Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
चाकरमानी कोकणात निघाला | तिकडे दापोलीसहित अनेक ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात
दापोलीत रात्रभर मुसळधार पाऊस झाला असून शहरातील विविध ठिकाणी आणि मुख्य रस्त्यांवर पाणी साचलं आहे. दापोलीतीलकेळकर नाका, शिवाजीनगर, भारत नगर, नागर गुडी, प्रभू आळी, जालगाव खलाटी या परिसरात सुमारे पाच फुटाने पावसाचे पाणी वाढल्याने अनेक घरांमध्ये हे पाणी शिरलेले आहे. त्यामुळे रत्नागिरी आणि चिपळूण परिसरात एनडीआरएफचे २५ जवान आणि ४ बोटीसह पथक दाखल झालेले आहे.
4 वर्षांपूर्वी -
Rain Alert | पश्चिम महाराष्ट्र, विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा | पुढील ५ दिवस कुठं पाऊस पडणार?
प्रादेशिक हवामान विभागानं पुढील पाच दिवसांसाठी महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज जारी केला आहे. हवामान विभागाच्या अंदाजनुसार पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. राज्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे. ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ के.एस. होसाळीकर यांनी याबाबत ट्विट केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
Mumbai Rain | मुंबईत आज मुसळधार पावसाचा अंदाज | या ठिकाणीही अंदाज
महाराष्ट्रात आज काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईच्यावतीनं हा इशारा देण्यात आला आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात पाऊस पडतोय. उत्तर कोकणात ठाणे , पालघर आणि मुंबई मध्ये मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईच्या शुभांगी भुते यांनी वर्तवला आहे.
4 वर्षांपूर्वी -
पुढील ४८ तासांत या जिल्ह्यांत पावसांचा जोर वाढणार | या जिल्ह्यांसाठी अलर्ट
महाराष्ट्रात मागील आठवड्यात झालेल्या पावसाने पूर आला होता. अनेक जिल्ह्यात हाहाकार उडाला होता. मात्र, आता पावसाने विश्रांती घेतल्यानं पूरग्रस्त जिल्ह्यांतील जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच हवामान विभागाने पुन्हा पावसाचा इशारा दिला आहे. रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, साताऱ्यासह पुराच्या फटक्यातून सावरत असलेल्या जिल्ह्यांवर पुन्हा एकदा मुसळधार पावसाचं संकट ओढवण्याची शक्यता आहे.
4 वर्षांपूर्वी -
High Alert | मुंबईकरांसाठी हवामान खात्याकडून रेडअलर्ट | पुढील ३-४ तास धोक्याचे
हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील तीन दिवस मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो. आज सकाळपासून मुंबई आणि उपनगराच्या परिसरात वेगवान वाऱ्यांसह पावसाला पुन्हा सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांमधील सततच्या पावसामुळे मिठी नदी सध्या तुडुंब भरून वाहत आहे. अशातच बुधवारी सकाळी 9 वाजून 56 मिनिटांनी समुद्राला मोठी भरती येणार आहे. या काळात पाऊस सुरुच राहिल्यास मुंबई पुन्हा एकदा जलमय होण्याची शक्यता आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुंबईकरांनो काळजी घ्या | हवामान विभागाकडून शहरात अतिवृष्टीचा इशारा
मुंबईसह कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये पुढील ४ दिवसांमध्ये अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्याचा प्रत्यय मुंबईत पहायला मिळाला. सोमवारी रात्रीपासून मुंबईच्या अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली. ज्यामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याचं चित्र पहायला मिळालं.
4 वर्षांपूर्वी -
मान्सून अंदमानात दाखल | उन्हाळा विसरा, पावसाळा वेळेआधीच सुरु होणार
तौते चक्रीवादळाने अतिरौद्र रूप धारण मागील दोन दिवस ३-४ राज्यांमध्ये प्रचंड नुकसान केल्याचं पाहायला मिळालं. एकाबाजूला वादळ काही तास किंवा दिवसभर घोंघावुन संपेल आणि पुन्हा कडक उन्हाळा अंगावर झेलावे लागेल असे अंदाज बांधले गेले. मात्र जून ६ ते १२ जूनपर्यंत अंदमानमध्ये हजर होणारा मान्सून सर्वांचे अंदाज चुकवून २-३ दिवसात तेथे दाखल होणार असल्याचा निष्कर्ष हवामान खात्याने वर्तविला आहे.
4 वर्षांपूर्वी -
ताैक्तेे चक्रीवादळाचा धोका | अमित शहा आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा
गुजरात आणि महाराष्ट्रासहित पाच राज्यांवर अरबी समुद्रात तयार होत असलेल्या ‘ताैक्तेे’ चक्रीवादळाचा धोका आहे. हवामान विभागानुसार हे वादळ गुजरातच्या दिशेने पुढे सरकत १८ मे रोजी गुजरातेतील द्वारका येथे धडकण्याची शक्यता आहे. परिणामी राज्यात आज कोकण, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, मराठवाडा व विदर्भात सोसाट्याचा वारा, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
4 वर्षांपूर्वी