हार्ड लँडिंग'नंतर देखील चंद्रावर 'विक्रम' सुरक्षित

चांद्रयान-२: मोहिमेत अखेरच्या टप्प्यात विक्रम लँडरचा नियंत्रण कक्षाशी असलेला संपर्क तुटला होता. त्यामुळे लँडरचे नेमके काय झाले? हा प्रश्न अनेकांना पडला होता. पण आता इस्रोकडून लँडरबद्दल एक चांगली बातमी समोर आली आहे. विक्रमने चंद्रावर हार्ड लँडिंग केले असले तरी विक्रम लँडरचे काहीही नुकसान झालले नाही. ऑर्बिटरच्या कॅमेऱ्याने जे छायाचित्र पाठवलं आहे, त्यानुसार कळतं की विक्रम नियोजित स्थळाजवळ उभं आहे. ते तुटलेलं नाही.’
हा संपूर्ण लँडर एकसंध असून त्याचे तुकडे झालेले नाहीत असे इस्रोच्या अधिकाऱ्याच्या हवाल्याने इंडिया टुडेने वृत्त दिले आहे. फक्त हा लँडर एकाबाजूला झुकलेला आहे. चंद्राच्या कक्षेत फिरत असलेल्या ऑर्बिटरने पाठवलेला फोटो आणि अन्य डेटाच्या विश्लेषणावरुन ही माहिती समोर आली आहे.
इस्रोच्या अन्य एका अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, जर विक्रम लँडरचा एक जरी भाग निकामी झाला असेल तरी संपर्क साधणं कठीण होईल. पण आतापर्यंतची स्थिती चांगली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ते म्हणाले, ‘आम्हाला जियोस्टेशनरी ऑर्बिटमध्ये हरवलेलं एक स्पेसक्राफ्ट शोधण्याचा अनुभव आहे. पण विक्रम चंद्राच्या पृष्ठभागावर आहे. तेथे तशी ऑपरेशन फ्लेक्झिबिलीटी नसल्याने आम्ही त्याला जागेवरून हलवू शकत नाही. जर त्याच्या अँटिनाची दिशा ग्राउंड स्टेशन किंवा ऑर्बिटरकडे असेल तर आमचं काम सोपं होईल.’ विक्रम ऊर्जा वापरत आहे, मात्र त्यावर सौर पॅनल लावल्याने त्याची चिंता नाही.
शास्त्रज्ञांनी सांगितलं होतं की, लँडरशी संपर्क तुटल्यानं मोहिमेला 5 टक्के इतकाच धक्का बसला आहे. तर 95 टक्के काम सुरू राहणार आहे. 5 टक्क्यांमध्ये लँडर विक्रम आणि रोव्हर प्रज्ञान यांच्याशी संपर्क तुटला आहे. यामुळं चंद्राच्या पृष्ठभूमीची माहिती मिळणार नाही. मात्र ऑर्बिटरच्या सहाय्यानं इतर माहिती मिळत राहणार आहे. चांद्रयान 2 चा ऑर्बिटर चंद्राभोवती फिरत राहणार आहे.
ज्या रोव्हरचा संपर्क तुटला आहे तो चंद्राच्या भूमीवर उतरल्यानंतर फक्त 14 दिवस काम करू शकतो. तर ऑर्बिटर मात्र एक वर्षभर काम करत राहणार आहे. ऑर्बिटर चंद्राचे अनेक फोटो काढून इस्त्रोला पाठवणार आहे. ऑर्बिटरकडून लँडरची माहिती सुद्धा मिळवता येईल. ऑर्बिटरनं लँडर विक्रमचे फोटो पाठवल्यानंतर त्याचे विश्लेषण केल्यानंतर नेमके कारण समजू शकेल.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं