Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
दहावीच्या विद्यार्थ्यांचे होणार मूल्याकंन | अकरावी प्रवेशाबाबत राज्य सरकारने दिली माहिती
मागील अनेक दिवस १०वी आणि १२वीच्या परीक्षेवरुन त्यानंतर त्याच्या निकालावरुन सावाळा गोंधळ उडाला होता. पालक, विद्यार्थी यांच्यातही संभ्रम निर्माण झाला होता. या सगळ्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. आज (२८ मे) पत्रकार परिषद घेत त्यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांचे प्रत्येक विषयाचे 100 गुणांचे मूल्यमापन होणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
केंद्राच्या सूचनेनंतरच राज्यात शाळांबाबत निर्णय | शिक्षणमंत्र्यांची माहिती
केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना आल्यानंतरच राज्यात शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. मात्र विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार नाही, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.
5 वर्षांपूर्वी -
राज्य बोर्डाचा १०वीचा निकाल ३१ जुलैपर्यंत; तर बारावीचा १५ ते २० जुलैदरम्यान
कोरोनाचं संकट आणि त्यामुळे करावा लागलेला लॉकडाऊन यामुळे दहावी आणि बारावीचे निकाल खोळंबले आहेत. हे निकाल लवकरच जाहीर होणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. दहावीचा निकाल ३१ जुलैपर्यंत; तर बारावीचा निकाल १५ ते २० जुलैदरम्यान लागणार असल्याचं गायकवाड यांनी सांगितलं. हिंगोली दौऱ्यावर असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना निकालाबद्दलची माहिती दिली.
5 वर्षांपूर्वी