Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
राज्य होरपळतंय दुष्काळात आणि लोकसभेत भाषणं ठोकून उद्धव ठाकरे परदेशात?
सध्या महाराष्ट्रात प्रचंड मोठा दुष्काळ लोटला आहे. विशेष म्हणजे दुष्काळाची तीव्रता ही ऐतिहासिक असल्याचं म्हटलं जात आहे. लोकसभेच्या प्रचारात मोठं मोठी भाषणं ठोकून सत्तेत असलेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सहकुटुंब परदेश दौऱ्यावर गेले असले तरी राष्ट्रवादीचे अध्यक्ष स्वतः राज्यातील दुष्काळाचा आढावा घेताना दिसत आहेत. तर दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोणतंही सत्ताकेंद्र स्वतःकडे नसताना कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या सहकाराने ग्रामीण भागात शक्य इथे टँकरने पाणी पोहोचवत आहेत.
6 वर्षांपूर्वी -
शिवसेना नगरसेवक गोरख जाधव यांच्यावर लाचखोरीचा गुन्हा दाखल
स्वतःच्या विभागात काम सुरु ठेवण्यासाठी ठेकेदाराकडे टक्केवारीची मागणी केल्याच्या आरोपाखाली शिवसेनेच्या स्थानिक नगरसेवकावर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात शिवसेनेवर टीकेची झोड उठवण्यात आली आहे. गोरख जंगलीराम जाधव (२६) असे या त्या नगरसेवकाचे नाव असून, तो कल्याण-कसारा मार्गावरील आंबिवली रेल्वे स्टेशन नजीकच्या अटाळी गावात राहणारा आहे.
6 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षण: निवडणुकीपूर्वी लाडू भरवणारे हेच ते नेते वैद्यकीय प्रवेश गोंधळानंतर गायब
निवडणुकीपूर्वी मराठा आरक्षणावर मार्केटिंग करून श्रेय घेणारे आणि एकमेकांना केमेऱ्यासमोर लाडू भरवत स्वतःची पाठ थोपटून घेणारे हे भाजप आणि शिवसेनेचे मंत्री आणि आमदार सध्या मराठा समाजातील मुलांच्या वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेपासून लांब आहेत. सध्या मराठा समाजातील विद्यार्थी वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत प्रचंड अडचणींचा सामना करत आहेत आणि सत्ताधाऱ्यांबद्दल त्यांच्या मनात प्रचंड संताप पाहायला मिळत आहे.
6 वर्षांपूर्वी -
सेल्फ डिफेन्सचे धडे घेताघेता शिवसेनाच अक्षयच्या डिफेन्समध्ये, त्याची कॅनडीयन नागरिकत्व तांत्रिक बाब
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखातून महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीवर सविस्तर भाष्य करतानाच अभिनेता अक्षय कुमारचे नागरिकत्वाच्या मुद्दावरुनही समर्थन केले आहे. अक्षय कुमार हा अस्सल हिंदुस्थानी आहे. त्याच्या कॅनडाच्या नागरिकत्वाचा विषय ही एक तांत्रिक बाब आहे.
6 वर्षांपूर्वी -
राज्यात निवडणूक संपताच भाजप-सेना सरकारकडून घरगुती गॅसच्या किमतीत मोठी वाढ
लोकसभा निवडणुकीदरम्यान सामान्य व्यक्तीला सरकारनं जोराचा धक्का दिला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी घरगुती गॅसच्या किमतीत मोठी वाढ केली आहे. घरगुती एलपीजी सबसिडी असलेल्या सिलिंडर गॅसची किंमत ६ रुपयांनी वाढवण्यात आली आहे. तर सबसिडी नसलेल्या सिलिंडरच्या किमतीत २२.५ रुपयांची वाढ झाली आहे, असं वृत्त द हिंदू बिझनेस लाइननं प्रसिद्ध केलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
श्रीलंकेत बुरखाबंदी; राज्यात निवडणूक संपताच छोट्या भावाची पुन्हा मोठ्या भावावर टीका
महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुका संपताच शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा मोदी सरकारवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. लोकसभा प्रचारादरम्यान मोदींच्या नावाने मतांचा जोगवा मागून, सभेच्या ठिकाणी केवळ मोदींचा सार्वजनिक ठिकाणी बुरखा किंवा नकाब परिधान करणे गुन्हेगारी स्वरूपाचे कृत्य ठरेल, असे जाहीर करुन श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रिपाल यांनी साहस आणि धैर्याचे दर्शन घडवले असून रावणाच्या लंकेत जे घडले ते रामाच्या अयोध्येत कधी घडणार?, असा थेट सवाल उपस्थित करतानाच भारतात देखील बुरखाबंदी करावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
मोदींचा उमेदवारी अर्ज भरताना उद्धव ठाकरेंची वाराणसीत उपस्थिती
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीत लोकसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, बिहारचे मुख्यमंत्री नीतिशकुमार, रामविलास पासवान, अतुल बरुआ यांच्यासहित इतर सहा राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. आजसुद्धा असेच विराट शक्तिप्रदर्शन होणार आहे. आज कोतवाल बाबा काळ भैरवाचे दर्शन घेऊन पुन्हा जयघोषाच्या मिरवणुकीने उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मोदी जाणार आहेत. त्यावेळी सम्राट मोदींचे मांडलीक असणारे राजे त्यांच्यासोबत अदबीने उभे राहणार आहेत.
6 वर्षांपूर्वी -
सेनेचे डझनभर मंत्री कुचकामी, आता उद्धव ठाकरेंकडून शहिदांच्या नावाने मतांचा जोगवा
यापूर्वी भाजपचे नेते आणि विशेष करून मोदी आणि अमित शहा शहीद जवानांच्या नावाने मतं मागत होते. आता सत्तेत डझनभर मंत्री असताना देखील सामान्य जनतेसाठी कुचकामी ठरल्याने हबल होऊन उद्धव ठाकरे देखील भर सभांमधून शहीद जवानांच्या नावाने मतं मागत आहेत. महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ कल्याण येथे सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सैनिकांच्या नावे मताचा जोगवा मागितला आहे.
6 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरेंनी ईडीला घाबरुन औरंगजेबास मुजरा घातला
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तुम्ही ग्रामपंचायतीचे-जिल्हापरिषदचे सदस्य नाहीत, आमदार-खासदार-मंत्री काहीच नाही मग तुमच्याकडे इतकी संपत्ती आली कुठून? ईडीला घाबरुन तुम्ही औरंगजेबास मुजरा घातला. अशी घणाघाती टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना केला. ईडीची पिडा टाळण्यासाठीच तुम्ही औरंगजेबास मुजरा केला. इतकंच नाही तर जय गुजरातही म्हणून आले अशी टीकाही मुंडे यांनी उद्धव ठाकरेंवर केली.
6 वर्षांपूर्वी -
अजब! उद्धव म्हणाले माझं ‘डासां’सोबत रक्ताचे नाते, तर राज ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका
धारावीतील रहिवाशांना जो डास चावतो तोच डास मला देखील चावतो. त्यामुळे आपले रक्ताचे नाते आहे, अशी अजब भावनिक साद शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी धारावीकरांना घातली. शिवसेनेचे उमेदवार राहुल शेवाळे यांच्या प्रचारार्थ ठाकरे यांच्या जाहीर सभेचे रविवारी आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. विशेष म्हणजे ज्या घाणीमुळे डास निर्माण होतात किंवा वाढतात त्यावर त्यांना काहीच बोलावसं वाटलं नाही. प्रचारात विकासावर बोलण्याचं त्यांचं धाडसच दिसून येत नाही आणि वायफळ विषयांवर अधिक भर देताना उद्धव ठाकरे दिसत आहेत.
6 वर्षांपूर्वी -
'माऊ' म्हणजे मांजर नाही तर 'माननीय उद्धव ठाकरे': हितेंद्र ठाकूर
पालघर पोटनिवडणुकी दरम्यानच्या स्वपक्षीय तसेच मित्रपक्षांच्या कार्यपद्धतीवर आमदार हितेंद्र ठाकूर यांनी त्याच्यासमोरच शाळा घेत खंत व्यक्त केली. तसेच त्यांच्यासमोरच तुम्ही विकले गेला होतात की नाही असा रोखठोक प्रश्न उपस्थित केला. दरम्यान, जर मित्रपक्षांची लायकी होती तर मतं कमी पडली असा प्रश्न देखील त्यांच्यासमोरच विचारला.
6 वर्षांपूर्वी -
मुंबई ते पालघर; शिवसेना महाराष्ट्रात निवडणूक लढवत आहे की गुजरातमध्ये?
सध्या लोकसभा प्रचाराचा जोर संपूर्ण महाराष्ट्रात वाढलेला असताना सर्वच पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. त्यासाठी प्रचाराचे नवं नवे फंडे वापरण्यात येत आहेत. परंतु शिवसेनेचा मुंबई ते पालघर पर्यंतचा प्रचार हा मुख्यत्वे गुजराती भाषेत होताना दिसत आहे. भाजपसोबत युती करण्याचा शिवसेनेचा मूळ उद्देश केवळ गुजराती मतदार तर नव्हता ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
6 वर्षांपूर्वी -
VIDEO: स्वर्गीय. बाळासाहेबांनंतर शिवसेनेवर सभेसाठी भाडोत्री गर्दी जमविण्याची वेळ
शिवसेनेच्या कणकवलीतील सभेला मुंबईवरून भाडोत्री अमराठी माणसे आणल्याचा आरोप काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी केला आहे. या संबंधित त्यांनी पुरावा म्हणून एक व्हिडिओ देखील ट्विटर अकाऊंटवर प्रसिद्ध केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
नाहीतर आत्महत्याग्रस्त शेतकरी भावाच्या अस्थी ‘मातोश्री’वर पाठवणार: शेतकरी कुटुंबीय
भावाने आत्महत्या करुन ४ दिवस झाले. मात्र अजून देखील पोलिसांनी कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही. पोलीस अधीक्षकांना देखील निवेदन देऊन आलो. परंतु, सगळ्यांना लोकसभा निवडणूक महत्वाची वाटते. जर सदर प्रकरणी पोलिसांनी आणि स्थानिक प्रशासनाने योग्य कारवाई केली नाही, तर भावाच्या अस्थी थेट मातोश्रीवर आणि जिल्हाधिकाऱ्यांना पाठवणार, असा गर्भित इशाराच उस्मानाबादमधील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबीयांनी सत्ताधाऱ्यांना दिला आहे.
6 वर्षांपूर्वी -
सेनेकडून मुंबईकरांना टोप्या; ५०० चौरस फुटांचा कर माफ केल्याची घोषणा फसवी
शहरात ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ करण्याची घोषणा शिवसेनेने केली. त्यानंतर युतीसाठी शिवसेना राजी व्हावी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५०० चौरस फुटांचा कर माफ केल्याचे जाहीर केले. त्यानंतर शिवसेनेने आम्ही दिलेले वचन पाळतो, असे सांगत हा मालमत्ता कर माफ झाल्याचे सांगितले. परंतु ती निवडणुकीसाठीची फसवी घोषणा असल्याचे समोर आलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
गांधी घराण्याची गरीबी हटली; लोकांची नाही: उद्धव ठाकरे
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी गरीबी हटावची घोषणा करताहेत. खरंतर याआधी त्यांच्या आजीबाईंनी याची सुरूवात केली होती. त्यांची गरीबी हटली, परंतु लोकांची नाही. काँग्रेस देशद्रोहाचे कलम हटवू पाहत आहे. हाच सर्वात मोठा देशद्रोह आहे. हे कलम काढल्यास दाऊद येऊन काँग्रेसचा नेता बनेल, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.
6 वर्षांपूर्वी -
पुलवामा हल्ल्यात जवान शहिद झाले; त्यांना श्रद्धांजली म्हणून मत भाजपला समर्पित करा: मोदी
लातूर येथील औसा येथे मंगळवारी महायुतीची जाहीर प्रचार सभा पार पडली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषणादरम्यान नवमतदारांना मत देण्याचे आवाहन करताना पुलवामा हल्ल्यात शहिद झालेल्या जवानांच्या नावाचा वापर केला. दरम्यान नवमतदारांना आवाहन करताना मोदी म्हणाले, तुम्ही तुमचे मत देताना प्रथम देशाचा विचार करा, मत देताना कोणतीही चूक करू नका, तुमचे पहिले मत हे पुलवामा हल्ल्यातील शहिद जवानांना समर्पित करा, शहिदांचे बलिदान लक्षात ठेऊन मत द्या’ असे मोदी यावेळी म्हणाले.
6 वर्षांपूर्वी -
सत्ताकाळात शिवसेना-भाजप खासदारांची संपत्ती ६० टक्क्यांनी वाढली
भारतीय जनता पक्षाच्या खासदार पूनम महाजन यांच्या संपत्तीमध्ये तब्बल १०६ टक्क्यांची घट झाल्याची आकडेवारी समोर आली होती. पण, आता शिवसेना-भाजप खासदारांच्या संपत्तीमध्ये तब्बल ६० टक्क्यांची वाढ झाल्याचे समजते. लोकसभेच्या पहिल्या टप्प्यात निवडणूक लढवीत असलेल्या शिवसेना-भाजप खासदारांच्या संपत्तीमध्ये सरासरी ३.२० कोटींची वाढ झाली आहे. ADRच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. २०१४ आणि २०१९ मधील आकड्यांची तुलना केल्यानंतर ही आकडेवारी देण्यात आली.
6 वर्षांपूर्वी -
बीडमध्ये राष्ट्रवादीला धक्का जयदत्त क्षीरसागर मातोश्रीवर
बीडमधील एनसीपीचे नाराज नेते जयदत्त क्षीरसागर यांनी शनिवारी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी जयदत्त क्षीरसागर यांच्यासोबत त्यांचे बंधु भारतभूषण क्षीरसागर देखील स्वतः उपस्थित होते. त्यामुळे लोकसभा निवडणुकीदरम्यान एनसीपीला मोठा राजकीय धक्का बसल्याच म्हटलं जात आहे.
6 वर्षांपूर्वी -
विनायक राऊतांची वैभववाडीतील ही विराट प्रचार सभा त्यांचा निकाल सांगत आहे?
मागील ५ वर्षे मुंबईत राहून सिंधुदुर्ग-रत्नागिरीच राजकारण पाहणारे खासदार विनायक राऊत लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने कोकणात दिसू लागल्याने आधीच त्यांचा मार्ग कठीण असल्याचं प्राथमिक निष्कर्षात समोर आलं होतं. विकासाचा मुद्दा घेऊन निवडून आले आणि ५ वर्ष दिसेनासे झालेले विनायक राऊत शेवटच्या क्षणी नारळ फोडण्याची स्टंटबाजी करताना कोकणवासीयांना दिसले. मात्र त्याच कोकणवासीयांना आणि स्थानिक शिवसैनिकांनी देखील चांगलाच हिसका दाखवला आहे.
6 वर्षांपूर्वी