Koo App | खाजगी कंपनीसाठी मोदी सरकार करतंय मार्केटिंग | सरकारी ई-मेलचा वापर

मुंबई, २७ फेब्रुवारी: गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर आणि केंद्र सरकार यांच्यात चांगलाच संघर्ष पेटला आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आता लवकरच कू (KOO) या अॅपला संपर्कांचं प्रमुख माध्यम बनवण्याच्या तयारीत आहे, अशी माहिती प्रसार माध्यमांना प्राप्त झाली होती. ट्वीटर आणि सरकार यांच्यात शेतकरी आंदोलनावरून वाद सुरू झाला आहे. त्यात ट्विटरने ट्रम्प यांना दिलेल्या दणक्यानंतर मोदी सरकार स्वतःच सतर्क झाले आहेत, कारण तसेच प्रकार करण्यात भाजपचा IT सेल माहीर असून उद्या आपल्याला देखील ट्विटरचा दणका बसल्यास मोठी अपमानित होण्याची घटना घडेल अशी शक्यता भाजपच्या मनात आहे.
त्यामुळे केंद्र सरकार कोणतीही माहिती देण्यासाठी KOO या सोशल मीडियाचा वापर करू शकते. इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालय, रेल्वे मंत्रालयासह अनेक सरकारी विभागांनी या अॅपवर आपलं खातं उघडलं आहे आणि विशेष म्हणजे भाजपच्या आयटी सेलचे सर्व प्रमुख पदाधिकारी Koo वर आले आहेत. भाजपचे अनेक गरळ ओकणारे नेते देखील प्राधान्याने Koo वर रजिस्टर झाले आहेत.
मात्र आता पुढं टप्पा सुरु झाला आहे. कारण स्वतः मोदी केंद्र सरकारच्या अधिकृत इमेलवरून Koo वर येण्यासाठी सामान्य लोकांशी संपर्क करत आहे. ई-मेल मार्केटिंग देखील एक खर्चिक जाहिरातीचा प्रकार आहे. मात्र एखाद्या खाजगी कंपनीसाठी मोदी सरकार स्वतः का मार्केटिंग आणि पैसा खर्च करत आहे असे प्रश्न उपस्थित होऊ लागले. भविष्यात Koo वर अघोषित ताबा मिळविण्याचा हा प्रयत्न तर नाही ना अशी शंका उपस्थित होऊ लागली आहे. त्यामुळे उद्या Koo चा शंभर टक्के स्वतःच्या राजकीय हितासाठी वापर झाल्यास आश्चर्य वाटायला नको असंच म्हणावं लागले.
News English Summary: The central government can use KOO social media to provide any information. Several government departments, including the Ministry of Electronics and IT, the Ministry of Railways, have opened their accounts on the app, and in particular, all the top officials of the BJP’s IT cell have come to Koo. Many BJP leaders have also registered on Koo.
News English Title: The central government can use KOO social media to provide any information news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं