Vodafone Idea 5G | VI ची 5G सर्विस भारतात लॉन्च; तुमच्या शहराचे नाव 'या' यादीमध्ये आहे की नाही चेक करा

Vodafone Idea 5G | वोडाफोन आयडिया 5G सर्विसची प्रतीक्षा भारतातील VI सिमकार्ड वापरकर्ते करत आहेत. आता ग्राहकांना कोणत्याही प्रकारची वाट पहावी लागणार नाही आहे कारण की, VI ने आपली 5G सर्विस सुरू केली आहे. वोडाफोन आयडियाने 2 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. माध्यमांकडून मिळालेल्या अहवालानुसार भारतातील एकूण 17 शहरांमध्ये वोडाफोन आयडियाची 5Gb लाईव्ह सर्विस सुरू करण्यात आली आहे.
केवळ मुंबईच नाही तर, दिल्ली, कोलकत्ता त्याचबरोबर कर्नाटकमध्ये देखील 5G सेवा सुरू केली आहे. या सेवेमुळे वोडाफोन ग्राहक अत्यंत आनंदी आहेत. कारण की त्यांना आता फास्ट नेटवर्किंगचा अनुभव घेता येणार आहे. त्याचबरोबर ग्राहकांना 5G कनेक्टिव्हिटीसह प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅन देखील मिळणार आहेत.
Vodafone Idea 5G :
माध्यमांकडून मिळालेल्या अहवालानुसार हे स्पष्ट चालू आहे की, 2025 म्हणजेच येत्या नव्या वर्षात सर्वच VI ग्राहकांना 5G सेवेचा लाभ घेता येणार आहे. परंतु कंपनीने नववर्ष सुरू होण्याआधीच केवळ 17 शहरांमध्ये आपली जलद 5G सेवा सुरू केली आहे. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सेवेमध्ये येण्यासाठी ग्राहकाला सर्वप्रथम 475 रुपयांचा रिचार्ज प्लॅन ऍक्टिव्ह करावा लागेल. एवढंच नाही तर कंपनीच्या पोस्टपेड ग्राहकांना देखील 1101 रुपयांचा प्लॅन घ्यावा लागेल.
5G शहरांच्या यादीत तुमच्या शहराचे नाव आहे का पहा :
1. पंजाब : जालंदर कोट-कलान
2. हरियाणा : कर्नाल, औद्योगिक क्षेत्र, सेक्टर 3
3. केरळ : थ्रीक्काकडा, काकनाड
4. कर्नाटक : बेंगळुरू – डेअरी सर्कल
5. पश्चिम बंगाल
6. बिहार : पाटणा- अनिशाबाद गोलांदर
7. मध्यप्रदेश इंदूर : इलेक्ट्रॉनिक कॉम्प्लेक्स, परदेशी पुरा
8. उत्तर प्रदेश पूर्व : लखनौ – विभूती खंड, गोमती नगर
9. उत्तर प्रदेश : आग्रा – जेपी हॉटेल जवळ फतेहाबाद रोड
10. गुजरात : अहमदाबाद – दिव्य भास्कर जवळ, कार्पोरेट रोड, मकरबा, प्रल्हाद नगर
11. आंध्र प्रदेश : हैदराबाद – एडा उपल, रंगा रेड्डी
12. महाराष्ट्र : पुणे – शिवाजीनगर
13. मुंबई : वरळी मरोळ अंधेरी पूर्व.
14. राजस्थान : जयपुर गॅलेक्सी सिनेमा, मानसरोवर औद्योगिक क्षेत्र, RIICO
15. कोलकत्ता : सेक्टर 5 त्याचबरोबर स्लॉट लेक
16. दिल्ली : ओखला इंडस्ट्रियल एरिया फेज 2, इंडिया गेट, प्रगती मैदान.
Latest Marathi News | Vodafone Idea 5G Sunday 29 December 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं