Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Pune Municipal Corporation Election | पुण्यात मनसेला हवी आहे भाजप सोबत युती | शहराध्यक्षांची प्रतिक्रिया
पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पुणे महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षासोबत युती करावी, असा आग्रह धरला आहे. दरम्यान, पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी यावर प्रसार माध्यमांकडे भाष्य केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
पुणे | सामान्य कार्यकर्त्याला सोबत घेऊन जाणाऱ्या वसंत मोरे यांच्याकडे मनसे शहराध्यक्ष पद
आगामी महापालिकेच्या निवडणूकीच्या वर्षभर आधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुणे विभागात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विद्यमान शहराध्यक्ष अजय शिंदे यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात बैठक घेतली होती. त्यानंतर बुधवारी (दि. ३) त्यांनी पदाधिकाऱ्यांना मुंबईला बोलावले होते. मुंबईमध्ये या नियुक्त्यांची अधिकृत घोषणा करण्यात आली.
4 वर्षांपूर्वी -
मनसेच्या कार्यसम्राट नगरसेवकाची पक्षांतर्गत गळचेपी | समाज माध्यमांवर घुसमट व्यक्त केली
पुणे मनसेतील कार्यसम्राट नगरसेवक वसंत मोरे यांनी समाज माध्यमांवर पक्षांतर्गत होणारी घुसमट व्यक्त केल्याने कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. पुण्यात राज ठाकरे यांच्यानंतर नगरसेवक वसंत मोरे हेच मनसेची ओळख असल्याचं सर्वश्रुत आहे. केवळ लोक प्रतिनिधी म्हणून त्यांनी केलेली विकास कामं एवढीच त्यांची ओळख नसून, स्थानिक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन ते देखील आपल्यासोबत राजकारणात कसे मोठे होतील यासाठी कार्यशाळा घेणारे नगरसेवक ही देखील त्यांची ख्याती आहे. त्यामुळे जमिनीवर लोकांसाठी झटणारा कार्यकर्ता वसंत मोरे यांच्यासाठी काहीही करायला तयार असतात.
5 वर्षांपूर्वी -
अभिमान आहे मी राज ठाकरे यांचा नगरसेवक आहे, आम्ही कोणाच्या पाया पडत नाही - वसंत मोरे
पारनेर नगरपंचायतीमधील शिवसेनेच्या पाचही नगरसेवकांची घरवापसी झाली आहे. ४ जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले पाचही नगरसेवक शिवसेनेत परतले आहेत. पाचही नगरसेवकांनी मुंबईत मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. याआधी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यासह या पाचही नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आणि त्यांच्यासोबत २० मिनिटं चर्चा केली होती.
5 वर्षांपूर्वी