टिकटॉक स्टार्सना बेरोजगारीची जाणीव होणार, टिकटॉक सह अनेक चायनीज अँप्स भारतात बॅन

नवी दिल्लीः भारतीय तरुणाई त्यांच्या आयुष्यातील बराच वेळ निरनिरळ्या अँप’मध्ये वाया घालवत असल्याचं समोर आलं होतं. देशात एक आधुनिक बेरोजगारीचा प्रकार तोंडवर काढत असल्याचं अनेकांनी यापूर्वीच म्हटलं आहे. केवळ नकोत्या फिल्मी चमकोगिरीसाठी तरुण-तरुणी त्यांच्या आयुष्यातील अमूल्य वेळ TikTok सारख्या अँप’वर वाया घालवत असून, त्याचे भविष्यात अनेक तोटे समोर येण्याची शक्यता आहे.
चीन मधील सरकार स्वतःच्या देशात अगदी गुगल’पासून अनेक अँप आणि वेबसाइट्स’ना बंदी घालत असलं तरी तिथल्या कंपन्या भारतातील चमकोगिरी तरुणाईचा अभ्यास करून, त्याप्रकारचे अँप्स लाँच करून स्वतःकडे आकर्षित करत आहेत. त्यामुळे देशातील सर्वच थरातील तरुणाई टिकटॉकच्या आहारी गेली असून TikTok म्हणजे त्यांचं आयुष्यच बनलं आहे असंच म्हणावं लागेल. अनेक जण तर त्यावर “TikTok स्टार्स” म्हणून प्रसिद्धीस येऊ लागल्याने या फिल्मी प्रकाराची अनेकांना मोहिनी घातली आहे असंच म्हणावं लागेल.
कारण शॉर्ट व्हिडिओ मेकिंग अँप टिकटॉक भारतात खूप प्रसिद्ध आहे. भारतीय युजर्स TikTok वर २०१८ च्या तुलनेत ६ पट अधिक वाढले आहे. टिकटॉकवर भारतीय अधिक वेळ खर्च केला. २०१९ मध्ये भारतीयांनी ५.५ अब्ज तास टिकटॉकवर खर्च केले आहेत. मोबाइल आणि डेटा एनालिटिक्स फर्म App Annie च्या माहितीनुसार, अँड्रॉयड युजर्सने २०१८ मध्ये एकूण ९०० मिलियन (९ कोटी) तास टिकटॉकवर घालवले. टिकटॉकने सध्या प्रतिस्पर्धी फेसबुकला मागे टाकले आहे.
डिसेंबर २०१९ मध्ये टिकटॉकच्या महिन्याला अॅक्टिव युजर्सची संख्या ८१ मिलियन झाली. डिसेंबर २०१८ च्या तुलनेत ही ९० टक्के वाढली होती. टिकटॉक हे चीननंतर सर्वात जास्त भारतात वापरले जाते. २०१९ मध्ये फेसबुकवर भारतीय लोकांनी २५.५ अब्ज तास घालवले. याआधी ही केवळ १५ टक्के वाढ होती. तसेच डिसेंबर २०१९ मध्ये महिन्याला एक्टिव युजर्सची संख्या सुद्धा १५ टक्के वाढ झाली होती. एकूण वेळापैकी TikTok जरी फेसबुकपेक्षा पाठीमागे असेल. परंतु, एक वर्षाआधीच्या तुलनेत यात प्रचंड वाढ झाली आहे. टिकटॉक अॅप सप्टेंबर २०१७ मध्ये लाँच करण्यात आले होते. जगभरातील सर्वात मौल्यवान स्टार्टअप कंपनी ByteDance टिकटॉकची पॅरंट कंपनी आहे. भारतीय युजर्स टिकटॉकवर २०१८ च्या तुलनेत ६ पट अधिक वाढले. टिकटॉकवर भारतीय अधिक वेळ खर्च करीत आहेत. २०१९ मध्ये भारतीयांनी ५.५ अब्ज तास टिकटॉकवर खर्च केले आहेत.
तत्पूर्वी, टिकटॉक अँप’मुळे मुलांवर वाईट संस्कार होतात असा दावा करत मुंबई उच्च न्यायालयात टिकटॉक विरुद्ध जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. हीना दरवेश नामक या मुंबईतील महिलेने मुंबई उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली होती. हीना यांनी TikTok मुळे जागतिक पातळीवर भारताचं नाव खराब होत असल्याचं देखील म्हटल होतं.
Web Title: Indian users spent their 5 5 Billion hours on Tiktok App in 2019.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं