महत्वाच्या बातम्या
-
पासवर्ड बदला! फेसबुकवर तब्बल ५ कोटी अकाऊंट हॅक, सर्वाधिक भारतीय अकाउंट
फेसबुकवरील तब्बल पाच कोटी अकाऊंट हॅक झाल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे हॅक झालेल्या अकाऊंटमध्ये सर्वाधिक भारतीय अकाऊंटचा समावेश असल्याची माहिती पुढे येत आहे. हॅकर्सनी फेसबुकच्या “View As” या सुविधेच्या सुरक्षेतील उणीवांचा नेमका फायदा उचलत फेसबुक अकाऊंट हॅक केल्याची माहिती स्वतः कंपनीचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी प्रसिद्ध केली आहे.
7 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रातील शिक्षकांना 'वंदे गुजरात' या गुजराती वाहिनीवरून प्रशिक्षणाचा 'विनोदी' घाट
काही दिवसांपूर्वी इयत्ता ८ वीच्या पुस्तकात गुजराती भाषेत मजकूर छापून आल्याचे गंभीर प्रकरण अजून ताजे असताना त्यात अजून एका शैक्षणिक ‘विनोदी’ निर्णय घेण्यात आला आहे. आता महाराष्ट्रातील शिक्षकांना थेट ‘वंदे गुजरात’ या गुजराती वाहिनीवरून प्रशिक्षण देण्याचा “अति विनोदी” घाट महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाने घातला आहे.
7 वर्षांपूर्वी -
सज्ज व्हा! 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स'मुळे जगभरातल्या करोडो नोकऱ्या धोक्यात
आधीच जागतिक स्तरावरील नोकऱ्यांची कमतरता असताना आता ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’मुळे म्हणजे तंत्रज्ञानाच्या ऑटोमेशनमुळे रोजगारांवर मोठं संकट येण्याची शक्यता आहे. कारण याच ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’मुळे जगभरातील ७ कोटींपेक्षा अधिक जणांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागू शकतात, असा अहवाल एका जग विख्यात संस्थेने प्रसिद्ध केला आहे.
7 वर्षांपूर्वी -
अनुभव नसलेल्या अनिल अंबानींच्या कंपनीला राफेल कंत्राट कसं काय मिळालं? फ्रान्समधील प्रसारमाध्यम
राफेल लढाऊ विमानाच्या कराराविषयी आता फ्रान्समधील प्रसार माध्यम सुद्धा प्रश्नचिन्हं उपस्थित करू लागले आहेत. त्यामुळे मोदी सरकारच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. फ्रान्समधील प्रमुख वृत्तपत्र असलेल्या फ्रान्स-२४ ने भारत आणि फ्रान्समधील संरक्षण क्षेत्राशी संबंधित संवेदनशील करारावर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
7 वर्षांपूर्वी -
देशभरात डिसेंबरपासून 'ड्रोन'चा व्यावसायिक वापर, धोरण निश्चित
देशात लवकरच म्हणजे येत्या डिसेंबर पासून ड्रोन’चा व्यावसायिक पद्धतीने वापर करता येणार आहे. त्याबाबतचे धोरण सरकारने निश्चित केले असून, त्यानुसार सरकारची नवी नियमावली १ डिसेंबरपासून लागू होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
7 वर्षांपूर्वी -
सुप्रीम कोर्टाने व्हॉट्सअॅपला फटकारले
सुप्रीम कोर्टाने इन्स्टंट मेसेजिंग व्हॉट्सअॅपला नोटीस बजावून चांगलेच झापले आहे. व्हॉट्सअॅपला नोटीस बजावून सर्वोच न्यायालयाने प्रश्न विचारला आहे की, ‘अद्याप भारतात तक्रार निवारण अधिकाऱ्याची नेमणूक का करण्यात आलेली नाही?’.
7 वर्षांपूर्वी -
अनिल अंबानींना कर्जाच्या सापळय़ातून वाचवण्यासाठी राफेलचे कंत्राट: राहुल गांधी
जगातील सर्वात मोठ्या संरक्षण खरेदीच्या करारात म्हणजे राफेल लढाऊ जेट विमान खरेदी प्रकरणात भारतीय जनता पक्षाच्या सरकारने कर्जाच्या सापळय़ात अडकलेल्या एका भारतीय उद्योगपतीच्या भल्यासाठी राफेल करारात वाट्टेल ते फेरबदल केले, असा सनसनाटी आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे केला.
7 वर्षांपूर्वी -
राज ठाकरेंपुढे Jio नरमली, आम्ही केबल चालकांना एकत्र घेऊन काम करायला तयार असल्याची हमी
काही दिवसांपूर्वी अनेक केबल संघटनांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर भेट घेऊन जिओ केबलमुळे होणाऱ्या नुकसानाची तसेच अडचणींचा पाढा राज ठाकरे यांच्यासमोर वाचला होता. जिओमुळे त्यांच्यावर बेरोजगारीची कुराड येणार असल्याचे राज ठाकरेंच्या निदर्शनास आणले होते. त्यानंतर मनसेने थेट जिओ कंपनी सोबत पत्रव्यवहार करून त्यांच्यासोबत बैठक आयोजित केली होती.
7 वर्षांपूर्वी -
राफेल करारातील घोटाळ्याबाबत भाष्य करणाऱ्या काँग्रेस नेत्याला अनिल अंबानी समुहाकडून नोटीस
बहुचर्चित राफेल करारातील घोटाळ्याबाबत भाष्य करणारे काँग्रेस नेते तसेच काँग्रेसचे प्रवक्ते जयवीर शेरगिल यांना अनिल धीरुभाई अंबानी समुहाने कायदेशीर नोटीस पाठवली आहे. त्यामुळे अनिल अंबानी समूह सुद्धा काँग्रेसवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे का असा प्रश्न विचारलं जाऊ लागला आहे.
7 वर्षांपूर्वी -
सर्वकाही आधार'शी जोडल्याने भारतावर ‘सिव्हील डेथ’च सावट : एडवर्ड स्नोडेन
अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा माजी कर्मचारी एडवर्ड स्नोडेन याने भारतातील ‘आधार’ संबंधित केलेल्या विधानामुळे खळबळ माजली आहे. भारत सरकारने UIDAI च्या माध्यमातून सार्वत्रिक दक्षता प्रणाली बनवली आहे. परंतु भारत सरकारच्या आधार’ला सर्वकाही जोडण्याच्या सक्तीमुळे भारताला ‘सिव्हिल डेथ’ म्हणजे व्यक्तिस्वातंत्र्याच्या समाप्तीचा धोका असल्याचं विधान केल्याने सर्वांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
केरळ'साठी मदत निधीच्या नावाने पेटीएम'चे मालक विजय शेखर शर्मा यांचं नोटबंदीनंतर पुन्हा प्रोमोशन-ब्रॅण्डिंग
संपूर्ण केरळला पावसाने काही दिवस झोडपले असून सर्वत्र पुराचे साम्राज्य असून त्यात लाखो लोकं बेघर झाले आहेत तर शेकडो लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. केरळला सर्वच थरातून मदत होत असताना त्यात केंद्र सरकार, अनेक राज्य सरकार आणि सामान्यांकडून मदतीचा ओघ सुरु असताना एक कटू अनुभव आल्याचे दृश्य आहे. कारण देशातील एका अब्जाधीशाने अशा संवेदनशील विषयात सुद्धा स्वतःच्या कंपनीचे प्रोमोशन आणि ब्रॅण्डिंग करत हात धुतले आहेत.
7 वर्षांपूर्वी -
भारतातील तंत्रज्ञान आणि डिजिटल इंडियाचे खरे शिल्पकार माजी पंतप्रधान राजीव गांधी
८०च्या दशकात दूरगामी परिमाण करणारी मोठी स्वप्न बघून राजीव गांधी यांनी भारतातील दूरसंचार आणि तंत्रज्ञानाचा खरा अर्थाने पाया रचला होता. केवळ तंत्रज्ञानच नव्हे तर ग्रामीण भागात पिण्याचे पाणी, लसीकरण, साक्षरता, खाद्यतेल, टेलिकॉम आणि डेअरी विकास याला सुद्धा तंत्रज्ञानाच्या मोहिमे सोबत जोडायला सुरुवात झाली होती.
7 वर्षांपूर्वी -
भारतातील निवडणुकीपूर्वी फेसबुक सावध; फेसबुकडून विशेष खबरदारी
जगभरातील मोठ्या लोकशाही देशातील निवडणुकांमध्ये म्हणजे अगदी अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत सुद्धा फेसबुकच्या प्लॅटफॉर्मचा गैरवापर झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. तसेच भारतात सुद्धा त्याचे मोठे पडसाद उमटले होते. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी फेसबुक सावध झालं असून त्यांनी त्यांच्या जगभरातील टीमला सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत.
7 वर्षांपूर्वी -
सोशल मिडीयावर बदनामी, ‘हाताची घडी तोंडावर बोट’ पेजवर गुन्हा दाखल होणार?
एनसीपीच्या वरिष्ठ नेत्यांची ‘हाताची घडी तोंडावर बोट’ या फेसबुक पेजवरून बदनामी केल्या प्रकरणी पुणे पोलीस आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली आहे. या नेत्यांमध्ये खुद्द पक्षाध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे तसेच पक्षातील अनेक वरिष्ठ नेत्यांचा समावेश आहे.
7 वर्षांपूर्वी -
पंतप्रधान राफेल विमान खरेदीबाबत संसदेत एक मिनिट सुद्धा बोलत नाहीत: राहुल गांधी
राहुल गांधी सध्या राजस्थान विधानसभेच्या अनुषंगाने राजस्थान दौऱ्यावर असून त्यांनी विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकल आहे. दरम्यान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर राफेल विमान खरेदीवरून जोरदार हल्ला चढवला असून त्यामागील वास्तव काय ते मोदी संसदेत बोलायचं टाळतात असा घणाघात केला आहे.
7 वर्षांपूर्वी -
भारतीय तंत्रज्ञान क्षेत्रात आयआयटी'चा मोठा वाटा : नरेंद्र मोदी
मुंबई आयआयटी’च्या विद्यार्थ्यांचा संपूर्ण जगभरात डंका आहे. तसेच भारतीय तंत्रज्ञान क्षेत्रात आयआयटीचा मोठा वाटा आहे. भारतातून विद्यार्थी शिक्षण पूर्ण करून जगभरात भारताचे नाव उंचावत आहेत. त्यामुळे मी तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज आयआयटी विद्यार्थ्यांबाबत गौरोद्गार काढले.
7 वर्षांपूर्वी -
गुगलने मला दोनवेळा नाकारल्यानेच फ्लिपकार्ट वेबसाइट उभी राहिली: बिनी बंसल
मी दोनवेळा गुगलला नोकरीसाठी माझा बायोडेटा पाठवला होता, परंतु दोन्ही वेळी मला गुगलने नाकारल होत आणि त्यामुळेच फ्लिपकार्ट वेबसाइट सुरु करू शकलो असं फ्लिपकार्ट’चे संस्थापक बिनी बंसल यांनी बेंगळुरूमध्ये आयोजित एका कार्यक्रमात म्हटलं.
7 वर्षांपूर्वी -
आता ट्रॅफिक पोलिसांना गाडीची कागदपत्रे दाखवण्याची गरज नाही
केंद्रीय परिवाहन मंत्रालयाच्या अध्यादेशानुसार डिजिलॉकर किंवा एम- परिवाहन या अॅपवर तुमच्या वाहनांची मूळ कागदपत्रे अपलोड केल्यास ती अधिकृत समजण्यात येणार आहेत. त्यामुळे तुमची ट्रॅफिक पोलिसांच्या नियमातून सुटका होण्याची शक्यता आहे.
7 वर्षांपूर्वी -
'एक देश, एक निवडणूक' अशक्य: मुख्य निवडणूक आयुक्त
काही महिन्यापासून वन नेशन वन ईलेक्शन’वर चर्चा रंगली असताना स्वतः मुख्य निवडणूक आयुक्त ओमप्रकाश रावत यांनी या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. तसे करायचे झाल्यास आधी राज्यघटनेत दुरुस्ती करावी लागेल तसेच ईव्हीएम’च्या दुप्पट म्हणजे तब्बल ४५ लाख मतदान यंत्र लागतील असं सांगत ‘एक देश, एक निवडणूक’ शक्य नसल्याचं कारण दिल आहे.
7 वर्षांपूर्वी -
देशात तणावाच्या काळात फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम बंदी?
देशात जर कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झालाच तर थेट फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामसारख्या सोशल मीडियांवर बंदी आणण्याचा केंद्र सरकार गांभीर्याने विचार करत असल्याची माहिती आहे. कारण तणावाच्या काळात अफवांचा सुळसुळाट वाढतो आणि अशावेळी परिस्थिती नियंत्रणात राहावी म्हणून केंद्र सरकार यावर गंभीरपणे विचार करत आहे.
7 वर्षांपूर्वी