PEE Power Urinal | आता लघवीपासून होणार वीजनिर्मिती | शास्त्रज्ञांना मिळाले मोठे यश

मुंबई, 31 ऑक्टोबर | भविष्यात मनुष्याच्या लघवीपासून वीज निर्मिती करून तुम्ही घरात हवी तेवढी वीज वापरू शकता. डेली स्टारच्या वृत्तानुसार, शास्त्रज्ञांना मूत्रातून निर्माण होणाऱ्या विजेवर करण्यात आलेल्या संशोधनात मोठं यश प्राप्त झाल्याचं वृत्त आहे. यासोबतच भविष्यात लोकांना सौरऊर्जा आणि पवन ऊर्जेपासून निर्माण होणाऱ्या विजेसोबत, मुत्रापासून निर्माण होणाऱ्या विजेचाही पर्याय मिळेल. ऊर्जेसाठी हा एक खूप स्वस्त (PEE Power Urinal) र्याय असेल.
PEE Power Urinal. In the future, you can use as much electricity as you want in the house by generating electricity from human urine. According to the Daily Star, scientists have made great strides in their research on electricity generated from urine :
Glastonbury Festival:
ब्रिस्टल, यूके येथील संशोधकांच्या पथकाने मानवी मल आणि मूत्रापासून बनविले जाणारे नवीन स्वच्छ ऊर्जा इंधन सेल विकसित केले आहे. हा सेल मानवी मल-मुत्राला विजेमध्ये रूपांतर करू शकतो. असा दावा केला जात आहे की, या सेलपासून बनवलेल्या विजेच्या मदतीने तुम्ही दिवसभर घर उजळून टाकू शकता. रिपोर्टनुसार, हा पी पॉवर प्रकल्प 2 वर्षांपूर्वी Glastonbury Festival सर्वांसमोर दाखवण्यात आला होता.
याठिकाणी शास्त्रज्ञांनी हे सिद्ध केले होते की, मूत्रातून वीज तयार केली जाऊ शकते. यानंतर युरीनपासून वीज बनवून मोबाईल फोन, लाईट, टीव्ही आणि घरे उजळवण्याचे काम सुरू झाले. ब्रिस्टल बायो एनर्जी सेंटरच्या शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार त्यांनी 5 दिवस चाललेल्या या फेस्टिव्हलमध्ये आलेल्या लोकांनी टॉयलेटमध्ये जितकी लघवी केली त्यापासून, ताशी 300 वॅट्स वीज निर्माण करण्यात यश मिळवले. दुसऱ्या शब्दांत, मूत्रापासून बनवलेल्या या विजेच्या मदतीने तुम्ही 10 वॅट क्षमतेचा बल्ब 30 तासांपर्यंत लावू शकता.
डोळ्यांना न दिसणार्या सूक्ष्मजंतूंचा वापर:
शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, या संशोधनात डोळ्यांना न दिसणार्या सूक्ष्मजंतूंचा वापर करण्यात आला. शास्त्रज्ञांनी एक बॉक्स सारखी पेशी सूक्ष्मजंतूंनी भरली. हे सूक्ष्मजंतू गवत, मानवी मूत्र यासह कोणतेही सेंद्रिय पदार्थ खातात आणि त्याचे विजेमध्ये रूपांतर करतात. वीजनिर्मितीनंतर उरलेला अवशेष खत म्हणून वापरता येतो. अहवालानुसार, प्रत्येक व्यक्ती दिवसाला सरासरी 2.5 लीटर लघवीची निर्मिती करते. अशा परिस्थितीत जर कुटुंबात चार लोक असतील तर दररोज सुमारे 10 लिटर लघवी एकत्र होऊ शकते.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: PEE Power Urinal to produce electricity research success to scientist.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं