Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पासंबंधित RTI च्या 'अतिजलद' माहितीतून शिंदे सरकारचीच पोलखोल झाली
Vedanta Project | वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प नेमका कुणामुळे गेला, याचा तपास घेण्यासाठी सदर कार्यकर्त्याने माहिती मागवल्याचे दाखवले जात आहे. मात्र सरकारने दिलेली ही माहिती पोलखोल करणारी आहे, अशी प्रतिक्रिया अरविंद सावंतांनी दिली. आदित्य ठाकरे यांनी काल टाइमलाइन देऊन चर्चा करण्यासाठी समोर या म्हटलंय, त्यामुळे सरकार घाबरलंय, असा आरोप अरविंद सावंतांनी केलाय. ५ मे २०२२ रोजी वेदांताने स्वारस्य अभिव्यक्ती केली होती. 14 मे 2022 रोजी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे गुंतवणुकीबाबत अर्ज सादर केला होता, मग काहीच झालं नाही कसं म्हणता? असा प्रश्न खासदार अरविंद सावंत यांनी उपस्थित केला.
3 वर्षांपूर्वी -
राज्यातील जिल्ह्यांना पालकमंत्री देऊ न शकलेल्या शिंदे सरकारमधील उद्योग मंत्री म्हणाले, वेदांता पेक्षा मोठा प्रकल्प राज्याला देऊ
Minister Uday Samant | राज्यामध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाल्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने नवे सरकार राज्यात आले. जवळपास ही उलथापालथ होऊन तीन महिन्याचा काळ उलटत आहे. मात्र, नवे सरकार येताच जुन्या कामांना स्थगिती देण्यात आली. याशिवाय जिल्हा वार्षिक नियोजन खर्चाला मज्जाव केल्याने विकासाला ब्रेक लागला आहे. ऐन पावसाळ्यात सरकारचा गाडा चिखलात रुतल्याची गट निर्माण झाली आहे. त्यातच जिल्ह्याला पालकमंत्री जाहीर होत नसल्याने अनेक निर्णय घेण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा ताटकळत बसली आहे. एकाबाजूला राज्यातील जिल्ह्यांना पालकमंत्री न देऊ शकलेल्या शिंदे सरकारमधील मंत्र्यांची केविलवाणी वक्तव्य येतं आहेत.
3 वर्षांपूर्वी