Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांनी पुढे येऊन प्लाज्मा दान करावा, मुख्यमंत्र्यांचं आवाहन
३० जूनला लॉकडाउनची मुदत संपते आहे. पुढे काय हा प्रश्न तुमच्या मनात असेल. ३० जून नंतर लॉकडाउन उठणार का? तर त्याचं उत्तर नाही असं आहे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. तसंच हे सगळं असंच सुरु राहणार का? तर त्याचंही उत्तर नाही असंच आहे. सध्या आपली अवस्था कात्रीत सापडल्यासारखी झाली आहे. आपण अर्थचक्राला गती देण्यासाठी काही गोष्टी सुरु करतो आहोत.
5 वर्षांपूर्वी -
३० जून नंतर लॉकडाउन उठणार का? मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण
३० जूनला लॉकडाउनची मुदत संपते आहे. पुढे काय हा प्रश्न तुमच्या मनात असेल. ३० जून नंतर लॉकडाउन उठणार का? तर त्याचं उत्तर नाही असं आहे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. तसंच हे सगळं असंच सुरु राहणार का? तर त्याचंही उत्तर नाही असंच आहे. सध्या आपली अवस्था कात्रीत सापडल्यासारखी झाली आहे. आपण अर्थचक्राला गती देण्यासाठी काही गोष्टी सुरु करतो आहोत. सगळं सुरु केलं म्हणून परिस्थिती सुरळीत झाली असं समजू नका नाहीतर करोन आ वासून बसला आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी जनतेशी संवाद साधणार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज दुपारी १.३० वाजता राज्यातील जनतेला फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संबोधित करणार आहेत. राज्यात पुनश्च हरी ओम असा नारा मुख्यमंत्र्यांनी दिला होता. या पार्श्वभूमीवर ते काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. तसंच राज्यात वाढत चाललेली कोरोना रुग्णांची संख्या त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर येणारा ताण याबाबत ते कोणती नवी सूचना देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
5 वर्षांपूर्वी -
अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी ठाकरे सरकारचा मोठा निर्णय
महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी. अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या शेवटच्या सेमिस्टरच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. यामध्ये राज्य सरकारनं व्यवसायिक (professional) आणि गैर-व्यवसायिक (non-professional) कोर्स करणाऱ्या अंतिम वर्षातील शेवटची सेमिस्टर करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे. कोरोना व्हायरसचा महाराष्ट्रातील वाढता संसर्ग आणि धोका लक्षात घेऊन राज्य सरकारनं विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे.
5 वर्षांपूर्वी -
महाराज मंडळींना प्रवेश नसेल, तर मुख्यमंत्र्यांनी आषाढी एकादशीची महापूजा करु नये - पडळकर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आषाढी एकादशीची महापूजा करु नये, अशी मागणी भाजपचे विधान परिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. शेतकरी कुटुंबाला महापूजेचा मान देण्याचे पडळकर यांनी सुचवले. पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशीची शासकीय महापूजा करण्याचा मान दरवर्षी मुख्यमंत्र्यांना सपत्नीक देण्याची परंपरा आहे.
5 वर्षांपूर्वी -
जिओ TV व गुगल मीट ऑनलाइन माध्यमांच्या पायलट प्रोजेक्टचे मुख्यमंत्र्यांना सादरीकरण
राज्यात कोरोनाची परिस्थिती पाहता राज्य सरकारने विद्यापीठांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर ठाम आहे. आता त्यानंतर राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या उच्च शिक्षण आणि तंत्र शिक्षण विभागाच्या विविध विषयांच्या प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
ठाकरे सरकारकडून चिनी कंपन्यांसोबतच्या ३ मोठ्या करारांना स्थगिती...रद्द नाही
मॅग्नेटिक महाराष्ट्र २.० मध्ये स्वाक्षरी करण्यात आलेले चीनच्या कंपन्यांसोबतचे तीन करार महाविकास आघाडी सरकारने रोखले आहेत. या करारांनुसार चीनच्या कंपन्यांकडून महाराष्ट्रात ५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार होती. केंद्र सरकारसोबत चर्चा करुन हा निर्णय घेण्यात आला आहे. गलवान खोऱ्यातील हिंसक घटनेपूर्वीच या करारांवर स्वाक्षरी करण्यात आली होती. परराष्ट्र मंत्रालयाने यापुढे चीनच्या कंपन्यांसोबत कोणतेही करार करू नये, असा सल्ला दिला होता, अशी माहिती राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी दिली.
5 वर्षांपूर्वी -
मोदीजी...भारत मजबूत आहे, मजबूर नाही; डोळे काढून हातात देऊ - उद्धव ठाकरे
शिवसेना पक्ष प्रमुख आणि महराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलवलेल्या चीन संदर्भातील सर्व पक्षीय बैठकीत सहभागी झाले. बैठकीत उद्धव ठाकरे यांनी चीनबाबत राग व्यक्त केला. ते म्हणाले की, भारत शांत आहे. याचा अर्थ आम्ही दुबळे आहोत असा होत नाही. भारत मजबूत आहे, मजबूर नाही. आमच्यात डोळे काढून हातात देण्याची क्षमता आहे, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी चीनला इशारा दिला.
5 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्राचा नकाशा उलटा करून दाखवला, याला म्हणतात महाराष्ट्रद्रोह - भाजपची टीका
एकीकडे कोरोनाशी लढत असताना महाराष्ट्राने उद्योग उभारणीत दमदार पाऊल टाकून, तब्बल १६ हजार कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार सोमवारी केले. उद्योग स्थापण्यात कोणत्याही अडचणी येऊ दिल्या जाणार नाहीत, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.
5 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली विधान परिषद सदस्यत्वाची शपथ
कोरोना व्हायरसचे संकटात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर राजकीय पेच निर्माण झाला होता. परंतु, विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध झाल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासमोरील राजकीय संकटावर पडदा पडला. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधान परिषद सदस्य म्हणून निवडीचे पत्र स्वीकाराले आणि सदस्यत्वाची शपथही घेतली.
5 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरे आमदार झाले, सोमवारी घेणार विधान परिषद सदस्यत्वाची शपथ
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह इतर आठही उमेदवार विधान परिषदेवर बिनविरोध निवडून आले आहेत. सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आल्याची माहिती आज, गुरुवारी अधिकाऱ्यांनी दिली. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आज दुपारी तीन वाजेपर्यंत होती. त्यानंतर अधिकृत निकालाची घोषणा करण्यात आली.
5 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरे यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा
कोरोनाच्या संकटकाळात विधान परिषद निवडणूक बिनविरोध व्हावी अशी शिवसेना-राष्ट्रवादीची इच्छा असतानाही काँग्रेसने दुसऱ्या उमेदवाराची घोषणा केल्याने रविवारी दिवसभर महाविकास आघाडीत राजी-नाराजीचे नाटय़ रंगले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त के ल्यानंतर आघाडीच्या नेत्यांची बैठक होऊन काँग्रेसने एकच उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला.
5 वर्षांपूर्वी -
रेड झोनमधील (कंटेन्मेंट झोन वगळून) काय सुरू करण्यास परवानगी...सविस्तर
राज्य सरकारनं रेड झोनमधल्या मद्यविक्रीला परवानगी दिली आहे. मात्र मुंबई, पुण्यातील कंटेन्मेंट झोनमधील दारुची दुकानं उघडण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. केंद्राशी समन्वय राखून राज्य सरकारनं हा निर्णय घेतला आहे. मात्र रेड झोनमधील मॉल्स, सलूनबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.
5 वर्षांपूर्वी -
विधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र
महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुका लवकर जाहीर करा या आशयाचं एक पत्र महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला लिहिलं आहे. “केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानपरिषदेच्या ९ रिक्त जागांसाठीच्या निवडणुका लवकरात लवकर जाहीर कराव्यात” अशी विनंती या पत्रात करण्यात आली आहे. करोनाच्या संकटामुळे या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. याची तारीख काय असेल ते जाहीर करण्यात आलेलं नाही. आता लवकरात लवकर या निवडणुकांची तारीख जाहीर करा असं राज्यपालांनी पत्रात म्हटलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
खाजगी कर्मचाऱ्यांना घरबसल्या पूर्ण पगार द्या; अन रस्त्यावर जीव धोक्यात तरी पगार कपात?
‘कोरोना’च्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या आरोग्य व आर्थिक परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांपासून, विधीमंडळाचे सर्व सदस्य तसेच स्थानिक स्वराज संस्थांच्या सदस्यांपर्यंत सर्व लोकप्रतिनिधींच्या मार्च महिन्याच्या वेतनात ६० टक्के कपात करुन त्यांना ४० टक्के वेतन देण्यात येणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
परराज्यातील गरजू कामगारांसाठी राज्यात २६२ मदतकेंद्र सुरु; राहण्याची-जेवणाची सोय
केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारे आणि केंद्र शासित प्रदेशाच्या प्रशासनाला लॉकडाऊनदरम्यान प्रवासी कामगारांना रोखण्यासाठी प्रभावीपद्धतीने राज्य आणि जिल्ह्याच्या सीमा सील करण्यास सांगितले आहे. मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालकांबरोबर झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सदरम्यान कॅबिनेट सचिव राजीव गोबा आणि केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी शहरांत आणि राज्यमार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यास सांगितले आहे.
5 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादी, काँग्रेसचे लोक मला साथ देत आहेत; राजही मला फोन करून सूचना देतो
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला. ते पुढे म्हणाले की, परराज्यातील कामगारांनी स्थलांतर करु नये. वर्दळ थांबवावी. नागरिकांनीही घराबाहेर पडू नये. पोलिस त्यांना सहकार्य करतील. त्यांना गांभीर्याने वागले नाही तर सरकारला कठोर पावले उचलावी लागतील, असा इशाराही त्यांनी दिला.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्ती: कामगारांनी स्थलांतर थांबवावं, राज्य सरकार त्यांची सोय करेलः मुख्यमंत्री
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला. ते पुढे म्हणाले की, परराज्यातील कामगारांनी स्थलांतर करु नये. वर्दळ थांबवावी. नागरिकांनीही घराबाहेर पडू नये. पोलिस त्यांना सहकार्य करतील. त्यांना गांभीर्याने वागले नाही तर सरकारला कठोर पावले उचलावी लागतील, असा इशाराही त्यांनी दिला.
5 वर्षांपूर्वी -
डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मानाचा मुजरा करतो..पोलिसांचे काम देखील डॉक्टरांइतकेच
करोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढतच असून आतापर्यंत राज्यातील रुग्णांच आकडा १८६ वर गेला आहे. तर, आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. करोनाच्या भीतीनं संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन सुरू असतानाही वाढता जाणारा रुग्णांचा आकडा चिंता वाढवणारा आहे. करोनाशी दोन हात करण्यासाठी राष्ट्रवादी, काँग्रेसचे लोक तर माझ्यासोबत आहेतच शिवाय विरोधी पक्षही मला साथ देतो आहे. राजही मला फोन करतो आहे. सूचना देतो आहे. सर्वांनी एकजूट होऊन काम केलं पाहिजे आणि करोनाशी लढा दिला पाहिजे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राशी संवाद साधला.
5 वर्षांपूर्वी -
आधी कोरोना बेरीज करत होता आता गुणाकार करतोय; पुढचे दिवस अत्यंत कसोटीचे
कोरोना व्हायरस आतापर्यत बेरीज करत होता. आता मात्र तो पुढच्या म्हणजेच धोक्याच्या टप्प्यात पोहोचला आहे. कोरोना व्हायरस आता गुणाकार करत आहे. त्यामुळे पुढचे १५ दिवस अत्यंत कसोटीचे, परीक्षेचे असून जिथं आहात, तिथंच थांबा. घराबाहेर पडू नका, घरातच राहा, सुरक्षित राहा, असे आवाहन आणि कडकडीची विनंती राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
5 वर्षांपूर्वी