चांद्रयान-२: ९८ टक्के यश मिळाल्याचा दावा हास्यास्पद: इस्रोचे वैज्ञानिक सल्लागार तपन मिश्रा

बंगळुरू: मागील काही दिवसांपासून मिशन चांद्रयान-२ विषय तापता ठेवण्यात आला आहे. मात्र के.सिवान यांचे दावे एकूण इस्रोचे वैज्ञानिक देखील संतापल्याचे पाहायला मिळत आहे. राजकारण्यांनी वैज्ञानिकांच्या आडून स्वतःचा प्रचार करून घेतल्याचं यापूर्वीच अनेकांनी म्हटलं आहे. भाजपने देखील या मिशनवरून स्वतःचा प्रचार करून घेतले. त्यात मागील अनेक दिवसांपासून दावे प्रति दावे करण्यात येत होते. मात्र काही दिवसांपूर्वी इस्रोच्या अध्यक्षांकडून गौतम अदानी यांच्या खाजगी कंपनीला तब्बल २७ सॅटेलाईट बनविण्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आणि हे मिशन फेल होऊन देखील का पेटत ठेवण्यात आलं याचा अंदाज सर्वांना आला. मात्र आता इस्रोतील वैज्ञानिकांचे अप्रत्यक्ष आरोप समोर येऊ लागल्याने वेगळीच चर्चा रंगल्याचे पाहायला मिळत आहे.
इस्रोचे अध्यक्ष के. सिवन यांनी शनिवारी चांद्रयान-२ मोहिम ९८ टक्के यशस्वी ठरली असा दावा केला. त्यांच्या या दाव्यावर वरिष्ठ वैज्ञानिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. एका वैज्ञानिकाने सोशल मीडिया अकाऊंटवरुन नेतृत्व आणि रॉकेट सायन्स या विषयांबद्दल आपले विचार मांडले आहेत. सखोल आत्मपरीक्षणाशिवाय असे दावे केल्यामुळे जगासमोर आपण हसण्याचा विषय बनत आहोत असे मत एका वरिष्ठ अवकाश संशोधकाने व्यक्त केले.
चांद्रयान-२ मधील विक्रम लँडरचे जास्त वेगामुळे चंद्रावर क्रॅश लँडिंग झालेले असू शकते अशी शक्यता इस्रोमधील सूत्रांनी व्यक्त केली. चंद्रावरील लँडिंग हा मोहिमेतील महत्वाचा टप्पा होता. तपन मिश्रा यांची समाज माध्यमांवर पोस्ट रविवारी चर्चेचा विषय ठरली. त्यांनी नाव न घेता के.सिवन यांना टोला लगावला.
नेमकं काय म्हटलं आहे तपन मिश्रा यांनी फेसबुक पोस्टवर?
“नेते प्रेरणा देतात, ते मॅनेज करत नाहीत, ” असे मिश्रा यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. तपन मिश्रा अहमदाबादच्या स्पेस अप्लिकेशन सेंटरचे संचालक होते. सिवन यांची इस्रोच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांना या पदावरुन हटवण्यात आले. अचानक नियमांचे पालन करण्यामध्ये वाढ झाली. वारंवार बैठका होऊ लागल्या. कागदपत्रांचा वापर वाढला तर संस्थेमध्ये नेतृत्व दुर्मिळ होत चालल्याचे ते लक्षण आहे. नवीन काही शोधण्याचा ध्यास थांबला की वेळेबरोबर संस्थेचा विकासही होत नाही असे मिश्रा यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
चंद्र मोहिमेत तज्ञ असलेल्या एका अवकाश वैज्ञानिकाने नाव न छापण्याच्या अटीवर मिशनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे सांगितले. चांद्रयान-२ मोहिमेत पाच थ्रस्टरऐवजी सिंगल थ्रस्टर वापरला असता तर टेक्नॉलॉजी हाताळण्यासाठी खूप सोपी ठरली असती.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं