Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Union Budget 2023 | पोस्ट ऑफिसच्या दोन योजनांमध्ये गुंतवणुकीची मर्यादा दुप्पट, कोणत्या योजना पहा
Union Budget 2023 | जर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. खरं तर आज च्या अर्थसंकल्पात पोस्ट ऑफिसच्या दोन योजनांमधील गुंतवणुकीची मर्यादा वाढवण्यात आली होती. अर्थमंत्र्यांनी ज्येष्ठ नागरिक बचत योजनेतील गुंतवणुकीची कमाल मर्यादा १५ लाखरुपयांवरून ३० लाख रुपये केली आहे. याशिवाय मासिक उत्पन्न खाते (मंथली इन्कम सेव्हिंग स्कीम) योजनेची कमाल ठेव मर्यादा एकल खात्यांसाठी ४.५ लाख रुपयांवरून ९ लाख रुपये आणि संयुक्त खात्यांसाठी ९ लाखांवरून १५ लाख रुपये करण्यात आली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Union Budget 2023 | खुशखबर, महिलांना मिळणार 2 लाखांचा फायदा, अर्थमंत्र्यांनी केली घोषणा
Union Budget 2023 | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी संसदेत 2023-24 चा अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पात महिलांसाठी (महिला अर्थसंकल्प २०२३) अनेक घोषणा करण्यात आल्या. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशभरातील महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे. केंद्र सरकारने देशातील महिलांसाठी नवी योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने म्हटले आहे की, महिलांसाठी महिला बचत सन्मानपत्र आणले जाईल, ज्यात महिलांना संपूर्ण 2 लाख रुपयांचा लाभ मिळेल. (Mahila Samman Bachat Patra)
2 वर्षांपूर्वी -
Union Budget 2023 | अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने महत्वाचा दिवस, सतत चर्चेतील क्रिप्टोकरन्सीबाबत निर्णय होणार, काय आहे वृत्त?
Union Budget 2023 | अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने आजचा दिवस भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन बुधवारी देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. सकाळी ११ वाजता सभागृहात त्यांचे भाषण सुरू होईल. गरिबांपासून व्यापारी वर्गापर्यंत २०२३ च्या अर्थसंकल्पात स्वत:साठी अपेक्षा ठेवण्यात आल्या आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला. भारताचा जीडीपी वाढीचा दर ६.० ते ६.८ टक्के राहील, असा अंदाज आहे. विशेष म्हणजे अर्थमंत्री सीतारामन यांचा हा पाचवा अर्थसंकल्प असणार आहे.
2 वर्षांपूर्वी