Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
महाड तालुका पाणी टंचाईच्या विळख्यात, स्थानिक नेतेमंडळी प्रचारात दंग
मार्च महिना ओलांडताच उष्णतेत प्रचंड वाढ झाली आहे. परंतु आता पाणी स्त्रोतांंवर त्याचा परिणाम होत असून पाण्याची पातळी देखील खाली जाऊ लागल्याने महाड तालुक्यावर प्रचंड पाणी टंचाईचे सावट पसरू लागले आहे. मात्र लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत स्थानिक नेत्यांना सामान्यांच्या या गंभीर प्रश्नांकडे लक्ष देण्यास अजिबात वेळ नाही आणि त्यामुळे नागरिक देखील हवालदिल झाले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
ते भगवं-पांढरं राहू दे! उद्धव ठाकरेंनी सेनेच्या डझनभर मंत्र्यांच्या कामाचा हिशेब द्यावा: समाज माध्यमं
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे त्यांच्या भाषणात वायफळ मुद्यांना विशेष महत्व देत असून, त्याच मुख्य कारण म्हणजे शिवसेनेच्या डझनभर मंत्र्यांनी केलेला विकास शून्य कारभार आणि राजीनामा नाट्याचे प्रयोग याशिवाय दुसरं काहीच केलं नसल्याने, शिवसेना पक्षप्रमुखांनी त्यांच्या डझनभर मंत्र्यांच्या ५ वर्षातील कारभाराचा हिशेब सामान्य जनतेला द्यावा असे आवाहन समाज माध्यमं करताना दिसत आहेत.
6 वर्षांपूर्वी -
मोदींच्या आणि उद्धव ठाकरेंच्या भाषणातून महागाई, बेरोजगारी व दुष्काळ गायब
लोकसभेच्या आखाड्यात सध्या सर्वच पक्षांकडून प्रचारसभा आणि भाषणं सुरु झाली आहेत. परंतु २०१४ मध्ये विकासाच्या मुद्यावर लोकसभा निवडणूक लढवणारे नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे सध्या सामान्य माणसाच्या दैनंदिन विषयांना बगल देत भगवं वादळ, मंदिर आणि पाकिस्तान अशा विषयावर भाषणं ठोकताना दिसत आहेत.
6 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरेंची बिल्डरसोबत तब्बल २८ कंपन्यांमध्ये भागीदारी - नारायण राणे
कोकणात देखील लोकसभेची धामधूम सुरु झाली आहे असंच म्हणावं लागेल. मुंबईत मराठी माणसांची टक्केवारी कमी झाली, १९६०-६६ दरम्यान मुंबईत मराठी माणूस साठ टक्के होता, पण आज मराठी माणूस केवळ १८ टक्के शिल्लक आहे. मुंबईतला मराठी माणूस कुठे गेला.वसई, बदलापूर, कल्याण याठिकाणी मराठी माणूस निघून गेले. ही स्थिती शिवसेनेनी आणली, उद्धव ठाकरेंची बिल्डरसोबत पार्टनरशिप आहे. २८ कंपन्यांमध्ये रवींद्र वायकर, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि ठाकरे घराण्यातील एका व्यक्तीची भागीदारी आहे. हे मी विधानसभेत पुराव्यानिशी मांडले, सत्ता मिळवायची आणि सत्तेतून पैसा कमवायचा ही निती शिवसेनेची आहे असा स्पष्ट आरोप महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे यांनी केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
‘काँग्रेसमुक्त भारत’ ही भाजपाची फालतू कल्पना: उद्धव ठाकरे
देशातील लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतील आहे. यावेळी उद्धव विविध विषयांना हात घालत पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी सेना-भारतीय जनता पक्षाची युती, प्रलंबित राम मंदिर, शेतकरी आत्महत्येपासून पक्षांतर करणारे उमेदवार अशा विविध विषयांवर मत व्यक्त केले आहे. परंतु, याच मुलाखतीत त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या अनेक मतांशी सहमती दर्शवली मात्र अनेक विषयांशी असहमती देखील दर्शवली.
6 वर्षांपूर्वी -
खंबाटातील ४०० कोटींच्या भ्रष्टाचारात विनायक राऊतांचा हात
बहुचर्चित तब्बल ४०० कोटींचा भ्रष्टाचार करून एका रात्रीत सर्वाधिक म्हणजे एकूण २७६३ कामगार तसेच त्यांच्या तब्बल दहा ते अकरा हजार कुटूंबियांना रस्त्यावर आणणा-या खंबाटा एव्हिएशन कंपनीतील घोटाळय़ाचा खरा सूत्रधार, या कंपनीचा निरव मोदी हा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे उमेदवार आणि विद्यमान खासदार विनायक राऊत असून बहुतांश कोकणातील कामगार असलेल्या या खंबाटातील भ्रष्टाचारातुन विनायक राऊत यांनी कोकणी माणसाचीच फसवणूक केली आहे असा धक्कादायक आरोप महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस निलेश राणे यांनी जाहीर पत्रकार परिषदेत केला.
6 वर्षांपूर्वी -
खान डौलत डुलत आला, सैय्यद बंडा त्याच्या संगतीला: राष्ट्रवादीकडून व्हिडिओ प्रसिद्ध
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर एनसीपीने एक व्हिडिओ प्रसिद्ध करून जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘अफझल खानाच्या फौजेत फितूर वाघ’ अशी जहरी टीका एनसीपीने केली आहे. त्याचवेळी पाच वर्ष अफजल खानाचा कोथळा बाहेर काढण्याची भाषा करणारे, आज थेट त्यांच्याच छावणीत. हेच का शिवरायांचे मावळे?? यांनी शिवरायांच्या नावाने मते मागणे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली इतिहासाचा अपमान आहे, असे ट्विट राष्ट्रवादीने केले आहे. त्याचवेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीही अफझल खानाच्या फौजेत जाऊन सेनेच्या सेनापतीने उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गांधीनगर गाठले, असे ट्विट करत उद्धव ठाकरेंवर टीका केलीआहे.
6 वर्षांपूर्वी -
अजब! मुंबईच्या सत्तेत असून बाधितांना भेटले नाही, पण सत्तेत टिकण्यासाठी थेट गुजरातला?
मुंबईमध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या पादचारी पूल दुर्घटनेत अनेकांचा नाहक जीव गेला आणि त्यात अनेक मुंबईकर गंभीर जखमी देखील झाले. मात्र काही मिनिटाच्या अंतरावर असून आणि मुख्य म्हणजे मुंबई महानगर पालिकेच्या सत्तेत असून देखील उद्धव ठाकरे यांनी दुर्घटनेतील ना जखमींची भेट घेतली ना मृतांच्या कुटुंबीयांचं सांत्वन केलं. मुंबई महानगर पालिकेत सत्तेत असून देखील उद्धव ठाकरे यांनी कोणतीही जवाबदारी किंवा संवेदनशीलपणा मुंबईकरांप्रती व्यक्त केला नाही.
6 वर्षांपूर्वी -
अमित शहा उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार, तर उद्धव ठाकरे यांची विशेष उपस्थिती
भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा लोकसभा निवडणुकीसाठी उद्या उमेदवारी अर्ज भरणार आहेत. यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गुजरातला जाणार आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याआधी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं जाणार असल्याचं वृत्त आहे. त्यासाठी शहांनी उद्धव ठाकरेंना थेट गुजरातला येण्याचं आमंत्रण दिलं आहे. उद्धव ठाकरे यांनी देखील ते आमंत्रण स्वीकारलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
PNB बँकेने कर्जबुडव्या म्हणून घोषित केलेल्या धैर्यशील माने यांना सेनेकडून उमेदवारी
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पीएनबी घोटाळा आणि देशातून पळ काढणारा निरव मोदी आधीच भाजपची डोकेदुखी ठरलेला असताना, आता शिवसेनेत देखील एक प्रति निरव मोदी असल्याचं उघड झालं आहे. विशेष म्हणजे या व्यक्तीला देखील PNB म्हणजे पंजाब नॅशनल बँकेनेच कर्जबुडव्या म्हणून अधिकृतपणे घोषित केलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
कोणते दिवे लावले म्हणून युतीच्या अधिक जागा ते सर्व्हेत का येत नाही? नेटिझन्स
लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून अनेक ओपिनियन पोल अर्थात सर्व्हे येण्यास सुरुवात झाली असून त्यात महाराष्ट्रात भाजप आणि सेनेला घवघवीत यश मिळणार असं दाखविण्यात आलं आहे. वास्तविक शिवसेनेबद्दल बोलायचं झालं तर त्यांच्या राज्यातील आणि केंद्रातील डझनभर मंत्र्यांनी, ६३ आमदार आणि १८ खासदारांनी नक्की विकास कामांचे कोणते दिवे लावले आहेत, म्हणून लोकं त्यांना भरघोस मतदान करणार आहेत? अशी चर्चा आता समाज माध्यमांवर रंगू लागली आहे.
6 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा, किरीट सोमैयांच्या उमेदवारीला तीव्र विरोध
ईशान्य मुंबईच्या लोकसभा उमेदवारीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात मातोश्रीवर आज पुन्हा चर्चा झाली. परंतु आज देखील याबाबत कोणताही तोडगा निघाला नसल्याचे समोर येत आहे. कारण उद्धव ठाकरे यांनी ईशान्य मुंबईतून भाजपाचे विद्यमान खासदार किरीट सोमैया यांच्या उमेदवारीला तीव्र विरोध दर्शविला आहे.
6 वर्षांपूर्वी -
पूल दुर्घटनेत दोषी ठरलेल्या डी. डी. देसाईंचाच सल्ला घेणार, शिवसेनेच्या मुंबई पालिकेचा घाट
सीएसटीएम स्थानकाजवळील हिमालय पुलाचा भाग कोसळण्यास जबाबदार ठरलेल्या बेजबाबदार कंत्राटदारावर पालिका प्रशासनाने १६ पुलांच्या दुरुस्तीची जबाबदारी टाकली आहे. हिमालय पूल दुर्घटनेत दोषी ठरलेल्या डी. डी. देसाई असोसिएटेड या कंपनीला पुन्हा काम देण्याचा घाट पालिका प्रशासनाने घेतला आहे. या दुरुस्तीसाठी पालिका तेरा कोटी ८६ लाख मोजणार आहे. पालिका प्रशासनाच्या या आश्चर्यकारक निर्णयामुळे पुन्हा एकदा मुंबईकरांच्या जीव धोक्यात येणार आहे.
6 वर्षांपूर्वी -
सेनेच्या १२ मंत्र्यांनी ५ वर्ष काय दिवे लावले ते उद्धव ठाकरे सांगतील का? नेटकरी चर्चा रंगल्या
लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या आणि सर्वच पक्ष प्रचाराला लागले आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या मालिका सुरु झाल्या असल्या तरी एक गोष्ट सहज जाणवते आणि ती म्हणजे शिवसेना पक्ष प्रमुख मतदाराला शिवसेनेच्या डझनभर मंत्र्यांच्या कोणत्याही विकास कामांचा पुरावा देताना दिसत नाहीत.
6 वर्षांपूर्वी -
वंचितांची आघाडी म्हणजे निवडणुकीपुरत्या उगवलेल्या छत्र्या, उद्धव ठाकरेंची सडकून टीका
राज्यात निवडणुकीचा रणसंग्राम आता सुरु झाला आहे. युतीबरोबरच आघाडीनेही आपल्या प्रचाराचे नारळ फोडले आहेत. दरम्यान, कोल्हापूरातील युतीच्या पहिल्याच प्रचार सभेला प्रचंड प्रतिसाद मिळाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबरच वंचित बहुजन आघाडीलाही त्यांनी टार्गेट केले. वंचितांची आघाडी म्हणजे निवडणुकीपुरत्या उगवलेल्या छत्र्या आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. शिवसेनेच्या मुखपत्रातून उद्धव ठाकरे विरोधकांवर बरसले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
कोल्हापूरचा सभेला थेट कर्नाटकातून माणसं आणली, मराठी समजत वा बोलताही येत नव्हतं
भाजपा आणि शिवसेनेची पहिली जाहीर सभा कोल्हापुरात झाली. तेव्हा संपूर्ण मैदान भरून रस्त्यापर्यंत गर्दीचा रेकॉर्ड झाला. या तुफान सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपाच्या तीन मित्रपक्षांचे नेते रामदास आठवले, विनायक मेटे आणि महादेव जानकर व्यासपीठावर उपस्थित होते. मात्र उपस्थित प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी जेव्हा अनेक लोकांशी व्यक्तिशः बोलून पाहिलं तेव्हा मोठ्या प्रमाणावर बसलेल्या महिलांना ना मराठी येत होतं, ना मराठी समजत होतं हे त्यांनी कॅमेरावर मान्य केलं. त्यावरूनच हे लोंढे जवळच्या सीमेवरून म्हणजे कर्नाटकातून आणल्याचं प्रसार माध्यमांच्या ध्यानात आलं आणि त्याचे व्हिडिओ देखील समाज माध्यमानावर व्हायरल झाले आहेत. त्यावरून सत्ताधाऱ्यांनी जनसागर दाखवण्यासाठी किती पैसा खर्ची केला आहे याचा प्रत्यय येत होता.
6 वर्षांपूर्वी -
शिवसेनेचा निरव मोदी? PNB बँकेने कर्जबुडव्या म्हणून घोषित केलं त्यालाच सेनेकडून उमेदवारी
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पीएनबी घोटाळा आणि देशातून पळ काढणारा निरव मोदी आधीच भाजपची डोकेदुखी ठरलेला असताना, आता शिवसेनेत देखील एक प्रति निरव मोदी असल्याचं उघड झालं आहे. विशेष म्हणजे या व्यक्तीला देखील PNB म्हणजे पंजाब नॅशनल बँकेनेच कर्जबुडव्या म्हणून अधिकृतपणे घोषित केलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
लोकसभेसाठी शिवसेनेची पहिली यादी जाहीर
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने २१ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीतील २१ उमेदवारांपैकी १७ विद्यमान खासदारांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेना यंदा एकूण २३ जागा लढवणार आहे. पालघर आणि सातारा वगळता सर्व मतदारसंघांचे उमेदवार यावेळी शिवसेनेने जाहीर केले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
बाळासाहेबांनी मला नेहमीच गोरगरीबांच्या मुलांची काळजी घ्यायला शिकवलं: उद्धव ठाकरे
युतीपूर्वी आमच्यात मतभेद होते, त्यावेळी आम्ही भारतीय जनता पक्षावर जाहीर टीका केली. परंतु हे मतभेद शिवसेनेने कधीही राज्याच्या विकासाच्या आड येऊ दिले नाहीत. आम्ही एकमेकांमध्ये कधीही तंगड घातलं नाही, असा एकतरी मुद्दा दाखवा, असे स्पष्टीकरण देताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवरही टीका केली. आघाडी करताना हातात हात घालून त्यांनी तंगड्यात तंगडं घातलं आहे, त्यामुळे ते नक्कीच पडणार असा टोला यावेळी उद्धव ठाकरेंनी विरोधकांना लगावला.
6 वर्षांपूर्वी -
पंतप्रधान मोदी व उद्धव ठाकरे यांचं एकाच व्यासपीठावर मनोमिलन होणार
लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकाच मंचावर येणार आहेत. नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात तब्बल २५ जाहीर सभा होणार आहे. त्यापैकीच ही एक जाहीर संयुक्त सभा असणार आहे. महाराष्ट्र चार टप्प्यांत मतदान होणार आहे.
6 वर्षांपूर्वी