बोलावं रे त्यांना स्टेजवर; महिलांच्या खात्यातील २ कोटी २५ लाख लंपास करणाऱ्यांची पोलखोल होणार?

ठाणे: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रचाराला सुरुवात केल्यापासून अनेकांना अपेक्षा आहे ती राज ठाकरे यांच्या जाहीरपणे एखाद्याची पोलखोल करण्याची. काही टीव्ही वृत्त वाहिन्यांना देखील त्यांनी तसे संकेत दिले आहेत. लाव रे व्हिडिओ होणार किंवा नाही याचं सांगता येत नसलं तरी, ठाणे शहरात ‘बोलाव रे त्यांना स्टेजवर’ होण्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे.
कारण मनसेचे ठाणे शहर येथील अधिकृत उमेदवार अविनाश जाधव यांच्या हातात तसे पुरावेच लागले आहेत आणि त्यासंबंधित व्हिडिओ देखील त्यांनी शेअर केला असून, ठाणे शहरातील राज ठाकरे यांच्या सभेबाबत काही सूतोवाच देखील दिले आहेत. कारण २०१४ मधील मोदी लाटेत विधानसभा निवडणुकीची लॉटरी लागलेले भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार संजय केळकर यांच्याशी हा विषय संबंधित असल्याने त्यांची जाहीर सभेत पुराव्यानिशी पोलखोल होण्याची शक्यता आहे.
विधानसभा निवडणुकीमध्ये ठाणे शहर मतदारसंघामधून भारतीय जनता पक्षाचे विद्यमान खासदार संजय केळकर आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमदेवार अविनाश जाधव यांच्यामध्ये चुरशीची लढत होणार आहे. काही दिवसांपूर्वी संजय केळकर यांच्यासाठी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सभा घेतली खरी, पण या सभेकडे लोकांनी पाठ फिरवल्याने सभेतील खाली खुर्चाचें व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाले होते आणि हवेचा प्रवाह भाजपाला निदर्शनास आला होता.
मात्र आता मनसेचे अविनाश जाधव यांनी भाजपचे विद्यमान आमदार संजय केळकर यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. पंतप्रधान मोदींनी सुरु केलेल्या केंद्र सरकारच्या स्कील इंडिया योजनेअंतर्गत महिलांच्या नावावर आलेल्या २ कोटी २५ लाख रुपयांचा भ्रष्टाचार भारतीय जनता पक्षाच्या आमदाराने केल्याचा आरोप अविनाश जाधव यांनी केला आहे. या योजनेच्या नावाखाली अनेक महिलांची फसवणूक झाल्याचा आरोप करणाऱ्या महिलांचा एक व्हिडिओ समाज माध्यमांवर पोस्ट करण्यात आला आहे.
शहरातील मनोरमा नगर आणि ठाण्यातील इतर भागातील तब्बल ३,००० महिलांचे नाव स्थानिक भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी स्कील इंडिया या केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत नोंदवून घेतले आणि बँकेमध्ये त्यांच्या नावाने खाती सुरु करण्यात आली. या महिलांना ३ दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर या महिलांच्या बँक खात्यावर ७,५०० रुपये जमा झाले. परंतु, दुसऱ्याच दिवशी हे ७,५०० रुपये बँक खात्यातून अचानक गायब झाले असा आरोप या महिलांनी केला आहे. ‘अनेकदा या महिला भारतीय जनता पक्षाचे स्थानिक आमदार संजय केळकर यांच्याकडे गेल्या तेव्हा त्यांनी तुम्ही आणि ते आपआपसात मिटवा असं सांगितलं. पण केंद्र सरकारने सुरु केलेल्या या योजनेचा एक रुपयाही या महिलांना मिळाला नाही,’ असा आरोप विनाश जाधव यांनी केला आहे.
‘भारतीय जनता पक्षाचे स्थानिक पदाधिकारी आले त्यांनी मोदी तुम्हाला उद्योग सुरु करायला मदत करतील असं सांगत स्कील इंडिया योजनेखाली आम्हाला ३ दिवसांचे प्रशिक्षण दिले. मी स्वत: हजार महिलांना गोळा केले. आम्ही सर्वांनी बँकेत खाते सुरु केले. काहींना घरी पासबुक आले तर काहींनी पोस्टाने आले. महिलांना पैसे आले आणि एका रात्रीत ते पैसे गायब झाले. त्या महिलांना मी पैसे खाल्ले असं वाटलं. मी आमदार संजय केळकर यांच्याकडे गेलो तर त्यांनी मला यातलं काही माहित नाही असं उत्तर दिल्याचे या महिला व्हिडिओमध्ये सांगताना दिसतात. भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांने आमच्याकडे सह्या करुन घेतल्याचेही या महिलांनी व्हिडिओमध्ये सांगतले आहे. ‘पदाधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे हे जर प्रशिक्षणाचे पैसे असतील तर ते थेट संबंधितांकडे जायला हवे होते. पण आमच्या खात्यावर येऊन ते पैसे अचानक गायब झाले म्हणजे त्यांनी आमचे पैसे खाल्ले आहेत,’ असा आरोप या महिलांनी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर केला आहे.
भारतीय जनता पक्षाकडून ठाण्यात झालेला हा सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार अविनाश जाधव यांनी केला आहे. “सरकारी योजनेअंतर्गत तब्बल ३,००० महिलांच्या खात्यावर आलेले प्रत्येकी ७,५०० रुपये काढून घेण्यात आले. या महिलांसहीत पोलीस स्थानकात जाऊन या प्रकरणात मी तक्रार दाखल करणार आहे,” असं जाधव यांनी व्हिडिओमध्ये म्हटलं आहे. तसेच ‘तुमच्या हक्काचे पैसे तुम्हाला मिळवून देईल हा माझा शब्द आहे’ असं आश्वासन जाधव यांनी या महिलांना दिलं आहे. दरम्यान, १९ तारखेला ठाण्यात होणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सभेत या महिलांची भेट राज ठाकरेंशी घडवून देणार आहेत. “राज ठाकरेंसमोर तुम्ही १९ तारखेला आपले म्हणणे मांडा,” असंही अविनाश जाधव यांनी या महिलांना सांगितलं आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं