचाची थेट निवड रद्द, तत्कालीन भाजप सरकारच्या निर्णयाला केराची टोपली
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आजच्या राज्य मंत्रिमंडळ कॅबिनेट बैठकीत महत्त्वाचे ४ निर्णय घेण्यात आले आहेत. यात सरपंचाची निवड, पुणे येथे अध्यापकांसाठी कंपनी कायद्यान्वये प्रशिक्षण संस्था, पीएचडीधारक अधिव्याख्यात्यांची वेतनवाढ आणि तंत्रशास्त्र विद्यापीठातील शिक्षकांची सुधारित वेतनश्रेणी या विषयांचा समावेश आहे.
5 वर्षांपूर्वी -
अयोध्या दौरा: राऊतां'कडून पुन्हा ७ मार्च तारीख जाहीर; आधी १६ जुन जाहीर केली होती
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येत्या ७ मार्च या दिवशी अयोध्येला जाणार असल्याचे शिवसेनेचे प्रवक्ते, खासदार संजय राऊत यांनी जाहीर केले आहे. महाराष्ट्र विकास आघाडी सरकारला १०० दिवस पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे अयोध्येला जाणार असल्याचे राऊत यांनी ट्विटद्वारे सांगितले होते. मुख्यमंत्री ठाकरे अयोध्येत रामलल्लाचे दर्शन घेतील, त्याच प्रमाणे ते शरयू नदीतीरावर आरती करतील अशी माहितीही राऊत यांनी दिली.
5 वर्षांपूर्वी -
पोलिसांवर हात टाकलेला; अमर ज्योत तोडली होती; त्यांची मुख्यमंत्र्यांसोबत चक्क पोलीस आयुक्तालयात भेट
कालच मुख्यमंत्री म्हणाले आमचा अंतरंग भगवाच आहे आणि आजच्या घटनेने शिवसेना मोठ्या राजकीय पेचात सापडण्याची शक्यता आहे. नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसीवरुन सुरु असलेल्या वादावर मुंबईतील २०० मुस्लिम नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भेट घेतली आहे. पोलीस आयुक्तालयात ही भेट झाली. यावेळी या नेत्यांनी सीएए आणि एनआरसी विरोधात मुख्यमंत्र्यांकडे निषेध व्यक्त केला. ज्याप्रकारे पंजाब आणि केरळ सरकारने सीएएविरोधात कायदा पारित केला तशाप्रकारे महाराष्ट्रातही हा कायदा लागू करु नका अशी मागणी त्यांनी यावेळी केली. त्यावेळी कोणालाही हा देश सोडून जाण्याची गरज नाही असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुस्लिमांना दिलं.
5 वर्षांपूर्वी -
ब्रेकिंग न्युज: विवादित रझा अकादमीच्या मुस्लिम नेत्यांची आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट
कालच मुख्यमंत्री म्हणाले आमचा अंतरंग भगवाच आहे आणि आजच्या घटनेने शिवसेना मोठ्या राजकीय पेचात सापडण्याची शक्यता आहे. नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसीवरुन सुरु असलेल्या वादावर मुंबईतील २०० मुस्लिम नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भेट घेतली आहे. पोलीस आयुक्तालयात ही भेट झाली. यावेळी या नेत्यांनी सीएए आणि एनआरसी विरोधात मुख्यमंत्र्यांकडे निषेध व्यक्त केला. ज्याप्रकारे पंजाब आणि केरळ सरकारने सीएएविरोधात कायदा पारित केला तशाप्रकारे महाराष्ट्रातही हा कायदा लागू करु नका अशी मागणी त्यांनी यावेळी केली. त्यावेळी कोणालाही हा देश सोडून जाण्याची गरज नाही असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुस्लिमांना दिलं.
5 वर्षांपूर्वी -
महाविकास आघाडीला शंभर दिवस होताच उद्धव ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार: संजय राऊत
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडी सरकारला शंभर दिवस पूर्ण होताच अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्वत: याबाबतची घोषणा ट्विटरवरुन केली. “सरकार जोरात कामास लागले आहे. पाच वर्षे पूर्ण करणारच! प्रभू श्रीरामाची कृपा. सरकारला शंभर दिवस पूर्ण होताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येस जातील. श्रीरामाचे दर्शन घेऊन पुढील कार्याची दिशा ठरवतील”, असं ट्विट खासदार संजय राऊत यांनी केलं.
5 वर्षांपूर्वी -
पाथरीचा विकास साईबाबांचे जन्मस्थळ म्हणून नव्हे तर तीर्थक्षेत्र म्हणून आश्वासन: उद्धव ठाकरे
साईबाबांच्या जन्मस्थळाच्या वादावर अखेर सामोपचाराने पडदा पडला आहे. पाथरीचा विकास साईबाबांचे जन्मस्थळ म्हणून नव्हे तर तीर्थक्षेत्र म्हणून करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले व त्यास पाथरी व शिर्डीकरांनी संमती दिल्याने वादाला पूर्णविराम मिळाला आहे. शिर्डी ग्रामस्थांचं 30 जणांच्या शिष्टमंडळाने शिर्डी विरुद्ध पाथरी या साई जन्मस्थळ वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन बैठक घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारही बैठकीला उपस्थित होते.
5 वर्षांपूर्वी -
केवळ सत्तेसाठी उद्धव ठाकरे हिंदुत्वाला विसरले: आ. प्रसाद लाड
राज्यात ठाकरे सरकार स्थापन झाल्यापसून शिवसेना – भारतीय जनता पक्षामधील यांच्यातील वाद अधिकच विकोपाला गेला आहे. तर दोन्ही पक्षातील नेते एकमेकांवर विविध मुद्यावरून टीका करण्याची कोणतेही संधी सोडत नाही. दरम्यान भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेनेला पक्षप्रमुख आणि मुख्यंमत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हिंदुत्ववादाच्या मुद्यावरून निशाणा साधला आहे.
5 वर्षांपूर्वी -
सरकारची कर्जमाफी ही शेतकऱ्यांची दिवसाढवळा केलेली फसवणूक: सदाभाऊ खोत
“महाराष्ट्र सरकारची कर्जमाफी ही शेतकऱ्यांची दिवसाढवळा केलेली फसवणूक आहे”, असा घणाघात माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केला आहे. विधानसभा निवडणुकीवेळी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर पक्षांनी सरसकट शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली होती. मात्र, अजूनही सरसकट कर्जमाफी झालेली नाही. महाविकास आघाडी सरकारने दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफीची घोषणा केली आहे. याच गोष्टीचा धागा पकडत सदाभाऊ खोत यांनी ठाकरे सरकारने केलेल्या कर्जमाफीवर टीका केली.
5 वर्षांपूर्वी -
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे: फ्रान्सिस दिब्रेटो
“मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देणार असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे. उद्धव ठाकरे हे मराठी भाषेचा आग्रह धरणारे आहेत. त्यांना सांगा हे आश्वासन लवकरात लवकर पूर्ण करा. अन्यथा ही मंडळी तुमचं ऐकणार नाहीत.” असंही संमेलनाचे अध्यक्ष फ्रान्सिस दिब्रेटो यांनी स्पष्ट केलं.
5 वर्षांपूर्वी -
'हा' खेकडा शिवसेना पोखरतोय, वेळीच नांग्या मोडा: शिवसैनिकांचा संताप
जिल्हा परिषदेच्या निवडणुकींमध्ये राज्यात अनेक ठिकाणी फाटाफुटीचं राजकारण झालं. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आल्याने बहुतांश ठिकाणी महाविकास आघाडीची सत्ता आली. परंतु काही ठिकाणी शिवसेनेतल्या नाराजांनी भारतीय जनता पक्षाला साथ देत सत्ता मिळविण्याचा प्रयत्न केला अशा नेत्यांविरुद्ध आता शिवसैनिकांनी एल्गार पुकारलाय. उस्मानाबाद जिल्हा परिषदेत भारतीय जनता पक्षाला साथ देणारे शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांच्या विरोधात शिवसैनिकांनी आक्रमक पोष्टर्स लावले आहेत. त्यांच्याविरुद्ध तातडीने कारवाई करावी अशी मागणी शिवसैनिकांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केलीय.
5 वर्षांपूर्वी -
गॅस पेटवणं सोपं, पण गोरगरीबाच्या घरची चूल आधी पेटली पाहिजे: मुख्यमंत्री
सत्तास्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी तिथल्या उद्योजकांच्या प्रदर्शनाला भेट दिली. या भेटीमध्ये मुख्यमंत्र्यांनी दोन महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. यामध्ये पहिली घोषणा म्हणजे औरंगाबादच्या बिडकिन भागामध्ये ५०० एकर जमिनीवर अन्नप्रक्रिया उद्योग उभारण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे. शिवाय या ५०० एकरपैकी १०० एकर हे फक्त महिला उद्योजिकांसाठी राखीव ठेवण्याचा देखील शब्द मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. ‘२०२०च्या जून महिन्यात या प्रकल्पाचं भूमिपूजन करायचं. त्यानंतर मध्ये कुठेही ते काम अडू नये, याची काळजी आपल्याला करायची आहे. नाहीतर फक्त भूमिपूजनाच्या पाट्या आपल्याला जागोजागी दिसतात’, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
पालकमंत्री जाहीर; आदित्य ठाकरे यांच्याकडे मुंबई उपनगर तर अजित पवारांकडे पुणे
मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्र्यांच्या पालकमंत्री म्हणून नियुक्त्या केल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर आदित्य ठाकरे यांना मुंबई उपनगर जिल्ह्याची जबाबदारी दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
एकही उद्योग राज्याबाहेर जाऊ देणार नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
महाराष्ट्र हे देशातील औद्योगिकदृष्ट्या सर्वात प्रगत राज्य असून या पुढील काळात राज्यातून एकही उद्योग इतर राज्यांमध्ये जाऊ देणार नाही. उद्योगांना येणाऱ्या अडचणींचे फास्ट ट्रॅकवर निराकरण करून राज्यात वैविध्यपूर्ण औद्योगिक विकास करण्यात येईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
5 वर्षांपूर्वी -
JNU हल्ला: ही तर २६ नोव्हेंबरच्या दहशतवादी हल्ल्याची आठवण: उद्धव ठाकरे
जवाहरलाल नेहरू विद्यापीठात हिंसाचार घडवणाऱ्या बुरखाधाऱ्यांचे चेहरे समोर यायला हवेत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. चेहरे लपवून हल्ले घडवणारे भेकड आहेत. त्यांच्यात इतकी हिंमत आहे तर मग ते तोंडावर मुखवटे लावून का फिरतात, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या प्रकरणी लवकरात लवकर कारवाई होऊन हल्लेखोरांचे चेहरे देशासमोर यायला हवेत. हा संपूर्ण प्रकार कोणाच्या पाठिंब्यानं झाला ते पुढे कळेलच. त्यासाठी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हायला हवी, असं मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटलं.
5 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्याचा 'मातोश्री'त घुसण्याचा प्रयत्न
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी ‘मातोश्री’वर जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या शेतकरी वडील आणि त्यांच्या लहान मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. देशमुख असे या शेतकऱ्याचे नाव असून, ते मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी पनवेलवरून वांद्रे येथील मातोश्री येथे आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. दोघंही आज दुपारी १२ च्या सुमारास मातोश्रीवर जाण्याच्या प्रयत्नात होते. आपल्या शेताच्या कर्जा संदर्भात झालेला गैरप्रकार सांगण्यासाठी ते रविवारी ‘मातोश्री’वर आले होते अशी प्राथमिक माहिती आहे.
5 वर्षांपूर्वी -
खातेवाटप जाहीर! अजित पवारांकडे अर्थ, देशमुखांकडे गृह, थोरातांकडे महसूल
मागील ६ दिवसांपासून रखडलेलं मंत्रिमंडळाचं खातेवाटप आज जाहीर करण्यात आलं. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी खातेवाटपाला मंजुरी दिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खातेवाटप जाहीर केलं असून अपेक्षेप्रमाणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ व नियोजन, अनिल देशमुख यांच्याकडे गृह, एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास, बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल, अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम आणि आदित्य ठाकरे यांच्याकडे पर्यावरण आणि पर्यटन मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
धक्कादायक! राज्यात नोव्हेंबर महिन्यात ३०० शेतकऱ्यांची आत्महत्या
नोव्हेंबरमध्ये सत्ता स्थापनेसाठी शह-काटशहाचा खेळ सुरू असताना राज्यात मात्र ३०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून गेल्या चार वर्षातील आकडेवारीच्या तुलनेत एका महिन्यात शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याचा हा आकडा सर्वाधिक असल्याचंही स्पष्ट झालं आहे. यापूर्वी २०१५मध्ये महिन्याभरात ३००हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं उघड झालं होतं.
5 वर्षांपूर्वी -
२ लाखांवरच्या कर्जधारकांसाठी नवीन योजना आणणार - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
महाराष्ट्रात सत्तेत आलेल्या शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या महाआघाडीच्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार पार पडला आहे. कोणालाही नाराज न करता हा ३ मित्रपक्षांचा मंत्रिमंडळ विस्तार असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. मंत्रिमंळ विस्तारानंतर झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी जाहीर पत्रकार परिषद घेत दिली. या विस्तारांनंतर आता २-३ दिवसांमध्ये खातेवाटप होईल असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
मंत्रिमंडळ विस्तार; शिवसेनकडून कोणाला मिळणार संधी
महाविकास आघाडीच्या सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार अखेर होत आहे. या विस्तारात आघाडीमधील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या तीन पक्षांच्या मिळून एकूण ३६ नव्या मंत्र्यांचा समावेश असणार आहे. सोमवारच्या शपथविधीनंतर सर्व मंत्र्यांना खातेवाटप होईल, अशी अपेक्षा आहे. ठाकरे सरकारच्या पहिल्याच मंत्रिमंडळात आमदार आदित्य ठाकरेंना स्थान मिळालंय. आदित्य ठाकरे सुद्धा मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळात २५ कॅबिनेट मंत्री असणार आहेत.
5 वर्षांपूर्वी -
‘वाईट नेता मिळणं ही महाराष्ट्राची चूक नाही'; अमृता फडणवीसांकडून उद्धव ठाकरे लक्ष
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. राज्यात सत्तापालट झाल्यापासून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि शिवसेनेमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अमृता फडणवीस यांनी वारंवार थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. आता पुन्हा एकदा त्यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करताना, ‘वाईट नेता मिळणं ही महाराष्ट्राची चूक नाही, पण त्या नेत्यासोबत राहणं ही मात्र चूक आहे’ अशी घणाघाती टीका केली आहे.
5 वर्षांपूर्वी