Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
ते सध्या काय करत आहेत? | म्हणाले, पक्षाने माझ्याकडे हरियाणाची जबाबदारी दिली आहे - विनोद तावडे
मागील २ वर्षांपासून राज्याच्या राजकारणातून जवळजवळ दूर गेलेले भाजपचे माजी मंत्री आणि नेते विनोद तावडे यांनी शुक्रवारी कल्याण पूर्वेत भाजपच्या कार्यक्रमाला हजेरी लावली आहे. यावेळी त्यांनी केलेल्या एका वक्तव्याने पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरु झाली. त्यांनी भाजप आणि मनसे युती याबाबत वक्तव्य केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
भाजपची नवी केंद्रीय टीम | पंकजा मुंडे आणि विनोद तावडे यांची वर्णी
भाजपने आपल्या नवीन केंद्रीय टीमची घोषणा केली आहे. यात महाराष्ट्रातील नेत्यांना संधी देण्यात आली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी भाजपच्या केंद्रीय अधिकाऱ्यांची नावे जाहीर केली. यात पंकजा मुंडे, विनोद तावडे, विजया रहाटकर यांना संधी देण्यात आली आहे. तर खासदार पुनम महाजन यांना वगळण्यात आले आहे. त्यांच्याऐवजी तेजस्वी सू्र्या यांच्यावर युवा मोर्चाची जबाबदारी देण्यात आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
विनोद तावडेंच्या दिल्लीत विराट सभा; महाराष्ट्रात सरकारी शाळा बंद करण्याचा विक्रम
अवघ्या १० दिवसांवर आलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीला भाजपने आता हिंदू-मुस्लीम आणि भारत-पाकिस्तान असाच रंग देण्याची पुरेपूर योजना आखली आहे. त्यात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी सोमवारी आपल्या प्रचारसभेत भाजप समर्थकांना ‘गोली मारो’च्या घोषणा द्यायला उद्युक्त केल्यानंतर, मंगळवारी दिल्लीचे लोकसभेतील खासदार प्रवेश वर्मा यांनीही दिल्लीत भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यास आपल्या मतदारसंघातील सरकारी जमिनींवरील सर्व मशिदी हटविण्याची घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीनवेळा युद्धात पराभूत झालेल्या पाकिस्तानला हरवायला ३ दिवसही लागणार नाहीत, अशी ग्वाही एनसीसीच्या विद्यार्थ्यांना संबोधित करताना दिली.
5 वर्षांपूर्वी -
त्यांनी आत्मचिंतन आणि स्वतःशी बोलण्यासाठी वेळ हवा असल्याचं सांगितलं: विनोद तावडे
भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आणि माजी महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या फेसबुक पोस्टनंतर राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे (Pankaja Munde on her Facebook Post). भारतीय जनता पक्षाचे नेते राम शिंदे आणि विनोद तावडे यांनी देखील आज पंकजा मुंडे यांची रॉयल स्टोन बंगल्यावर भेट घेतली. त्यामुळे पंकजा मुंडे आपल्या पुढील वाटचालीबद्दल नेमकी काय घोषणा करणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे. त्यातच आज पंकजा मुंडे यांनी माध्यमांसमोर येऊन आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी आत्मचिंतनासाठी आणि स्वतःशी बोलण्यासाठी वेळ हवा असल्याचं सांगितलं.
5 वर्षांपूर्वी -
मुंबईत शिवसेनेच्या आमदारांना पोलीस संरक्षण लागत ही चिंतेची बाब: विनोद तावडे
राज्यातल्या सत्तास्थापनेच्या घडामोडींना आज वेग आला आहे. भारतीय जनता पक्षाच्या बैठका एकीकडे सुरू असतानाच दुसरीकडे काल शिवसेनेच्या आमदारांचीही बैठक पार पडली. अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदासह सत्तेतल्या समान वाटपावर शिवसेना ठाम आहे. आमदार फुटू नयेत यासाठी शिवसेनेकडून सावधगिरी बाळगण्यात येत असून सर्व आमदारांना काल रंगशारदा हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते. त्यांच्यावर देखरेख ठेवली जात आहे. ‘मला युती तोडण्याची इच्छा नाही; पण जे ठरलंय तेच व्हावं. आमची बाकी काही अपेक्षा नाही,’ अशी आपली भूमिका उद्धव ठाकरे यांनी आधीच स्पष्ट केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
भाजपने माझं तिकीट का कापलं तेच कळत नाही? तावडेंच्या प्रचारात सुद्धा तोच मुद्दा
विधानसभेसाठी भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने अनेकांची उमेदवारी नाकारून आयारामांना संधी दिली आहे. यामुळे अनेक मतदारसंघामध्ये नेत्यांनी बंड पुकारलं होतं. मात्र भारतीय जनता पक्षाने त्यांच्यावर प्रचाराची धुरा देत बंड थंड केलं आहे. भारतीय जनता पक्षाने एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे, प्रकाश मेहता यांचा पत्ता कट केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
पूरग्रस्तांसाठी ११० डबे घेऊन फिरणाऱ्या गरीब तावडेंच्या सौजन्याने एस्सेल वर्ल्ड ऑफर
कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील पुरग्रस्तांसाठी भाजपच्यावतीने बोरिवली विधानसभा मतदारसंघात आज मदतफेरीचे आयोजन करण्यात आले होते. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री विनोद तावडे तसेच खासदार गोपाळ शेट्टी मदतफेरीमध्ये सहभागी झाले होते. त्यांच्या समवेत बोरिवली विधानसभा मतदारसंघातील नगरसेवक, नगरसेविका यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
6 वर्षांपूर्वी -
तिवरे धरणफुटी: कोकणचे नेते असून देखील मंत्री विनोद तावडे तिकडे फिरकलेच नाहीत
तीन दिवसांपूर्वी कोकणातील चिपळूण येथे झालेल्या तिवरे धरण फुटीच्या घटनेनंतर त्यात शिवसेनेतील स्थानिक आमदारच कॉन्ट्रॅक्टर असल्याचं चौकशीत बाहेर आलं होतं. तसेच प्रत्यक्ष घटनास्थळी धाव घेणाऱ्या मंत्री तानाजी सावंत यांनी स्थानिकांसोबत केलेल्या वरवरच्या चर्चेअंती सर्व दोष खेकड्यांना दिला होता आणि त्यानंतर राज्यभर संताप व्यक्त करण्यात येत आहे.
6 वर्षांपूर्वी -
कोचिंग क्लासेसचे मालक व विनोद तावडेंमध्ये मोठी आर्थिक देवाणघेवाण: राष्ट्रवादीचा आरोप
खाजगी कोचिंग क्लासेसचे मालक आणि राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यामध्ये मोठया प्रमाणात आर्थिक देवाणघेवाण झाल्याने खाजगी शिकवणीबाबतचा मसुदा तयार असून देखील तो मंत्रालयात केवळ धूळखात पडून असल्याचा थेट आरोप एनसीपीचे नेते व माजी मंत्री अनिल देशमुख यांनी जाहीर पत्रकार परिषदेत केला आहे. तसेस याकडे शिक्षणमंत्री विनोद तावडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत असून यामध्ये मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून खाजगी शिकवणी मसुद्याला तात्काळ मंजुरी द्यावी, अशी मागणी देखील अनिल देशमुख यांनी केली.
6 वर्षांपूर्वी -
फायदा भाजपला होणार मग तो खर्च भाजपच्या नावावर टाका, नेटिझन्सची तावडेंवर टोलेबाजी
राज ठाकरेंनी घेतलेल्या सभांचा आम्हाला फायदा झाला, असे वक्तव्य शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी खाजगी वृत्तवाहिनीशी बोलताना केले आहे. त्यामुळे राज्यातील ४८ पैकी ३७ ते ४० जागा आम्ही जिंकू असा दावा तावडे यांनी केला होता.
6 वर्षांपूर्वी -
तावडेंनी हे का लपवलं? स्वतःवरील घोटाळ्याच्या आरोपासंबंधित बातम्या त्या पाकिस्तानी वेबसाईटवर आहेत
भारतीय जनता पक्ष समर्थकांनी एका फेसबूक पेजवर चिले कुटुंबियांचा फोटो त्यांना न विचारताच वापरत मोदी सरकारचे लाभार्थी म्हणून झळकवले असल्याची पोलखोल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होती. मात्र या सगळ्याबाबत प्रतिक्रीया देताना शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मनसे, चिले कुटुंबियांचा पाकिस्तानशी थेट संबंधच जोडला.
6 वर्षांपूर्वी -
VIDEO: राज यांचं पाकिस्तानशी नातं काय विचारणारे तावडे तुलसी जोशींच्या उत्तराने तोंडघशी
काल मुंबई भांडुप येथे राज ठाकरे यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी देखील राज ठाकरे यांनी मोदींना विशेष लक्ष केलं. दरम्यान, राज ठाकरे यांच्या सभेत पुन्हा तेच भाजप समर्थकांच्या फेसबुक पेजवरील जाहिरातीतील कुटुंब पुन्हा समोर आणण्यात आलं आणि त्यांनी अधिक खुलासा देखील केला.
6 वर्षांपूर्वी -
विनोद तावडेंचे राज ठाकरेंना चॅलेंज, 'कट-पेस्ट' चं राजकारण सोडून ठोस भूमिका घ्यावी
मुंबई: साऱ्या महाराष्ट्रालाच नाही तर जगभरातील मराठी माणसांना आपल्या भाषणाने मंत्रमुग्ध करणाऱ्या राज ठाकरेंना विनोद तावडेंनी खास टोला लगावला आहे. विनोद तावडेंनी राज ठाकरेंना थेट आव्हान देत ‘कट-पेस्ट’ चं राजकारण सोडून काहीतरी ठोस भूमिका घ्या असं म्हटलं आहे. तसंच पुढे ते म्हणाले राज ठाकरेंनी त्यांचा माणूस आमच्या सोबत पाठवावा मग आम्ही त्यांना गावाची दुसरी बाजू दाखवू.
6 वर्षांपूर्वी -
निवेदन असं उभं राहून स्वीकारतात? तावडेंचा 'स्टॅन्ड अप कॉमेडी' विनोदी फोटो व्हायरल
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभा म्हणजे स्टँड अप कॉमेडी शो आहेत असं म्हणत राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी राज ठाकरेंच्या भाषणाची खिल्ली उडवली आहे. शुक्रवारी नांदेडमध्ये शो पार पडला आता लवकरच महाराष्ट्रात आणखी काही ठिकाणी त्यांचे स्टँड अप कॉमेडी शो पार पडणार आहेत, असं विधान देखील तावडे यांनी उपरोधाने म्हटले आहे.
6 वर्षांपूर्वी -
राज ठाकरेंना मोदींच्या मुद्यावरून विचलित करण्याची राज्यातील नेत्यांची रणनीती?
मागील काही महिन्यापासून राज ठाकरे यांनी केवळ नरेंद्र मोदी आणि अमित शहा या देशपातळीवरील नेत्यांना लक्ष करण्याचं एकमेव ध्येय ठेवलं आहे. त्यात ते अनेक व्हिडिओ पुरावे दाखवून मोदींना लक्ष करत असल्याने मोदींच्या अडचणीत वाढताना दिसत आहेत. त्याचा थेट परिणाम राज्यातील नेत्यांवर देखील होताना दिसत आहे. त्याचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना बारामतीचा पोपट असा उल्लेख करत त्यांची खिल्ली उडविण्याचा प्रयत्न केला, मात्र पुढे कार्यकर्त्यांना म्हणाले की त्यांच्या भाषणाने तुम्ही विचलित होऊ नका.
6 वर्षांपूर्वी -
शिक्षणमंत्र्यांचं गणित बघा; ७००० गुणिले १२ बरोबर ७२ हजार?
महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री विनोद तावडे पुन्हा एकदा सामान्यांच्या टीकेचे लक्ष झाले आहेत. ययाधी ते त्यांच्या पदवीवरून तर कधी त्यांच्या शिवराळ भाषेवरून नेहमीच वादात अडकले आहेत. आज पुन्हा पालघरमध्ये काँग्रेसच्या न्याय योजनेचा गुणाकार उपस्थितांन समोर करत असताना स्वतःच गणित देखील कच्च असल्याचं दाखवून दिलं आहे. त्यावरून उपस्थितांमध्ये तावडेंच्या शिक्षणावरून पुन्हा कुजबुज सुरु झाली होती.
6 वर्षांपूर्वी -
पालकांसाठी बुरे दिन! यावर्षी स्कूल बसचे दर १० ते १५ टक्क्यांनी वाढणार
स्कूल बस मालक संघटनेने वाढलेल्या महागाईचे कारण पुढे करत स्कूल बसच्या दरात आगामी शैक्षणिक वर्षापासून दहा ते पंधरा टक्के दरवाढीची घोषणा केली आहे. २०१९-२० या शैक्षणिक वर्षासाठी मालक संघटनेने जाहीर केलेल्या धोरणातून ही माहिती पुढे आली आहे. दरम्यान, संघटनेचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी सांगितले की, डिझेलसह बसचा विमा, कर्मचाऱ्यांचे वेतन, बसचा देखभाल खर्च वाढला आहे असं स्पष्ट केलं. याशिवाय मुंबईतील वाढत्या वाहतूक कोंडीमुळे बस मालकांच्या खर्चात वाढ झाली आहे. तसेच महाराष्ट्र शासनाने सुरक्षेच्या नावाखाली आणलेल्या नव्या नियमावलीमुळेही बस मालकांचे बजेट कोलमडले आहे. परिणामी, २०१९-२० या येत्या शैक्षणिक वर्षापासून स्कूल बससाठी दहा ते पंधरा टक्के दरवाढ केली जाईल.
6 वर्षांपूर्वी -
VIDEO: मोदी'लाटे पुर्वी विधानपरिषदेसाठी कृष्णकुंजचे उंबरठे झिजवले, आज आव्हान?
रंग शारदामध्ये नेहमी नाटकाचे प्रयोग होतात तसाच १ नाटकाचा प्रयोग काल झाला आणि तो म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतलेला पदाधिकारी मेळावा अशी टीका राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केली आहे. पुढे ते असेही म्हणाले मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंचा उल्लेख बारामतीचा पोपट असा केला होता आणि ते अधोरेखित करणारे त्यांचे आजचे भाषण होते.
6 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रातील शिक्षकांना 'वंदे गुजरात' या गुजराती वाहिनीवरून प्रशिक्षणाचा 'विनोदी' घाट
काही दिवसांपूर्वी इयत्ता ८ वीच्या पुस्तकात गुजराती भाषेत मजकूर छापून आल्याचे गंभीर प्रकरण अजून ताजे असताना त्यात अजून एका शैक्षणिक ‘विनोदी’ निर्णय घेण्यात आला आहे. आता महाराष्ट्रातील शिक्षकांना थेट ‘वंदे गुजरात’ या गुजराती वाहिनीवरून प्रशिक्षण देण्याचा “अति विनोदी” घाट महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाने घातला आहे.
7 वर्षांपूर्वी -
शिक्षण विभागाची 'डिजिटल'माघार, बारावीचे प्रवेश यंदा ऑफलाइनच
शालेय शिक्षण विभागाने गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही माघार घेत बारावीच्या ऑनलाइन प्रवेशाची तयारी नसल्याने, बारावीचे प्रवेश प्रक्रिया पुन्हा ऑफलाइन करण्याचे आदेश दिले आहेत. सरकारच्या शालेय शिक्षण विभागाची ‘डिजिटल’ म्हणजे ऑनलाइन प्रवेश घेण्याची तयारी नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
7 वर्षांपूर्वी