कल्याण-डोंबिवलीकरांचे ६५०० कोटी आलेच नाहीत; आता ठाणेकरांवर गाजरांची खैरात?

ठाणे शहर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सध्या राज्यभर सभांचा सपाटा लावला असून त्यांच्या दिवसाला ३-४ सभा नियोजित असल्याचं कळतं. मात्र अनेक ठिकाणच्या आयोजकांनी सभेसाठी मागवलेल्या खुर्च्या देखील भरत नसून त्यांच्या सभेकडे लोंकांनी पाठ फिरवल्याचे दिसत आहे. प्रसार माध्यमांचे कॅमेरे सभेतील केवळ स्टेजचं चित्रीकरण करत असल्याने इतर वास्तव समोर येत नसल्याचं निर्दशनास येतं आहे.
तसाच काहीसा प्रकार ठाण्यातील सभेत पाहायला मिळाला आहे. भाजपचे ठाणे शहर येथील आमदार संजय केळकर यांच्या प्रचाराच्या निमित्ताने भाजपने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा आयोजित केली होती. मात्र यावेळी २००-३०० खुर्च्या देखील भरल्या नव्हत्या असं चित्र पाहायला मिळालं. विशेष म्हणजे खुर्च्या मोठ्या प्रमाणात मागविण्यात आल्या होत्या. मात्र स्थानिक मतदारांनी या सभेकडे पाठ फिरवल्याने आणलेल्या खुर्च्या तशाच थर लावून बाजूला ठेवण्यात आल्याचं दिसत होतं.
दरम्यान, मागील विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण-डोंबिवली शहराला तब्बल ६५०० कोटी रुपये देण्याचं आमिष दाखवलं होतं. मात्र २०१९ पर्यंत ते वचन हवेतच विरलं असून आता मुख्यमंत्र्यांनी २०१९ मधील विधानसभा निवडणुकीत ठाणेकरांना विकासाचं गाजर दाखवलं आहे. वाढत्या शहरीकरणामुळे वाहतूक कोंडीचा सामना करणाऱ्या ठाणेकरांसाठी ठाणे ते बोरीवली रोप-वे प्रकल्प आराखडा तयार करण्यात आला असून ३० मिनिटांत हे अंतर कापलं जाणार आहे. याचबरोबर जलवाहतूक, भुयारी मार्ग, मेट्रोचे जाळे, कोस्टल मार्ग आणि अवजड वाहनांची शहराबाहेरून वाहतुकीची योजना या माध्यमातून ठाणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करणार आहोत तर एसआरए योजनेत मुंबईच्या धर्तीवर ठाण्यातही ३०० चौरस फुटाचे घर देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाणे शहरातील प्रचारादरम्यान केली आहे. त्यामुळे जे वचन कल्याण डोंबिवलीतील लोकांना २०१४ मध्ये दिलं गेलं जे आजही अधांतरीच आहे आणि त्यात आता ठाणे शहराला देण्यात आलेल्या नव्या आमिषांचा चर्चा रंगली आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं