Facebook To Rebrand Itself as Metaverse Company | फेसबुक कंपनीचं नाव बदलण्याचा विचार करतंय?

मुंबई, २० ऑक्टोबर | फेसबुक सध्या अनेक अंतर्गत समस्यांचा सामना करत असल्याने, कंपनी त्यांच्या एकूण व्यवसायात आणि काम करण्याच्या पद्धतींमध्ये बदल करण्याचा गंभीरपणे विचार करत असल्याचं (Facebook To Rebrand Itself as Metaverse Company) वृत्त आहे. त्यासाठी कंपनीने प्रथम कंपनीचे रिब्रान्ड अर्थात फेसबुक आयएनसी या नावात बदल करण्याची योजना आखत असल्याचं वृत्त आहे . याबाबत द वेर्जने वृत्त दिलं आहे.
Facebook To Rebrand Itself as Metaverse Company. Facebook Inc., facing intense scrutiny over its business practices, is planning to rebrand the company with a new name that focuses on the metaverse, according to The Verge :
कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग कंपनीच्या कनेक्ट कॉन्फरन्समध्ये 28 ऑक्टोबर रोजी नाव जाहीर करण्याची अपेक्षा आहे, असे वेबसाइटने मंगळवारी म्हटले आहे. मात्र फेसबुक प्रवक्त्याने प्रतिक्रिया देण्यास नकार देताना ही अफवा असल्याचं सांगताना अधिक बोलण्यास नकार दिला आहे.
अगदी 2004 मध्ये सोशल नेटवर्कची स्थापना करणारे झुकरबर्ग यांनी म्हटले होते की फेसबुकच्या भविष्याची गुरुकिल्ली मेटावर्स संकल्पनेमध्ये आधारित असेल आणि आमचे वापरकर्ते भविष्यात व्हर्च्युअल विश्वामध्ये राहतील, काम करतील आणि अनेक विषयांवर काम करतील असं म्हटलं होतं..
त्यानुसार मेटाव्हर्स पद्दतीने उत्पादने निर्माण करुन वापरकर्त्यांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने हे नाव बदलण्याचा विचार सुरु असल्याचं वृत्त द व्हर्जने मंगळवारी म्हटल्याने यावर चर्चा सुरु झाली आहे. फेसबुक कंपनीचा संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग या विषयावर कंपनीच्या वार्षिक सभेमध्ये बोलणार असल्याची माहिती समोर येत आहे. २८ ऑक्टोबर रोजी ही बैठक होणार आहे. मात्र त्याआधीच यासंदर्भातील निर्णय घेतला जाण्याची शक्यता व्हर्जच्या वृत्तामध्ये व्यक्त करण्यात आलीय.
मेटाव्हर्सचा अर्थ असा की, ‘व्हर्चूअल विश्वाला अधिक प्राधान्य देण्याची भूमिका जेथे इंटरनेटच्या माध्यमातून लोक जेव्हा व्हर्चूअल विश्वामध्ये भ्रमंती करतात त्याला मेटाव्हर्स असं म्हणतात. यामध्ये डिजीटल स्पेसचाही समावेश होतो. डिजीटल स्पेस म्हणजेच व्हर्चूअल रिअॅलिटी आणि ऑगमेन्टेट रिअॅलिटीसारख्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उभं केलेलं आभासी जग. याच आभासी जगाला डिजीटल स्पेस असं म्हटलं जातं.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही.
News Title: Facebook To Rebrand Itself as Metaverse Company according to The Verge report.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं