Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
पदवी परीक्षांना स्थगितीची विनंती मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली
‘मुंबई विद्यापीठाच्या १२ जून २०१९च्या परिपत्रकाप्रमाणे अंतिम परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केल्यापासून प्रत्यक्ष परीक्षा सुरू होईपर्यंत किमान एक महिन्याचा कालावधी विद्यार्थ्यांना देणे आवश्यक आहे. मात्र, यंदा विद्यापीठाने करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्याचे ठरवले असले तरी विद्यार्थ्यांना तयारीसाठी पुरेसा कालावधी दिलेला नाही’, असे कारण देत १ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या परीक्षेला स्थगिती देण्याची विनंती दोन विद्यार्थ्यांनी याचिकेद्वारे केली होती. परंतु, मुंबई उच्च न्यायालयाने शनिवारी ती विनंती फेटाळून लावली.
5 वर्षांपूर्वी -
परीक्षा ऑनलाईन घेण्यात येणार | घरात बसूनच परीक्षा देता येईल याची व्यवस्था करणार
न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार विद्यापीठ अंतिम वर्षाच्या परिक्षा घेण्यासाठी राज्यातील बहुतांश विद्यापीठांनी 31 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ मागितीली आहे. तसेच, विद्यापीठांनी आपले म्हणने राज्य सरकारला कळविण्यापूर्वी विचार करण्यासाठी आणखी एक दिवसाची मुदत मागितल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे. विद्यापीठ अंतिम वर्षाच्या परिक्षेबाबत उदय सामंत यांनी आज (31 ऑगस्ट) एक पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत ते बोलत होते. कोरोना व्हायरस संसर्ग, लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्यास राज्य सरकारांनी असमर्थता दाखवली होती.
5 वर्षांपूर्वी -
परीक्षा रद्द करण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही, अधिकार फक्त UGC'ला
परीक्षा रद्द करण्याचा राज्य सरकारचा निर्णय म्हणजे आमच्या वैधानिक अधिकारावरील अतिक्रमण असल्याचा दावाही ‘यूजीसी’ने केला आहे. विद्यापीठाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द करण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही तर आम्हाला आहे. विशेष काद्याने हा अधिकार आम्हाला बहाल केलेला आहे अशी भूमिका यूजीसीने शुक्रवारी उच्च न्यायालयात मांडली. निवृत्त शिक्षक धनंजय कुलकर्णी यांनी विद्यापीठाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला कोर्टात आव्हान दिले होते.
5 वर्षांपूर्वी