Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
नारायण राणेंविरोधात बार्शी पोलिसांत तक्रार दाखल | मुख्यमंत्र्यांवर टीका भोवली
भारतीय जनता पार्टीचे खासदार नारायण राणे यांच्याविरोधात सोलापूर जिल्ह्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, नारायण राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली आहे. दरम्यान राणे यांनी मुख्यमंत्र्यावर टीका करताना ‘गांडूळ, पुळचट’ यासारखे शब्द वापरले होते, त्यामुळे त्यांच्यावर बार्शी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
महाघोषणा | शिवसैनिकांनो महाराष्ट्रावर एकहाती भगवा फडकवण्यास सज्ज राहा - उद्धव ठाकरे
राज्यात एकहाती शिवसेनेचा भगवा फडकवण्यास सज्ज राहा, आत्तापासूनच तयारीला लागा असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना दिले आहेत. शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांच्या बैठकीत ते बोलत होते, बुधवारी रात्री उशिरापर्यंत उद्धव ठाकरे आणि जिल्हाप्रमुखांची बैठक सुरु होती, रात्री १० वाजता सुरु झालेली बैठक तब्बल १ वाजता संपली.
5 वर्षांपूर्वी -
घाणेरडं राजकारण करून मिळवलेल्या खुर्चीसाठी तुम्ही पात्र नाही | पुन्हा मुख्यमंत्री लक्ष
मुख्यमंत्रिपदाचा मास्क बाजूला ठेवून भाषण करतोय, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यात भाजप, मोदी सरकार, कंगना राणौत, राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचा समाचार घेतला. घरी खायला मिळत नाही, मुंबईत यायचं आणि मुंबईशी नमकहरामी करायची, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्र्यांनी कंगनावर केली. मुख्यमंत्र्यांच्या टीकेला आता कंगनानं प्रत्युत्तर दिलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
मोदी सरकारकडून राज्य सरकारची आर्थिक कोंडी | निसर्ग चक्रीवादळ व मास्कचे पैसेही अडवून
राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागांत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेले पिक वाहून गेले आहे. या अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने १० हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत या आर्थिक मदतेची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, हे १०,००० कोटी रुपये विविध कारणआंसाठी असणार आहेत. शेतीचे झालेले नुकसान, वाहून गेलेली शेती, खरडून गेलेली शेती, पिकं वाहून गेली असतील, रस्ते उद्धवस्त झाले असतील, विजेचे खांब पडले असतील, दळणवळण यंत्रणा असेल या सर्व गोष्टींसाठी दहा हजार कोटी आम्ही जाहीर करत आहोत.
5 वर्षांपूर्वी -
अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना १० हजार कोटींची मदत | मुख्यमंत्री ठाकरेंची घोषणा
राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागांत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेले पिक वाहून गेले आहे. या अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने १० हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत या आर्थिक मदतेची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, हे १०,००० कोटी रुपये विविध कारणआंसाठी असणार आहेत. शेतीचे झालेले नुकसान, वाहून गेलेली शेती, खरडून गेलेली शेती, पिकं वाहून गेली असतील, रस्ते उद्धवस्त झाले असतील, विजेचे खांब पडले असतील, दळणवळण यंत्रणा असेल या सर्व गोष्टींसाठी दहा हजार कोटी आम्ही जाहीर करत आहोत.
5 वर्षांपूर्वी -
आकडे लावण्यासाठी आलेलो नाही | २ दिवसांत शेतकऱ्यांसाठी मदतीचा निर्णय जाहीर करू - मुख्यमंत्री
सवंग लोकप्रियतेसाठी घोषणा करणार नाही. जे करू शकत नाही, ते बोलत नाही आणि जे बोलतो ते करतोच, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी उस्मानाबादमधल्या काटगावातल्या शेतकऱ्यांशी संवाद साधला. मी इथे आकडा जाहीर करायला आलेलो नाही, तर तुम्हाला दिलासा द्यायला आलो आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. शेतकऱ्यांनी धीर सोडू नये. या संकटावर आपण नक्की मात करू, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
5 वर्षांपूर्वी -
केंद्राच्या मदतीत काय चूक | पंतप्रधानांचा मला फोन आला होता | मदत करू म्हणाले होते
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरु आहेत, पुढील २-३ दिवसांत माहिती गोळा करण्याचं काम होईल, त्यानंतर सरकारकडून जे शक्य आहे ते करणार आहे, घोषणा देणारे गेले आम्ही प्रत्यक्षात काम करू असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विरोधकांना लगावला आहे. विदर्भ पूर, निसर्ग चक्रीवादळ येथेही मदत केली आहे, परतीच्या पावसाचं संकट टळलं नाही, आणखी काही दिवस अतिवृष्टी होऊ शकते असा इशारा हवामान खात्याने दिला आहे, त्यामुळे नुकसान किती होतेय याचा अंदाज आला आहे, सरकार लवकरच मदत करेल अशी ग्वाही उद्धव ठाकरेंनी दिली.
5 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्र्यांचा पाहणी दौरा | शेतकऱ्यांना २५ हजारांचे मदतीचे धनादेश
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आजपासून पाहणी दौरा सुरू होत असून बारामतीमधून या दौऱ्याला सुरुवात होणार आहे. त्या, पार्श्वभूमीवर भाजपा नेते आमदारगोपीचंद पडळकर यांनी मंत्र्यांच्या आणि खासदार शरद पवार यांच्या दौऱ्यावरुन राज्य सरकारवर टीका केलीय.
5 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सोलापूर दौऱ्याला सुरुवात
परतीच्या पावसाने राज्यात केलेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सोमवारी (१९ ऑक्टोबर) सोलापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी ते सांगवी, अक्कलकोट येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. सकाळी 8 वाजता मातोश्री निवासस्थानावरुन ते सोलापूरसाठी रवाना झाले. त्यानंतर ते विमानाने सोलापूरला जातील आणि तिथून पुढे गाडीने सांगवी आणि अक्कलकोटला जातील. नुकसानग्रस्त भागासाठी मुख्यमंत्री काही महत्त्वाच्या घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या या पाहणी दौऱ्याकडे शेतकऱ्यांसह सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
5 वर्षांपूर्वी -
माजी आणि विद्यमान मुख्यमंत्र्यांविरुद्ध शेतकऱ्याची बॅनरबाजी | फसव्या कर्जमाफीवरून संताप
आस्मानी संकटामुळं जगाचा पोशिंदा अर्थात शेतकरी कायमचं अडचणीत येत असतो. या शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी सरकारं नेहमीच कर्जमाफीची लोकप्रिय घोषणा करतात. प्रत्यक्षात त्याचा फायदा किती शेतकऱ्यांना होतो हा प्रश्न कायमच राहतो. अशाच एका कर्जमाफी न मिळालेल्या शेतकऱ्याने उद्विग्न होऊन यापूर्वीच्या फडणवीस आणि आत्ताच्या ठाकरे सरकारचे वाभाडे काढले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
घराबाहेर पडल्यावर एकट्या मुख्यमंत्र्यांनाच कोरोना होतो का | रावसाहेब दानवेंचा टोला
घराबाहेर पडल्यावर एकट्या मुख्यमंत्र्यांनाच करोना होतो का असा सवाल भाजपा नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी विचारला आहे. “राजा घराच्या बाहेर आला पाहिजे, प्रजेत सामील झाला पाहिजे,” असं त्यांनी म्हटलं आहे. ते एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी आमच्या काळात मोबाईल नेहमी व्हायब्रेट करायचा. काही तरी मदतीचा एसएमएस यायचा असं म्हणत राज्य सरकारच्या कारभारावर टीका केली.
5 वर्षांपूर्वी -
बॉलीवूड संपवण्याचा डाव आहे | मुख्यमंत्री ठाकरेंकडून थेट इशारा
‘बॉलीवूडला गेल्या काही दिवसांपासून ठराविक वर्गाकडून बदनाम करण्यात येत आहे, ही बाब अत्यंत वेदनादायक आहे. बॉलीवूडला संपवण्याचे किंवा इतरत्र हलवण्याचे जे प्रकार होऊ पाहत आहेत ते कधीही सहन केले जाणार नाहीत’, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी इशारा दिला आहे.
5 वर्षांपूर्वी -
मुबईला PoK म्हणणाऱ्यांचे हसत स्वागत करणे माझ्या हिंदुत्वात बसत नाही - मुख्यमंत्री
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे( CM Uddhav Thackeray ) यांनी राज्यातील मंदिरे उघडण्यासंदर्भात इंग्रजीतून खरमरीत पत्र लिहिले होते. याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तशाच पद्धतीने राज्यपालांना पत्र लिहून उत्तर दिलं आहे. राज्यपाल भगतसिंह यांनी मुख्यमंत्र्यांना हिंदुत्वाचा विसर पडलाय का? असा सवाल केला होता. याला मुख्यमंत्र्यांनी उत्तर देताना माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची गरज नाही, असं म्हटलं आहे. मुंबईला पीओके म्हणणाऱ्यांचं हसत स्वागत करणं माझ्या हिंदुत्वात बसत नाही असा टोला देखील उद्धव ठाकरे यांनी आपल्या पत्रात लगावला आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्यपालच हिंदुत्वावरून राजकीय आखाड्यात | मुख्यमंत्र्यांचं राज्यपालांना सडेतोड उत्तर
महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावे सोमवारी एक पत्र लिहिलं. या पत्रातून त्यांनी राज्यातील मंदिरं पुन्हा सुरु करण्याची मागणी केली. अतिशय खरमरीत रोखानं लिहिलेल्या या पत्रात त्यांनी शिवसेनेच्या हिंदुत्त्वाचा मुद्दाही अधोरेखित केला.
5 वर्षांपूर्वी -
Power Cut | प्रकरणाची संपूर्ण चौकशी होणार | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई आणि परिसरात सोमवारी अचानक वीज पुरवढा खंडीत झाल्याने मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर अडीच ते तीन तासांनी वीज पुरवढा सुरळीत व्हायला सुरुवात झाली. राज्यात कोरोनाचं संकट असल्याने हॉस्पिटल्समधल्या वीज पुरवढ्याबाबत प्रशासन चिंतेत होतं. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संबंधित सर्व विभागांची बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला आणि बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईचे संकेत दिलेत.
5 वर्षांपूर्वी -
महाविकास आघाडीच्या एका निर्णयाने आरेतील २१९ दुर्मिळ प्राण्यांच्या प्रजातींना जीवदान
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मोठी घोषणा केली आहे. आरे कॉलनीत होणाऱ्या मेट्रो कारशेडला स्थगिती दिल्यानंतर ठाकरे सरकारनं आता मेट्रोचं कारशेड थेड कांजूरमार्ग येथे हलवण्यात आलं आहे. शासकिय जमीनीवर हे कारशेड होणार असून त्यासाठी शून्य खर्च येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी आरे जंगलातील गेल्या वर्षांपासून पेटलेल्या मेट्रो कारशेडचा मुद्दा मार्गी लावला आहे.
5 वर्षांपूर्वी -
Unlock 5 | मुंबई लोकल, मंदिरं, जिम कधी सुरू होणार | मुख्यमंत्र्यांनी दिलं 'हे' उत्तर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला आहे. त्यावेळी मुंबई लोकल कधी सुरू होणार याविषयी त्यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. ‘राज्यांतर्गंत रेल्वेची वाहतूक सुरू केली आहे. हळूहळू काही गोष्टी सुरु केल्या आहेत. लोकलसाठी फेऱ्या वाढवण्याची मागणी केली आहे. कारण मला गर्दी नकोय. सगळ्यांनाच लोकलनं जायचंय. लोकलची संख्या वाढल्यानंतर आपण त्यातून अधिक लोकांना प्रवास करण्याची परवानगी देऊ. राज्यांतर्गंत हरिद्वारपर्यंत वाहतूक सुरू झाली आहे,’ असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
फडणवीसांचं अशक्य काम उद्धव ठाकरेंनी शक्य केलं | आरेतील मेट्रो कारशेड कांजूरमार्गला
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मोठी घोषणा केली आहे. आरे कॉलनीत होणाऱ्या मेट्रो कारशेडला स्थगिती दिल्यानंतर ठाकरे सरकारनं आता मेट्रोचं कारशेड थेड कांजूरमार्ग येथे हलवण्यात आलं आहे. शासकिय जमीनीवर हे कारशेड होणार असून त्यासाठी शून्य खर्च येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
धनगर समाजाच्या आरक्षण व आर्थिक विकासाच्या मागण्यांबाबत सकारात्मक पावले उचलणार - मुख्यमंत्री
धनगर समाजाच्या (Dhangar community) आर्थिक विकासाच्या व अन्य मागण्यांबाबत सकारात्मक पावले उचलली जातील. आरक्षणासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा करण्यासाठी कायदेतज्ज्ञ आणि विविध घटकांशी समन्वय साधला जाईल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धनगर समाज शिष्टमंडळाला दिला. धनगर समाजाच्या आरक्षण व विविध मागण्यांबाबत शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शुक्रवारी (९ ऑक्टोबर) सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते.
5 वर्षांपूर्वी -
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता, कठोर नियमांना तयार राहा - मुख्यमंत्री
रात्री दहानंतर व्यवहार बंद करणे, कार्यक्रमांवर आणि गर्दी रोखण्यासाठीचे उपाय योजण्याचे काम चालू आहे, त्यामुळे पुढचे सहा महिने ही बंधने राहतील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. तसेच जगभर कोरोना विषाणू प्रादुर्भावाची दुसरी लाट येईल, असे म्हटले जात आहे. आर्थिक चक्र फिरवण्यासाठी तरुण पिढी बाहेर पडू लागली आहे. ती कामावर जात आहे. पण त्यांच्यामुळे घरच्या ज्येष्ठांपर्यंत विषाणू पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळेच आता आपल्याला जनजागृतीवर मोठा भर द्यावा लागणार आहे. त्यासाठी वेळप्रसंगी कठोर नियम करावे लागतील तर ते करा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.
5 वर्षांपूर्वी