IT'बाबत स्थायी संसदीय समितीने पेगासस प्रकरणी केंद्राकडे अहवाल मागवला | संसदीय समितीतही भाजपचे बहुमत

नवी दिल्ली, 22 जुलै | आयटीबाबत स्थायी संसदीय समितीने पेगासस प्रकरणावर केंद्राकडे अहवाल मागितला आहे. काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या अध्यक्षतेखालील ही समिती आयटी व गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांना पेगाससच्या माध्यमातून नेते, पत्रकार व इतरांवर पाळत ठेवल्याच्या बाबतीत प्रश्न विचारेल. समितीची बैठक २८ जुलैला होईल. यात दोन्ही मंत्रालयांच्या प्रमुख अधिकाऱ्यांना पाचारण केले आहे. समितीच्या बैठकीचा अजेंडा ‘नागरिकांची डेटा सुरक्षा व गोपनीयता’ हा आहे.
सूत्रांनुसार, समितीचा पहिला उद्देश हेरगिरी झाली की नाही, झाली असेल तर कुणी केली हे जाणून घेणे आहे. भारताच्या सरकारी संस्था पेगासस स्पायवेअर वापरतात का? असतील तर आजवर कुणावर पाळत ठेवण्यात आली? त्याचा निर्णय कोणत्या आधारे घेतला, आदींची चौकशी होईल. थरूर यांनी या प्रकरणाची सविस्तर चौकशी सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींमार्फत करण्याची मागणीही केली.
संसदीय समितीतही भाजपचे बहुमत:
शशी थरूर यांच्या अध्यक्षतेखालील आयटी घडामोडींच्या संसदीय स्थायी समितीत लोकसभेचे २१ आणि राज्यसभेचे ११ सदस्य आहेत. यापैकी १७ भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांचे स्वतंत्र सदस्य आहेत. समितीतील भानुप्रताप सिंह वर्मा आणि निशिथ प्रमाणिक यांना ७ जुलैरोजी मंत्रिपद मिळाले आहे. यामुळे समितीत आता दोन जागा रिक्त आहेत.
प्रकरणाची स्वतंत्रपणे चौकशी केली जावी: एडिटर्स गिल्ड
एडिटर्स गिल्ड ऑफ इंडियाने सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीत पेगासस प्रकरणाच्या स्वतंत्रपणे चौकशीची मागणी केली. पाळत ठेवण्याचे कृत्य दाखवते की पत्रकारिता आणि राजकीय असहमतीला ‘दहशतवादा’प्रमाणे गणले जात असल्याचे गिल्डने म्हटले अाहे. स्पायवेअर निर्मात्या एनएसओ कंपनीने म्हटले की, पुरावे मिळाले तर चौकशी करू, पण मीडियाच्या प्रश्नांना उत्तरे देणार नाही.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: Congress leader Shashi Tharoor no need for JPC into Pegasus IT panel will do its duty news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं