Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Maharashtra Unlock | मुंबईत आजपासून रात्री १० पर्यंत दुकाने खुली राहणार | तर पुण्यातील नियमांवरून महापौरांची नाराजी
मुंबईमध्ये कोरोना रुग्ण कमी होताना दिसत आहेत, त्यानुसार मुंबईमध्ये काही नियम शिथिल करण्यात आले आहेत. निर्बंधांबाबत राज्यासाठी सुधारित आदेश जारी करताना सरकारने मुंबईचा निर्णय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणावर सोपवला होता. त्यानुसार आपल्या अधिकारात मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी पालिका क्षेत्रासाठी आदेश जारी करत निर्बंधांमध्ये मोठ्या प्रमाणात शिथीलता दिली आहे. नवे आदेश आजपासून(३ ऑगस्ट) लागू केले जाणार आहेत.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना संपलेला नाही | गर्दी, आरोग्याचे नियम मोडलेले चालणार नाही - मुख्यमंत्री
महाराष्ट्रात सोमवारपासून ‘ब्रेक दि चेन’अंतर्गत सर्व जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल होत आहेत. मराठवाड्यात औरंगाबाद मनपा क्षेत्र, जालना, नांदेड आणि लातूर शहर पहिल्या स्तरात असल्यामुळे या ठिकाणी सर्व व्यवहार नेहमीप्रमाणे सुरू होणार आहेत. मात्र मास्क लावणे, फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे या गोष्टी अनिवार्य असून औरंगाबाद शहरात व्यापाऱ्यांना आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. नाशिक, सोलापूर जिल्ह्यांमध्ये सकाळी ७ ते ४, तर जळगाव जिल्ह्यात सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत सवलत देण्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
ठाणे शहर आणि ठाणे जिल्ह्यातील महानगरपालिका | उद्यापासून अनलॉक प्रक्रिया सुरु | नवे नियम जाणून घ्या
राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात येत आहे. राज्य सरकारकडून लॉकडाऊन शिथिलतेसाठी पाच टप्पे ठरवण्यात आले आहेत. याबाबतची नवी नियमावली देखील जारी करण्यात आली आहे. या पाच टप्प्यांपैकी ठाणे जिल्ह्यात ठाणे महापालिका आणि नवी मुंबई महापालिका क्षेत्र दुसऱ्या टप्प्यात समाविष्ट करण्यात आलं आहे. तर कल्याण डोंबिवली महापालिका, मीरा भाईंदर महापालिका, भिवंडी महापालिका, उल्हासनगर महापालिका तसेच अंबरनाथ, बदलापूर, शहापूर, मुरबाड नगर पंचायत आणि संपूर्ण ग्रामीण क्षेत्र हे तिसऱ्या टप्प्यात समाविष्ट करण्यात आले आहे. या सर्व क्षेत्रांमध्ये नव्या नियमावलीनुसार सोमवारपासून (7 जून) नेमकं काय सुरु, काय बंद असेल याची सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.
4 वर्षांपूर्वी -
राज्यातील निर्बंध अद्याप हटवले नाहीत | नवे नियम अजून विचाराधीन | आपत्कालीन गोंधळ
राज्यातील कोरोनाची दुसरी लाट काहीशी ओसरत असल्यामुळे राज्यात अनलॉकिंगच्या दिशेनं एक-एक पाऊल टाकण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यातील जिल्ह्यांची विभागणी 5 लेव्हलमध्ये करण्यात आल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसंच ज्या जिल्ह्यात पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्के आहे आणि ऑक्सिजन बेड 25 टक्क्याच्या आत व्यापलेले असेल, तिथे सर्व गोष्टी सुरु होतील, असंही वडेट्टीवार म्हणाले.
4 वर्षांपूर्वी