Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
ठाकरे पितापुत्रांसह सुप्रिया सुळेंच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रांची फेरपडताळणी?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्राची फेरपडताळणी होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाला (Central Board of Direct Taxes – CBDT) तशी विनंती केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
सर्वांच्या सहभागाने पायाभरणी समारंभ होणार | राजकारण करू नये - मुख्यमंत्री
इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या पायाभरणीचा कार्यक्रम आज होणार होता. परंतु अनेकांच्या नाराजीमुळे हा कार्यक्रम रद्द करावा लागला. कार्यक्रमाला विरोधी पक्ष आणि आंबेडकरी चळवळीतील अनेक नेत्यांना निमंत्रण नसल्यामुळे राजकीय वाद रंगला होता. अखेर आजचा हा पायाभरणी सोहळा रद्द करण्यात आल्याचे एमएमआरडीएकडून सांगण्यात आले. आज दुपारी साडेतीन वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार होता. पण आता यावरुन राजकारण करु नये असं आवाहन मुख्यमंत्री यांनी केलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्राच्या बदनामीचा कट सहन करणार नाही - मुख्यमंत्री
राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादूर्भाव झपाट्याने वाढत आहे. येणाऱ्या काळात तो आणखी वाढण्याची शक्यता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्यक्त केली. पुनश्च हरीओम अर्थात मिशन बिगिन अगेनला पुन्हा सुरुवात केली आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे प्रत्येकाने आपल्या कुटुंबाची जबाबदारी घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. त्यासाठी त्यांनी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिम राबवण्याबाबत सांगितलं. १५ सप्टेंबरपासून १० ऑक्टोबरपर्यंत ही मोहिम राबवली जाणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
राजकीय विकृतीचा कळस | उत्तर प्रदेशात उद्धव ठाकरे आणि राऊतांवर पोस्टरबाजी
कंगना रणौत आणि शिवसेना यांच्यात निर्माण झालेल्या वादावर शिवसेनेकडून आता पडदा टाकण्यात आला असला तरी याचे राजकीय पडसाद अद्याप उमटतच आहेत. अनेक भाजपशासित राज्यांमधून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लक्ष करण्यात आल्यानंतर आता उत्तर प्रदेशातूनही उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना लक्ष करताना विकृतीचा कळस गाठला आहे.
5 वर्षांपूर्वी -
अजून किती दिवस ट्रेन बंद राहणार | उच्च न्यायालयाची राज्य सरकारला विचारणा
राज्य सरकारला मुंबई उच्च न्यायालयाने मुंबईत लोकल सेवा सुरु करण्याबाबत विचारणा केली आहे. अजून किती दिवस लोकल बंद राहणार, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला विचारला आहे. त्याचवेळी कोरोनासोबत जगावं लागणार आहे, असे सांगत न्यायालयाने म्हटले आहे, ६ महिने झाले, अजून किती दिवस लोकल बंद राहणार, अशी विचारणा केली आहे. दरम्यान, लोकल सुरू करण्याबाबत मागणी होत आहे.
5 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरे यांच्या विरुद्ध खालच्या पातळीवरील हॅशटॅग अभियान | ट्विटरवर टॉप ट्रेन्ड
कंगना रानौतचे उद्धव ठाकरे यांच्यावरील व्यक्तिगत हल्ले सुरूच आहेत. ट्विटवरून ती उद्धव ठाकरेंची व्यक्तिगत पातळीवर बदनामी कशी करता येईल याचीच काळजी घेताना दिसत आहे. त्यात तिला समाज माध्यमांवर भाजप समर्थकांची मोठ्या प्रमाणावर साथ मिळाल्याने ती दर काही मिनिटांनी विवादित ट्विट करत आहे. थेट स्वर्गीय. बाळासाहेब ठाकरे यांच्या आडून तिने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विखारी शब्दात लक्ष केलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या फार्म हाऊसच्या रेकी काढल्या | ATS'ने तिघांना ताब्यात घेतलं
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना धमकीचे फोन आल्यानं खळबळ उडाली आहे. त्यात मुख्यमंत्र्यांच्या फार्म हाऊसची रेकी करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. खालापूर तालुक्यातील भिलवले येथील बगंल्यावर मगंळवारी सायंकाळी साडे सात वाजेच्या सुमारास टुरीस्ट कारने आलेल्या 3-4 जणांनी रेकी केली. मुबंई दहशतवाद विरोधी पथकानं (ATS) नवी मुबंई टोल नाक्यावर आरोपींना ताब्यात घेतलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
इगो असता नये आणि शॉर्टकटही मारू नये | मग रात्रीची झाडे कापावी लागतात - मुख्यमंत्री
काम करताना इगो असता नये आणि शॉर्टकटही मारू नये. मग रात्रीची झाडे कापावी लागतात. आम्ही रात्रीची कामे दिवसा करायला लागलो, असा टोला मुख्य़मंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला.
5 वर्षांपूर्वी -
इतर प्रांतातून येऊन अनेकजण नाव कमवतात | काही जण ऋण मानतात काहीजण मानत नाहीत
अनेकजण इतर प्रांतातून महाराष्ट्रात येतात रोजी रोटी कमावतात, नाव कमवतात काही जण महाराष्ट्राचं ऋण मानतात काहीजण मानत नाहीत” असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कंगना रणौतला अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. संजय राऊत आणि कंगना यांच्यात ट्विटर वॉरही रंगलं. मात्र या सगळ्या प्रकरणावर मुख्यमंत्र्यांनी काहीही भाष्य केलं नव्हतं. आज मात्र त्यांनी अप्रत्यक्षरित्या कंगनाला टोला लगावला आहे.
5 वर्षांपूर्वी -
प्रणवदा म्हणालेले शिवसेनाप्रमुखांमुळे राष्ट्रपती झालो | काहीजण रात गयी बात गयी - मुख्यमंत्री
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिवेशनात प्रार्दुभाव रोखण्यासाठी सर्व आमदार, अधिकारी-कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. शनिवारी, रविवारी या अधिवेशनासाठी येणाऱ्या सर्वांची चाचणी करण्यात आली. पण अनेकांना रिपोर्टसाठी ताटकळतच राहावं लागलं.
5 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्र्यांना ठार मारू | मातोश्री निवास्थान बॉम्बने उडवून देऊ | दाऊदच्या हस्तकाची धमकी
राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेला मातोश्री बंगला उडवून देण्याची धमकी अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या हस्तकानं दिली आहे. या घटनेनंतर मातोश्री परिसरात धावपळ उडाली आहे. मातोश्रीवर दुबईतून चार कॉल आल्याचं वृत्त आहे. त्यामुळे मातोश्री बंगल्याची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
मुंबई कोणाच्या बापाची आहे का | भाजप खासदाराचं मुख्यमंत्र्यांना मेन्शन करत वक्तव्य
कंगनाच्या मुंबईच्या वक्तव्यावरून वातावरण पेटलं आहे. यावरून कंगनाला मुंबईत न येणाचा सल्ला देणाऱ्यांना कंगनाने पुन्हा एक आव्हान दिलं आहे. कुणाच्या बापात हिम्मत असेल तर मला रोखून दाखवा, असं म्हणत कंगनाने आपण ९ सप्टेंबर रोजी मुंबईत येणार असल्याचं सांगितलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
ई-पासची अट रद्द | राज्यातील जिल्हाबंदी अखेर समाप्त
राज्यभर एसटीचा प्रवास ई-पास मुक्त करण्यात आला असताना खासगी वाहनांवर असलेल्या या निर्बंधांबाबत जनतेतून नाराजी व्यक्त होत होती. या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने ई-पास रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. अनलॉक ४ संदर्भात नियमावली जाहीर करण्यात आली असून यामध्ये याचा उल्लेख करण्यात आला आहे. यामळे आंतरराज्य प्रवास करण्यावरील बंधनं शिथील झाली आहेत. यामुळे प्रवास करताना आता ई-पासची गरज नाही असं स्पष्ट करण्यात आलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
आपण केलं की पाप आणि त्यांनी केलं की पुण्य | मुख्यमंत्र्यांची मोदी सरकारवर टीका
काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज काँग्रेस समर्थित सरकारचे मुख्यमंत्री व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासोबत काँग्रेस शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक बोलविली. जीएसटी आणि नीट-जेईई परीक्षेबाबत ही बैठक घेण्यात आली.
5 वर्षांपूर्वी -
सर्व सत्ता एका व्यक्तीच्या हातात, एकच व्यक्ती देश चालवणार अशी परिस्थिती - उद्धव ठाकरे
काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज काँग्रेस समर्थित सरकारचे मुख्यमंत्री व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासोबत काँग्रेस शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक बोलविली. जीएसटी आणि नीट-जेईई परीक्षेबाबत ही बैठक घेण्यात आली.
5 वर्षांपूर्वी -
Independence Day 2020 | मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण
‘सुमारे पाऊणशेच्या घरात पोहोचलेले हिंदुस्थानी स्वातंत्र्याचे वयोमान काळाच्या कसोटीवर मोजले तर निश्चितच कमी नाही. स्वातंत्र्याबरोबरच सामर्थ्यशाली आणि स्वावलंबी होण्यासाठी कुठल्याही राष्ट्रासाठी हा तसा पुरेसा कालखंड म्हणावा लागेल. एक स्वतंत्र देश म्हणून आपण परिपक्व आणि प्रगल्भ निश्चितच झालो, पण ‘कोरोना’ ते ‘चीन’ या स्वातंत्र्यावरील दुहेरी संकटाचा विचार करता सामर्थ्यशाली आणि स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने आपण किती मजल मारली याचे चिंतन स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सर्वांनीच करायला हवे’, असं भाष्य शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून करण्यात आलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
देशातील सर्वोत्तम मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ | उद्धव ठाकरेंच्या लोकप्रियतेत सुद्धा वाढ
कोरोना व्हायरसच्या संकटातही महाराष्ट्रातील परिस्थिती संयमानं हाताळणाऱ्या मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा टॉप फाईव्हमध्ये स्थान पटकावलं आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पहिला क्रमांक पटकावून देशातील सर्वोत्तम मुख्यमंत्र्याचा मान मिळवला आहे. इंडिया टूडे आणि कार्वी इनसाइट्सने संयुक्तपणे केलेल्या सर्वेक्षणातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. (Mood Of The Nation Survey)
5 वर्षांपूर्वी -
अर्णब गोस्वामीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना थेट LIVE चर्चेत बघून घेण्याची धमकी
अभिनेता सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी त्याची कथित प्रेयसी आणि अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सुशांतच्या वडिलांकडून रियावर फसवणूक आणि मानसिक छळाचा आरोप करण्यात आला आहे. यानंतर रिया चक्रवर्तीवर अटकेची टांगती तलवार असल्याचं बोललं जात आहे. या सर्व घडामोडींदरम्यान मौन बाळगलेली रिया चक्रवर्ती पहिल्यांदाच समोर आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
बकरी ईद निमित्त कुर्बानी देण्यात अडथळे, मुस्लिम धर्मियांचा आंदोलनाचा इशारा
मुस्लिम धर्मियांकडून बकरी ईद हा सण १ ऑगस्ट रोजी साजरी होत आहे. या निमित्ताने बकऱ्यांची कुर्बानी देण्याची प्रथा आहे. मात्र, करोनामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यंदा बकरी ईद साध्या पद्धतीने साजरी करण्याच्या सूचना राज्य शासनाच्या वतीने करण्यात आल्या आहेत. याच वेळी महापालिकांनी काही नियमावली जाहीर केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोनामुळं राज्यातील सर्वच महापालिकांची आर्थिक स्थिती गंभीर - मुख्यमंत्री
कोरोनामुळे देशाच्या अर्थकारणावर विपरित परिणाम झाला आहे. राज्यावर देखील याचा मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला आहे. त्यामुळे पुण्यासह राज्यातील सर्वच महापालिकांची आर्थिक स्थिती गंभीर झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार केंद्राकडे निधीची मागणी करीत आहे. तसेच राज्य सरकारमार्फत जेवढी शक्य आहे तेवढी मदत आम्ही देत आहोत, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुण्यातील बैठकीत शहरातील लोकप्रतिनिधींना दिले.
5 वर्षांपूर्वी