डोंबिवली स्टेशन: भाजप कार्यकर्त्यांच्या ‘भारत माता की जय’ घोषणा; मतदार 'आधी खड्डे बुजवा'

डोंबिवली: सध्या विधानसभा निवडणुकीचा भारतीय जनता पक्षाचा प्रचार पाहिल्यास त्यात केवळ भावनिक मुद्दे महत्वाचे करण्यात आले आहेत. मात्र त्यात सामान्यांच्या मूळ समस्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आल्याचे स्पष्ट दिसते. बेरोजगारी, महागाई, शेतकरी आत्महत्या, महिलांवरील अत्याचार अशा एक ना अनेक गंभीर विषयांवरून सामान्य माणूस संतप्त असताना भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी केवळ भावनिक मुद्दे पुढे रेटून लोकांच्या संतापाला अजून वाट करून देत आहे असेच म्हणावे लागेल.
दरम्यान अमित शहा यांच्या बीडमधील पहिल्या प्रचार सभेत त्याचा प्रत्यय आला आणि संपूर्ण भाजप मूळ विषयांवरून मतदाराला दूर लोटल्यासाठी भावनिक मुद्द्याचं अस्त्र पुन्हा उगारणार हे पुन्हा सिद्ध झालं आणि राज्यातील नेत्यांनी देखील प्रचारात तोच कार्यक्रम सुरु ठेवल्याचे समजते. राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी बुधवारी सकाळी डोंबिवली रेल्वे स्थानकात अवतरलेल्या भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना प्रवाशी मतदारांकडून विविध प्रश्नांवर खडे बोल ऐकण्याची वेळ आली आणि सामान्य डोंबिवलीकरांनी भाजप नेत्यांची तोंड बंद केल्याचे पाहायला मिळाले.
महायुतीचे अधिकृत उमेदवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासोबत मोठ्या लवाजम्यासह स्थानकात आलेले भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ च्या घोषणा देत उमेदवाराचे परिचय पत्रक प्रवाशांना वाटत होते. हे प्रचार पत्रक स्वीकारताना शहरातील वाहन कोंडी, पडलेले खड्डे, स्थानक परिसरातील फेरीवाले या प्रश्नांवरून प्रवाशांकडून कार्यकर्त्यांवर प्रश्नांची अक्षरश: सरबत्ती सुरू होती आणि त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांचे चेहरे पाहण्यासारखे झाले होते.
डोंबिवली शहरात खड्डे, वाहतूक कोंडी आणि विजेच्या लपंडावामुळे नागरिक अक्षरश: त्रस्त आहेत. भारतीय जनता पक्षाचे बडे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीच मध्यंतरी डोंबिवलीचा उल्लेख घाणेरडे शहर असा केल्यामुळे स्थानिक नेत्यांना घरचा आहेर मिळाला होता. मागील काही दिवसांपासून कल्याण, डोंबिवली ही शहरे चहुबाजूंनी कोंडीत सापडली आहे. कोपर पूल, पत्री पुलाची कामे रखडल्याने या कोंडीत दिवसागणिक भर पडत असून नागरिकांचे अतोनात हाल सुरू आहेत. डोंबिवली औद्योगिक पट्टय़ातील प्रदूषणाचा प्रश्नही ऐरणीवर असून या पाश्र्वभूमीवर यंदा होणारा निवडणूक प्रचार रंगतदार अवस्थेत येऊन पोहोचला आहे. असे असताना विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी गल्लोगल्ली फिरणाऱ्या नेत्यांवर नागरिकांकडून प्रश्नांची सरबत्ती होताना दिसत आहे. बुधवारी सकाळी प्रचारासाठी डोंबिवली स्थानकात अवतरलेल्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांसह कार्यकर्त्यांनाही नागरिकांच्या त्रस्त प्रतिक्रियांचा अनुभव आला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं