Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
शरद पवार व राज ठाकरे का एकमेकांना खंजीर खुपसतील? राजकीय संदर्भ नसलेले हे कॉपी-पेस्ट व्यंगचित्रकार कोण ?
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी प्रसिद्ध केलेल्या व्यंगचित्राला एक राजकीय आणि वस्तुस्थितीवर आधारित संदर्भ असतो हा अनुभव आहे. त्यांनी त्या त्या परिस्थितीशी सांगड घालणारी व्यंगचित्र नेहमीच प्रसिद्ध केली आहेत. अगदी राष्ट्रीय ख्यातीचे व्यंगचित्रकार स्वर्गीय. बाळासाहेब ठाकरे असो की त्यांचाच व्यंगचित्रकारितेचा वारसा अधिक प्रगल्भतेने पुढे घेऊन वर्तमानावर बोट ठेवण्याची नेमकी कला या दोन्ही व्यंचित्रकारांनी नेहमीच जोपासली.
7 वर्षांपूर्वी -
रावतेंवर प्रवाशी आणि एसटी कर्मचारी दोघेही नाराज
परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी एकबाजूनेच विचार करून जाहीर केलेली पगारवाढ एसटी संघटनांना मान्य नाही. तसेच एसटीच्या वर्धापन दिनाचा मुहूर्त साधत परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी एसटी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ घोषित केली. परंतु ज्या कर्मचाऱ्यांना ही वेतनवाढ मान्य नसेल त्यांनी एसटी महामंडळाकडे ९ जूनपर्यंत लेखी स्वरूपात अर्ज करावा आणि कहर म्हणजे हे अर्ज स्वीकारताना संबंधित कर्मचाऱ्यांचे चित्रीकरण करण्यात येणार असल्याने सर्व एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांमध्ये परिवहनमंत्री दिवाकर रावते याच्या विरोधात एक खदखद आहे.
7 वर्षांपूर्वी -
टीडीपीच्या केंद्रातील रिक्त मंत्रिपदांवर सेनेचा डोळा ?
सत्तेत राहून भाजपला विरोध करत राहायचा आणि योग्य वेळ येताच स्वतःची ‘बार्गेनिंग पवार’ वापरून महत्वाची खाती पदरात पाडून घ्यायची रणनीती सध्या सत्ताधारी आपसातच करताना दिसत आहेत. ज्या चंद्रा बाबूंच्या तेलुगू स्वाभिमानाने केंद्रातील मंत्रिपदांना मागचा पुढचा विचार न करता लाथ मारली त्याच रिक्त झालेल्या मंत्रिपदावर दिखाऊ स्वाभिमान दाखविणाऱ्या सत्ताधारी शिवसेनेचा डोळा असल्याचे भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांकडून समजलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
शिवसेनेचे मंत्री अर्जुन खोतकर काँग्रेसच्या वाटेवर, 'मातोश्री'वरही माहिती?
शिवसेनेचे मंत्री अर्जुन खोतकर काँग्रेसच्या वाटेवर असून त्याची माहिती ‘मातोश्री’वरही आहे आणि मी स्वतः हे स्टॅम्प पेपरवर लिहून देतो असा धक्कादायक व खात्रीशीर दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेव दानवेंनी केला आहे. जालन्यामधील शिवसेनेत खोतकर जे करत आहेत त्याची माहिती मातोश्री वर असल्यानेच खोतकरांना मातोश्रीवर भेटीसाठी ३-४ तास वाट बघावी लागते असं सुद्धा ते म्हणाले.
7 वर्षांपूर्वी -
आज नारायण राणे 'मातोश्री'वरील भेटीगाठींवर भाष्य करतील
कालच भाजप आणि सेनेमधील दुरावा दूर करण्यासाठी आणि आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली आणि तब्बल दोन तासाहून अधिक वेळ चर्चा केली.
7 वर्षांपूर्वी -
चंद्राबाबूंकडे जाण्याचं धाडस नाही झालं, पण मातोश्रीवर आत्मविश्वासाने गेले?
भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी काल मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेऊन तब्बल दोन तासाहून अधिक वेळ चर्चा केली. परंतु एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते आणि ती म्हणजे जर भाजप नेतृत्वाला खरोखरच जुन्या मित्र पक्षासोबत पुन्हा मैत्रीपूर्ण संबंध जोडायचे होते तर तो प्रयत्नं टीडीपी सोबत म्हणजे चंद्राबाबूंना भेटून दुरावा दूर करण्याचा प्रयत्न का नाही झाला, जसा शिवसेनेसोबत अगदी सहज झाला?
7 वर्षांपूर्वी -
युतीतले रुसवे-फुगवे दूर, २०१९ नंतर जनतेचे पुन्हां 'अच्छे दिन' येणार?
काल भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. नियोजित वेळेनुसार सुद्धा ही चर्चा खूप लांबल्याने सर्व काही मनासारखं आणि सकारात्मक झालं असल्याचा अंदाज राजकीय विश्लेषक बांधत आहेत.
7 वर्षांपूर्वी -
अफजल खान व उंदीर यांची उद्या गळाभेट : काँग्रेस
आज भाजपचे अध्यक्ष अमित शहा हे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंची मातोश्री या निवासस्थानी जाऊन भेट घेणार आहेत. परंतु भाजप आणि शिवसेनेने एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना अनेक वेळा चिखलफ़ेक आणि बोचरी टीका केली आहे. त्यामुळे आज होणाऱ्या भेटीवर कॉग्रेसने ट्विटरवरून उपहासात्मक टोला लगावला आहे.
7 वर्षांपूर्वी -
युवासेनेची नाराजी भोवली, डॉ. दीपक सावंत यांचा राजीनामा
राज्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्या कार्यपद्धतीवर युवासेनेतून आवाज बुलंद होण्याआधीच घडामोडींना वेग आला होता. अखेर शिवसेनेचे बोरिवलीचे विभागप्रमुख विलास पोतनीस यांना मुंबई पदवीधर मतदारसंघातून होणाऱ्या निवडणुकीची उमेदवारी देण्यात आली आहे. आरोग्य मंत्री दीपक सावंत यांच्या कार्यशैलीवर अनेक युवा सैनिक नाराज होते तसेच मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीतील यश संपादन केल्यानंतर अनेकांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या.
7 वर्षांपूर्वी -
मराठी नाट्यसंमेलन, उद्घाटन राज ठाकरे करतील आणि समारोप उद्धव ठाकरे
१३ जूनला ९८ व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच उद्घाटन मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार आणि ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांच्या हस्ते होणार आहे. कालच नाट्यसंमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर या निवासस्थानी भेट घेऊन तसं निमंत्रण सुद्धा दिल आहे.
7 वर्षांपूर्वी -
२०१९ ची धास्ती, अमित शहा-उद्धव ठाकरे भेट, युतीची चर्चा ?
भाजप अध्यक्ष अमित शहा उद्या संध्याकाळी ६ वाजता मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. आगामी निवडणुकीसाठी भाजप शिवसेनेची युतीसाठी पुन्हा बोलणी सुरु होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन्ही पक्षाना आगामी निवडणुकीचे नकारात्मक संकेत मिळताच जवळीक साधली जाऊ शकते.
7 वर्षांपूर्वी -
साहेब! नाहीतर पक्षाला त्याचा मोठा फटका बसेल
शिवसेना पक्ष प्रमुखांनी आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला असला तरी पक्षात जनतेतून निवडून येणारे लोकप्रतिनिधी आणि पक्षाच्या पाठींब्यावर निवडून येणारे राज्यसभा व विधानपरिषदेवरील नेते असे दोन गट पडल्याचे चित्र आहे. राज्यसभेवरील खासदार भाजपाविरोधात आक्रमक होत आहेत तर जनतेतून निवडणून येणारे खासदार पक्ष नैतृत्वाला युतीचा पुनर्विचार करण्यास सांगत आहेत.
7 वर्षांपूर्वी -
...नाहीतर सेनेला लोकसभेत मोठा फटका बसेल ?
आगामी निवडणुकीत शिवसेनेची भाजपसोबत आघाडी न झाल्यास शिवसेनेच्या निम्यापेक्षा अधिक जागा कमी होऊन त्यांना जेमतेम ९ जागा मिळतील अशी भीती शिवसेनेतीलच एक वरिष्ठ गटाने व्यक्त केली आहे. त्यामुळे पक्ष नैतृत्वाने युतीचा फेरविचार करावा अशी भूमिका घेतल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.
7 वर्षांपूर्वी -
फिर से, खोदा पहाड आैर निकला उद्धव: नितेश राणें
पालघर लोकसभा निवडणुकीतील शिवसनेच्या पराभवानंतर मातोश्रीवर तातडीची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर लगेचच सर्वत्र ब्रेकिंग न्यूज येऊ लागल्या की शिवसेना पक्ष प्रमुख आता मोठा निर्णय घेणार आणि सत्तेतून बाहेर पडणार व मोठा राजकीय भूकंप होणार.
7 वर्षांपूर्वी -
शिवरायांचा अपमान करणाऱ्यांसोबत तुम्ही सत्तेत कसे? समाज माध्यमांवर चर्चा रंगली
कालचा पालघर लोकसभा पोटनिवडणुकीचा निकाल शिवसेनेच्या चांगलाच जिव्हारी लागल्याचे चित्र पाहायला मिळालं. उद्धव ठाकरे यांनी तातडीने पत्रकार परिषद आयोजित केल्याने शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार असल्याची चर्चा रंगू लागली. परंतु त्या सत्तेतून बाहेर पडण्याच्या मुद्याला उद्धव ठाकरे यांनी साधा स्पर्श देखील केला नाही.
7 वर्षांपूर्वी -
'सेनेला मत म्हणजे भाजपला मत', समाज माध्यमांवर जोर धरला
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पालघरमध्ये घेतलेली प्रचंड जाहीर सभा आणि त्याला स्थानिकांचा मिळालेला प्रतिसाद हा पालघरमध्ये मनसेची ताकद दाखविण्यासाठी पुरेसा होता. मनसेने जर त्यांचा उमेदवार पालघर पोटनिवडणुकीत दिला असता तर शिवसेनेला पराभवाचं खापर फोडण्यासाठी आयतच कारण मिळालं असत. तेच पालघर पोटनिवडणुकीत न मिळाल्याने सर्व खापर निवडणूक आयोगावर फोडण्यात आलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
शिवसेना वगळता सर्वच विरोधकांनी भाजपला धूळ चारली
देशभरात पार पडलेल्या मतं मोजणीतून जे निकाल हाती आले आहेत, त्यामध्ये शिवसेना वगळता सर्वच पक्षांनी भाजपला पोटनिवडणुकीत मात दिली आहे. त्यामुळे शिवसेनेने सत्तेत राहून भाजपला केलेला विरोध आणि निवडणुकीनंतर पुन्हा त्यांच्याच पंगतीला जाऊन बसण्याची रणनीती मतदाराच्या पचनी पडत नसल्याने, पुढील निवडणूका शिवसेनेला कठीण जाऊ शकतात.
7 वर्षांपूर्वी -
पालघर निवडणुकीत जनतेने शिवसेनेला नाकारलं
पालघर निवडणुकीची मतमोजणीची चुरस ही भाजप, शिवसेना आणि बहुजन विकास आघाडी यांच्यातच होती असं एकूण मतमोजणीच चित्र होत. पाहल्या ३-४ फेऱ्यामध्ये शिवसेना थेट तिसऱ्या स्थानी होती. परंतु एकूणच मतदानाचा कौल पाहिल्यास शिवसेना जरी जिंकण्याचा दावा करत होती तरी भाहुजन विकास आघाडीने घेतलेली मतं सुद्धा मोठ्या प्रमाणावर होती. भाजप फेरीपासूनच अग्रस्थनी होती.
7 वर्षांपूर्वी -
भाजप-सेनेचं म्हणजे तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना
भाजपची हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेसोबत युती असून ही युती राहिली पाहिजे असं केंद्रीय महामार्ग आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी मत व्यक्त केलं. आमच्यातील युतीच म्हणजे “तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना” अशी परिस्थिती येते असं सुद्धा नितीन गडकरी म्हणाले.
7 वर्षांपूर्वी -
पालघर, भंडारा-गोंदिया निवडणुक मतदान, व्हीव्हीपॅट मशीन गुजरातमधून
आज पालघर, भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान होत आहे. संपूर्ण निवडणूक यंत्रणा सुसज्ज झाली असून या निवडणुकीत पहिल्यांदाच ईव्हीएम व्हीव्हीपॅट मशीनचा वापर करण्यात येणार आहे. हे व्हीव्हीपॅट मशीन गुजरातमधील सुरत व बडोदा येथून आणण्यात आली आहे.
7 वर्षांपूर्वी